Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

आ. निम्हणांना आव्हान कुणाचे?

$
0
0
उमेदवार शोधण्यापासून सतत चर्चेत राहिलेल्या शिवाजीनगर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या काँग्रेसच्या दोन बंडखोर उमेदवारांसह पाच उमेदवारांनी गुरुवारी माघार घेतली.

आता लढाईचा खरा खणखणाट

$
0
0
नेत्यांच्या झंझावाती सभा, विरोधकांवर आरोप-प्रत्यारोप, नेते-अभिनेत्यांचे रोड शो आणि मते खेचण्यासाठी ‘साम-दाम’ या अस्त्रांसह विधानसभा निवडणुकांच्या खऱ्या लढाईला बुधवारपासून सुरूवात झाली आहे.

आघाडी सरकारचे नेतृत्व अहंकारी

$
0
0
राज्यातील आघाडी सरकारच्या नेतृत्वामध्ये असलेल्या अहंकारामुळे सर्वसामान्य जनता सर्वाधिक त्रस्त आहे. ही जनता भाजपकडे समर्थ पर्याय म्हणून आशेने बघत आहे. विकासाबरोबरच या नागरिकांचे अधिकार परत मिळवून देण्यासाठी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने झटले पाहिजे, असे आवाहन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केले.

अजितदादांना घेरण्याचा डाव उधळला

$
0
0
धनगर समाजाच्या आरक्षणाचा लढा, ऊसदरासाठी शेतकरी संघटनेने केलेले आंदोलन, दुष्काळी बावीस गावांच्या पाणी योजनेमुळे असलेली नाराजी, मासाळवाडी गावात केलेली दमबाजी आणि धरणांतील पाणीसाठ्यावरून केलेले वादग्रस्त वक्तव्य... अशा अनेक मुद्द्यांवर अजित पवार यांना त्यांच्या बारामती विधानसभा मतदारसंघातच घेरण्याचा विरोधकांचा व्यूह भाजप-शिवसेना युती तुटल्यानंतर उधळला आहे.

१३ तास... क्लिक आणि वूल्वरिन!

$
0
0
नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्ट आणि वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमानं वन्यजीव सप्ताहानिमित्त पाच ते सात ऑक्टोबरदरम्यान विक्रम पोतदार यांच्या छायाचित्रांचं प्रदर्शन आयोजिण्यात आलं आहे.

येरवड्यातील कैद्यांनी केली काश्मीर पूरग्रस्तांना मदत

$
0
0
जम्मू-काश्मीरमध्ये पुरामुळे झालेली दाणादाण पाहून येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांमधील माणूस जागा झाला. काही तरी मदत करावी, या भावनेतून त्यांनी जेलमध्ये राबून कमावलेले एक लाख ८० हजार रुपये ‘पंतप्रधान मदत निधी’ला देण्याचा निर्णय घेतला आहे.

शहरात दोन ठिकाणी दोन मतदानयंत्रे

$
0
0
उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत समाप्त झाल्यानंतर शहरातील दोन आणि जिल्ह्यातील पाच अशा सात मतदारसंघांमध्ये पंधरापेक्षा अधिक उमेदवार रिंगणात राहिल्याने येथे प्रत्येकी दोन मतदानयंत्रे ठेवावी लागणार आहेत.

‘कप-बशी’ मिळाली पीरन शेलारांना

$
0
0
शिवाजीनगर मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या १८ उमेदवारांपैकी सहा इच्छुकांनी ‘कप-बशी’ हे चिन्ह मागितल्याने बुधवारी एकच गोंधळ उडाला. अखेर निवडणूक निर्णय अधिकारी धनाजी पाटील यांनी चिठ्ठी पद्धतीचा वापर केल्याने हा तिढा सुटला.

पर्वतीत काँग्रेससाठी प्रतिष्ठेची लढत

$
0
0
पर्वतीमध्ये खरी लढत ही भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये होण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसचे शहराध्यक्ष येथून लढत असल्याने काँग्रेससाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेची खरी कसोटी पर्वतीमध्ये लागणार आहे.

