Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

स्केटिंग ट्रॅकचा वापर होतोय भटक्या कुत्र्यांसाठी

$
0
0
विमाननगर चौकात सव्वा तीन कोटी रुपये खर्चून बांधलेला शहरातील पहिला आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्केटिंग ट्रॅक अद्याप खुला केला नसल्याने गरजू खेळाडूंना वंचित राहावे लागत आहे. या ट्रॅकचा उपयोग परिसरातील भटकी कुत्री करत असल्याने सुरू होण्यापूर्वीच त्याची दुरवस्था झाली आहे.

कर्नाटक बस ओढ्यात कोसळली

$
0
0
कात्रज घाटातील मांगडेवाडीजवळील पूलावर समोरून येणाऱ्या दुचाकीला वाचवताना कर्नाटक परिवहन मंडळाची बस गुरुवारी पहाटे पाच वाजता ओढ्यात कोसळली. या अपघातात बसमधील सात प्रवासी किरकोळ जखमी झाले. कठड्यात अडकल्यामुळे बसमधील प्रवासी बचावले.

आघाडीचे चित्र स्पष्ट नाही : थोपटे

$
0
0
नेते व कार्यकर्ते यांनी एकविचार आणि मनापासून काम केले, तर येणाऱ्या विधानसभेत आघाडी सरकारला सत्ता मिळवणे अवघड नाही; परंतु जिल्ह्यासह राज्यातील आघाडीचे चित्र फारसे स्पष्ट नसल्याचे मत काँग्रेसच्या निवडणूक प्रचार समितीचे सदस्य आणि जेष्ठ नेते माजी मंत्री अनंतराव थोपटे यांनी व्यक्त केले.

पर्यावरण विकासाला प्राधान्य

$
0
0
पुणे जिल्ह्यातील माळीण गावात नुकतीच घडलेली दुर्घटना, गावांसाठी बंधनकारक करण्यात आलेला पर्यावरण विकास आराखडा आणि जिल्हा परिषदतर्फे ई-पंचायतीकरणाचे सुरू असलेले काम या विषयी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप यांच्याशी कुलदीप जाधव यांनी साधलेला संवाद.

आग विझवायला गाडी एकच

$
0
0
हडपसर उपनगर परिसराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. वाढती लोकवस्ती, मोठमोठ्या टाउनशिप, आयटी कंपन्या, औद्योगिक विभाग, कपड्यांचे होलसेल व्यापारी, लघु उद्योग, सोसायट्यांचे प्रमाणही वाढत आहे. मात्र, या सर्वांसाठी आगीपासून संरक्षण करणारी गाडी एकच आहे.

बसप लढविणार पुण्यातील सर्व जागा

$
0
0
आगामी विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्षाने (बसप) पुण्यातील सर्व जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होणाऱ्या यादीत पुण्यातील काही उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

गावठाण निवासी क्षेत्रवाढीवर दीडशे हरकती

$
0
0
गावठाणांच्या निवासी क्षेत्रात वाढ करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर सुमारे दीडशे हरकती आल्या असून, या हरकतींवर सुनावणी घेण्याचे काम येत्या दोन दिवसांत सुरू होणार आहे. त्यानंतर पंधरा दिवसांत राज्य सरकारला त्या संबंधीचा अहवाल सादर केला जाणार आहे.

३१ ऑगस्टला मतदार नोंदणी

$
0
0
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर येत्या ३१ ऑगस्ट रोजी शहर आणि जिल्ह्यात मतदार नोंदणीची खास मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील सर्व मतदार केंद्रांवर यादिवशी मतदार नोंदणी करण्यात येणार असून त्यामध्ये नावे नोंदविल्यास विधानसभा निवडणुकीत मतदानाची संधी मिळणार आहे.

रिक्त जागांचा सिलसिला कायमच

$
0
0
इंजिनीअरिंग आणि मॅनेजमेंट अभ्यासक्रमांच्या जागा रिक्त राहण्याचा सिलसिला यंदाही सुरूच आहे. इंजिनीअरिंगच्या सुमारे ६० हजार, तर मॅनेजमेंटच्या २० हजार जागा यंदा शिल्लक राहतील.

विद्यापीठाच्या चुकीनेच नापास

$
0
0
इंजिनीअरिंगला नापास झाल्यानंतरही ‘कॅरी ऑन’ची मागणी करणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी विद्यापीठाच्याच चुका काढण्याचा प्रयत्न केला.

