Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

भुयारी मार्गाला विरोध

$
0
0
पौड रोडवरील कोथरूड बस डेपो चौकात रस्ता ओलांडताना सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन या ठिकाणी भुयारी मार्ग प्रस्तावित करण्यात आला होता. मात्र पालिकेत सत्ताधारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक बंडू केमसे यांनी उपसूचना देऊन भुयारी मार्गाची जागाच बदलली आहे.

‘IIM’साठी एकच पर्याय... पुणे!

$
0
0
‘देशभरात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘आयआयएम’सारख्या नामवंत आणि दर्जेदार संस्थेच्या उभारणीसाठी आवश्यक असणारी जागा, शिकविण्यासाठी उपलब्ध असणारे मनुष्यबळ, नागरी सोयीसुविधा या दृष्टीने पुणे सर्वथा योग्य आहे. त्यामुळे ‘आयआयएम’ पुण्यात होणेच इष्ट आहे...’

भूतानच्या छात्राची आत्महत्या?

$
0
0
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमधील (एनडीए) एका भूतानच्या छात्राचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. खोलीतील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत या छात्राचा मृतदेह आढळल्याने त्याने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

‘लकवा झालेले निष्क्रीय सरकार’

$
0
0
‘राज्याच्या विकासाचा सुशासनाशी जवळचा संबंध असतो. गेली पंधरा वर्षे राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात सुशासनाचा राज्यात अभाव आहे. राज्यात धोरण ठरवण्याच्या बाबतीत लकवा आहेच; पण त्यासोबत धोरणानुसार निर्णय घेणे व त्यांची अंमलबजावणी या बाबतीतही हे सरकार लकवा झालेले निष्क्रीय सरकार आहे,’ असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

स्वाइन फ्लूमुळे दोघांचा मृत्यू

$
0
0
‘स्वाइन फ्लू’च्या संसर्गामुळे सातारा जिल्ह्यातील एका महिलेसह दोघांचा एका खासगी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य खात्याने केली आहे. या वर्षभरात आतापर्यंत पाच जणांचा या आजाराने बळी गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

विनाअट येणाऱ्यांनाच भाजपप्रवेश

$
0
0
उमेदवारी किंवा आणखी कोणतीही अट घालणाऱ्यांना भारतीय जनता पक्षात प्रवेश देण्यात येणार नाही, असे भाजपने गुरुवारी बजावले आहे. ‘विनाअट येणाऱ्या कार्यकर्त्यांनाच प्रवेश देण्यात येईल आणि पक्षाने निश्चित केलेल्या कसोट्यांवरच उमेदवारीचे वाटप होईल,’ असे पक्षाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी स्पष्ट केले.

‘विसर्जन मिरवणुकीवेळी अचानक तपासणी करा’

$
0
0
गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होण्यासाठी मिरवणुकीतील वाहने पोलिसांनी अचानक तपासण्याची मागणी मराठा युवा फाउंडेशनतर्फे करण्यात आली आहे. त्याबाबतचे निवेदन फाउंडेशनने पोलिस आयुक्तांना दिले आहे.

प्रॉपर्टी टॅक्सची बिले वाढीव दराने

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या परिसरातील प्रॉपर्टीजचे वार्षिक करपात्र मूल्य निश्चित करताना बोर्डाने संबंधित प्रॉपर्टीचे क्षेत्रफळ आणि प्रॉपर्टी किती जुनी आहे, यावरून ठरविले असल्याने नागरिकांना सुमारे ७०० ते ८०० पट वाढीव दराने प्रॉपर्टी टॅक्सची बिले पाठविण्यात येत आहेत.

जुन्नर, पुरंदर, वेल्हा, दौंडला महिला सभापती

$
0
0
जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापती पदांची आरक्षण सोडत जाहीर झाली असून जुन्नर, पुरंदर, वेल्हा व दौंड पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण गटातील महिलांसाठी आरक्षित आहे. हवेली पंचायत समितीचे सभापतीपद इतर मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे.

गणेशोत्सवासाठी प्रशासन सज्ज

$
0
0
शहराचा नावलौकिक सर्वत्र पोहचविणारा गणेशोत्सव काही दिवसांवर आल्याने गणेशोत्सवासाठी आवश्यक तयारी प्रशासनाने सुरु केली आहे. विसर्जन घाटांच्या स्वच्छतेबरोबरच डागडुजीचे काम सुरु झाले आहे. शहरातील विविध भागात महापालिकेचे १६ विसर्जन घाट असून, येत्या आठवड्यात त्याचे काम पूर्ण होईल.

