Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘बंद’ शाळेमध्ये शिक्षकांची पर्यायी व्यवस्था करा

$
0
0
शिक्षकांनी गेल्या १५ दिवसांपासून दांडी मारल्याने दौंड तालुक्याच्या वाटलूज गावामध्ये बंद असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षकांची पर्यायी व्यवस्था करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी गट शिक्षण अधिकाऱ्यांना दिले आहेत.

बनावट बिले तयार करून हॉटेल मालकाची फसवणूक

$
0
0
बंडगार्डन रोडवरील श्रीमान हॉटेलमधील कॅशिअर आणि अकाउंटंट असलेल्या चार आरोपींनी गेल्या एक वर्षात बनावट बिले तयार करून हॉटेल मालकाची सुमारे ३६ लाख रुपायांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

‘LBT’बाबत एकही हरकत नाही

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डात स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू झाल्याचे गॅझेट केंद्र सरकारने आठ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केले असून, एलबीटीचे दर राज्य सरकारच्या दरांप्रमाणेच निश्चित करण्यात आले आहेत. बोर्डाने एलबीटीबाबत हरकती आणि सूचना मागविल्या असल्या, तरी आतापर्यंत एकही हरकत नोंदविण्यात आलेली नाही.

तापाच्या पेशंटमध्ये डेंगीची लक्षणे

$
0
0
पोटदुखी, खाज येणे, उलट्यासह विविध आजारांमुळे ग्रस्त असलेल्या आणि ताप असणाऱ्या पेशंटमध्येही डेंगीची लक्षणे आढळत असल्याचा निष्कर्ष वैद्यकतज्ज्ञांनी काढला आहे. डेंगीच्या प्रत्येक पेशंटने योग्य वेळीच उपचार घेतल्यास आजार बरा होऊ शकतो, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

बाणेर, पाषाणमध्येही डेंगीचा वाढता प्रादुर्भाव

$
0
0
डेंगीमुळे बाणेर, पाषाण परिसरातील अनेक नागरिक हैराण झाले असून, याबाबत प्रशासन गंभीर नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. अनेक ठिकाणी सोसायट्यांमध्ये जनजागृतीचा अभाव पहायला मिळत आहे.

धनकवडी, हडपसरमध्येही डेंगी

$
0
0
शहरात डेंगीच्या डासांचा उद्रेक वाढला असून धनकवडी, विश्रामबाग, हडपसर, औंधसारख्या भागात सर्वाधिक पेशंट आढळून येत आहेत. डेंगीचे डास वाढल्याने या भागात पालिकेते सातत्याने आवश्यक ती धूरफवारणी करावी, अशी मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने भागातील पेशंटकडून आता संताप व्यक्त होऊ लागला आहे.

संसर्गजन्य आजारांचा बदलतोय ‘ट्रेंड’

$
0
0
काही वर्षांपूर्वी पुण्यात थैमान घातलेल्या ‘स्वाइन फ्लू’च्या विषाणूंच्या वाढीसाठी पोषक स्थिती सध्या असताना पुणेकरांमध्ये तयार झालेल्या रोग प्रतिकारशक्तीमुळे फ्लूचा संसर्ग घटत आहे. तसेच, डेंगीचे वाढते पेशंट, उन्हाळ्याऐवजी पावसाळ्यात आढळणारे गोवर, कांजण्याच्या पेशंटवरून पुण्यात संसर्गजन्य आजारांचा ‘ट्रेंड’ बदलत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

वाढत्या प्रदूषणाचा आरोग्यास फटका

$
0
0
पुण्यातील सार्वजनिक आरोग्य धोक्यात येण्यास शहरातील वाढते प्रदूषण हे सर्वात महत्त्वाचे कारण ठरले आहे. शहराला केवळ जलप्रदूषणाची नव्हे तर ध्वनी आणि वायू प्रदूषणाचा फटका बसतो आहे.

खड्ड्यांचे साम्राज्य... दुखण्यांना आमंत्रण

$
0
0
विविध वैशिष्ट्यांसाठी जगप्रसिद्ध असलेल्या पुण्याच्या रस्त्यांवरचे खड्डेही आता पुण्याची एक वेगळी ओळख बनू लागले आहेत. हाय-वे असो, मुख्य रस्ते असोत किंवा अगदी छोटेखानी गल्लीबोळ...खड्डा नाही, असा रस्ता सापडणे विरळाच.

