Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

बॉम्बच्या अफवेने धाबे दणाणले

$
0
0
स्थळ टाटा कम्युनिकेशन कंपनी... वेळ सकाळी अकराची... सर्व जण नेहमीप्रमाणे आपले काम करीत असताना अचानक एकाने पोलिसांना दूरध्वनी करून कंपनीत दोन सशस्त्र दहशतवादी घुसले असल्याची माहिती दिली.

शिक्षण मंडळाच्या शाळांचे वीज कनेक्शन तोडले

$
0
0
राज्य सरकारने दिलेल्या आदेशामुळे शिक्षण मंडळाला कोणतेही अधिकार राहिलेले नाहीत. परिणामी मंडळाच्या दूरध्वनी, तसेच शाळांचे वीजबील भरण्यासाठीही मंडळाकडे पैसे नसल्याने मंडळाचे फोन कनेक्शन आणि काही शाळांचे वीजजोड तोडण्यात आले आहेत.

बोगस वाहन कर्जप्रकरणी ४ बँकांवर गुन्हे दाखल

$
0
0
बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहन कर्जे दिल्याप्रकरणी महेश सहकारी बँकेसह कुणबी बँक, कराड अर्बन बँक व राजगुरूनगर बँकेच्या अधिकारी व संचालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश सहकार खात्याने दिले आहेत.

तरुणाचा मृतदेह सोडून पळ

$
0
0
विश्रांतवाडी चौकातील एका जनरल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणलेल्या तरुणाला डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर, त्याला आणलेल्या व्यक्तींनी या तरुणाचा मृतदेह हॉस्पिटलच्या दारात सोडून पळ काढला.

ठेकेदारांच्या बचावासाठी नगरसेवक सरसावले

$
0
0
पालिकेचे पैसे वाचवण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांनी सुरू केलेल्या प्रयत्नांना पालिकेत‌ील ‘मानन‌ीयां’नीच खो घातला आहे. ठेकेदारांची चौकशी करून त्यांना विनाकारण त्रास देऊ नका, अशी मुक्ताफळे उधळून प्रशासनाने ठेकेदारांबाबत काढलेले परिपत्रक स्थगित करण्यास प्रशासनाला भाग पाडले.

फुटपाथ खोदण्यासाठी सणासुदीचा मुहूर्त

$
0
0
दसरा-दिवाळीचा ऐन सणासुदीचा काळ सुरू होण्यास आठवड्यापेक्षा कमी कालावधी राहिला असताना, लक्ष्मी रोडला खरेदीसाठी जाणाऱ्या ग्राहकांना मनस्तापाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

रिक्षाचालकांची फसवणूक

$
0
0
परमिटसह रिक्षा देण्याचे आमिष दाखवून शहरातील १५ रिक्षा चालकांची ४५ लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी मुख्य आरोपीसह मध्यस्थी करणाऱ्या व्यावसायिकांविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे.

शिरूर, नगर : ११ जणांना मोक्का

$
0
0
नगर आणि पुणे जिल्ह्यांत विविध ठिकाणी दरोडे तसेच खुनाच्या घटनांत सहभागी असलेल्या अकरा गुन्हेगारांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी आणि नियमन कायदा(मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

केंद्राच्या आदेशालाच ‘सेन्सॉर’

$
0
0
चित्रपटाचे सेन्सॉर प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सेन्सॉर बोर्डातील अधिकाऱ्यांकडून केला जाणारा कागदपत्रांतील परस्पर फेरफार आणि पक्षपात होत असल्याची दखल दस्तुरखद्द केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयानेही घेतली आहे.

हडपसरमध्येही डेंगीचा उद्रेक

$
0
0
पुणे शहरासोबतच हडपसरमध्येही डेंगीचा फैलाव झाला आहे. येथील कॅनोलमध्ये जलपर्णी वाढल्याने तसेच कचऱ्यामुळे डासांची पैदास वाढली असून या भागात डेंगी व साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे येथील सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे.

