Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

शेतकरी कुटुंबाला मारहाण

$
0
0
जमिनीच्या वादातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक बाबूराव चांदेरे व त्याच्या मुलांनी बाणेरमधील एका शेतकरी कुटुंबाला घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर औंध पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या हाणामारीत सात महिन्यांच्या गर्भवती महिलेलाही मार लागला आहे.

मोदी सरकारकडून झाला अपेक्षाभंग

$
0
0
‘विकासाची स्वप्ने दाखवून सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने शंभर दिवसांतच जनतेचा अपेक्षाभंग केला असून, आगामी निवडणुकीत विकासाऐवजी पुन्हा जातीय ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे’, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस तारिक अन्वर यांनी शनिवारी केला.

‘स्वाइन फ्लू’ने एकाचा मृत्यू

$
0
0
स्वाइन फ्लूच्या संसर्गाने नगर जिल्ह्यातील जेऊर येथील एकाचा रुबी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत मृतांची संख्या आठवर पोहोचली आहे. रमेश आसाराम भिटे (वय ३७) असे मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. स्वाइन फ्लूची लक्षणे आढळल्याने त्याला रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

आहारामुळे विद्यार्थ्यांना उलट्या

$
0
0
चिखलवाडी येथील पुणे महानगरपालिकेच्या माता रमाबाई आंबेडकर इंग्रजी माध्यमाच्या शाळेमधील आठ ते दहा विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातील खिचडी खाल्यानंतर उलट्यांचा त्रास झाला.

पालिकेचे बजेट फुगले अन् कर्जही

$
0
0
पालिकेच्या बजेटमधील आकडे कोटीच्या कोटी उड्डाणे घेत असले, तरी गेल्या दोन वर्षांपासून पालिकेवरील कर्जाचा बोजा कायम राहिला आहे. दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या सुमारे दोनशे कोटी रुपयांहून अधिकच्या कर्जापैकी पालिकेने आत्तापर्यंत ५० कोटी रुपयांची परतफेड केली आहे.

‘बाबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी महाराष्ट्रात फिरते आहे’

$
0
0
‘मला अनुकंपा तत्त्वावर पद नको आहे, मेरिटवरच पद हवे आहे. महायुतीची सत्ता महाराष्ट्रात यावी यासाठीच मी महाराष्ट्रभर फिरते आहे. त्यासाठी मला तुमची साथ हवी आहे,’ अशी भावनिक साद आमदार पंकजा मुंडे यांनी घातली. संघर्ष यात्रेअंतर्गत पिंपरीत झालेल्या सभेत त्या बोलत होत्या.

डिग्रीसाठीही अमेरिका कॉलिंग!

$
0
0
शिष्यवृत्तीची सुविधा नसतानाही अनेक भारतीय विद्यार्थी पदवी अभ्यासक्रमासाठी अमेरिका गाठत आहेत. त्यासाठी वर्षाला २५ हजार ते ३० हजार डॉलर खर्च करण्याचीही त्यांच्या पालकांची तयारी असून, इंजिनीअरिंगबरोबरच फाइन आर्ट्स, डिझाइन अशा शाखांना विद्यार्थी पसंती देत आहेत.

रस्त्यावर टायर जाळल्यास कारवाई

$
0
0
रस्त्यावर गंमत म्हणून किंवा आंदोलनामध्ये टायर जाळाल तर यापुढे कठोर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. कोणत्याही मोकळ्या जागेवर अथवा वीटभट्टीमध्ये इंधन म्हणून टायर जाळण्यास बंदीचा आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने नुकताच दिला आहे.

बोर्डाच्या पेपरचे वेळापत्रक बदलणार

$
0
0
बारावीच्या ऑक्टोबर परीक्षेतील वेळापत्रकात १५ ऑक्टोबरला असलेल्या पेपर्सचा दिवस बदलणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

हडपसर-पर्वतीत अदलाबदल होणार?

$
0
0
विधानसभेच्या तारखा जाहीर होताच, आता इच्छुकांच्या मोर्चेबांधणीने वेग घेतला असून, शहरातील काही मतदारसंघांची अदलाबदल होण्याची दाट चिन्हे आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी होणार हे यापूर्वीच स्पष्ट झाले असल्याने शहरातील कोणत्या मतदारसंघांमध्ये बदल होणार, याकडे मतदारसंघातील इच्छुकांच्याही नजरा लागल्या आहेत.

ढोलताशा आता तालापुरताच...

