Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

हिंजवडी परिसरातील अतिक्रमणे काढा

$
0
0
हिंजवडी एमआयडीसी परिसरातील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी रस्त्यांची कामे, अतिक्रमणे काढण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. येथील समस्या सोडवण्यासाठी सर्व विभागातील अधिकाऱ्यांची पवार यांनी १५ ऑगस्ट रोजी बैठक घेतली.

‘मोदींनी महागाईच जन्माला घातली’

$
0
0
"नरेंद्र मोदींनी लोकसभेच्या निवडणुकीत सर्वसामान्यांना मोठमोठी स्वप्ने दाखवली, अच्छे दिन आयेंगे म्हणाले. सरकार आले, मात्र प्रत्यक्षात महागाईच जन्माला घातली. या महागाईने सर्वसामान्यांचे स्वप्न उद्ध्वस्त केले," असे प्रतिपादन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी दौंड येथे केले.

खराडीतील हॉस्पिटलच्या खासगीकरणास विरोध

$
0
0
खराडी येथील ‘आर ७’अंतर्गत हॉस्पिटलच्या खासगीकरणास शिवसेना, भाजपने विरोध केला आहे. स्थायी समितीत बहुमताच्या जोरावर मंजूर करण्यात आलेल्या या प्रस्तावाचा फेरविचार करण्याचा प्रस्ताव सेना, भाजपच्या सभासदांनी दिला असून, मंगळवारी (१९ ऑगस्ट) होणाऱ्या समितीच्या बैठकीत हा विषय चर्चेसाठी येणार आहे.

शिवाजीनगरमध्ये काँग्रेसने निष्ठावंतांनाच संधी द्यावी

$
0
0
‘कॉँग्रेस पक्षातर्फे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात कॉँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यालाच उमेदवारी द्यावी. माजी मंत्री अॅड. चंद्रकांत छाजेड, आमदार दीप्ती चवधरी, माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, नगरसेवक दत्ता बहिरट किंवा झुबेर पीरजादे या निष्ठावंतांपैकी एकाला उमेदवारी द्यावी,’ असा ठराव कॉँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात संमत करण्यात आला.

पिस्तुलाच्या धाकाने व्यावसायिकाला लुटले

$
0
0
सिंहगड रोडलगत असलेल्या प्रयेजा सिटी रोडने कॅनॉलकडे जाताना एका कोपऱ्यावर ‘बिल्डिंग मेटेरिअल सप्लायर्स’ला पिस्तुलाच्या धाकाने लुटल्याचा प्रकार रविवारी सायंकाळी घडला. या सप्लायर्सच्या अंगावर असलेले साडेचार लाख रुपयांचे दागिने हिसकावून नेण्यात आले.

तपास दिरंगाईचा देशभर निषेध

$
0
0
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण होत असूनदेखील त्यांच्या मारेकऱ्यांचा तपास लागू शकलेला नाही. त्यामुळे, अंनिसतर्फे येत्या बुधवारी (२० ऑगस्ट) डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा तसेच तपासातील दिरंगाईचा देशभर निषेध करण्यात येणार आहे.

वाहने वाढली, आता दुष्परिणाम भोगा

$
0
0
पुण्याच्या विस्ताराबरोबरच वेगाने वाढत असलेल्या वाहनांच्या संख्येचे दुष्परिणाम आगामी काळात पुणेकरांना सहन करावे लागणार आहेत. पुण्यात दररोज धावणाऱ्या तब्बल ३६ लाख वाहनांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आखून दिलेल्या प्रदूषण नियंत्रणाच्या सीमा आपण कधीच ओलांडल्या आहेत.

पहिले विद्रोही स्त्री साहित्य संमेलन आजपासून

$
0
0
विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्यावतीने घेण्यात येणाऱ्या पहिल्या विद्रोही स्त्री साहित्य संस्कृती संमेलनाला आजपासून (दि. १९) पुण्यात सुरुवात होणार आहे. दोन दिवस होणाऱ्या या संमेलनाचे उद् घाटन केरळच्या प्रसिद्ध लेखिका डॉ. मीरा वेलायुधन यांच्याहस्ते केले जाणार आहे.

‘CCTV’ बसविण्यासाठी गणेशोत्सव मंडळे सरसावली

$
0
0
पुणे पोलिसांनी मोठ्या मंडळांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा केलेल्या नियमाला मंडळांकडून अनुकूल प्रतिसाद मिळतो आहे. उत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार न घडण्यासाठी मंडळांकडून सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे.

युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

$
0
0
घरात कोणी नसताना घराच्या लाकडी वाश्याला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी खराळवाडीत मंगळवेढेकर चाळ येथे सायंकाळी चारच्या सुमारास घडली.शंकर भीमसेन मंगळवेढेकर (३०, रा. खराळवाडी) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

बसच्या धडकेने मुलाचा मृत्यू

$
0
0
भरधाव वेगाने आलेल्या बसची धडक बसल्यामुळे ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी पुणे-मुंबई रस्त्यावर खडकीच्या ‘सीएएफव्हीडी’समोर घडली. पीयूष संतोष गाडे (११, रा. धायरी) असे मृत मुलाचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीयूष त्याचे वडील संतोष यांच्याबरोबर मोटारसायकलवरून घरी जात होता.

५ व्या दिवसापासून रात्री १२ पर्यंत परवानगी

$
0
0
‘गणेशोत्सवाच्या काळात पाचव्या दिवसापासून रात्री बारापर्यंत मंडळांचे देखावे पाहण्यासाठी परवानगी राहील,’ असे आश्वासन पोलिस आयुक्त सतीश माथुर यांनी दिले. पिंपरी-चिंचवड महापालिका, पोलिस आयुक्तालय यांच्या वतीने गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे नुकतीच झाली.

प्रलंबित प्रश्नांचा सत्ताधाऱ्यांना धसका

$
0
0
आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पिंपरी-चिंचवडमधील प्रलंबित प्रश्न मार्गी लागत नसल्यामुळे सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मोठा धसका घेतला आहे. प्रश्न मार्गी न लागल्यास निवडणुकीत मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

पुणे विद्यापीठाचे ‘दूरशिक्षण’ दूरच

$
0
0
बहिःस्थ शिक्षणपद्धतीला प्रभावी पर्याय म्हणून दूरशिक्षणाचे अभ्यासक्रम सुरू करण्याचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा प्रयत्न यंदा तरी अयशस्वीच ठरला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) नव्या निकषांचा विचार करत नवा प्रस्ताव विद्यापीठाला तयार करावा लागणार आहे.

शहरातील मेट्रो प्रकल्पासाठी पाठपुरावा करण्याची मागणी

$
0
0
गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या सत्तेचा उपभोग घेतलेल्या काँग्रेसजनांची लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काय अवस्था झाली आहे, याचा प्रत्यय सोमवारी पुणेकरांना आला.

२ आठवड्यांनंतरही पालिका आयुक्तपद रिक्तच

$
0
0
पुण्यातील प्रश्न आणि पुणेकरांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे शहराच्या कारभाऱ्यांनी दुर्लक्षच केले असून, गेल्या दोन आठवड्यांपासून पुणे महापालिकेचा कारभार आयुक्तांविना सुरू आहे. बृहन्मुंबईनंतर राज्यातील सर्वांत मोठ्या पालिकेवर राज्य सरकारला अद्याप पूर्णवेळ प्रशासकीय प्रमुखच नेमता आलेला नाही.

पोलिसाला धक्काबुक्की; एकाला अटक

$
0
0
दुचाकीवर ट्रिपल सीट चाललेल्या तरुणांना हटकले म्हणून पोलिसाच्या अंगावर धावून जात धक्काबुक्की करणाऱ्या तरुणाला कोंढवा पोलिसांनी अटक केली. कोंढवा येथील डीएसके सोसायटीसमोर रविवारी सायंकाळी हा प्रकार घडला.

वेळ लागेल, पण अनेक प्रश्न सोडवू

$
0
0
‘‘केंद्र सरकारवर जनतेच्या वाढलेल्या अपेक्षांचे ओझे आहे. देशापुढे अनेक प्रश्न आहेत, त्यांना तोंड देऊन विकास करण्यास काही काळ लागेल. मात्र, विकासाचे राजकारण करण्यास केंद्र सरकार कटिबद्ध असून, येत्या दोन वर्षांत यापैकी अनेक प्रश्न आम्ही समाधानकारकपणे सोडवू,’’ असा विश्वास केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी व्यक्त केला.

एक वेळ पाणीपुरवठ्याचा फज्जा

$
0
0
धरणातील उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यासाठी दिवसातून एकच वेळ पाणी देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला; मात्र हे पाणी नक्की कधी देणार याचे कोणतेही वेळापत्रक जाहीर न केल्याने एक वेळ पाणीपुरवठा करण्याच्या निर्णयाचा पहिल्याच दिवशी फज्जा उडाला.

आरोप-प्रत्यारोपात भरकटली पुणे मेट्रो

$
0
0
देशभरातील मोठ्या शहरांमध्ये मेट्रो धावू लागली असताना पुणे मेट्रो मात्र राजकारणाच्या ट्रॅकवर भरकटली आहे. पुण्यापूर्वी नागपूर मेट्रोला हिरवा कंदिल दाखवित केंद्र सरकार राजकारण खेळत असल्याचा आरोप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी केला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images