Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पेट्रोल पंपचालकांचा संप अखेर मागे

$
0
0
पेट्रोल पंप चालकांनी मंगळवारपासून पुकारलेला बेमुदत संप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्या शिष्टाईनंतर मागे घेण्याचा निर्णय फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डिलर्स असोसिएशनने जाहीर केला आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात नागरिकांना होणारा त्रास टळला आहे.

आधी ‘लगीन’… जागावाटपाचे

$
0
0
महायुतीचे जागावाटप एक ते पाच सप्टेंबर या कालावधीत निश्चित होणार असून, महायुतीच्या जागावाटपानंतर भाजप आणि शिवसेनेच्या काही जागांमध्ये अदलाबदल केली जाणार आहे, असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी सोमवारी स्पष्ट केले.

काँग्रेसचाही फॉर्म्युला २८८

$
0
0
राष्ट्रवादीच्या दबावतंत्राला प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसनेही राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये इच्छुकांच्या मुलाखती सुरू करण्याचा निर्णय सोमवारी घेतला. त्यामुळे आघाडीच्या राजकारणात आक्रमक पवित्रा घेऊन राष्ट्रवादीला झटका देण्याचे काँग्रेसने ठरविल्याचे स्पष्ट झाले आहे.

अपहरण झालेल्या लहानग्याची सुटका

$
0
0
कोंढवा येथून सात दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या दीड वर्षीय मुलाची रिक्षाचालकांच्या प्रसंगावधानामुळे सुटका झाली. त्याला घेऊन पलायन करण्याच्या बेतात असलेल्या दाम्पत्याला रिक्षाचालकांनी सोमवारी सकाळी रेल्वे स्टेशनवर ओळखले.

कँटोन्मेंटमध्ये दीड वर्षांनी ‘LBT’ हरकती

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू करण्याचा आदेश संरक्षण मंत्रालयाने काढल्यामुळे अखेर दीड वर्षांनी ‘एलबीटी’ आकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नागरिकांना हरकती आणि सूचनांसाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

मदतीस नकार देणाऱ्यांना दणका

$
0
0
गेल्या दोन दिवसांपासून शहरात पडत असलेल्या पावसामुळे अनेक भागातील घरांमध्ये पाणी ‌शिरले. यावर उपाययोजना करण्यासाठी मदत देण्याचे सोडून आपत्ती व्यवस्थापन विभाग, तसेच अग्नीशमन दलाकडून रविवारच्या सुटीचे कारण पुढे करत मदत देण्यास नकार देण्यात आला.

महापौरांच्या उत्तरावर नगरसेविका नाराज

$
0
0
महापालिकेच्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक महोत्सवाच्या प्रवेशिका (पास) बेकायदेशीरपणे वाटल्याने राष्ट्रवादीच्या नगरसेविका अश्विनी कदम यांनी सोमवारी सर्वसाधारण सभेमध्ये आवाज उठविला. प्रशासनाने याबाबत खुलासा करावा, अशी मागणी कदम यांनी केली असताना त्यावर सभागृह नेते सुभाष जगताप यांनी‌ बोलण्यास सुरुवात केली.

ठेकेदार, अधिकाऱ्यांवरून पालिका प्रशासन धारेवर

$
0
0
चुकीच्या पद्धतीने काम करुन महापालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान करणाऱ्या ठेकेदारावर प्रशासन कारवाई करते. मात्र, या ठेकेदारांना मदत करणाऱ्या पालिकेतील अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नाही. अधिकाऱ्यांच्या संगनमतानेच ठेकेदार मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करत सर्वपक्षीय सभासदांनी सोमवारी प्रशासनाला धारेवर धरले.

झेडपी, पंचायत समित्या होणार लवकरच ‘हाय टेक’

$
0
0
ग्रामविकास विभागातर्फे जिल्हा परिषद स्तरावर ई- गव्हर्नन्ससाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्हा परिषदेत मध्यवर्ती माहिती व तंत्रज्ञान विभाग निर्माण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

महापालिकेची शिक्षक भरती प्रक्रिया बेकायदा

$
0
0
पुणे महानगरपालिकेच्या इंग्रजी शाळांसाठी पालिकेने नुकतीच राबविलेली शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे राज्याचे शिक्षण आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी सोमवारी स्पष्ट केले.

