Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

भाजप प्रस्ताव : शिवसेनेला फटका

$
0
0
‘आधी घटकपक्षांना जागा; आणि नंतर उरलेल्या जागांची समान वाटणी,’ असा प्रस्ताव भारतीय जनता पक्षाने शिवसेनेकडे सादर केला आहे. हा प्रस्ताव मान्य केल्यास शिवसेनेला ३४ जागांचा फटका बसण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच शिवसेनेने जागाटपाबाबत आक्रमक भूमिका घेतल्याचे बोलले जाते.

दत्ता धनकवडे पुण्याचे महापौर

$
0
0
पुणे महानगरपालिकेच्या महापौरपदी आज अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्ता धनकवडे यांची निवड झाली आहे, तर उपमहापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे आबा बागूल विजयी झालेत. या दोघांनाही ८३ मतं मिळाली असून त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा ४२ मतांनी पराभव केला.

नगर रोड बीआरटी मार्ग वाहनांसाठी होणार खुला

$
0
0
आळंदी आणि नगर रोड मार्गावर अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत असलेला बीआरटी मार्ग वाहनांसाठी खुला करावा, या मागणीसाठी राजकीय पक्षांनी आंदोलन केल्यानंतर अखेर हा मार्ग सुरू करण्यासाठी हालचालींना वेग आला आहे.

दरोड्याच्या भीतीने दहशत

$
0
0
नारायणगाव परिसरात सध्या दरोडेखोरांच्या भीतीमुळे​ दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरातील तरुणांनी मोठ्या प्रमाणावर एकत्र येऊन रात्रगस्त घालण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांकडून सतर्कता बाळगण्यात येत असली तरी दरोड्यांच्या अफवांमुळे नागरिक हैराण झाले आहेत.

‘पंचायत’चा फायदा विधानसभेला होणार?

$
0
0
राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर लगेच झालेल्या पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती पदाच्या निवडणुकीदरम्यान काही मतदार संघात झालेल्या राजकीय घडामोडी व फेरबदलाचा विधानसभेला राजकीय पक्षांना फायदा होणार का, अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे.

परिवर्तन ट्रस्टवर आर्थिक घोटाळ्यांचा आरोप

$
0
0
हिंदू जनजागृती समितीने डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कुटुंबीयांचा सहभाग असलेल्या ‘परिवर्तन ट्रस्ट’ या सेवाभावी संस्थेवर आर्थिक घोटाळे केल्याचा आरोप केला.

बँक एम्प्लॉइज संघटना ‘रुपी’ प्रकरणी हायकोर्टात

$
0
0
रुपी सहकारी बँकेचा परवाना रद्द होऊ नये. बँकेवर प्रशासक नेमून दोषी संचालक आणि अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई व्हावी, यासाठी बँक एम्प्लॉइज असोसिएशनने मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे.

एकाच वेळी ९ ठिकाणी कारवाई

$
0
0
नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून गेल्या आठ महिन्यांत एकही रुपयाचा स्थानिक संस्था कर (एलबीटी) न भरणाऱ्या एच. जी. रिटेलर व्हेंचर्स आणि सोल्युशन्स व के. पी. मॉल यांच्या शहरातील नऊ दालनांवर सोमवारी एलबीटी विभागाने एकाचवेळी कारवाई केली.

जकात नाक्यांवर अतिक्रमण?

$
0
0
शहरात प्रवेश करताना अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या पालिकेच्या जकात नाक्यांच्या जागांवर अतिक्रमण होण्याची अथवा संबंधित जागांवर अनधिकृतपणे खासगी पार्किंग होण्याची दाट शक्यता आहे.

आता नाट्यव्यवस्थापनाचा ‘स्मार्ट’ अभ्यासक्रम

$
0
0
देशभरातील नाट्यसंस्थांचा सेतू म्हणून काम करणाऱ्या इंडिया थिएटर फोरम या संस्थेतर्फे नाट्यव्यवस्थापनाचा ‘स्मार्ट’ अभ्यासक्रम सुरू केला आहे.

