Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

शहरातील २८ माननीयांचे पोलिस संरक्षण काढले

$
0
0
शहरातील आमदार-खासदारांसह २८ जणांना देण्यात आलेले पोलिस संरक्षण काढण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे माननीयांना देण्यात आलेले संरक्षण तत्काळ काढण्यात आले आहे.

डेंगीच्या उपाययोजनांसाठी पालिका सरसावली

$
0
0
शहरात डेंगीचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी महापालिकेचा आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. डेंगीचे डास आढळणाऱ्या ठिकाणी भेटी देऊन दोषींवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

विद्यमान आमदारांच्या विरोधात अन्य इच्छुकांनी दंड थोपटले

$
0
0
विरोधी पक्षाच्या गोटात दाखल होण्याची पूर्ण तयारी केल्यानंतर आता पुन्हा स्वकीयांच्या झेंड्याखाली निवडणूक लढविण्याची तयारी करणाऱ्या शिवाजीनगरच्या आमदारांविरोधात अन्य इच्छुकांनी उघडपणे दंड थोपटले आहेत.

अजय शिंदे यांना ‘बसप’तर्फे उमेदवारी

$
0
0
शिवाजीनगर विधानसभा मतदार संघात असलेल्या राजकीय अस्थिरतेचा फायदा घेण्यासाठी बहुजन समाज पक्षाने (बसप) उमेदवार जाहीर केला आहे. या मतदार संघातून अजय शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिंदे हे यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष होते. राष्ट्रवादीतून त्यांनी ‘बसपमध्ये प्रवेश केला आहे.

वडगाव शेरी, कँटोन्मेंट हवे ‘RPI’ला

$
0
0
विधानसभा निवडणुकीत शहरातील वडगावशेरी, कँटोन्मेंट मतदारसंघातील जागा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला (आरपीआय) द्यावी, अशी मागणी पक्षाच्या शहर पदाधिकाऱ्यांनी केली आहे. महायुतीत सेना, भाजपबरोबर आरपीआय सहभागी आहे.

पालिकेने BRT प्रकल्प रद्द केला का?

$
0
0
केंद्राकडून कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त केल्यानंतरही अद्याप शहरात बीआरटी सुरू का केली नाही, अशी विचारणा करत १०० किलोमीटरहून अधिक रस्त्यांवर बीआरटी राबविण्याच्या प्रस्ताव केराच्या टोपलीत टाकण्यात आला आहे का, असा सवाल स्वयंसेवी संस्थांनी उपस्थित केला आहे.

परीक्षांचे फेरनियोजन करा

$
0
0
विधानसभेच्या निवडणुकीचे मतदान आणि परीक्षांचा कालावधी एकाच वेळी येत असल्याने शाळा-महाविद्यालयांना परीक्षांचे वेळापत्रक अलीकडे घ्यावे लागणार आहे. मतदानाच्या तारखेपूर्वी दोन दिवस अगोदर शाळांमधील मतदान केंद्रे ताब्यात घेतली जाणार आहे.

परीक्षांची… ‘शाळा’!

$
0
0
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शाळांना आपले सहामाही परीक्षांचे वेळापत्रक बदलावे लागणार आहे. मात्र, बहुतेक सर्व शाळा दिवाळीच्या सुट्टीआधीच परीक्षा संपविण्याचे नियोजन करत आहेत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी १५ ऑक्टोबरला मतदान आहे.

शहराच्या प्रश्नांना पुन्हा रेड सिग्नल

$
0
0
राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता शुक्रवारी जाहीर झाल्याने पुणे मेट्रोच्या मान्यतेला आता आणखी विलंब होणार असून, पालिकेचे इतर महत्त्वाचे प्रकल्पही रखडणार आहेत.

मतदार नोंदणी : उरले फक्त ५ दिवस

$
0
0
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी दहा दिवस अगोदर म्हणजे १७ सप्टेंबरपर्यंत मतदारयादीत नावनोंदणी करता येणार आहे. या मुदतीत नावनोंदणी करणाऱ्यांनाच विधानसभेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क मिळणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरव राव यांनी शुक्रवारी दिली.

मानधनाच्या टक्केवारीचाही ‘ठेका’!

