Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

काँग्रेस सेवादलातर्फे प्रचार

$
0
0
महायुतीप्रमाणेच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्येही जागावाटपाचा निर्णय होत नसल्याने राज्यातील सर्व जागांवर लढण्याचे संकेत काँग्रेस हायकमांडने दिले आहेत. या संकेतानुसार काँग्रेसच्या सेवादलातर्फे २८८ विधानसभा मतदारसंघात प्रचार मोहीम राबविण्यात येणार आहे.

CCTV मुळे २१ लाखांची चोरी उघड

$
0
0
मार्केट यार्ड येथील एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरात झालेली २१ लाख रुपयांची चोरी सीसीटीव्हीमुळे उघडकीस आली आहे. त्याच्याकडे काम करत असलेला सुरक्षारक्षक आणि त्याच्या पत्नीने चोरी केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळले.

शिक्षण मंडळ अंधारात

$
0
0
टेलिफोनपाठोपाठ वीज बिलही थकल्याने शिक्षण मंडळाची मुख्य इमारत शनिवारी अंधारात बुडाली आणि त्यामुळे शिक्षण मंडळ पदाधिकारी आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये शनिवारी जुंपली.

हिंदुराष्ट्र लढणार निवडणूक

$
0
0
हिंदुत्वाचा मुखवटा घेऊन फिरणाऱ्या राजकीय पक्षाला हिंदुराष्ट्र सेनेने निस्वार्थ मदत केली. पण सत्ता आल्यावर केवळ राजकीय स्वार्थासाठीच हिंदुत्वाचा वापर होत असल्याने येत्या विधानसभा निवडणुकीत आम्ही रिंगणात उतरणार आहोत, अशी घोषणा हिंदुराष्ट्र सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी पुण्यात केली.

‘आघाडीचा निर्णय आज’

$
0
0
‘विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला निम्म्या जागा मिळाल्याच पाहिजेत,’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पुन्हा ठासून सांगितले. या संदर्भात आज (रविवारी) दिल्लीमध्ये निर्णय होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

चोरट्यांच्या अफवांचा पाहुण्यांनाच ‘फटका’

$
0
0
जुन्नर तालुक्यात दरोडेखोरांच्या दहशतीचे व्हॉटस अॅप, मोबाइलवर मेसेज फिरत असल्याने ग्रामस्थांच्या गस्तीचा फटका पाहूणे मंडळींना विनाकारण बसत आहे. चोरट्यांची गाडी समजून अलदरे परिसरात ग्रामस्थांच्या गस्तीचा गावातील पाहूण्यांनाच फटका बसला.

ऊर्जामंत्र्यांच्या गावातच वीजचोरी

$
0
0
थकबाकीदार वीजग्राहकांवर तत्परतेने कारवाई करणाऱ्या महावितरणचे वीजचोरीकडे दुर्लक्ष होत असल्याचा प्रकार दस्तुरखुद्द ऊर्जामंत्री अजित पवार यांच्या गावातच सुरू आहे. बारामती शहरात अनेक ठिकाणी आकडे टाकून वीजचोरी होत आहे.

पावसाने सरासरी ओलांडली

$
0
0
जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यात सुरू झालेल्या पावसानंतरही सप्टेंबर महिना संपण्याधीच जिल्ह्यात पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. साधारणपणे जिल्ह्यात सरासरी ८५४ मिलीमीटर पाऊस पडतो.

गाड्या लावायच्या कुठे?

$
0
0
हडपसर आता गाव न राहता शहरातील मोठी बाजारपेठ निर्माण झाली आहे. मात्र, वाढती लोकवस्ती, सोसायट्या, टाउनशिपमुळे वाहनांच्या प्रमाणातही मोठी वाढ झाली आहे. त्या तुलनेत या भागात वाहनांच्या पार्किंगची सोय नाही.

सूर्यकिरणांनी उजळला चांगा वटेश्वराचा गाभारा

$
0
0
येथील चांगा वटेश्वर मंदिरात रविवारी अनोखा योग जुळून आला. थेट गाभाऱ्यापर्यंत पोचलेल्या सूर्यकिरणांनी गाभारा उजळून निघाला होता. श्रावणी अमावास्येनंतर पितृपंधरवडा संपेपर्यंत आणि साधारण मार्च महिन्यात असा वर्षातून दोन वेळा हा दुर्मिळ सुवर्णयोग जुळून येतो.

