Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

प्लास्टिकविरोधात आता रात्रीही कारवाई

$
0
0
शहरात वारंवार उद्भवणाऱ्या कचऱ्याच्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी सर्वाधिक कचरा साठणाऱ्या जागांवरील कचरा निर्मूलनासह पुन्हा एकदा प्लास्टिकवरील निर्बंधाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

विकृत तरुणाकडून १० वर्षांच्या मुलाचा खून

$
0
0
एका दहा वर्षीय मुलाबरोबर अनैसर्गिक कृत्य करताना त्याने विरोध केल्यामुळे शेजारी राहत असलेल्या विकृत तरुणाने त्याचा खून केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. संबंधित तरुण आणि त्याला मदत केल्याप्रकरणी त्याच्या आई वडिलांना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.

महापौरपदावरून कारभाऱ्यांमध्येच विसंवाद

$
0
0
पालिका निवडणुकांनंतर महापौरपद पाचही वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहील, असे निश्चित झाले असतानाही, काँग्रेसकडून विनाकारण संभ्रमाचे वातावरण निर्माण केले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.

कँटोन्मेंट परिसरात पेट्रोल स्वस्त होणार

$
0
0
राज्य सरकारचा कोणत्याही प्रकारचा अध्यादेश नसताना कँटोन्मेंट विभागात पेट्रोल पंपांच्या माध्यमातून होणारी स्थानिक संस्था कराची (एलबीटी) वसुली लवकरच थांबणार आहे. कँटोन्मेंट परिसरातील पेट्रोल पंपांकडून एलबीटी आकारण्यात येऊ नये, अशा आशयाचे पत्र पुणे महापालिकेने शनिवारी ऑइल कंपन्यांना दिले.

१ वेळ पाणीपुरवठ्याच्या निर्णयाची कारणमीमांसा सांगा

$
0
0
पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा कारभार कोणत्याही नियोजनाशिवाय सुरू असून, धरणांत पुरेसा साठा असतानाही एक वेळ पाणी देण्याचा निर्णय कोणत्या उद्देशाने घेण्यात आला, त्याची कारणमीमांसा जाहीर करावी, अशी मागणी आता राजकीय पक्षांकडूनही होऊ लागली आहे.

उत्सवाचा मान....

$
0
0
पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवातील मानाच्या पाच गणपतींसह दगडूशेठ मंडळ व अखिल मंडई मंडळाच्या गणपतींची माहिती...

पुण्याचा गणेशोत्सव ‘अलाइव्ह’

$
0
0
पुण्याचा गणेशोत्सव हा विविध कारणांनी वैशिष्ट्यपूर्ण असतोच; पण ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वाचकांच्या दृष्टीने या वैशिष्ट्यामध्ये आजपासून आणखी एक भर पडते आहे. टाइम्स समूहाने ‘अलाइव्ह’ या मोबाइल अॅपच्या साह्याने तो बोलका केला आहे.

पुणेरी गणेशोत्सवाचे बदलते रंग

$
0
0
सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे महाराष्ट्राची एक सांस्कृतिक ओळख. गणेशोत्सवाचा काळ म्हणजे नितांत भक्तिभाव...उत्साह...आनंद. संपूर्ण महाराष्ट्रात हा उत्सव मोठ्या दणक्यात साजरा होतोच; तरीही विविध शहरांमध्ये हा उत्सव साजरा करण्याच्या काही खास रीती, परंपरा आहेत.

मुंबईतही आजपासून ‘ई रजिस्ट्रेशन’

$
0
0
राज्याच्या नोंदणी व मुद्रांक विभागाची ‘ई रजिस्ट्रेशन’ सुविधा आज, रविवारपासून पुण्यापाठोपाठ मुंबईतही उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता नव्या फ्लॅटखरेदीच्या व्यवहारांची नोंदणी बिल्डरच्या ऑफिसमध्येच करता येणार आहे. त्यामुळे ग्राहक आणि बिल्डर्सच्या प्रतिनिधींना नोंदणी कार्यालयात जाण्याचा वेळ वाचणार आहे.

मोदी गुरुजींची सक्तीची शाळा

$
0
0
शिक्षण दिनी (५ सप्टेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण होणार आहे. त्याचे थेट प्रक्षेपण राज्यातील प्रत्येक शाळेत केले जाणार असून तशा प्रकारचे आदेश केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने काढले आहेत. पंतप्रधानांचे हे थेट भाषण विद्यार्थ्यांना ऐकता यावे यासाठी टीव्हीपासून ते आसन व्यवस्थेची जबाबदारी मुख्याध्यापकाची असणार आहे.

