Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

धाकट्यानेही दिला अल्टिमेटम!

0
0
महायुती अभेद्य ठेवण्याच्या आणाभाका घेतलेल्या भाजप आणि शिवसेना या मित्रपक्षांमध्ये आता भाऊबंदकीचा प्रयोग रंगला आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांची तोंडे विरुद्ध दिशेला गेल्याने बुधवारी शिष्टाईचा प्रयत्न करणारे स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांनी दोघा मोठ्या भावांना दोन दिवसांचा अल्टिमेटम देण्याची वेळ गुरुवारी आली.

पाण्याच्या टाकीत मुलाचा मृतदेह

0
0
वारजे येथे आदित्य गार्डनसिटीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या ‘म्हाडा’च्या इमारतीवरील पाण्याच्या टाकीत बुधवारी रात्री साडेचार वर्षाच्या मुलाला संशयास्पद मृत्यू झाला.

सेन्सॉर बोर्डातील गोरखधंदा सुरूच

0
0
सेन्सॉर बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राकेशकुमार यांना लाचखोरीच्या आरोपात अटक केल्यानंतरही बोर्डातील लाचखोरीचा गोरखधंदा आजही सुरूच आहे. प्रमाणपत्र मिळवून देणाऱ्या एजंट्सचा सुळसुळाट झाला असून, बोर्डातील गोंधळामुळे तीनशेहून अधिक चित्रपट प्रमाणपत्राअभावी रखडले आहेत.

शाळेच्या व्यवहारांमध्ये नगरसेवकाच्या खोट्या सह्या

0
0
गोखलेनगर भागातील शिक्षण मंडळाच्या एका शाळेत शाळा सुधार समितीच्या व्यवहारांमध्ये स्थानिक नगरसेवकाच्या बनावट सह्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी उघडकीस आला.

नवरात्रौत्सवासाठी आचारसंहिता

0
0
नवरात्रोत्सवात तोरणांना बंदी घालण्याबरोबरच पोलिसांनी मंडळांसाठी आचारसंहिताही जारी केली आहे. मांडवाची सुरक्षितता, दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यासाठी विविध २३ नियमांचे पालन करण्याचे आदेश मंडळांना देण्यात येणार आहेत.

झोपडपट्टी पुनर्वसनात भ्रष्टाचार

0
0
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेने विठ्ठलनगर येथे राबविलेल्या प्रकल्पाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून, अधिकारी आणि ठेकेदारांनी संगनमताने भ्रष्टाचार केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विनोद नढे यांनी शुक्रवारी केला.

नर्सिंगच्या विद्यार्थिनीचा मृत्यू

0
0
लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाच्या (एएफएमसी) नर्सिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या स्वाती एम. या विद्यार्थिनीचा नुकताच अकस्मात मृत्यू झाला. स्वाती आदल्या दिवशीची ड्युटी संपवून तिच्या खोलीत येऊन झोपली होती.

‘छावा’चे जिल्हाध्यक्ष फोलाणेंची हकालपट्टी

0
0
अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या नावाखाली गैरप्रकार करीत असल्याचा ठपका ठेवत संघटनेचे प्रदेश महासचिव मनोज अण्णा मोरे आणि पुणे जिल्हाध्यक्ष सचिन फोलाणे यांची संघटनेतून हकालपट्टी केली आहे, असे संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रतापसिंग कांचन यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

भंगारच्या दुकानातून चोरीचा माल जप्त

0
0
पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या जय भवानी स्क्रॅप सेंटर या भंगार माल विक्रीच्या दुकानातून लाखो रुपयांचा चोरीचा माल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी युनिट चारच्या पथकाने बुधवारी दुपारी पावणे चारच्या सुमारास दोघांना अटक केली.

‘सणासुदीत सुरळीत पाणी द्या’

0
0
सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरळीत आणि पुरेसा पाणीपुरवठा करावा, अशी सूचना पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांनी केली आहे. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना आढावा बैठक घेण्यात आली.

घाईच्या विकासकामांना ‘रेड सिग्नल’

0
0
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या धसक्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने मंजूर केलेली आणि श्रेयवादासाठी उद्घाटने केलेल्या काही विकासकामांना तूर्त ‘रेड सिग्नल’ देणार असल्याचे आयुक्त राजीव जाधव यांनी स्पष्ट केले.

३ महिन्यांचे धान्य दिवाळीपूर्वी रेशनवर

0
0
शहरातील रेशनकार्डधारकांना ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यांचे धान्य वाटप दिवाळीपूर्वी ऑक्टोबरअखेर करण्यात येणार असल्याची माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी धनाजी पाटील यांनी दिली.

गॅस गळतीमुळे घरात स्फोट

0
0
सिलिंडरच्या रबरी नळीमधून रात्रभर गॅस गळती झाल्याने सकाळी त्याचा स्फोट झाला. त्यात पाच जण गंभीर जखमी झाले. वाल्हेकरवाडी येथील रेल्वे कॉलनीतील इमारतीच्या दुस-या मजल्यावर शुक्रवारी ही घटना घडली.

बेशिस्त वाहतुकीवर शिस्तीचा बडगा

0
0
आतापर्यंत वाहतुकीची कोणतीही शिस्त नसलेल्या जुन्नर शहराला पार्किंग शिस्तीच्या शिरस्त्याला सामोरे जावे लागत आहे. जुन्नरला पार्किंग शिस्त लागावी यासाठी जुन्नरचे पोलिस निरीक्षक यांनी विशेष उपाययोजना अवलंबल्या आहेत.

बारामतीतील प्रशासकीय इमारत ठरतेय पांढरा हत्ती

0
0
बारामतीतील प्रशासकीय कार्यालये एकाच छताखाली आल्याने नागरी सुविधा मिळवण्यासाठी नागरिकांची होणारी कसरत थांबली आहे. मात्र भव्यपणे उभारण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतीची देखभाल अधिकाऱ्यांपुढे आव्हान ठरत आहे. या इमारतीची देखभाल म्हणजे, प्रशासनासाठी नाकापेक्षा मोती जड अशी झाली आहे.

झेडपीच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात?

0
0
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निश्चित करण्यासाठी पक्षाचे नेते अजित पवार हे आज (२० सप्टेंबर) इच्छुकांची बैठक घेणार आहेत.

आमदार निधीचे करायचे काय?

0
0
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत क्लोस सर्किट टीव्ही (सीसीटीव्ही) कॅमेरे बसविण्यासाठी आमदार निधीचा वापर करायचा की नाही, याबाबत बोर्डाचे प्रशासन संभ्रमात पडले आहे.

तरुणाचा खून : तिघांना पोलिस कोठडी

0
0
पूर्ववैमनस्यातून एका तरुणाचा रूमालाने गळा आवळून खून केल्याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तसेच एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्या तिघा आरोपींना २४ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

महापालिकेच्या हेल्पलाइनला प्रतिसाद

0
0
डेंगीचा फैलाव कमी करण्यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या हेल्पलाइनला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच दिवशी दिवसभरात १२५ तक्रारी तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ६८ तक्रारी या हेल्पलाइनवर नोंदविण्यात आल्या.

संत नामदेवांचे साहित्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी लढणार

0
0
संत नामदेव आणि त्यांची कर्मभूमी घुमानवर आपण गेली ४५ वर्षे अभ्यास केला असून तो लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी आपण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरला आहे. ही आपली पहिली आणि शेवटची निवडणूक असेल, अशी भूमिका डॉ. अशोक कामत यांनी स्पष्ट केली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images