Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

$
0
0
पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून दोघांनी एका तरुणावर वार करून त्याला जखमी केले होते. उपचार सुरू असताना गुरुवारी त्याचा मृत्यू झाला. काळू ऊर्फ कृष्णा दांडे (वय २५, रा. त्रिवेणीनगर, निगडी) असे त्याचे नाव आहे.

काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी सचिन साठे यांची नियुक्ती

$
0
0
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या काही तास अगोदर काँग्रेसच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी सचिन साठे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे भाऊसाहेब भोईर यांच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

धरण-प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आंदोलन

$
0
0
राज्यातील पाटबंधारे प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील जमिनींच्या हस्तांतर व्यवहारावर असलेले निर्बंध उठविण्याबाबतचा शासन निर्णय तातडीने रद्द करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य धरण व प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषदेने शुक्रवारी केली.

काही तासांतच वाहन सोडावे लागले

$
0
0
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी विराजमान झालेल्या शकुंतला धराडे आणि उपमहापौर प्रभाकर वाघेरे यांना काही तासांतच सरकारी वाहन सोडावे लागले. या दोघांनाही आपापल्या घरी जाताना खासगी वाहनांचा वापर करावा लागला.

पिंपरीच्या महापौरपदी धराडे

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शकुंतला धराडे आणि उपमहापौरपदी याच पक्षाचे प्रभाकर वाघेरे यांची शुक्रवारी बिनविरोध निवड झाली.

‘पॉझिटिव्ह साथी’चा मंथन पुरस्काराने गौरव

$
0
0
एचआयव्हीग्रस्तांनाही योग्य जीवनसाथी मिळवून देणाऱ्या ‘पॉझिटिव्ह साथी’ या ई-एनजीओला नुकतेच मंथन पुरस्काराने गौरविण्यात आले. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी असलेल्या अनिल वळीव यांनी ही वेबसाइट विकसित केली आहे.

वंचित घटकांसाठी ‘देणे समाजाचे’

$
0
0
समाजातील विविध घटकांसाठी अनेक स्वयंसेवी संस्था आपापल्या पातळ्यांवर काम करीत असतात. काही संस्थांना दानशूर व्यक्तींचा पाठिंबा मिळतो, तर काहींना शासनाच्या योजनांचा लाभ मिळतो.

भोर नगरपरिषदेत राजकीय सुंदोपसुंदी

$
0
0
विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने गेल्या दीड महिन्यांपासून भोर नगरपरिषदेत नगराध्यक्ष व नगरसेवकांमध्ये सुंदोपसुंदी सुरू झाल्याने त्याचा कामकाजावर परिणाम झाला आहे.

‘इंद्रधनू’ म्हणजे एकत्र कुटुंबच जणू

$
0
0
आमच्या इंद्रधनू सोसायटीत विविध प्रकारच्या स्वभावाचे सभासद एकमेकांमध्ये अगदी बेमालूमपणे मिसळून गेले आहेत. त्यामुळेच आमच्या सोसायटीचे एक कुटुंबच तयार झाले आहे.

कचऱ्यामुळे आरोग्य धोक्यात

$
0
0
गेल्या काही वर्षात चाकण व परिसरात अनेक लहान-मोठ्या कंपन्या निर्माण झाल्या. ऑटोमोबाईल क्षेत्रातील विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आगमनामुळे चाकण ऑटो हब म्हणून उदयास आले.

पालिकेची फक्त जनजागृतीचीच

$
0
0
घरातील झाडांच्या कुंड्यांमध्ये पाणी साठणे... वापरण्याच्या पाण्याची साठवणूक करणे... पाण्याच्या टाकीचे झाकण उघडे असणे...असे तुमच्या घरात चित्र दिसत असेल आणि घरातील सदस्याला सतत ताप येतोय, अंग दुखतयं, अशक्तपणा जाणवतोय...ही लक्षणे दिसत असल्यास त्याला डेंगीची लागण झाला असण्याची शक्यता आहे.

टाकीत बुडून मुलाचा मृत्यू

$
0
0
हडपसर माळवाडी येथील महापालिकेच्या हँडबॉल स्टेडियममधील पाण्याच्या टाकीत बुडून एका नऊ वर्षांच्या अपंग मुलाचा मृत्यू झाला. पाणी भरण्यास आलेल्या नागरिकांकडून ही घटना शुक्रवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.

तरुणाच्या मृत्यूनंतरही पालिकेचे दुर्लक्ष

$
0
0
महंमदवाडी येथे जून महिन्यामध्ये डेंगीमुळे एका तरुणाचा मृत्यू झाला होता. तरीही महंमदवाडी, सय्यदनगर, काळेपडळ, पंधरा नंबर, गोंधळेनगर, हडपसर, वानवडी, कोंढवा परिसरामध्ये डेंगी , मलेरियाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. मात्र, महापालिका याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.

वाढत्या ‘डेंगी’वर कारवाई संथच

$
0
0
जुलै महिन्याच्या आखेरीस आंबेगाव बुद्रूक व आंबेगाव पठारपासून सुरू झालेली डेंगीची साथ नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच धनकवडी व बालाजीनगर परिसरात साथ पसरल्याचे पेशंट संख्येवरून आढळून आले आहे.

विदेशी पर्यटकांना ‘MTDC’चे निमंत्रण

$
0
0
डेक्कन ओडिसीच्या माध्यमातून परदेशी पर्यटकांना महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे पाहण्यासाठी आकर्षित करण्याचा प्रयत्न फारसा यशस्वी न झाल्याने आता युरोपमधील फेम टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स एजंटांना महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाने (एमटीडीसी) निमंत्रित केले आहे.

शहरसुधारणांचे ७८६ प्रस्ताव रखडले

$
0
0
महापालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शहर सुधारणा समितीने अभिप्रायासाठी पाठविलेल्या सुमारे ७८६ प्रस्ताव रखडले आहेत. प्रशासनाने गेल्या सात वर्षांपासून यावर कोणताही अभिप्राय देण्याची तसदी घेतली नसल्याने हे प्रस्ताव रखडले आहे.

नव्या गझलकारांकडून आश्वासक लेखन

$
0
0
गझल सम्राट सुरेश भट यांनी मराठीमध्ये रुजवलेली गझलेची परंपरा नवी पिढी उत्साहाने पुढे नेताना दिसत आहे. राज्याच्या विविध प्रांतातून सातत्याने नव्या पिढीचे गझलकार आश्वासक लेखन करत आहेत.

मित्राच्या खूनप्रकरणी जन्मठेप

$
0
0
मित्राने विकलेल्या फ्लॅटमधून आलेल्या पैशांवर डल्ला मारण्यासाठी त्याचा खून करणाऱ्याला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सत्र न्यायाधीश एस. टी. ढवळे यांच्या कोर्टाने हा निकाल दिला. याप्रकरणी सुभाष शामराव गायकवाड (५५, रा. दापोडी) याला शिक्षा सुनावण्यात आली आहे.

नव्या अभ्यासक्रमाला एकही आक्षेप नाही

$
0
0
चौथीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केलेल्या नव्या अभ्यासक्रमाला आणि परीक्षेच्या नव्या स्वरूपाला राज्यातून एकही आक्षेप नोंदविला गेला नसल्याचे समोर आले आहे.

पालक-शिक्षक संघ निम्म्या शाळांत नाही

$
0
0
शुल्क नियंत्रण कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या पालक-शिक्षक संघाच्या स्थापनेविषयी राज्यातील शाळा गांभीर्याने विचारच करत नसल्याचे स्पष्ट होत आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images