सर्व शाळांमध्ये CCTV बसवणार

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या सर्व शाळांमध्ये क्लोज सर्किट टीव्ही (सीसीटीव्ही) कॅमेरे लावण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर कोणत्याही एकाच शाळेत कॅमेरे लावण्यात येणार असून, याबाबतचा खर्च आणि उपयुक्ततेचा अहवाल आल्यावर सर्व शाळांमध्ये कॅमेरे बसविले जाणार आहेत.

पळून जाणारे ‘टीनएजर्स’ अधिक

$
0
0
घरातून पळून जाणाऱ्या मुला-मुलींमध्ये १४ ते १८ वयोगटातील मुलांचे प्रमाण सर्वाधिक असून, त्यात मुली ‘आघाडी’वर आहेत. प्रेमप्रकरणे, पालकांशी वाद, परीक्षा, ​मैत्रीतले तणाव आदी कारणांमुळे या वयोगटातील मुले-मुली पळून जात असल्याची कारणे पोलिसांच्या चौकशीत उघड झाली आहेत.

पितृपक्षात अर्ज भराच : अंनिस

$
0
0
एकीकडे पुरोगामी महाराष्ट्राची भाषणे करायची आणि दुसरीकडे निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठीही पितृपक्ष संपण्याची वाट पाहायची असा पाखंडीपणा सर्व पक्षामध्ये दिसतो आहे. म्हणूनच अंधश्रद्धा निर्मुलन समितीने राजकारण्याच्या या खोटारडेपणाला आव्हान दिले आहे.

बिल्डरला दहा हजारांचा दंड

$
0
0
औंध क्षेत्रीय कार्यालयाच्या कीटक प्रतिबंधक विभागातर्फे डेंगी, मलेरिया विशेष तपासणी मोहिमेअंतर्गत बाणेरमधील दोन बांधकाम व्यावसायिकांवर शनिवारी दहा हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.

टिंबर मार्केटची आरक्षित जागा निवासी होण्याच्या मार्गावर

$
0
0
बिबवेवाडी परिसरात टिंबर मार्केटसाठी आरक्षित असलेली तब्बल ५७ एकर जागा आता निवासी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारच्या निर्देशांनुसार या जागेवरील आरक्षण रद्द करून ती निवासी करण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवला आहे.

पॉलिशच्या बहाण्याने लुटणारी परराज्यातील टोळी गजाआड

$
0
0
दागिन्यांना पॉलिश करण्याच्या बहाण्याने महिलांना गंडा घालणाऱ्या परराज्यातील टोळीला येरवडा पोलिसांनी अटक केली असून त्यांना रविवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

राज्यस्तरीय ‘इन्स्पायर’मध्ये पुणे जिल्ह्याचा झेंडा

$
0
0
लोणी काळभोरमध्ये आयोजित राज्यस्तरीय इन्स्पायर अॅवॉर्ड प्रकल्प सादरीकरण स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी राज्यात बाजी मारली आहे. स्पर्धेतून राष्ट्रीय टप्प्यासाठी निवडण्यात आलेल्या १० प्रकल्पांमध्ये सर्वाधिक पाच प्रकल्प एकट्या पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे आहेत.

झेडपीचे अध्यक्ष-उपाध्यक्षपद सव्वा वर्षांसाठीच!

$
0
0
विधानसभा निवडणुकीची गणिते डोळ्यासमोर ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासह सर्व सभापतीपदे सव्वा वर्षांसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या सव्वा वर्षासाठी अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता आहे.

‘LBT’तून महिन्याभरात १०५ कोटींचे उत्पन्न

$
0
0
रहदारी शुल्क (एस्कॉर्ट) बंद झाल्यानंतरही स्थानिक संस्था कराद्वारे (एलबीटी) पालिकेला गेल्या महिन्यात १०५ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. शहराच्या हद्दीत माल आयात करणाऱ्या बँका आणि ऑनलाइन व्यवहार करणाऱ्या कंपन्यांकडूनही एलबीटी वसूल केला गेला आहे.

२९३ उमेदवारांनी ५७६ अर्ज नेले

$
0
0
विधानसभा निवडणुकीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली, तरी प्रमुख पक्ष अद्याप युती-आघाडीच्याच चर्चेत गर्क असल्याने शनिवारी प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल होऊ शकलेले नाहीत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>