यूपीएससीची रविवारी प्रथमच पुण्यात परीक्षा

$
0
0
केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा येत्या रविवारी (२४ ऑगस्ट) होत असून, पुणे केंद्रावर ही परीक्षा प्रथमच होत आहे. या परीक्षेसाठी पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड व आळंदी येथे ३३ केंद्र तयार करण्यात आली आहेत. पुणे केंद्रावर १४ हजार ५६२ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

देशातील विद्यार्थी भागाकारात कच्चे

$
0
0
बेरीज, वजाबाकी वा गुणाकाराच्या तुलनेत राज्यातीलच नव्हे, तर देशभरातील विद्यार्थी भागाकारामध्ये कच्चे असल्याचे ‘एनसीईआरटी’च्या ‘नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे’मधून (एनएएस) दिसून आले आहे. इतर क्रियांमध्ये चांगले गुण नोंदविणारे विद्यार्थी भागाकारामध्ये मात्र कमी पडत आहेत.

स्कॉलरशिप परीक्षेचे स्वरूप झाले स्पष्ट

$
0
0
कोणत्याही अभ्यासक्रमाविना स्कॉलरशिपची तयारी करणाऱ्या चौथीच्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिपच्या अभ्यासक्रम आणि परीक्षेच्या स्वरूपाबाबतची अडचण आता सुटली आहे.

‘राष्ट्रवादी’ची उमेदवारी नको बाबा!

$
0
0
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभव, शहरातील महत्त्वाच्या प्रश्नांचे भिजत असलेले घोंगडे, कुरघोडीचे राजकारण आणि पक्षांतर्गत विरोधकांना बळ या कारणांमुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी स्वीकारण्यास अनेक प्रबळ उत्सुक नाहीत.

गढूळ पाण्याला पाऊसच जबाबदार!

$
0
0
धरण परिसरात‌ पडत असलेल्या पावसामुळेच गेल्या काही दिवसांपासून शहरातील काही भागांमध्ये गढूळ पाणीपुरवठा होत असल्याचे महापालिका प्रशासनाने गुरुवारी स्पष्ट केले.

वाहतूकदारांचा शुक्रवारी लक्षणिक संप

$
0
0
सेंट मेरीज शाळांतील विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षा तसेच बसेसला कायदेशीर परवानगी नाही, वाहतुकीला अडथळा निर्माण होईल, अशा स्वरूपात वाहने पार्क करणे, आदी कारणांमुळे वाहतूक पोलिसांनी त्यांच्यावर तात्पुरत्या स्वरूपाची कारवाई केल्याचा प्रकार कॅम्पमध्ये घडला.

मेट्रोचा चेंडू राज्याच्या कोर्टात

$
0
0
केंद्रीय नगरविकास मंत्र्यांनी चार दिवसांत पुणे मेट्रोला मान्यता देण्याचे आश्वासन दिले असले, तरी मेट्रोच्या सुधारित खर्चाला राज्य सरकारची मंजुरी घेण्याचे निर्देश देऊन केंद्राने पुन्हा पुणे मेट्रोचा चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात ढकलला आहे.

पुण्यात विरोध, नागपुरात पाठिंबा

$
0
0
मेट्रोच्या दोन्ही मार्गिकांच्या बाजूला पाचशे मीटरपर्यंत ४ एफएसआय देण्यावरून राजकीय पक्षांसह स्वयंसेवी संस्थांनी रान उठविले असले, तरी नागपूर मेट्रोच्या दोन्ही मार्गिकांच्या बाजूला ४ एफएसआय देण्याबाबत कोणाचाही आक्षेप नाही.

भरतीचा मार्ग अखेर मोकळा

$
0
0
राज्य सरकारच्या दरबारी धूळ खात पडून असलेल्या महापालिकेच्या सेवा प्रवेश नियमावलीला अखेर मंजुरी मिळाली आहे. यामुळे पालिकेतील हजारो पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

खेडेकर यांचा सत्कार रद्द

$
0
0
शिवश्री पुरुषोत्तम खेडकर यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्याचा महापालिकेने घेतलेला कार्यक्रम गुरुवारी अचानक रद्द करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्यांची वेळ न मिळाल्याने हा कार्यक्रम स्थागित ठेवल्याचे महापौर चंचला कोद्रे यांनी स्पष्ट केले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images