Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

सर्वोत्कृष्ट नाटकांसाठीचे पुरस्कार जाहीर

$
0
0
येथील 'सलाम पुणे' या सांस्कृतिक क्षेत्रातील मैत्रीपूर्ण संस्थेने यंदाच्या रंगभूमीदिन समारंभात देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची आज येथे घोषणा केली.

जखमीला फेकणाऱ्या रिक्षाचालकाला शिक्षा

$
0
0
रिक्षाची धडक बसून जखमी झालेल्याला हॉस्पिटलात दाखल करण्याऐवजी फेकून दिल्याप्रकरणी रिक्षाचालकाला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. जखमी झालेल्या पादचाऱ्याचा या घटनेत मृत्यू झाला. सत्र न्यायाधीश आर. एस. पांढरे यांच्या कोर्टाने हा निकाल दिला.

एमबीए अभ्यासक्रमात जर्मनी दौरा झालाच नाही

$
0
0
एमबीए अभ्यासक्रमात जर्मनीला नेण्यासाठी तब्बल दोन लाख ४० हजार रुपये फी घेऊनही प्रत्यक्षात अभ्यासक्रमच न शिकविल्याप्रकरणी इंटरनॅशनल बिझनेस स्कूलला ग्राहक न्यायमंचाने दणका दिला आहे. विद्यार्थ्यांची फी परत करण्याचा, तसेच पाच हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश मंचाने दिला आहे.

घटस्थापनेसाठी सर्वोत्तम मुहूर्त १० पर्यंतच

$
0
0
आश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजेच नवदुर्गांच्या उत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. यावर्षी प्रतिपदा दुपारी १ वाजून २२ मिनिटांनी संपणार असल्याने घटस्थापनेसाठी सकाळी सूर्योदय म्हणजेच ६.२९ ते १० हाच सर्वोत्तम मुहूर्त आहे, अशी माहिती 'शारदा ज्ञानपीठम'चे संस्थापक पं. वसंतराव गाडगीळ यांनी दिली.

कॉल सेंटरमधील तरुणींशी अश्लील संभाषण भोवले

$
0
0
वडगाव शेरी येथील कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुणींशी अश्लील संभाषण आणि विनयभंग करणाऱ्या कंपनीच्या व्यवस्थापकासह चार अधिकाऱ्यांना येरवडा पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली. मागील काही महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याचे तक्रारदार तरुणींनी फिर्यादीत म्हटले आहे.

पुजाऱ्याच्या घरी दरोडा

$
0
0
दिघी-आळंदी रस्त्यावरील श्री व्यंकटेश बालाजी देवस्थान ट्रस्टच्या मंदिरातील पुजाऱ्याच्या घरी बुधवारी पहाटे ५ ते ६ दरोडेखोरांनी हल्ला चढवला. त्यात देवाचे दागिने व रोकड असा साडेचार लाखांचा ऐवज लुटून नेला.

डॉ. गौतम भोंग यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्याला बगल

$
0
0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य डॉ. अरुण अडसूळ यांच्या रिक्त झालेल्या जागेवर नवीन नेमणूक करण्याबाबतच्या खलबतांना आता जोर चढला आहे.

साहित्य परिषदेच्या सभेत वादंग

$
0
0
आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप व पदाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारावरून झालेल्या वादविवादांमुळे महाराष्ट्र साहित्य परिषदेची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी गाजली. घुमानच्या संमेलनाला प्रकाशकांचा असलेला विरोध, सातारा शाखेच्या कार्यक्रमांची माहती यावरूनही परिषदेत खडाजंगी झाली.

मंगळयान मोहिमेनंतर पुणेही झाले ‘मंगलमय’

$
0
0
चौकाचौकांत होणारा भारतीय शास्त्रज्ञांचा गौरव... विविध संस्था-संघटनांकडून होणारे मिठाई वाटप... कुठे होत होते एकमेकांचे अभिनंदन, तर कुठे होता देशभक्तीपर घोषणांचा जल्लोष...

मंगळावरील जीवनाच्या शक्यतांचा शोध सुरू

$
0
0
‘इतर ग्रहांवरील वातावरणाच्या तुलनेत मंगळ आणि पृथ्वीवरील वातावरणात काही महत्त्वाच्या बाबींमध्ये साधर्म्य आढळले. मंगळाच्या वातावरणात असणारे कार्बन डायऑक्साइडचे मोठे प्रमाण शास्त्रज्ञांना वारंवार या ग्रहाचा विचार करण्यास भाग पाडत आहे.

