Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

बीआरटी मार्ग आंदोलनाने खुला

$
0
0
कोट्यवधी रुपये खर्च करूनही केवळ पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांमधील समन्वयाअभावी बंद अवस्थेत असलेला आळंदी-नगररोड बीआरटी मार्ग सोमवारी सकाळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आरपीआय) कार्यकर्त्यांनी बससाठी खुला केला.

‘पाणीबाणी’त महापालिका नापास

$
0
0
‘पाण्यामध्ये अर्थक्रांतीची ताकद आहे, तरीदेखील त्याचे संवर्धन, मूल्यांकन आणि हिशेब ठेवण्याबद्दल प्रशासन उदासीन आहे. राज्यातील एकाही महापालिकेने अद्याप पिण्याच्या पाण्याचे मूल्यांकन केलेले नाही. कोणत्याही महापालिकेकडे पाण्याचा हिशेब उपलब्ध नाही,’ अशी टीका केंद्रीय ग्रामविकास मंत्री नितीन गडकरी यांनी केली.

आता ‘इबोला’चे धडे

$
0
0
पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या आफ्रिकन विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ‘इबोला’चा संभाव्य संसर्ग विचारात घेऊन शैक्षणिक संस्थांकडूनही त्या विरोधात खबरदारीचे उपाय केले जात आहेत.

दगडूशेठला कलावंत करणार महाअभिषेक

$
0
0
कलाक्षेत्राच्या समृद्धीसाठी आणि जागतिक सुख, समृद्धी, शांततेसाठी तमाम सिनेनाट्यकलावंतांच्या वतीने सोमवार दिनांक १ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला महाअभिषेक आणि महाआरती करण्यात येणार आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे पुणे भाजपला आवाहन

$
0
0
‘देशात नक्कीच नरेंद्र मोदी यांची लाट आहे. परंतु, येत्या निवडणुकीत केवळ मोदी लाटेवर तरंगणे योग्य ठरणार नाही, तर सर्व कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकद लावून जनतेपर्यंत जाणे आवश्यक आहे,’ असे आवाहन केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी केले.

माळीणच्या स्मृतींचं स्मारक

$
0
0
दरड कोसळून गडप झालेल्या माळीणच्या स्मृती जुन्नर तालुक्यातील गोद्रे गावात जपल्या जाणार आहेत. येथील ज्ञानदा हायस्कूलमधील पाच एकर जागेत या स्मारक उभारणीचा प्रारंभ एका अनौपचारिक कार्यक्रमाने करण्यात आला.

कुणाल कुमार पुण्याचे आयुक्त

$
0
0
राज्य सरकारने कुणाल कुमार यांची पालिका आयुक्तपदी नेमणूक केली असून, ते बुधवारी (आज) कार्यभार स्वीकारणार आहेत.

पुण्यात आघाडीला धसका मोदी लाटेचा

$
0
0
काँग्रेसला नेहमी साथ देणारे शहर अशी पुण्याची एके काळची राजकीय ओळख होती. कालौघात काँग्रेसची पकड ढिली होत गेली. शहरांतील पेठा आणि उपनगरी भागात शिवसेना-भाजप युतीने पाया मजबूत केला आणि त्याचे बालेकिल्ल्यात रूपांतरही केले.

स्वतःच्या मुलीवर बलात्कार; बापाविरुद्ध गुन्हा दाखल

$
0
0
गेल्या चार वर्षांपासून स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या बापाविरुद्ध मुलीने पोलिसांमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार बापावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचे उत्तर प्रदेशातील हे कुटुंब कामानिमित्त मुंबई येथे राहात होते.

लोणावळ्यात जमीनविक्रीत सव्वा कोटीची फसवणूक

$
0
0
लोणावळ्याजवळच्या भुशी गावातील एका जमिनीची बोगस दस्त नोंदणी करून तिची संगनमताने विक्री करून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मूळ मालक मयत असताना त्याच्या जागी मालक म्हणून बनावट व्यक्ती उभी करून सव्वा कोटी रुपये किमतीच्या दोन एकर जमिनीचे बोगस दस्त नोंदण्यात आले होते.

