Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

ठुमरीनं केलं घायाळ

$
0
0
‘बलमा बडा नादान’, ‘मोहे पनघट पे नंदलाल छेड गयो रे’, ‘ठाडे रहियो’, ‘बैय्या ना धरो’... कधी वृंदावनातल्या गोपींची छेडछाड, कधी एखाद्या नायकिणीच्या सज्जावरचं वातावरण; तर कधी आत्मचिंतनाचा स्वर, तर कधी एखाद्या वृद्धेचा विलाप आणि कधी श्रुंगार अशा विविधरसयुक्त ठुमरीनं उपस्थितांना घायाळ केलं.

उमेदवारीसाठी शिष्टाई अन् लढाईही

$
0
0
२००९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरी मतदारसंघात दहा हजारांपेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला होता. त्या वेळी हा मतदार संघ सर्वांसाठीच नवीन होता. राष्ट्रवादीचा बोलबाला असलेल्या या मतदारसंघावर दादांची पकड होती. मात्र, लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना ५७ हजारांचे मताधिक्य मिळाल्याने राष्ट्रवादीच्या एकाधिकारशाहीला धक्का बसल्याचे बोलले जाऊ लागले.

संमेलनाध्यक्षपदासाठी चार अर्ज

$
0
0
पंजाबमधील घुमान येथे होणाऱ्या आगामी ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी चार उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत.

कसबामध्ये संधी कोणाला?

$
0
0
एका बाजूला जागावाटप आणि उमेदवारीवरून अखेरच्या मिनिटापर्यंत सुरू असलेला संघर्ष आणि दुसरीकडे प्रचारासाठी राहणारा अत्यल्प कालावधी, यावर मात करून भाजपला कसब्याचा गड राखण्यासाठी, तर काँग्रेस आणि मनसेला त्यावर आपला झेंडा रोवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

भाजपमध्ये शिवाजीनगर वरुन गोंधळ

$
0
0
भाजपाचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांच्या चिरंजीवांचे नाव ऐनवेळी शर्यतीत आल्याने भाजपच्या इच्छुकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आघाडीवर अद्यापही शिक्कामोर्तब न झाल्याने शिवाजीनगरमधून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवा‌त केली आहे.

पर्वतीमध्ये भाजप, राष्ट्रवादीत घमासान

$
0
0
युती आणि आघाडी होणार असल्याचे संकेत मिळू लागल्याने पर्वतीमध्ये एकास एक लढतीचे चित्र स्पष्ट होवू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्यातील हा मतदारसंघ काँग्रेसकडे घेण्याच्या हालचाली सुरू असल्याने ‘राष्ट्रवादी’च्या इच्छुकांमध्ये अस्वस्थता आहे.

कोथरुडमध्ये संघर्ष

$
0
0
भाजप आणि शिवसेना यांच्यातील दुरावा कमी होऊन युती होणार, हे समोर आल्यानंतर कोथरूड विधानसभा मतदारसंघात शिवसेना, राष्ट्रवादी आणि मनसे अशी लढत रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुणे कँटोन्मेंटमध्ये काँग्रेसविरुद्ध आरपीआय किंवा शिवसेना

$
0
0
भाजप-शिवसेनेमधील जागावाटपाचा तिढा सुटला असला, तरी पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदार संघात तिकिटावरून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा आठवले गट आणि शिवसेना यांच्यात कलगीतुरा सुरू आहे. दोन्ही पक्षांकडून या जागे​ची मागणी करण्यात येत असल्याने या मतदारसंघातील संघर्षाचा विस्तव कायम आहे.

राष्ट्रवादीत खडकवासल्यात बंड

$
0
0
जागावाटपावरून युती आणि आघाडीतील खडाखडी संपुष्टात येण्याची चिन्हे दिसू लागल्याने खडकवासला मतदारसंघात राजकीय हालचालींनी वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून येणाऱ्या संभाव्य उमेदवाराच्या विरोधात दोन विद्यमान नगरसेवकांसह चार इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

काँग्रेस- राष्ट्रवादीमध्ये मतदारसंघावरून रस्सीखेच

$
0
0
कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या आघाडीचे चित्र रात्री उशिरापर्यंत स्पष्ट होऊ शकले नसल्याने हडपसर मतदारसंघातील दोन्ही पक्षांतील इच्छुकांमधील धाकधूक वाढली आहे. कॉँग्रेसच्या वाट्यावरील ‘हडपसर’ची राष्ट्रवादीकडून मागणी होत असली तरी आघाडीच्या निर्णयावरच हा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाईल हे अवलंबून आहे.