माळीणमधील बैलपोळा दु:खात

$
0
0
माळीण... जगाच्या नकाशावरुन दीड महिन्यांपूर्वी नामशेष झालेले गाव, जिथे भाद्रपद पोळ्याचा सण म्हणजे मारुती मंदिराच्या परिसरात दणाणून जाणारा जल्लोष असायचा. या पोळ्याला मात्र हा परिसर सुनासुना होता.

पुण्यापेक्षा पिंपरीतच डेंगीचे पेशंट अधिक

$
0
0
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात पिंपरी- चिंचवडमध्ये १४ पेशंटची नोंद झाल्यानंतर या वर्षी १५९ डेंगीचे पेशंट आढळले. त्या तुलनेत पुणे शहरात गेल्या वर्षी २४३ ‘पॉझिटिव्ह’ पेशंटवरून ही संख्या या वर्षी ११० पर्यंत घसरली आहे.

डेंगीमुळे पालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू

$
0
0
नागरिकांमध्ये डेंगीबाबत जनजागृती करणाऱ्या महापालिकेला आपल्या मालकीच्या इमारतीकडे लक्ष देण्यास वेळ नाही. त्यामुळे महापालिकेच्या मालकीच्या अनेक मिळकतींमध्ये डेंगीचे डास सापडत असल्याची माहिती समोर आली आहे.

संदीप जोशी यांचे निधन

$
0
0
‘ग्रीन सर्जन’ म्हणून प्रसिद्ध असलेले पर्यावरणतज्ज्ञ संदीप जोशी (वय ४९) यांचे सोमवारी रात्री दिल्लीत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर मंगळवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, आई व सासू-सासरे, असा परिवार आहे.

‘भाजपला घराणेशाहीची लागण नको’

$
0
0
काँग्रेससारखी बलाढ्य संघटना घराणेशाहीमुळे धोक्यात आली. या घराणेशाहीच्या रोगाची भारतीय जनता पक्षाला लागण होऊ नये. त्यामुळे बीडमधून पंकजा पालवे-मुंडे यांनी बहिणीऐवजी एखाद्या कार्यकर्त्याला तिकीट देऊन आदर्श घालून द्यावा, असे जाहीर आवाहन भाजपचे माजी खासदार प्रदीप रावत यांनी बुधवारी केले.

भाजपच्या यादीला आजचा मुहूर्त?

$
0
0
उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या टप्प्यात आता सर्वच पक्षांमध्ये पडद्याआडचे राजकारण रंगू लागले आहे. कार्यकर्त्यांच्या चर्चा आणि इच्छुकांच्या दाव्या-प्रतिदाव्यांच्या पलीकडे जाऊन ‘इलेक्टिव्ह मेरिट’ आणि सामाजिक समीकरणे जुळविण्यात वरिष्ठ नेते गुंग झाले आहेत.

सर्वच मतदारसंघांत सज्ज रहा

$
0
0
निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास अवघे तीन दिवस राहिले असूनही, आघाडीचे सूत जुळण्याची शक्यता दिसत नसल्याने सर्व मतदारसंघात सज्ज राहा, असा सूचक संदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत बुधवारी देण्यात आला.

पितृपक्ष संपल्याने अर्ज भरण्यास वेग

$
0
0
पितृपक्ष संपण्याची वाट पाहणारे उमेदवार घटस्थापनेच्या मुहूर्तावर विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या तयारीत आहेत. अर्ज भरण्यासाठी उरलेले फक्त तीन दिवस आणि प्रचाराचा अल्प कालावधी लक्षात घेता पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच विद्यमान आमदारांसह अनेक जण अर्ज दाखल भरणार आहेत.

घोषणेपूर्वीच निम्हण रिंगणात

$
0
0
शिवाजीनगरमधील काँग्रेसचे विद्यमान आमदार विनायक निम्हण यांनी स्वत:च आपली उमेदवारी घोषित केली असून ते आज (२५ सप्टेंबर) अर्ज भरणार आहेत. पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी सायकल रॅली काढून अर्ज दाखल करणार असल्याचे निम्हण यांनी सांगितले.

रंगून जा धमाल ड्रामात

$
0
0
पुण्यातील लक्ष्मीकुबेर प्रॉडक्शन्स निर्मित धमाल विनोदी नाटक आर यू इंटरेस्टेड इन ड्रामा..? याचा रौप्यमहोत्सवी प्रयोग आज (दि. २६) आयोजिण्यात आला आहे. बालगंधर्व रंगमंदिर इथं संध्याकाळी पाच वाजता होणाया या नाटकात सगळेच नवोदित कलाकार आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images