कचरा विल्हेवाटीला जागेचा ‘घोर’

$
0
0
कचऱ्याच्या वर्गीकरणाबाबत नागरिकांमध्ये असलेली अनास्था, बंद पडलेले गांडूळखत आणि बायोगॅस प्रकल्प यामुळे शहरातील कचराप्रश्न गंभीर होत चालला आहे. त्यातच शहरात दररोज तयार होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याने पुणे महापलिकेला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.

आरोग्य सेवा पुरविण्यात पालिका ‘नापास’

$
0
0
शहरातील नागरिकांना कमी दरात आणि दर्जेदार पायाभूत आरोग्य सुविधा पुरविण्याची संपूर्ण जबाबदारी ही संबंधित महापालिकेची आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करत आरोग्य सेवा पुरविण्याच्या जबाबदारीपासून पळ काढण्याचा ‘प्रताप’ महापालिकेचा आरोग्य विभाग करत आहे.

इच्छुकांचा ‘सोशल संवाद’ सुरू

$
0
0
लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियाने दाखवलेला करिश्मा डोळ्यासमोर ठेवून आपण किती पाण्यात आहोत, हे जाणून घेण्यासाठी राजकीय नेत्यांनी ‘सोशल संवाद’ सुरू केले आहेत.

मठकरींना उमेदवारी द्या

$
0
0
विधानसभेची निवडणूक जवळ येऊ लागल्याने निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांच्या नावामध्येही भर पडत आहे. शिवाजीनगर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष आणि नगरसेवक प्रा. विकास मठकरी यांना उमेदवारी देण्याची मागणी कार्यकर्त्यांमधून होत आहे.

युतीच्या फॉर्म्युल्यास भाजपचा सुरुंग

$
0
0
‘केंद्रात भाजप मोठा भाऊ आणि राज्यात शिवसेना मोठा भाऊ,’ या वर्षानुवर्षे चालत आलेल्या युतीच्या फॉर्म्युल्यास भारतीय जनता पक्षाने सुरूंग लावला आहे. युतीमध्ये मोठा भाऊ-छोटा भाऊ असे कोणी नाही, तर सर्वजण समान आहेत, असा पवित्रा भाजपचे महाराष्ट्र प्रभारी राजीव प्रताप रूडी यांनी रविवारी घेतला.

शताब्दीत कुलवृत्तांतांची ऑनलाइन भरारी

$
0
0
घराण्याच्या वंशावळीबरोबरच सामाजिक-सांस्कृतिक, आर्थिक-शैक्षणिक इतिहासाचा दस्तऐवज ठरणाऱ्या कुलवृत्तांतांची परंपरा यंदा शताब्दी साजरी करीत आहे. ‘आपटे’ घराण्याच्या कुलवृत्तांताने सुरू झालेली ही परंपरा आता ऑनलाइन स्वरूपात ‘क्लिक’ होत आहे.

व्हिडिओ गेममुळे बीपी ‘हाय’

$
0
0
व्यायामाचा अभाव, स्मोकिंग, मद्यसेवन, जंक फूडसारख्या बदलत्या लाइफस्टाइलमुळे हार्टला ‘झटका’ बसत असल्याचे सर्वश्रूत आहे. मोबाइल, व्हिडिओ गेम खेळण्यात रात्रभर जागणाऱ्या तरुणाईंचा ‘बीपी’ हाय होऊन त्यांचे ‘हार्टफेल’ही होत असल्याचे निरीक्षण हृदयरोग तज्ज्ञांकडून नोंदविण्यात येत आहे.

आमचे हे तसे नाहीत

$
0
0
‘मुख्यमंत्र्यांवर होत असलेले सर्व आरोप हे बिनबुडाचे असून, त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. हे सर्व आरोप राजकीय आहेत, त्याची मी पर्वा करत नाही,’ असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण यांनी सांगितले.

स्फोटाचा तपास बिजनोरमध्ये

$
0
0
फरासखाना पोलिस ठाण्याच्या आवारात झालेल्या स्फोट प्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) उत्तर प्रदेशातील बिजनोर येथे तपास सुरू केला आहे. मध्य प्रदेश जेल तोडून पळालेल्या ‘सिमी’च्या पाच दहशतवाद्यांकडून बिजनोर येथे बॉम्ब बनवताना स्फोट घडल्याची माहिती मिळाल्यानंतर तपासाची चक्रे फिरली आहे.

२८ किलोचा गांजा पकडला

$
0
0
पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत २८ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. गांजाची विक्री करण्यासाठी आलेला तसेच गांजा खरेदीसाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

प्रचाराच्या मुहूर्ताला शहा

$
0
0
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला असून उत्तर प्रदेशात चमत्कार घडविणारे पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते पुण्यात प्रचाराचा शंख फुंकण्यात येणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images