...शेती करणे जास्त कठीण

$
0
0
‘भारत हा आजही कृषिप्रधान देश आहे. मात्र, देशातील कृषी क्षेत्राची स्थिती दयनीय असल्याने सुपर कम्प्युटर तयार करण्यापेक्षा शेती करणे अधिक कठीण आहे,’ असे मत ज्येष्ठ कम्प्युटरतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांनी नुकतेच मांडले.

मतदारयाद्यांतून वगळले संपर्क क्रमांक, ई-मेल आयडी

$
0
0
साहित्य संमेलनाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असताना साहित्य महामंडळाने जाहीर केलेली मतदारयादी चर्चेत आली आहे. या मतदारयादीत मतदारांचे मोबाइल क्रमांक व ई-मेल आयडी वगळण्यात आले असून, मतपत्रिका पाठवण्यासाठी रजिस्टर एडी न वापरण्याचा निर्णय महामंडळाने घेतला.

तस्कराला अटक, १३ पिस्तुले जप्त

$
0
0
गुन्हे शाखेने नगर येथील एका ‘आर्म डिलर’ला अटक केली असून त्याने वेगवेगळ्या ठिकाणी विकलेले १३ पिस्तुल आणि ६९ काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

फोन चोरणाऱ्याला पोलिस कोठडी

$
0
0
लोहियानगर येथील पत्र्याचे शेड उचकटून पाच हजार रोख आणि मोबाईल हॅण्डसेट चोरल्याप्रकरणी खडक पोलिसांनी अटक केलेल्या एका आरोपीला १८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

संशयित नक्षलवादी भेलके दाम्पत्यावर ATS ची कारवाई

$
0
0
देशभक्ती युवा मंचच्या माध्यमातून तरुणांना नक्षलवादी चळवळीशी जोडणारा संशयित नक्षलवादी अरुण भेलके आणि त्याची पत्नी कांचन ननावरे यांच्यावर एटीएसने बेकायदाशीर हालचाली प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे.

तलाठी गोणे यांच्याविरुद्ध बेहिशेबी मालमत्तेचा गुन्हा

$
0
0
लोणावळा येथील तत्कालीन तलाठी संजीव बलराम गोणे (वय ४३) आणि त्यांच्या पत्नीला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने ११ लाख रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जमवल्याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

एक्स्प्रेस वेवर अपघात; ४ ठार

$
0
0
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूरजवळील टेंभरी गावच्या हद्दीत एका वाहनाने पंक्चर काढण्यासाठी उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरात धडक दिली. त्यात चार मजुरांचा मृत्यू झाला, १२ जण जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी मध्यरात्री पाऊणच्या सुमारास झाला.

अत्याचारग्रस्तांना मिळाले ‘मनोधैर्य’

$
0
0
बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार, एकतर्फी प्रेमातून अॅसिड हल्ला अशा घटनांमुळे खचलेल्या १ हजार १४९ अत्याचारग्रस्तांच्या जीवनात ‘मनोधैर्य’ योजनेच्या माध्यमातून मदतीची फुंकर घालण्यात आली आहे. पण, राज्यात दररोज एक महिला व दोन बालकांवर अत्याचार होत असल्याचे वास्तवही यातून समोर आले आहे.

हार्डवेअर दुकानाचे शटर उचकटून चोरी

$
0
0
भोसरीतील इंद्रायणीनगर येथील एस. एन. ट्रेडिंग या हार्डवेअर दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी लाखो रुपयांचा माल चोरून नेल्याची घटना सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आली. मुस्तफा कागलवाला (वय ३६) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

गटातटात अडकू नका

$
0
0
आघाडी सरकारची कामे लोकांपर्यंत पोहोचवा. पक्षातील गटातटात अडकू नका, असा सल्ला राष्ट्रवादीच्या महिला विभागाच्या प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी दिला. नारायण मेघाजी लोखंडे कामगार भवन येथे आयोजित राष्ट्रवादीच्या महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images