बिहार, हरियाणा पॅटर्नचे राज्यात पडसाद

$
0
0
एकीकडे बिहारमध्ये ‘धर्मनिरपेक्ष शक्तीं’ची मोट बांधल्याने पोटनिवडणुकीत झालेला फायदा; तर दुसरीकडे हरियाणात भारतीय जनता पक्ष आणि हरियाणा विकास काँग्रेस याची तुटलेली युती...

गणेश मंडळांवर कारवाईसाठी वकील सरसावले

$
0
0
ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरलेल्या पर्यावरण मंत्रालय आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला धडा शिकविण्यासाठी राज्यातील सामाजिक न्यायासाठी लढणारे वकील आता एकत्र आले आहेत.

माळीण गावाला मंडळांचा मदतीचा हात

$
0
0
धानोरी -लोहगांव परिसरात यंदाच्या वर्षी सर्व गणेश मंडळानी माळीण दुर्घटनेमुळे देखावे साधेपणाने केले असून जास्तीत जास्त निधी माळीण गाव मदतीसाठी पाठविण्यात येणार आहे. अनेक मंडळानी पाच हजारपासून पन्नास हजारांपर्यंत रुपयांची मदत करण्याचे ठरविले आहे.

पौराणिक आणि नावीन्यपूर्ण देखाव्यांवर भर

$
0
0
शिवाजी रस्ता, शुक्रवार पेठेतील चर्चेत असलेल्या गणेश मंडळांनी यंदाही पौराणिक तसेच नाविन्यपूर्ण देखावे करण्यावर भर दिला आहे. बाबू गेनू मित्र मंडळाचा नऊ रंगात दिसणारा गणेश मंदिर, शाहू चौक मंडळाचा संत ज्ञानेश्वर समाधी मंदिर तर सेवा मित्र मंडळाने साकारलेले ८५ फूट उंचीचे चंद्रोदय मंदिर...

पार्किंगचे ९ लाख रुपये वसूल करणार

$
0
0
पूर्वीच्या ठेकेदाराकडून पार्किंगच्या शुल्कापोटी बाजार समितीला देणे असलेली नऊ लाख रुपयांची रक्कम वसूल करण्याचा निर्णय प्रादेशिक बाजार समितीच्या प्रशासकीय मंडळाने घेतला. तसेच, बाजार समितीच्या आवारातील जागेत कोणाचेही अतिक्रमण होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.

यार्डातील फूल बाजार भरणार तरी कोठे?

$
0
0
कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला फूल बाजार आता मॅफकोच्या जागेत की गुरांच्या बाजारात उभारायचा याबाबत पुणे प्रादेशिक बाजार समितीच्या प्रशासकीय मंडळापुढे प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. प्रशासकीय मंडळाने आर्किटेक्टचे मत मागविले आहे.

खराब पालेभाज्यांमुळे आवक होऊनही दरवाढ

$
0
0
पावसामुळे भाज्या खराब झाल्याने पालेभाज्यांच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे. तर, बटाटा वगळता फळभाज्यांचे दर मात्र स्थिर आहेत. येत्या बुधवारी गौरी पूजन असल्याने त्यासाठी फळभाज्यांच्या मागणीत वाढ झाली असल्याने भाज्यांचे दर वाढले आहेत.

पंपावर दरोडा टाकणाऱ्यांना ३ तासांत पकडले

$
0
0
कासारवाडी येथील पेट्रोल पंपावर रविवारी (३१ ऑगस्ट) पहाटे दरोडा टाकून पळून जाणाऱ्या टोळीला भोसरी पोलिसांनी तीन तासांत अटक केली.

अत्याचार रोखण्यासाठी कायद्याचे विशेष संरक्षण द्या

$
0
0
भटक्या विमुक्त जमातीतील महिलांवरील अन्याय अत्याचार रोखण्यासाठी त्यांना अनुसूचित जाती व जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंध कायद्याचे विशेष संरक्षण द्यावे आणि भटके विमुक्त जमातींना जातीचा दाखला काढण्यासाठी १९६१ सालच्या वास्तव्याच्या पुराव्याची अट रद्द करावी, अशी मागणी भटके विमुक्त महिला अधिकार आंदोलन संघटनेने रविवारी केली.

दोन वेगवेगळ्या घटनेतील दुचाकी चोरणारे अटकेत

$
0
0
पाच महिन्यांपूर्वी पुणे स्टेशन येथील पार्किंगमधून दुचाकी चोरून नेल्याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी रवी वामनराव टिंगळे (वय १९, रा. जाहिराबाद, कर्नाटक) याला अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीची दुचाकी जप्त केली आहे. या प्रकरणी चेतन राजेंद्र शहा (३६, रा. वानवडी) यांनी फिर्याद दिली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images