Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘स्थायी’तील वादाची ‘दादां’कडून दखल

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीतील वाद चव्हाट्यावर येऊ लागला असून, पदाधिकारी दमबाजी करीत असल्याचा आरोप सदस्या रमा ओव्हाळ यांनी केला आहे. या प्रकरणाची उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दखल घेतली असून, चुकीची कामे करणाऱ्यांना पाठीशी घालणार नाही, अशी तंबी त्यांनी दिली आहे.

पुणे कँटोन्मेंटमध्ये काही वस्तू महाग

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाने स्थानिक संस्था कराचे (एलबीटी) दर राज्य सरकारने बनविलेल्या दरपत्रकाप्रमाणेच ठरविले आहेत. मात्र, राज्य सरकार आणि पुणे महापालिका यांनी काही वस्तूंवरील एलबीटी कमी केला असताना, बोर्डाच्या आराखड्यात त्या वस्तूंचे दर जास्त आहेत.

‘कौटुंबिक कायदा व एकात्मतेचा संबंध नाही’

$
0
0
समान कौटुंबिक कायदा सर्वसहमतीनेच केला पाहिजे, मात्र हा कायदा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा काही संबंध नाही, असे स्पष्ट मत सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश पी.बी. सावंत यांनी नुकतेच व्यक्त केले.

मद्यपी तरुणामुळे पोलिसांची तारांबळ

$
0
0
मद्यपान केलेल्या तरुणाने आत्महत्या करणार असल्याचा खोटा ‘एसएमएस’ पाठवून रविवारी पोलिस आणि फायरब्रिगेड यंत्रणा कामाला लावली. राहुल राजेंद्र हेगडे (वय ३०) असे त्या तरुणाचे नाव आहे. तो हिंजवडी येथील एका आयटी कंपनीमध्ये कामाला असून, तो मूळचा कर्नाटकचा आहे.

अॅडमिशनच्या बहाण्याने २० लाखांची फसवणूक

$
0
0
‘एमबीबीएस’ला अॅडमिशन मिळवून देण्याच्या बहाण्याने २० लाख रुपये घेऊन जळगावच्या व्यक्तीची फसवणूक केल्याची घटना पुण्यात घडली. या विरोधात विपिन बेंडाळे (वय ४६, रा. जळगाव) यांनी शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

बेशुद्ध पाडल्यानंतर ओमवर लैंगिक अत्याचार

$
0
0
हडपसर येथे अनैसर्गिक कृत्यास विरोध करणाऱ्या दहा वर्षांच्या ओम बनकर याचा खून करणाऱ्या आरोपीने त्या मुलाचे तोंड टपातील पाण्यात बुडवून तो बेशुद्ध झाल्यानंतर त्याच्यावर अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, विशेष न्यायाधीशांनी याप्रकरणातील तीनही आरोपींना ६ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

उघडीप अन् तडाखाही

$
0
0
सायंकाळनंतर शहर आणि परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पावसापासून गणरायाचे आणि देखाव्याचे संरक्षण करण्यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ उडाली, तर रविवारच्या सुटीचेनिमित्त साधून गणपती पाहण्यासाठी बाहेर पडलेल्या पुणेकरांना अचानक आलेल्या सरींपासून वाचण्यासाठी कसरत करावी लागली.

राजकारणामुळे शिवाजी सावंतांचा ज्ञानपीठ हुकला

$
0
0
‘मृत्युंजय’कार शिवाजी​ सावंत हे लेखक म्हणून देशभर प्रसिद्ध असतानाही समीक्षक आणि पुरस्कार कमिटीमधील राजकारण यामुळे सावंत यांना ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ मिळू शकला नाही, अशी टीका पानिपतकार विश्वास पाटील यांनी केली.

५३ मंडळांनी वापरली नियमापेक्षा जास्त जागा

$
0
0
शहराच्या मध्यवर्ती भागातील ५३ गणेश मंडळांनी मांडवासाठी नियमापेक्षा अधिक जागा वापरल्याचे वाहतूक पोलिसांच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. रस्त्याची ७० टक्क्यांहून अधिक जागा व्यापणाऱ्या मंडळांनी आपला मांडव कमी केल्यानंतरच त्यांना परवानगी देण्याचा पवित्रा वाहतूक पोलिसांनी घेतला होता.

राज्यातील विद्यार्थ्यांना ‘इन्स्पिरेशन’ नाही

$
0
0
निवडणुकांसाठीच्या पार्श्वभूमीवर केल्या जात असलेल्या जाहिरातींत महाराष्ट्र अग्रेसर असल्याचा दावा करणारे शिक्षणखाते प्रत्यक्षात मात्र पिछाडीवरचाच कारभार करीत असल्याचे ‘इन्स्पायर अॅवॉर्ड’च्या निमित्ताने पुढे येत आहे.

