Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पत्नीचा खून : पतीला जन्मठेपेची शिक्षा

$
0
0
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या डोक्यात पाटा घालून खून केल्याप्रकरणी पतीला जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. जगताप यांच्या कोर्टाने हा निकाल दिला. खेड सत्र न्यायालय सुरू करण्यात आल्यानंतर सुनावण्यात आलेली ही पहिलीच शिक्षा आहे.

सार्वजनिक स्वच्छतेची शिस्त लावण्यासाठी पालिकेची पावले

$
0
0
शहरात दर चार सहा महिन्यांनी निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याबरोबरच सार्वजनिक स्वच्छतेचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना शिस्त लावण्यासाठी पालिकेने पावले उचलली आहेत.

‘स्थायी’च्या निर्णयावर लक्ष

$
0
0
आचारसंहिता लागू होण्याच्या शक्यतेने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत नियम धाब्यावर बसवून संगनमताने कोट्यवधी रुपयांची विकासकामे मंजूर होत असल्याच्या आम आदमी पक्षाचे जिल्हा समन्वयक मारुती भापकर यांच्या तक्रारीची मुख्यमंत्री कार्यालयाने दखल घेतली आहे.

पारधी समाज स्वातंत्र्यानंतरही हक्काच्या घरापासून वंचित

$
0
0
बारामतीतील कारखेल या गावातील पारधी समाजातील कुटुंबाला स्वातंत्र्यानंतरही प्रशासनाच्या हतबलतेमुळे हक्काच्या निवाऱ्यासाठी झगडावे लागत असल्यामुळे त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. ब्रिटिशांनी बळजबरीने लावलेल्या गुन्हेगार शिक्क्यामुळे स्वतंत्र भारतात आजही पारधी समाज सातत्याने सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आहे.

नळपुरवठा योजनेत भ्रष्टाचाराचा इन्कार

$
0
0
खेड तालुक्यातील कडाचीवाडी गावात राबविण्यात आलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेमध्ये कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही. जिल्हा परिषदेकडे केलेली तक्रार राजकीय द्वेषापोटी असल्याचे स्पष्टीकरण नळ पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष यांनी दिले.

बाजार समितीचे अधिकार राजगुरुनगरला काढले

$
0
0
विधानसभा निवडणुकीला काही दिवस शिल्लक राहिले असले तरी खेड तालुक्यातील राजकीय वातावरण भलत्याच दिशेला जाऊ पाहत आहे. एका नाट्यमय घडामोडीनंतर खेड कृषिउत्पन्न बाजार समितीचे सभापती रामदास ठाकूर यांचे सह्यांचे अधिकार काढून घेतले.

आचारसंहितेपूर्वी कामे संपवण्यासाठी ‘लगीनघाई’

$
0
0
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विविध समित्यांचे सभापती यांचा पुढच्या महिन्यात संपुष्टात येणारा कार्यकाल आणि त्यापूर्वी आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता असल्यामुळे जिल्हा परिषदेतील सत्ताधाऱ्यांना शेवटच्या क्षणी कामे उरकण्याची घाई झाली आहे.

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रयोगशाळा

$
0
0
जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात आता डेंगी, चिकनगुनिया आणि लिव्हर कार्यक्षमतेची मोफत चाचणी केली जाणार आहे. आरोग्य सेवा महाग होत असताना पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने डेंगीच्या आजारासारखी महागडी चाचणी मोफत करण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

आंतरराष्ट्रीय व्याघ्र तस्कर सोराम बावरीला पंजाबमधून अटक

$
0
0
मेळघाटातील वाघाच्या शिकारप्रकरणात आंतरराष्ट्रीय व्याघ्र तस्कर सोराम बावरी याला दिल्ली येथील वाइल्ड लाइफ कंट्रोल बोर्डाच्या पथकाने पंजाबमधील होशियारपूर येथून अटक केली. मेळघाट सायबर सेलने दिलेल्या माहितीच्या आधारे हे अटकसत्र राबविण्यात आले.

युवकांनी वाचवले अपघातग्रस्तांचे प्राण

$
0
0
‘पीएमपी’खाली दहा वर्षांची चिमुकली गतप्राण झाली; ‘पीएमपी’ इनोव्हावर उलटली...‘व्हॉट्स अप’वरील अशा संवादाने हळहळ व्यक्त केली जात होती; पण भरत पटेकर आणि संदीप शेळके या दोन युवकांनी थेट अपघातस्थळी धाव घेतली.