कॅन्टोन्मेंटमधील तिढा सुटला

$
0
0
पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचा तिढा अखेर सुटला असून, आरपीआयचे उमेदवार नवनाथ कांबळे यांनी माघार घेतल्याने भाजपचे माजी मंत्री दिलीप कांबळे हे भाजप-आरपीआय युतीचे उमेदवार असणार आहेत.

महिला अत्याचाराचे हॉस्पिटलमध्येही ‘ट्रॅकिंग’

$
0
0
कौटुंबिक हिंसाचार अथवा बलात्कारासारख्या महिला अत्याचाराच्या घटनांची माहिती मिळविण्यासाठी आता पोलिस ठाणे, स्वयंसेवी संस्थांबरोबर आता राज्यातील सर्व सरकारी हॉस्पिटलमध्येही ‘ट्रॅकिंग’ करण्यात येणार आहे.

एक हजार मतदान केंद्रे पहिल्या मजल्यावर

$
0
0
शहर व ग्रामीण भागातील तब्बल १ हजार ५९ मतदान केंद्रे इमारतींच्या पहिल्यावर असल्याने वृद्ध, अपंग व आजारी मतदारांसाठी खुर्चीची सोय करण्यात येणार आहे. या ठिकाणी कर्मचारी नेमून अशा मतदारांना केंद्रांपर्यंत मतदानासाठी नेण्यात येणार आहे.

अजित वाडेकर यांना अथश्री जीवन गौरव

$
0
0
जागतिक जेष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून अथश्री फाउंडेशन आणि परांजपे स्कीम्सतर्फे यंदा भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांना अथश्री जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

राष्ट्रवादीला सापडेना ‘व्होटबँक’

$
0
0
लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेले प्रचंड मताधिक्य आणि गेल्या तीन निवडणुकांतील काँग्रेसशी असलेली आघाडी तुटल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासमोर शहरात आपली स्वतःची व्होटबँक निर्माण करण्याचे मोठे आव्हान ठेपले आहे.

निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच समिती सभापतीपदांचे वाटप

$
0
0
विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषदेच्या विविध समित्यांच्या सभापतीपदांचे वाटप केल्याचे गुरुवारी पाहायला मिळाले. शिरूर, पुरंदर आणि भोर-वेल्हा-मुळशी या मतदार संघातून विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या, मात्र पक्षाने तिकीट न दिलेल्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न या निवडीद्वारे करण्यात आला.

पालिकेला मिळणार ४० कोटी

$
0
0
मुद्रांक शुल्कावर स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) एक टक्का अधिभारापोटी पालिकेला ४० कोटी रुपये देण्याचे आदेश राज्य सरकारने नुकतेच दिले आहेत. नव्या आर्थिक वर्षातील एप्रिल ते जून या पहिल्या तीन महिन्यांतील थकबाकी यामुळे पालिकेच्या तिजोरीत जमा होऊ शकणार आहे.

‘आरपीआय’च्या युतीवरून संभ्रम मतदारांचा गोंधळ

$
0
0
वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांचे उमेदवार एकमेकांपुढे उभे ठाकल्याने राज्यामध्ये असलेल्या त्यांच्या युतीवरच प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

राष्ट्रवादी- काँग्रेस युती पालिकेत कायमच

$
0
0
राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत फाटाफूट झाली असली, तरी याच कारभाऱ्यांच्या ताब्यात असलेल्या पुणे पालिकेतील सत्तेचा फैसला निवडणुकीनंतर प्रदेश काँग्रेसतर्फे घेतला जाण्याची शक्यता आहे.

पिंपरीत बसणार काँग्रेसला धक्का?

$
0
0
शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील काही आजी-माजी नगरसेवक आणि पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी काँग्रेसला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे समजते. आघाडी तुटल्यानंतर निवडणुकीच्या तोंडावर आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीने काँग्रेसला धक्का देण्याचे मनसुबे आखल्याचे बोलले जात आहे.

राज्यातील भाऊबंदकी आमने-सामने

$
0
0
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्ष स्वबळावर रिंगणात उतरले आहेत. राज्यातील युती व आघाडीत बिघाडी झाल्याने काही ठिकाणी भाऊबंदकी एकमेकांविरोधात उभी ठाकली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images