UPSC परीक्षेसाठी उद्या चोख व्यवस्था

$
0
0
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या रविवारी (२४ ऑगस्ट) पुण्यात प्रथमच होणाऱ्या परीक्षेसाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड व आळंदी येथे ३३ परीक्षा केंद्रे तयार करण्यात आली असून या केंद्रांवर १४ हजार ५६२ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

मोबाइलचे दुकान फोडून लाखोंचा ऐवज लांबवला

$
0
0
टिळक रोडवरील मोबाइल विक्रीचे दुकान फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचे मोबाइल हॅन्डसेट चोरल्याचा प्रकार गुरुवारी पहाटे पाचच्या दरम्यान घडला आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रश्नपत्रिका फोडल्याप्रकरणी माजी स्वीय सचिवाची मुक्तता

$
0
0
राष्ट्रीय संस्थेत उमेदवारांना नोकरी देण्यासाठी प्रश्नपत्रिका फोडल्याप्रकरणी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी (आयआयटीएम)च्या संचालकांच्या माजी स्वीय सचिव छबी वर्धन यांची एक लाख रुपयांच्या जामिनावर कोर्टाने मुक्तता केली.

मुद्रांक शुल्क उत्पन्नात पुन्हा घट

$
0
0
स्थानिक संस्था कराबाबत (एलबीटी) अनिश्चितता कायम असली, तरी जुलैमध्येही पालिकेला त्यातून सुमारे शंभर कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त करण्यात यश मिळाले आहे. यंदाच्या वर्षात निव्वळ एलबीटीच्या महसुलात वाढ होत असली, तरी मुद्रांक शुल्कातून जमा होणाऱ्या रकमेत सलग चौथ्या महिन्यात घट झाली असल्याचेही समोर येत आहे.

भुशी डॅममध्ये बुडून तरुणाचा मृत्यू

$
0
0
लोणावळ्यातील भुशी डॅममध्ये पाय घसरल्याने एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. शुक्रवारी सकाळी दहा वाजता पोलिस व जीवरक्षकांना त्याचा मृतदेह शोधण्यास यश आले. अकिल सुरेश लोयर (वय २०, सध्या रा. म्हाळुंगे, खेड, मूळ चंद्रपूर) असे मृत तरुणाचे नाव आहे.

‘सदर्न कमांड’ने केली वाहतूक बंद

$
0
0
कौन्सिल हॉल चौकाजवळ मिलिटरी इंजिनीअरिंग विभागाकडून स्वागत कमान उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे या परिसरातील वाहतुकीत तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात आले आहेत. ही स्वागत कमान उभारण्याचे काम ऑक्टोबर महिन्याच्या शेवटपर्यंत चालणार आहे.

शहर प्रांत अधिकारी यमगर यांच्या बदलीला स्थगिती

$
0
0
पुणे शहराचे उपविभागीय अधिकारी सोनप्पा यमगर यांची बदली झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच त्यांच्या बदलीला स्थगिती देण्यात आली आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागातील अठरा उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा आदेश राज्य सरकारने काढला आहे.

संमेलनाध्यक्ष निवडणुकीची घोषणा आज

$
0
0
पंजाबमधील घुमान येथे होणाऱ्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रक्रियेची घोषणा आज (२३ ऑगस्ट) होणार आहे. निवडणुकीच्या प्रक्रियेला सुमारे दोन महिने लागणार असल्याने दिवाळीनंतरच संमेलनाध्यक्ष पदाचा मान कोणाला मिळणार हे कळणार आहे.

पालिकेच्या गणेशोत्सव स्पर्धेत यंदाही वादाचा देखावा

$
0
0
गणेशोत्सवानिमित्त महापालिकेच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या गणेशोत्सव स्पर्धेने यंदाच्या वर्षीही आपली वादाची परंपरा कायम ठेवली आहे. यंदा पालिकेने दोन मंडळांना पालिकेने प्रथम क्रमांकाचा पुरस्कार दिला आहे.

जॅमर चोरले : आणखी २ जणांवर गुन्हा

$
0
0
पुणे-सोलापूर रोडवर हॉटेल प्रेसिडेंटसमोर पार्किंग केलेल्या अल्टो आणि ह्युंडाई कारचालकांनी पोलिसांनी कारला लावलेले जॅमर चोरल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी जॅमरची कारवाई तीव्र केल्यानंतर वाहन चालकांकडून जॅमर चोरून नेण्याचे प्रकार वाढत आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images