$
0
0
विसर्जन मिरवणुकीला सकारात्मक रूप येण्यासाठी ज्ञानप्रबोधिनीचे पथक गेल्या बारा वर्षांपासून प्रयत्नशील आहे. या पथकाने ढोल-ताशांला दुय्यम स्थान देऊन बर्चीसारखे पारंपरिक सामूहिक नृत्याबरोबरच इतर पारंपरिक नृत्यप्रकार आणि मार्शल आर्ट् सच्या प्रकारांना अधिक प्रभावीपणे पुढे आणण्याचे धोरण ठरवण्यात आले आहे.

प्रा. शेषराव मोरे यांना पुरस्कार

$
0
0
मृत्युंजय प्रतिष्ठानतर्फे मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांच्या स्मृत्यर्थ देण्यात येणारा मृत्युंजय पुरस्कार ज्येष्ठ लेखक प्रा. शेषराव मोरे आणि ज्येष्ठ समाजसेवक डॉ. भीमराव गस्ती यांना जाहीर झाला आहे.

जागावाटपाची चर्चा सार्वजनिक नाहीःBJP

$
0
0
‘लोकशाहीत प्रत्येक पक्षाला आपला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. मात्र, महायुतीच्या जागावाटपाची चर्चा सार्वजनिकरीत्या होणार नाही. ज्यांना ही चर्चा सार्वजनिक करायची आहे, ते आपला निर्णय घेण्यास मुक्त आहेत,’ असा टोला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शिवसेनेचे नाव न घेता लगावला.

इमारतीवरून उडी मारल्याने नायजेरियन गुन्हेगाराचा मृत्यू

$
0
0
पोलिसांना चकवा देण्यासाठी इमारतीच्या तिस-या मजल्यावरून खाली उडी मारल्यामुळे जखमी झालेल्या नायजेरियन गुन्हेगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शनिवारी पिंपळे गुरव येथे रात्री पावणे आठच्या सुमारास ही घटना घडली.

फळभाज्या, पालेभाज्यांचे दर वधारले

$
0
0
पावसामुळे भाज्या खराब झाल्याने भाज्यांची कमी झालेली आवक आणि त्यातुलनेत पितृ पंधरावड्यामुळे वाढलेली मागणी यामुळे फळभाज्या व पालेभाज्यांचे दर सुमारे २० टक्क्यांनी वाढले आहेत. पितृ पंधरावड्यामुळे कारले, गवार , भेंडी, पावटा, चवळई, कोथिंबीर, मेथी, देठ, आळू, पेरू, केळी, डाळिंब याला जास्त मागणी आहे.

पक्षशिस्त आणि पक्षनिष्ठेला प्राधान्य देणार

$
0
0
पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसमध्ये यापुढे पक्षशिस्त आणि पक्षनिष्ठेला प्राधान्य दिले जाईल. पक्षशिस्त मोडणा-या पदाधिका-यांवर आणि कार्यकर्त्यांवर तातडीने कारवाई केली जाईल.

गोळीबार करणाऱ्यांना धडा शिकवा

$
0
0
‘ज्या मावळातील शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या पाण्यासाठी गांधीजींच्या सत्याग्रहाच्या मार्गाने व लोकशाही पध्दतीने आंदोलन केले त्या शेतकऱ्यांवर या जुलमी आघाडी सरकारने गोळीबार केला.

टर्मिनेट कंत्राटदारानेच पुन्हा भरले टेंडर

$
0
0
नियमापेक्षा जास्त दराने वाहन प्रवेश करवसुली (व्हेइकल इन्ट्री टॅक्स) केल्याप्रकरणी पुणे कँटोन्मेंट बोर्डाने काढून टाकलेल्या कंत्राटदाराने पुन्हा टेंडर भरले असून, बोर्डानेही संबं​धित कंत्राटदाराचे टेंडर स्वीकारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

निवडणुकीनंतर सत्तापरिवर्तन अटळ

$
0
0
‘गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर माझा राजकारणातील रस संपला होता. मात्र, राज्याच्या विविध भागातील नागरिकांनी मला राजकारणात सक्रिय राहण्यासाठी प्रचंड बळ दिले. त्यामुळे नागरिकांच्या आशीर्वादावर माझ्या बाबांचे अधुरे राहिलेले स्वप्न पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही,’ असा आत्मविश्वास पंकजा मुंडे-पालवे यांनी व्यक्त केला.

‘पाषाण मंडई’मुळे सुटेल वाहतुकीचा प्रश्न

$
0
0
‘रस्त्यावर बसणाऱ्या भाजी मंडईचे नियोजन करून बहुतांश भाजी मंडई बांधण्याचे काम सध्या पालिका करत आहे. मंडईचे बांधकाम झाल्यामुळे वाहतुकीला येणारे अडथळे दूर होण्यास मदत होईल,’ असे मत महापौर चंचला कोंद्रे यांनी व्यक्त केले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images