Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

अमित शहा यांच्यासमोर आज इच्छुकांचे शक्त‌िप्रदर्शन

0
0
लोकसभेच्या निवडणुकीत पुण्यात घुमलेला ‘नमो नमः’ नारा पुन्हा देण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष अमित शहा हे आज (गुरुवारी) पुण्यात येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत आयोजित विजय संकल्प मेळाव्याच्या निमित्ताने भाजपच्या इच्छुकांनी जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी केली आहे.

अखेरच्या दिवशी मतदारनोंदणीचे साडेसहा हजार अर्ज दाखल

0
0
विधानसभा निवडणुकीसाठी मतदारयादीत नावनोंदणी करण्याच्या बुधवारच्या अखेरच्या मुदतीत नागरिकांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात मोठी गर्दी केली. नावनोंदणीसाठी रांगा लावून नागरिक थांबल्याने सायंकाळी उशिरापर्यंत कार्यालये सुरू ठेवण्यात आली.

व्हायरसच्या माध्यमातून ‘हेरगिरी’!

0
0
शत्रूराष्ट्रातील माहिती मिळविण्यासाठी हेरगिरीबरोबरच सध्याच्या तंत्रज्ञानयुगात कम्प्युटर व्हायरसचादेखील मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत असून भारतही त्याला अपवाद नाही, अशी माहिती क्विक हिल टेक्नॉलॉजीचे संचालक संजय काटकर यांनी दिली.

इलेक्ट्रॉनिक सायन्स आता झाले रंजक

0
0
इलेक्ट्रॉनिक सायन्स म्हणजे नेमके काय... खूप सारे सर्किट्स असणारे ‘आयसी’ कसे काम करतात... रोजच्या जीवनात वापरल्या जाणाऱ्या मोबाइल, टेलिव्हिजन, कॉम्प्युटर, कार या वस्तुंमध्ये इलेक्ट्रॉनिक्स सायन्स कसे काम करते...

निकाल सुधारण्यासाठी विद्यार्थ्यांकडून ‘हमीपत्रे’!

0
0
आठवीपर्यंत नापास न करण्याचे धोरण अवलंबिणाऱ्या शाळांनी गुणवत्ता सुधारण्यासाठी आता नववीतील कच्च्या विद्यार्थ्यांकडून हमीपत्र लिहून घेण्याचा सपाटा लावला आहे. ‘शाळेने ठरवून दिलेले टक्के न मिळविल्यास मी स्वेच्छेने दाखला स्वीकारीन,’ अशा आशयाचे हे हमीपत्र आहे.

दौंडमध्ये पादचारी पूल लिफ्टविना

0
0
मुंबई हायकोर्टाने दिलेली मुदत संपून गेल्यानंतरही दौंड रेल्वे स्थानकावरील नवीन पादचारी पुलाला लिफ्ट बसवण्याचे काम संथ गतीने सुरू आहे. तसेच जुन्या वापरात असलेल्या पुलाची दुरुस्तीही करण्यात आलेली नाही.

‘डेंगी’: सोसायट्यांना नोटिसा

0
0
डेंगीच्या पेशंट्सची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच दुसरीकडे त्याला सोसायट्यांमध्ये असलेली अस्वच्छताही कारणीभूत असल्याचे समोर येत आहे. टाकीच्या खाली साठलेले पाणी, जुने टायर्स, माठ किंवा भांडी आणि कचऱ्यामुळे डेंगीच्या डासांसाठी आमंत्रण ठरत आहे.

विद्यार्थी ‘आय कार्ड’विनाच

0
0
एक ऑक्टोबरपासून प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या कला शाखेच्या (आर्ट् स) विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू होत आहे. मात्र, कॉलेजचे विद्यार्थी असल्याचा कुठलाही खात्रीशीर पुरावा अजूनही विद्यार्थ्यांकडे उपलब्ध नाही.

‘RIMC’ ची परीक्षा डिसेंबरमध्ये

0
0
डेहराडून येथील राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेजमधील इयत्ता आठवीच्या प्रवेशांसाठी येत्या १ आणि २ डिसेंबरला पात्रता परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा सातवीमध्ये असणारे किंवा सातवी उत्तीर्ण असणारे विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र आहेत.