पावसाची दमदार हजेरी

$
0
0
विदर्भावर असलेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे रविवारी पुण्यासह राज्यात सर्वदूर पावसाने दमदार हजेरी लावली. संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय असल्याने रविवारी काही ठिकाणी जोरदार, तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला.

युवतीचा ‘दूधसागर’मध्ये मृत्यू

$
0
0
गोवा-कर्नाटक सीमेवरील दूधसागर धबधबा परिसरात ट्रेकिंगसाठी गेलेल्या पुण्यातील युवतीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. चेताली सतीश पाटील (वय २४) असे त्या तरुणीचे नाव असून, ती एरंडवण्यात राहणारी आहे.

पुणे : महापालिका काढणार लघुपट

$
0
0
राज्याची सांस्कृतिक राजधानी, विद्येचे माहेरघर, पेन्शनरांचे शहर अशी विविध क्षेत्रात ख्याती असलेल्या पुणे शहराची महती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचविण्यासाठी महापालिका लघुपट (शॉर्ट फिल्म) काढणार आहे.

‘एकला चलो’चा काँग्रेसचा नारा

$
0
0
‘विविध मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते लढण्यास तयार आहेत. परंतु, आघाडीमुळे अनेक ठिकाणी आम्हाला लढू दिले जात नाही. न लढताच कार्यकर्त्यांना मारू नका..’ अशा मागण्या करीत राज्यातील अनेक मतदारसंघांमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या ‘एकला चलो रे’ च्या घोषणांनी रविवारी मुंबईतील टिळक भवन दणाणून गेले.

व्हायरल आजारांनी पुणेकर बेजार

$
0
0
सकाळी कडक ऊन, दुपारी पाऊस, रात्री गारवा यासारखे बदलत्या हवामानामुळे विषाणूंचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे घराघरात लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना सर्दी, खोकला, डेंगी, मलेरिया सदृश तापाचा संसर्ग होऊन कुटुंबच आजारी पडू लागली आहेत.

मोदींचा तास : काँग्रेसची छडी

$
0
0
शिक्षकदिनाच्या निमित्ताने देशभरातील शालेय विद्यार्थ्यांचा सक्तीचा तास घेण्याचा मोदी सरकारचा निर्णय वादात सापडण्याची चिन्हे आहेत. मुख्याध्यापक-शिक्षकांसह विद्यार्थ्यांवर लादल्या जाणाऱ्या अशा निर्णयांचा विरोध करण्यासाठी काँग्रेसकडून राज्यव्यापी मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

पुणेरी गणेशोत्सवाचे बदलते रंग

$
0
0
अर्थवशीर्षचे पठण... देशभरातील देखण्या मंदिरांच्या प्रतिकृती...नारळांच्या ढीगांमध्ये बसलेला गणराय... विर्सजन मिरवणुकीत शिस्तबद्ध बँडपथक, झांजा-ढोल-लेझीम पथक... ही पुण्यातल्या गणेशोत्सवाची वैशिष्ट्ये. याच गणेशोत्सवातल्या कार्यक्रमांमधून अनेक दिग्गज कलावंत सामान्य रसिकांपर्यंत पोहोचले. पण...

७१ कलावंतांचे दगडूशेठला साकडे...

$
0
0
मराठी सिने-नाट्य सृष्टीतील तब्बल ७१ कलावंतांनी आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला विश्वशांती आणि समृद्धीसाठी साकडे घातले. सलाम पुणे या संस्थेने आज या उपक्रमाद्वारे पुण्याच्या गणेशोत्सवात एक ऐतिहासिक क्षण नोंदविला.

अॅडमिशनच्या बहाण्याने फसवणूक

$
0
0
‘एमबीबीएस’ला अॅडमिशन मिळवून देण्याच्या बहाण्याने २० लाख रुपये घेऊन जळगावच्या व्यक्तीची फसवणूक केल्याची घटना पुण्यात घडली. या विरोधात विपिन बेंडाळे (वय ४६, रा. जळगाव) यांनी शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

बर्फातून साकारले गणराय

$
0
0
एखादी कला साकारण्यासाठी बर्फाचा वापर करणे तसे कठीण काम. मात्र, हे आव्हान विजय पिसे यांनी स्वीकारले आणि त्यातून ‘आइस कार्व्हिंग’ ही आगळीवेगळी कला समोर आणली. गणेशोत्सवानिमित्त अवसरीच्या गव्हर्न्मेंट कॉलेजमध्ये झालेल्या प्रात्यक्षिकांमध्ये पिसे यांनी गणराय, मोदक आणि त्यांचे वाहन उंदीर तसेच राजहंस पक्षी साकारला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images