नऊवारी नेसणे म्हणजे लावणी सादर करणे नाही

$
0
0
‘केवळ नऊवारी नेसणे म्हणजे लावणी नव्हे. तर त्यातील शब्द, अभिनय चेहऱ्यावरील भाव ज्याला समजतात, तोच व्यक्ती लावणीचा खरा आनंद घेऊ शकतो. नाहीतर बाकीचे लोक लावणीचे नाव घेतल्यावर नाक मुरडतात,’ अशी भावना ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांनी व्यक्त केली.

टोलवर पडणार कारवाईचा ‘टोल’!

$
0
0
ढोल-ताशा पथकांमध्ये वाजवण्यात येणाऱ्या टोलला बंदी घालण्यात आल्याचा पुनरुच्चार पोलिस आयुक्त सतीश माथूर यांनी केला आहे. ढोल-ताशा पथकांनी मिरवणुकांदरम्यान टोल वाजवल्यास तो जप्त करण्याचे आदेश शहरातील सर्व पोलिस ठाण्यांना देण्यात आले आहेत.

दिवसात १३२ कोटींची कामे मंजूर

$
0
0
येत्या आठवड्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने स्थायी समितीत सोमवारी तब्बल १३२ कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली. एका दिवसात सुमारे शंभरहून अधिक प्रस्ताव मान्य करण्यात आले असून, त्यात सर्वाधिक ६४ कोटींचा निधी पाणीपुरवठा योजनांसाठी खर्च केला जाणार आहे.

‘नरेंद्र’ सांगतील तोच

$
0
0
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘दिल्लीत नरेंद्र, राज्यात देवेंद्र’चा नारा लावण्यात येत असला, तरी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मात्र आपण मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेमध्ये नसल्याचे सोमवारी पुण्यात स्पष्ट केले.

PMP च्या १९८ बस बंद

$
0
0
शहरातील सार्वजनिक वाहतूक सुधारावी, यासाठी केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरु नागरी पुनर्निर्माण (जेएनएनयूआरएम) योजनेअंतर्गत पुणे महानगर परिवहन महामंडळ कंपनीने (पीएमपीएमएल) खरेदी केलेल्या ६३९ बसपैकी तब्बल १९८ बस बंद पडल्या आहेत.

शाळा प्रवेश : ५ वर्षे ११ महिने?

$
0
0
येत्या शैक्षणिक वर्षापासून वयाची किमान पाच वर्षे ११ महिने पूर्ण केलेल्या बालकांनाच पहिल्याच्या प्रवेशासाठी गृहित धरले जाण्याची शक्यता आहे. तसा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन असून, त्या विषयी लवकरच धोरणात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे.

मनसेचे ‘इंजिन’ यार्डातच

$
0
0
मोदी लाटेचा धसका, नेतृत्वाच्या करिष्म्याला लागलेली उतरती कळा, ठोस कार्यक्रमाचा अभाव आणि त्यातून राज ठाकरे यांची उमेदवारीच्या रिंगणातून माघार...! एकापाठोपाठ उभ्या राहिलेल्या अशा आव्हानांमुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गोटात सामसूम पसरली आहे.

पालिकेने केला महिला अहवाल

$
0
0
प्रत्येक क्षेत्रात महिलांची प्रगती व्हावी, यासाठी ‘महिला संवेदनशील शहर तयार करण्यासाठीचा आराखडा’ महापालिकेने तयार केला आहे. त्यामुळे महिलांच्या सद्यस्थितीचा अहवाल तयार करणारी पुणे ही देशातील पहिली महापालिका ठरली आहे.

वाहनचोरीप्रकरणी तिघांना अटक

$
0
0
वाहनचोरीच्या गुन्ह्यातील वीस दुचाकी चोरट्यांकडून हस्तगत करण्यात चतुःश्रृंगी पोलिसांना यश आले आहे. वाहनचोरीच्या विविध गुन्ह्यातील तीन आरोपींना या प्रकरणी अटक करण्यात आली. यात एका सराईत चोरट्याचा समावेश आहे.

पोस्टमन भरतीसाठी आंदोलन

$
0
0
पोस्टमनची भरती करण्याच्या मागणीसाठी ऑल ​इंडिया पोस्टल एम्प्लॉइज युनियनच्या वतीने मंगळवारी मार्केटयार्ड आणि लोकमान्यनगर येथील अधीक्षक कार्यालयांसमोर आंदोलन करण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष जी. डी. शेख आणि सचिव आर. टी. तुपे यांच्या नेतृत्त्वाखाली सुमारे १०० कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images