आमदार निम्हण काँग्रेसमध्येच

0
0
आमदार विनायक निम्हण यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या चर्चा थंडावल्याने आणि ते काँग्रेसकडून रिंगणात येणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता त्यांच्याविरोधात उमेदवार निश्चित करण्यासाठी नवी समीकरणे तयार होऊ लागली आहेत.

राम कदम आज भाजपमध्ये

0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वादग्रस्त आमदार राम कदम आज ‘इंजिना’तून उतरून भाजपचा झेंडा खांद्यावर घेणार आहेत. पुण्यात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत ते भाजपमध्ये औपचारिक प्रवेश करतील. प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

स्वतंत्र लढण्याची ‘स्वाभिमानी’ची तयारी?

0
0
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची भ्रष्ट सत्ता उलथवून टाकण्यासाठी महायुती अबाधित राहावी, अशी जनभावना आहे. मात्र, आमच्या ‘ज्येष्ठ’ मित्र पक्षांनी त्याचा अनादर केला आणि महायुती तुटलीच, तर आम्ही गप्प बसणार नाही, असे खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.

‘रास दांडिया’ कार्यशाळा

0
0
गणेशोत्सव संपल्यानंतर तरुणांना वेध लागतात ते नवरात्रीचे. त्याचं खास कारणही असतं. नवरात्रीत दांडिया किंवा गरबा खेळायला जाणाऱ्या उत्साही तरुण-तरुणींची संख्या अलीकडे वाढलेली आहे.

केकलेस केक

0
0
पार्टीसाठी केकची ऑर्डर देण्याच्या बेतात आहात का? मग ‘केकलेस केक’चा पर्याय तुमच्यासाठीच आहे. सध्या त्याची चलती आहे.

‘पर्यावरण व प्राण्यांबाबतच्या कायद्याचे नूतनीकरण व्हावे’

0
0
‘जगभरातील इतर देशांच्या तुलनेत पर्यावरण संवर्धन आणि प्राणी कल्याणासाठीचे भारतातील कायदे अधिक चांगले आहेत. मात्र, त्यातील बरेच कायदे आता जुने झाले असल्याने त्यांचे नूतनीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे,’ असे मत केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी मांडले.

पर्यावरणीय दृष्टिकोन साहित्यातून विकसित व्हावा

0
0
‘विज्ञान तंत्रज्ञानामुळे मानवी आयुष्य सुखकारक होत असताना निसर्गाच्या हानीकडे डोळेझाक केली जात आहे. त्यामुळे साहित्यिकांनी आपल्या साहित्यातून पर्यावरण रक्षणाबाबतचा दृष्टिकोन विकसित करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत,’ असे मत केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी गुरुवारी मांडले.

लाचखोर महिला फौजदार गजाआड

0
0
येरवडा पोलिस ठाण्याच्या प्रशिक्षणार्थी महिला फौजदाराने गुन्हा दाखल करण्याची धमकी देत तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

बुडण्याच्या ‘अभिनया’ने यंत्रणांची पळापळ

0
0
स्वारगेट कॅनॉलमध्ये बुडत असल्याचा ‘अभिनय’ करत पोलिस तसेच फायर ब्रिगेडला वेठीस धरण्याचा प्रकार बुधवारी दुपारी चारच्या सुमारास घडला.

एकेरी पार्किंग सुरू

0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील महात्मा गांधी रस्त्यावर एकेरी पार्किंगची अंमलबजावणी पोलिसांनी बुधवारपासून सुरू केली. पोलिसांच्या या निर्णयास नागरिकांनी विरोध केला असून, आचारसंहितेच्या काळात अधिकाऱ्यांकडून दबावतंत्राचा वापर केला जात असल्याची तक्रार नागरिकांनी पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे.

झेडपी अध्यक्षपदासाठी ११ सदस्यांचे अर्ज

0
0
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनुक्रमे ११ आणि १० सदस्यांनी अर्ज केले आहेत. पालकमंत्री अजित पवार हे इच्छुकांच्या मुलाखती घेणार असून त्यानंतर निवडीबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images