डिझेलचोरी करणारी टोळी गजाआड

$
0
0
ग्रामीण पोलिसांनी कुंजीरवाडी येथे कारवाई करत ११ डिझेल चोरांना गजाआड केले आहे. डिझेल चोरीतील म्होरक्यासह तीन ड्रायव्हर, दोन क्लिनरचा यात समावेश आहे. याचबरोबर ३६ हजार लिटर डिझेल असलेले ५१ लाख रुपयांचे टँकरही जप्त करण्यात आले आहे.

‘PMP’ला पालिकेकडून १२० कोटी

$
0
0
परिवहन उपक्रमातील संचलन तूट भरून काढण्यासाठी ‘पीएमपीएमएल’ला १२० कोटी रुपये देण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला आहे. या रकमेतून कर्मचाऱ्यांच्या सुधारित वेतनश्रेणीचा फरक दिला जाणार आहे.

कालवा वाहता ठेवण्याचा ‘कारभार’

$
0
0
वर्षभराच्या नियोजनासाठी पुणेकरांनी एक वेळ पाणीकपात सहन केली असताना कोणाच्याही मागणीशिवाय कालवा मात्र पूर्ण क्षमतेने सुरू आहे. कालवा वाहता ठेवण्याचा कारभार नेमका कोणाच्या आदेशाने सुरू आहे, या कोड्याची उकल करण्याची जबाबदारी ‘कारभारी’ घेताना दिसत नाहीत.

७६ आक्षेपार्ह ‘यूआरएल’ डिलिट

$
0
0
फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करून समाजात तेढ निर्माण करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. पोलिसांकडून अशा प्रकारच्या पोस्ट शोधून त्या वेळीच डिलिट करण्याची कारवाई सुरू आहे. गेल्या दोन महिन्यांत पोलिसांनी अशा प्रकारच्या ७६ युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर (यूआरएल) डिलिट केल्या आहेत.

प्रदीप निफाडकर यांना पुरस्कार

$
0
0
मराठी गझलकार प्रदीप निफाडकर यांना यंदाचा उर्दू अकादमीचा सेतूमाधवराव पगडी पुरस्कार जाहीर झाला आहे. १५ हजार रुपये रोख आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

मुंबईतही आजपासून ई-रजिस्ट्रेशन

$
0
0
नव्या फ्लॅटखरेदीच्या व्यवहारांची नोंदणी बिल्डरच्या ऑफिसातच करण्याची सुविधा पुण्यापाठोपाठ आता आजपासून (रविवार) मुंबईत सुरू करण्यात येत आहे. पनवेलमधील म्हाडाच्या योजनेच्या फ्लॅटमधील खरेदीचे व्यवहार म्हाडाच्या ऑफिसमध्ये ही नोंदणी सुरू होणार आहे.

‘आवाज’ उत्सवाचा

$
0
0
मंगलमूर्तीसमोर साकारण्यात येणारे देखावे हे पुण्याच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य. भव्य-दिव्य, विविधरंगी सजावटीबरोबरच पौराणिक-धार्मिक-ऐतिहासिक विषयांवर आधारित देखाव्यांच्या माध्यमातून गणपतीच्या मांडवात साक्षात तो काळच जिवंत केला जाते.

असा सुरू झाला गणेशोत्सव

$
0
0
लोकमान्य टिळकांच्या कामात गणपतीला देशा-परदेशांत महत्त्व प्राप्त झाले. त्याअगोदर गणपती ही देवता परदेशात स्थानापन्न झालेली होतीच. तिबेट आणि तुर्कस्तान या प्रदेशात आध्यात्मिक मठांचा रक्षणकर्ता म्हणून तो द्वाररक्षक झाला.

परंपरा सामाजिक उपक्रमांची, विधायकतेची!

$
0
0
गणेशोत्सवाने उदात्त परंपरा जपताना समाज आणि राष्ट्राला उपयुक्त ठरतील असे अनेक बदल वेळोवेळी स्वीकारले आहेत. या गुणवैशिष्ट्यामुळे, काळ आणि पिढ्या बदलल्या तरी, समस्यांचे स्वरूप आणि मनोरंजनाचे स्रोत बदलले तरी आणि ज्ञान-विज्ञानामध्ये आधुनिकता आली तरीही सार्वजनिक गणेशोत्सवाची उपयुक्तता कालातीत अशीच आहे.

साजिरे-सुंदर रूप मनोहर

$
0
0
भान विसरून पाहात राहावे, तल्लीन होऊन नजरेत साठवून घ्यावे अन् लोभस दर्शनाने आनंदी, प्रसन्न व्हावे... बाप्पाचे हे साजिरे-सुंदर रूप मूर्तिकलेतून प्रत्यक्ष साकारते. प्रत्येक ठिकाणच्या गणेशमूर्तीची वैशिष्ट्ये वेगवेगळी असतात अन् त्या साकारण्यामागचा मूर्तिकाराचा भावही! त्या विषयी...
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images