Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘भवरा’ आणि ‘फोटू’नं केलं अंतर्मुख

$
0
0
‘भवराच तो. फिर फिर फिरणार. इकडे-तिकडे उड्या मारणार आणि मग स्वतःच बनविलेल्या खड्ड्यात गप जाऊन पडणार,’ या ओळी प्रेक्षकांच्या मनाला भिडल्या आणि व्यवस्थेमुळे पिचल्या गेलेल्या, व्यक्त होण्याचं स्वातंत्र्यही नसलेल्या सामान्य माणसाची व्यथा मांडणारी ‘भवरा’ ही एकांकिका दाद घेऊन गेली. डोंबाऱ्याचं आयुष्य दाखविणारी ‘फोटू’ ही एकांकिका प्रेक्षकांना अंतर्मुख करणारी ठरली.

सेवाकर बुडविणाऱ्या ठेकेदारांच्या चौकशीचे आदेश

$
0
0
गेल्या चार वर्षांत सुमारे ४५ कोटींची सेवाकरासह बिले महापालिकेने मंजूर केली. मात्र, ठेकेदारांनी सेवाकर सरकारकडे भरला नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारांची चौकशी करून त्यांच्याकडून सेवाकर वसूल करण्याचे आदेश पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी दिले आहेत.

‘सीए’ पेपरतपासणीवर विद्यार्थ्यांकडून आक्षेप

$
0
0
‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’तर्फे (आयसीएआय) देशभरात घेतल्या जाणाऱ्या सीएच्या परीक्षांमधील पेपर तपासणीविषयी विद्यार्थी आणि शिक्षकांकडूनही आक्षेप घेण्यात आले आहेत.

भाईचंद रायसोनी पतसंस्थेच्या ठेवीदारांसाठी समन्वय समिती

$
0
0
भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेच्या (बीएचआर) ठेवीदार आणि खातेदारांना त्यांच्या अडकलेल्या ठेवी मिळवून देण्यासाठी ठेवीदार समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे.

नवरात्रीनिमित्ताने किराणा दुकानात वरईची तपासणी

$
0
0
नवरात्रीनिमित्ताने उपवासासाठी भेसळमुक्त वरई (भगर) नागरिकांना मिळावी यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अन्न विभागाने मार्केट यार्डासह शहरातील घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांकडे वरईची तपासणी मोहीम हाती घेतली आहे.

वीजबिलांचा भरणा दंडासह ऑनलाइन करण्याची सुविधा

$
0
0
वीजबिले भरण्याची मुदत संपल्यानंतरही ग्राहकांना आता दंडासह वीजबिलांचा भरणा ऑनलाइन करण्याची सुविधा महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांची सोय होणार आहे.

मित्र झाले शत्रू

$
0
0
युती आणि आघाडीचे परंपरागत मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागांत सर्वच पक्ष स्वबळावर लढणार असल्याने सर्वच गणिते आता बदलणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून मैत्रीच्या आणाभाका घेऊन एकत्र लढलेल्यांनाच आता समोरच्या मित्रांशी दोन हात करण्याची तयारी ठेवावी लागणार आहे.

वडील-मुलाच्या भांडणातून गोळीबार

$
0
0
घरात वाद झाला म्हणून पिस्तुलातून हवेत पाच गोळ्या झाडून राग व्यक्त करणाऱ्या विटभट्टी चालकाविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मुलानेच वडिलांविरुद्ध तक्रार दाखल केली असून, हडपसर पोलिसांनी वडिलांना अटक केली आहे. हा प्रकार आकाशवाणी येथे गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडला.

… आता होऊन जाऊ द्या!

$
0
0
एकीकडे भाजप-शिवसेना यांच्यात काडीमोड आणि दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची फारकत झाल्याने शहरातील सर्वच लढतींचे चित्र अखेरच्या टप्प्यात अचानक बदलून गेले आहे.

मूक-बधिरांसाठी अनोखी सहल

$
0
0
मूक-बधिर व्यक्तींसाठी एखादे संग्रहालय केवळ पाहण्यापुरते मर्यादीत राहते. कारण, संग्रहालयाची माहिती देणाऱ्यांना मूक-बधिरांसाठीची साइन लँग्वेज येईलच असे नाही. मूक-बधिर व्यक्तींची हीच अडचण विचारात घेत त्यांना त्यांच्याच साइन लँग्वेजमधून संग्रहालयांची माहिती दिली तर...