पठारेंना वाढता विरोध

$
0
0
राष्ट्रवादीवर नाराज होऊन मनसेमध्ये गेलेले माजी नगरसेवक सुनील टिंगरे हे मनसेच्या की शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढविणार, याची जोरदार चर्चा सध्या वडगाव शेरी मतदारसंघात सुरू आहे. युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला असून शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी पक्षाच्या स्थानिक नेत्यांनाच संधी देण्याचे आश्वासन दिल्याचे सांगून उमेदवारी आपल्यालाच मिळावी यासाठी मोर्चेबांधणी चालविली आहे.

...म्हणून केस मागे घेतली

$
0
0
कोर्टातील मीडिएशनमुळे तुटणारी घरे पुन्हा जुळतात, या आशेवर त्या दोघी सासू आणि सुनेने कोर्टात केस दाखल केली. आईने मुलाविरुद्ध, तर बायकोने पतीविरुद्ध घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत केस दाखल केली. पण...

हमीपत्र घेणा-या शाळांवर कारवाई?

$
0
0
विद्यार्थ्यांचे आणि अंतिमतः शाळांचे निकाल सुधारण्यासाठी विद्यार्थ्यांकडून हमीपत्र लिहून घेण्याचे धक्कादायक प्रकार तातडीने बंद करण्याचे आदेश राज्याच्या माध्यमिक शिक्षण संचालकांनी गुरुवारी दिले. हे प्रकार न थांबल्यास, संबंधित शाळांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही संचालकांकडून देण्यात आला.

संरक्षण क्षेत्राच्या हद्दीत बदल?

$
0
0
महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी ‘हाय कपॅसिटी मास ट्रान्झिट रूट’च्या (एचसीएमटीआर) अलाइनमेंटमध्ये संरक्षण क्षेत्राच्या हद्दीत बदल करावे लागणार असल्याचे समोर आले आहे.

शब्द किती पाळला?

$
0
0
आमदार महोदय आपण शब्द किती पाळला? (विशेष)

पीएचडी प्रवेश लांबले

$
0
0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लांबत चाललेल्या पीएचडी प्रवेश प्रक्रियेविषयी विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांनीच आक्षेप घेतले आहेत. ‘पेट’मधील मुलाखतीमध्ये विद्यार्थ्यांना संशोधनाविषयी माहिती नसल्यास प्रवेश नाकारता येत नसूनही विद्यापीठाने प्रवेश नाकारल्याचा आरोप सदस्यांकडून करण्यात येत आहे.

सोशल उमेदवारांवर लक्ष

$
0
0
जाहीर प्रचाराप्रमाणेच सोशल मीडियावरील प्रचारावरही यंदा निवडणूक यंत्रणेची नजर राहणार आहे. सोशल मीडियावरून करण्यात येणारा प्रचार संबंधित उमेदवारांच्या प्रचारात ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे येथील प्रचारासाठी लाखो रुपयांची पॅकेजेस देणाऱ्यांना खर्चाची मर्यादा पाळूनच राहावे लागेल.

सिद्धार्थ शिरोळेंना विरोध

$
0
0
उमेदवार निश्चितीच्या अखेरच्या टप्प्यात शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात खासदार अनिल शिरोळे यांचे चिरंजीव सिद्धार्थ यांचे नाव अचानक पुढे आल्याने भाजपमध्ये नाराजी नाट्य रंगले आहे. शिरोळे यांना उमेदवारी देण्यास विरोध करीत अन्य इच्छुकांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी मुंबईत प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या.

मेडिपॉइंट हॉस्पिटलला दंड

$
0
0
वारंवार सूचना देऊनही स्थानिक संस्था कर (एलबीटी) भरण्यात दिरंगाई करणाऱ्या बाणेर येथील मेडिपॉइंट हॉस्पिटलला दंड ठोठावून त्यांच्याकडून ३५ लाख रुपयांची वसुली एलबीटी विभागाने मंगळवारी केली. तसेच, हॉस्पिटलमध्ये आयात करण्यात आलेल्या इतर मालाची सखोल तपासणी केली जात आहे.

दहा वर्षापूर्वीचा थरार

$
0
0
‘वाघाच्या तावडीत सापडणे’ ही जरी म्हण असली, तरी प्रत्यक्ष वाघाच्या पिंजऱ्यात अडकणे म्हणजे नेमके काय असते, हा मी दहा वर्षांपूर्वी अनुभवलेला थरार पुन्हा जसाच्या तसा डोळ्यासमोर उभा राहिला. मंगळवारी दिल्लीत घडलेला असाच प्रकार ९ ऑक्टोबर २०००मध्ये पुण्यातही पेशवे प्राणी संग्रहालयामध्ये घडला होता
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images