तळेगाव न.प.समोर ओतला कचऱ्याचा ढीग

$
0
0
तळेगाव शहरात कचराकुंडीतील कचरा नगरपरिषदेकडून वेळेवर उचलला जात नसल्यामुळे शहरात कचऱ्याचे ढीग साचू लागले आहेत. यामुळे शहरात आरोग्याची समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. ही शक्यता लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाने शहरातील कचरा समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी विरोधी पक्षनेते सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले.

कोर्टाच्या फटक्याने पालिका सरळ

$
0
0
हायकोर्टाने फटकारल्यानंतरही शहरातील अनधिकृत बांधकामे हटवण्यास तीव्र विरोध करणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिका सभागृहाला आपल्या भूमिकेत अखेर ‘यू-टर्न’ घ्यावा लागला. त्यामुळे अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण आणि निर्मूलनासाठी सक्षम यंत्रणा निर्माण करण्यास सर्वसाधारण सभेने मंगळवारी चुटकीसरशी मान्यता दिली.

हातगाड्यांच्या विळख्यात अडकला इंदापूर चौक

$
0
0
बारामती शहरातील बाजारपेठेतील खरेदीचे प्रमुख ठिकाण असणा-या इंदापूर चौकाला सध्या हातगाड्यांचा विळखा पडला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून फेरीवाल्यांमुळे या चौकात मोठया प्रमाणात अडथळा व अतिक्रमणे झाली आहेत.

कारमधील सराईत गुन्हेगारावर गोळीबार

$
0
0
कात्रज-देहूरोड बायपासवर रंगोली टाईल्स या दुकानासमोरून कारमध्ये चाललेल्या गुन्हेगारावर गोळीबार झाल्याचा प्रकार सोमवारी रात्री घडला. कारमधील गुन्हेगाराने त्याच्यावर झाडण्यात आलेली गोळी चुकवल्याने तो बचावला.

पोलिसांनी जॅमर लावले; सुमो चालकाने चोरले

$
0
0
शंकरशेठ रोडवर जानकी हॉलसमोरील फुटपाथवर नो-पार्किंगमध्ये पार्क केलेल्या सुमोला सोमवारी रात्री वाहतूक पोलिसांनी जॅमर लावले होते. सुमो चालकाने या जॅमरसह सुमो पळवून नेल्याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घोरपडी, मुंढवा उड्डाणपुलांसाठी जेटलींना साकडे

$
0
0
वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी घोरपडी आणि मुंढवा येथील रेल्वे उड्डाणपुलास मान्यता द्यावी, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे नेते खासदार रामदास आठवले यांनी संरक्षणमंत्री अरुण जेटली यांच्याकडे केली आहे. या विषयात लक्ष घालून प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन जेटली यांनी दिले.

महामार्गांच्या दुरवस्थेबाबत गडकरींना निवेदन

$
0
0
शहर आणि परिसरातील महामार्गांची दुरवस्था झाली असून, त्यात तातडीने लक्ष देऊन पुणेकरांचा त्रास दूर करावा, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. नियोजित रिंगरोडही केंद्र सरकारनेच करावा, अशीही मागणी त्यांनी केली.

आयटी कर्मचाऱ्यांसाठी ‘मेट्रो झिप’

$
0
0
हिंजवडी येथील राजीव गांधी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आता खासगी बससेवा सुरू होणार आहे. हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनतर्फे एमआयडीसीच्या सहकार्याने ही बससेवा सुरू करण्यात येणार आहे.

महापौरांचे आवाहन मंडपांच्याच खड्ड्यात

$
0
0
रस्ता न खणता गणेशोत्सवाचा मंडप उभारण्याच्या महापौरांनी केलेल्या आवाहनाला गणेश मंडळांनी खड्ड्यात घातले आहे. महिन्याअखेरीला असलेल्या गणेशोत्सवाची तयारी वेग घेऊ लागली असून, मंडपासाठी रस्ता खणून मंडप उभारण्याचे काम सुरू झाले आहे.

विद्रोही चळवळीही आता जातीयवाद्यांच्या वळचणीला

$
0
0
‘अस्तित्त्व आणि सन्मानासाठी सुरू झालेल्या विद्रोही चळवळी आता जातीयवाद्यांच्या वळचणीला जाऊ लागल्या आहेत. त्यामुळे या चळवळींमध्येही जातीचे राजकारण शिरू लागले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images