स्केटिंग ट्रॅकची सुरक्षा ‘रामभरोसे’

$
0
0
विमाननगर येथे सुमारे सव्वा तीन कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या शहरातील पहिल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्केटिंग ट्रॅकवर दोन महिन्यांतच अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. दारूच्या बाटल्या सापडल्याने ट्रॅकची सुरक्षा आणि देखभाल रामभरोसे असल्याचेच समोर आले आहे.

अपंग मुलीवर बलात्कार

$
0
0
वडगाव मावळ परिसरातील एका आश्रमात शिक्षणासाठी असलेल्या एका अपंग मुलीवर शारिरीक अत्याचार करणाऱ्या शिपायासह दोघा महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आश्रमातील तान्हाजी मराठे या शिपायासह दोघा महिलांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मार्केटयार्डात ग्राहकांसाठी ‘अच्छे दिन’

$
0
0
दमदार पावसाने गेल्या काही दिवसापासून उघडीप दिल्याने पालेभाज्यांसह फळभाज्यांची चांगले उत्पादन हाती आले. त्यामुळे मार्केट यार्डात रविवारी भाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाली.

लाचप्रकरणी फौजदार गजाआड

$
0
0
दोन दिवसांपूर्वीच प्रशिक्षणार्थी महिला फौजदारास वीस हजारांची लाच स्वीकारताना लाच लुचपत पथकाने रंगेहाथ पकडल्याची घटना ताजी असतानाच दारू अड्डा मालकाला प्रतिबंधात्मक कारवाईची धमकी देऊन अडीच हजार रुपये आणि बिअरच्या बाटलीची लाच मागितल्याप्रकरणी येरवडा पोलिस स्टेशनमधील आणखी एका फौजदाराला रंगेहाथ पकडण्यात आले.

दिवाळीसाठी एसटीच्या २ हजार बस रस्त्यावर

$
0
0
दिवाळीसाठी पुण्याहून गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी एसटीच्या पुणे विभागाने आता दोन हजार जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दर दहा मिनिटाला सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकण तसेच औरंगाबाद, नाशिक, लातूर, उस्मानाबादकडे गाड्या धावणार आहेत.

चाकणमध्ये DTL कंपनीला भीषण आग

$
0
0
चाकणजवळील खराबवाडी गावाच्या हद्दीतील डी. टी. एल. अॅन्सिलरीज लि. कंपनीतील पेंट शॉपला शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत कंपनीचे सहा कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

राजस्थान पोलिसांमुळे पर्यटकांचे पैसे मिळाले

$
0
0
लोणावळा परिसर आणि मावळ तालुक्यातून राजस्थान येथे पर्यटनसाठी गेलेल्या बारा तरूण पर्यटकांची जयपूर येथील व्यापारी व दलालांनी फसवणूक केली होती. परंतु पर्यटकांची जागरूकता आणि तेथील पोलिसांच्या सहकार्यामुळे पर्यटकांना लुटणाऱ्या या टोळीचे पितळ लोकांसमोर उघडे पडले आहे.

बँकेचा प्रतिनिधी असल्याचे भासवून फसवणूक

$
0
0
नामांकित बँकेचा प्रतिनिधी असल्याचे सांगून, दूरध्वनीवरून बँक खात्याची वैयक्तिक माहिती प्राप्त करून त्याद्वारे एका तरुणाच्या खात्यातील बारा हजार रूपये लंपास केल्याची घटना रविवारी सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आला. सुनील मोरे (वय २५, रा. आळंदी रोड) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.

इच्छुकांचा बैठकांवर भर

$
0
0
विधानसभा निवडणुकीसाठी आघाडी, महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटला नसला तरी पिंपरी-चिंचवड आणि मावळमधील इच्छुकांनी मात्र बैठका घेण्यावर भर दिला आहे. यामध्ये विद्यमान आमदार केलेल्या विकासकामांचा पाढा वाचत आहेत.

प्रॉपर्टी टॅक्सची बिले शंभरपटीने वाढीव दिली

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील नागरिकांना या वर्षीच्या प्रॉपर्टी टॅक्सची बिले वाटण्यास बोर्डाने सुरुवात केली असून, नागरिकांना सुमारे शंभरपटीने वाढीव बिले देण्यात येत आहेत. ही बिले रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आरपीआय) आठवले गटाकडून देण्यात आला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images