Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

संगीतकार मोडक यांना ‘बालगंधर्व पुरस्कार’

0
0
‘अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शहर शाखेने ‘बालगंधर्व पुरस्कार’ देऊन माझा गौरव केल्यामुळे पुन्हा तरुणाईत आल्यासारखे वाटू लागले आहे. अशा पुरस्कारामुळे कलाकारांना एक प्रकारची चेतना मिळते,’ असे उद्गार ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक यांनी काढले.

निधी अभावी भविष्यनिर्वाह नाही

0
0
एसटी कर्मचा-यांना शैक्षणिक फी, घराची बांधणी आदी कामांसाठी भविष्यनिर्वाह निधीतील रक्कम उचल म्हणून घेण्यासाठी अर्ज केले असले तरी त्यासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध नसल्याने कर्मचार्यांनी ही रक्कम मिळत नसल्याचे समोर आले आहे.

आणखी ३०० जण मोहिमेत सहभागी

0
0
आरोग्यास हानीकरक असलेल्या ई कच-याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्थेने हाती घेतलेल्या ‘ई कचरा कलेक्ट’ मोहिमेची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. दुसर्या दिवशीही मोहिमेला उत्साही प्रतिसाद मिळाला असून, शनिवारी सुमारे ३०० जण मोहिमेत सहभागी झाले होते.

१.५ कोटी शेतक-यांना विम्याचे कवच

0
0
शेती करताना शेतक-यांना होणारे अपघात आणि त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकारने ‘शेतकरी जनता अपघात’ विमा योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत चालू वर्षात राज्यातील एक कोटी ३७ लाख शेतकर्यांना विमा संरक्षण मिळणार असून त्यासाठी ३१ कोटी ५१ लाख रुपयांचा हप्ता विमा कंपन्यांना दिला जाणार आहे.

तृतीय दर्जामुळे मराठी 'ऑप्शन'ला

0
0
‘मराठी भाषेच्या गळचेपीची अनेक उदाहरणे समोर असतानाच आता मराठी मुलखाची राजधानी असणा-या मुंबईमधील काही शाळांमध्येही मराठी भाषेला तृतीय भाषेचा दर्जा दिला जात आहे. अशा धोरणांमुळेच मराठी आता ‘ऑप्शन’ला जात आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी शासनाने पावले उचलण्याची गरज आहे.

माजी नगरसेवकांनाही संपूर्ण वैद्यकीय खर्च

0
0
नगरसेवकांना अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजनेअंतर्गत वैद्यकीय उपचाराचा शंभर टक्के खर्च देण्यात येतो. त्याप्रमाणे माजी नगरसेवक आणि नगरसेविकांनाही वैद्यकीय खर्चाची सर्व रक्कम देण्याबरोबरच त्यांच्या पती किंवा पत्नीलाही लाभ देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर आला आहे.

चार महिन्यांत ४५० कोटी

0
0
नव्या आर्थिक वर्षात महापालिकेला जकातीपोटी ४५० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. जकात विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी ही माहिती दिली. गेल्या आर्थिक वर्षात महापालिकेचे जकातीचे उत्पन्न लक्षणीय वाढले होते. त्यामुळे यंदाच्या आर्थिक वर्षातही जकात विभागास जकात वसुलीचे टार्गेट वाढवून देण्यात आले होते.

मणिपुरी तरुणांना मारहाण; ९ ताब्यात

0
0
कोंढवा आणि लष्कर परिसरात गेल्या तीन दिवसांत सहा मणिपुरी नागरिकांना मारहाण करणा-या नऊ तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबई येथे झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दक्षता बाळगण्यास सुरुवात केली आहे.

आरोग्याचे खासगीकरण

0
0
बाराव्या पंचवार्षिक योजनेत सार्वजनिक आरोग्याच्या कल्याणकारी योजनेतून बाहेर पडण्याचा केंद्र सरकारला नियोजन आयोगाने सल्ला दिला आहे. त्यामुळे आरोग्य सेवेचे खासगीकरण करण्याचा मंडळाने घाट घातला आहे. परिणामी गरिबांना उपचारासाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागण्याची भीती व्यक्त होत आहे.