$
0
0
पारंपरिक वाद्ये, सामाजिक उपक्रमांचा डंका पिटणाऱ्या ढोलपथकांमध्ये आता मानधनाच्या टक्केवारीचा गोरखधंदा होऊ लागला आहे. वर्षागणिक ढोलपथकांचे अर्थकारण वाढत असून, आर्थिक फायद्यासाठी काही पथके आपल्या बॅनरचा वापर करून टक्केवारीचे व्यवहार करू लागली आहेत.

पितृपक्षाचा असाही परिणाम

$
0
0
पितृपक्षात नवे मुहूर्त, शुभकार्ये करू नयेत अशी अंधश्रद्धा असल्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना नवरात्रीच्या पहिल्या तीन ​दिवसांमध्ये ' शुभमुहूर्त ' शोधावे लागणार आहेत.

शहर होर्डिंग, बॅनरमुक्त होणार

$
0
0
शहरात विविध राजकीय पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्यासह संस्था-संघटना यांनी लावलेले सर्व फलक, बॅनर, पोस्टर्स आणि होर्डिंग्ज तातडीने काढून टाकण्याचे आदेश पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी शुक्रवारी दिले.

सरकारी वाहने जमा

$
0
0
विधानसभा निवडणुकीच्या घोषणेसोबतच आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची सरकारी वाहने जमा करून घेण्यास जिल्हाधिकारी कार्यालयाने सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील महापौर, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष अशा सर्वांनीच सरकारी वाहने शुक्रवारी सोडली.

बनावट सिमकार्डचा वापर

$
0
0
डेक्कन आणि दगडूशेठ मंदिराच्या परिसरात सॉक्स विक्री करणाऱ्या एका बिहारी विक्रेत्याला सापडलेले सिमकार्ड वापरणे चांगलेच महागात पडले आहे. फरासखाना पोलिस ठाण्याच्या आवारात झालेल्या स्फोटाच्या तपासात ही बाब निष्पन्न झाल्याने दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

कसरत निवडणूक पार पाडण्याची

$
0
0
मतदार याद्या अद्ययावत करण्यापासून मतदान केंद्रे, निवडणूक ओळखपत्रे, मतदार जागृती, मतदान व मतमोजणीसाठी ६५ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती, त्यांचे तीन वेळा प्रशिक्षण, मतमोजणीसाठी स्वतंत्र यंत्रणा आणि ६८ लाख मतदारांना घरपोच व्होटर स्लिप देण्यापर्यंतची कसरत जिल्हा प्रशासनाला येत्या तीस दिवसांत करावी लागणार आहे.

कॉलेज विद्यार्थिनीची आत्महत्या

$
0
0
वडगाव येथील सिंहगड पॉलिटेक्निकल कॉलेजमध्ये शिकत असलेल्या एका १७ वर्षीय विद्यार्थिनीने कॉलेजच्या शेजारी असलेल्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.

दुचाकी चोरणाऱ्या तिघांना अटक

$
0
0
चोरलेल्या दुचाकींची बनावट कागदपत्रे तयार करून ओएलएक्स वेबसाइटवर जाहिरात देऊन दुचाकी विकण्याची अनोखी शक्कल लढविणाऱ्या तिघा आरोपींना लष्कर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. चोरलेल्या दुचाकीसाठी बनावट कागदपत्रेही आरोपी स्वतःच तयार करत होते.

हडपसरमध्ये अपघाती मृत्यू

$
0
0
सय्यदनगर महंमदवाडी रस्त्यावर दुचाकीची धडक बसून रस्त्याने पायी निघालेला पाच वर्षांच्या मुलगा समोरून येणाऱ्या ट्रकवर आदळून ठार झाला. शनिवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास हा प्रकार घडला. सिद्दीक सादिक शेख (वय ५, सय्यदनगर) हे या मुलाचे नाव आहे.

मिरवणुकीत मारहाण करणाऱ्याला अटक

$
0
0
गेल्या वर्षी गणपती विसर्जन नाचत असताना धक्का लागल्याच्या कारणावरून एकाला बेदम मारहाण केल्याच्या प्रकरणातील एका आरोपीला पोलिसांनी नाशिक येथून अटक केली आहे. त्याला शनिवारी कोर्टाने १६ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images