दहावी, बारावीची परीक्षा आजपासून

$
0
0
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने सप्टेंबर/ऑक्टोबरमध्ये घेण्यात येणारी दहावी आणि बारावीची परीक्षा आजपासून (२६ सप्टेंबर) सुरू होत आहे. दहावीची परीक्षा ११ ऑक्टोबरपर्यंत, तर बारावीची परीक्षा २० ऑक्टोबरपर्यंत आहे.

ध्येय... ५० हजार मतांचे !

$
0
0
शहरातील सर्वच विधानसभा मतदारसंघात साधारणतः तीन ते साडेतीन लाख मतदार असून, युती-आघाडीच्या काडीमोडामुळे आगामी निवडणुकीत ५० हजार मतांचा टप्पाही विजयश्री खेचून आणण्यासाठी पुरेसा ठरू शकणार आहे. त्यामुळे, मित्रपक्षाची साथ नसताना, ही मजल कशी मारायची यासाठीचे नियोजन आता सर्व पक्षांना करावे लागणार आहे.

पक्षांतरांच्या चर्चेला आता उधाण

$
0
0
गेले अनेक दिवस सुरू असलेले चर्चेचे गुऱ्हाळ समाप्त होऊन युती आणि आघाडीमध्ये फारकत झाल्यानंतर शहरात संभाव्य उमेदवारी आणि पक्षांतराच्याही चर्चा रंगू लागल्या आहेत.

निम्हण कुटुंबीयांकडे २१ कोटी

$
0
0
शिवाजीनगर मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविणारे आमदार विनायक निम्हण यांच्या कुटुंबीयांकडे २१ कोटी ५६ लाख रुपयांची मालमत्ता असून पन्नासहून अधिक ठिकाणी निम्हण यांच्याकडे १०० हेक्टरपेक्षा अधिक जमीन आहे.

नवरात्र मंडळांवर ‘क्लोज वॉच’

$
0
0
विधानसभा निवडणुकांचे पडघम जोरात वाजू लागल्याने नवरात्र उत्सव मंडळांचीही ‘दिवाळी’ सुरू झाली आहे. या मंडळांवर आचारसंहितेचे पालन करण्याची जबाबदारी वाढली असून निवडणूक यंत्रणांकडून त्यांच्यावर ‘क्लोज वॉच’ ठेवण्यात येणार आहे.

वादळी चर्चेने गाजणार विद्यापीठ सिनेटची बैठक

$
0
0
पीएचडीची लांबलेली प्रवेश प्रक्रिया, कॉलेजांमधून होणारी बेकायदा पार्किंग शुल्काची वसुली आणि विद्यापीठाच्या पदाधिकाऱ्यांच्या आक्षेपार्ह कार्यशैलीबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आज (शनिवारी) होणाऱ्या सिनेट बैठकीमध्ये वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.

बारामती होस्टेल दणाणले!

$
0
0
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपण्याच्या आदल्या दिवशीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुण्यातील एकाही मतदारसंघात अधिकृत उमेदवार जाहीर न केल्याने इच्छुकांनी बारामती होस्टेलमध्ये शुक्रवारी सायंकाळी गर्दी केली.

राज्य भ्रष्टाचारमुक्त करणार

$
0
0
स्वबळावर विधानसभा जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरताना जोरदार शक्तिप्रदर्शन केले. खासदार सुप्रिया सुळे, पार्थ आणि जय या दोन्ही मुलांच्या उपस्थितीत जोरदार फेरी काढून अर्ज दाखल केला.

जगतापांचा BJP कडून अर्ज

$
0
0
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आज (शनिवार‌) आहे, तरीही कोणत्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरणार याबाबत आमदार विलास लांडे यांनी मौन बाळगले आहे. त्यांनी उमेदवारीसाठी भारतीय जनता पक्षाकडे लावलेली ‘फिल्डिंग’ अयशस्वी ठरण्याची शक्यता आहे.

पर्यटनात सातारा आघाडीवर

$
0
0
आपल्या घरातच पर्यटकांचे स्वागत करण्याच्या न्याहारी निवास योजनेत पुणे विभागातच दस्तुरखुद्द पुणेकरांना मागे टाकून सातारकरांनी बाजी मारली आहे. दुसरीकडे, सांगली-सोलापूरकरांनी मात्र या योजनेत आजिबातच रस दाखविलेला नाही.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images