स्वाइन फ्लूच्या पेशंट संख्येत वाढ

0
0
पिंपरी चिंचवड परिसरात स्वाइन फ्लूची लागण झालेल्या पेशंट्सच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, एप्रिल महिन्यापासून आजपर्यंत ४३ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. तर, दोन पेशंट्सचा मृत्यू झाला आहे. मात्र, परिस्थिती नियंत्रणात असून, स्वाइन फ्लूची लक्षणे दिसू लागताच त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच औषधोपचार सुरू करावे, असे आवाहन यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलचे आरोग्य प्रमुख डॉ. आनंदराव जगदाळे यांनी केले आहे.

सीएनजीचा पुरवठा सुरळीत करू

0
0
शहरातील पेट्रोल पंपावर सीएनजीचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिका-यांनी दिल्याने रिक्षा बंद आंदोलन एक महिना स्थगित करण्याचा निर्णय रिक्षा पंचायतीने घेतला आहे. रिक्षा पंचायतीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

मूकपट पाहा डीव्हीडीवर

0
0
राजा हरिश्चंद्र, कालियामर्दन यांसारख्या दर्जेदार मूकपटांचा आस्वाद आता सर्वसामान्य प्रेक्षकांना घेता येणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीच्या शताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने डीव्हीडीच्या माध्यमातून हे मूकपट उपलब्ध करण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. पहिल्या टप्प्यात चार मूकपटांची डीव्हीडी सप्टेंबरमध्ये प्रकाशित होणार असून या मूकपटांना संगीताचीही जोड देण्यात येणार आहे.

'आयसर'मध्ये 'नॅनो'क्रांती

0
0
अतिसूक्ष्म जागेमध्ये रासायनिक अभिक्रिया होताना द्रव्याच्या प्रवाहामधील रासायनिक आणि भौतिक बदल अभ्यासण्यात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, एज्युकेशन अँड रिसर्चच्या (आयसर) संशोधकांना यश आले आहे. या संशोधनामुळे अत्यल्प किमतीमध्ये नॅनो ट्यूबची निर्मिती करणे शक्य होणार आहे.

सानेगुरुजी हॉस्पिटलमधून अर्भक चोरी

0
0
दोन दिवसांच्या नवजात अर्भकाचे हडपसर येथील साने गुरुजी हॉस्पिटलमधून सोमवारी अपहरण करण्यात आले. पहाटे चार ते पाचच्या दरम्यान घडला. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

विधी समितीकडून दंडवाढीस मान्यता

0
0
रस्त्यावर आंघोळ, वाहने धुणे आणि पाळलेल्या जनावरांनी घाण केल्यास पुणेकरांना दंड द्यावा लागणार असून, बांधकामाचा कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकल्यास तब्बल २५ हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.

सीएनजीसाठी पहिल्या टप्प्यात एक हजार रिक्षांना अनुदान

0
0
‘सीएनजी’वरील रिक्षांना अनुदान देण्याच्या स्थायी समितीच्या निर्णय आता अमलात येणार आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात दहा हजारांपैकी एक हजार रिक्षांचालकांना प्रत्येकी बारा हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे.

बोगस मजूर दाखवणार्या इंजिनीअरला अटक

0
0
एका कंपनीच्या फॅक्टरीच्या बांधकाम साइटवरील बोगस मजूर दाखवून कंपनीकडून २५ हजार रुपये लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या इंजिनीअरला कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली आहे.

‘नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल’साठी न्यायाधीश, तज्ज्ञांना आवाहन

0
0
पर्यावरणाच्या समस्या सोडविण्याच्या उद्देशाने पुण्यामध्ये ऑक्टोबर महिन्यात सुरू होत असलेल्या ‘नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल’साठी न्यायाधीश आणि पर्यावरण तज्ज्ञांनी अर्ज पाठवावेत, असे आवाहन केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने केले आहे.

महापालिकेतील वादग्रस्त भरतीला स्थगिती?

0
0
पुणे महापालिकेत वादग्रस्त ठरलेल्या ज्युनियर इंजिनीअर पदाच्या भरतीला स्थगिती देण्यात येत असल्याची चर्चा आहे. या संदर्भात येत्या एक-दोन दिवसांत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

नोकरी लावण्याच्या मिषाने तरुणीची फसवणूक

0
0
हिंजवडी येथील आयबीएम कंपनीत नोकरी लावून देतो, असे सांगून एका तरुणीची दहा हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images