Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

माळीणच्या पुनर्वसनासाठी समिती

0
0
दुर्घटनाग्रस्त माळीण गावाच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी जिल्हाधिकारी सौरव राव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कुलगुरुपदी डॉ. राजीव कुमार

0
0
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. राजीव कुमार यांची ‘गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स’च्या कुलगुरूपदी निवड झाली आहे.

पोलिसांची ‘चलाखी’, प्लँचेट नि लाचखोरीचे आरोप

0
0
पोलिस यंत्रणांकडून तपासात राहणाऱ्या त्रुटी आणि गुन्ह्यांच्या तपासाबाबत गांभीर्य न राखल्यामुळे त्यांच्यावर टीका होताना दिसते. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासात पोलिस, गुन्हे आणि समाजव्यवस्थेचे अनेकविध पैलूदेखील समोर आले.

दहीहंडीचा वायफळ खर्च टाळून अॅम्ब्युलन्स

0
0
दहीहंडी उत्सवासाठी उभारले जाणारे फ्लेक्स किंवा सेलिब्रेटी आणण्यासाठी लागणारा वायफळ खर्च कमी करून ही मदत डॉ. बाबा आमटे यांच्या महारोगी सेवा समितीला देण्याचा निर्णय सुवर्णयुग तरुण मंडळाने घेतला आहे.

दहीहंडीच्या उत्साहाला तारकांची ‘मलई’!

0
0
परिणिती चोप्रा, जॅकलिन फर्नांडिस, प्राची देसाई, श्रुती मराठे, नेहा पेंडसे, सई ताम्हणकर अशा हिंदी-मराठी सिनेमांतील सेलिब्रेटींची उपस्थिती... त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड... धमाल गाण्यांवरचा नाच.. थरावर थर लावून हजार-लाखांची बक्षिसे असणाऱ्या दहीहंडी फोडणाऱ्या गोपाळांचा उत्साह..

नाटकाच्या जोडीने समाजप्रबोधनाचा लोकरंगमंच

0
0
अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार नाटकाच्या माध्यमातून सादर करत समाजप्रबोधनाचे नवे रिंगण आता आकार घेत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सहाय्याने दिग्दर्शक अतुल पेठे रिंगण नाटकासाठी लोकरंगमंचाची कल्पना राबवत आहेत.

यूपीएससी, एमआयडीसीच्या परीक्षा एकाच दिवशी

0
0
केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) पूर्वपरीक्षा आणि ‘एमआयडीसी’च्या गट ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’साठीच्या परीक्षा एकाच दिवशी आल्याने दोन्ही परीक्षांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसमोर पेच निर्माण झाला आहे.

‘अकरावी ऑनलाइन’च्या पारदर्शकतेला हरताळ

0
0
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या अखेरीस केंद्रीय प्रवेश समितीकडून दिल्या जाणाऱ्या आकडेवारीमध्ये तफावत आढळूतन आली आहे. उपलब्ध प्रवेशसंख्या, समितीने ऑनलाइन, ऑफलाइन पद्धतीने दिलेले एकूण प्रवेश आणि रिक्त जागांविषयी समितीने वेळोवेळी दिलेल्या माहितीमध्येही तफावत दिसून आली आहे.

अकरावी प्रवेशाचा मार्ग ‘क्लास’मधून जातो...

0
0
मागील वर्षी अकरावीसाठी ६०-६२ टक्क्यांपर्यंत कट ऑफ असलेल्या कॉलेजचा कट ऑफ यंदा तब्बल ९२ टक्क्यांवर पोहोचला आहे. यामागे विद्यार्थ्यांची वाढलेली गुणवत्ता हे कारण नसून, कॉलेजची आर्थिक गणिते त्यामागे दडली आहेत.

‘इबोला’ला रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज

0
0
नायजेरिया, आफ्रिकेसारख्या प्रदेशांना हैराण केलेल्या इबोला विषाणूचा संसर्ग महाराष्ट्रात होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य खात्याने यंत्रणा सज्ज ठेवली आहे. पेशंटवरील उपचाराची पद्धती निश्चित करण्यात आली असून, त्याद्वारे उपाययोजना करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

पालिकेच्या सारथ्यावर एक कोटीची ‘उलाढाल’

0
0
महापालिकेची विविध वाहने चालविण्यासाठी आवश्यक असलेले मोटार ड्रायव्हर पुरविण्यासाठी स्थायी समितीने एक कोटी रुपयांच्या टेंडरला मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे, चालक पुरविल्याच्या अनुभवाचे खोटे दाखले आणि प्रमाणपत्र सादर केलेले असतानाही त्याकडे दुर्लक्ष करत हे टेंडर मान्य करण्यात आले आहे.

नामदार गोखल्यांच्या बंगल्याचे पुनरुज्जीवन

0
0
डेक्कन परिसरात असलेल्या ‘गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स’ संस्थेमधील महात्मा गांधी, नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्या बंगल्याचे पुनरुज्जीवन केले जाणार आहे. पुणेकरांना हा ऐतिहासिक ठेवा पाहण्यासाठी उपलब्ध व्हावा, यासाठी महापालिकेच्या माध्यमातून हे काम केले जाणार आहे.

शहरात पावसाचा जोर ओसरला

0
0
गेल्या पंधरा दिवसांत पावसाचा जोर ओसरल्याने पुण्यातील पाऊस पुन्हा आतापर्यंतच्या सरासरीच्या खाली गेला आहे. जुलैअखेरीस आणि ऑगस्टच्या पहिल्या काही दिवसांत झालेल्या जोरदार पावसाने पाच ऑगस्ट रोजी पुण्यातील पावसाने तेव्हापर्यंतची सरासरी ओलांडली होती.

पोलिसांची तंबी कागदावरच!

0
0
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याची तंबी पोलिसांनी दहीहंडी उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना दिली आहे. या उत्सवात आवाजाची मर्यादा पाळा, अन्यथा कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे; परंतु......

कर्वे रोड ठरतोय ‘पोल्युशन रोड’

0
0
वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी ‘पीएमपी’ला सुधारा, काही म्हणतात मेट्रो हवी, तर काहींना हवी आहे बीआरटी.. पुणेकर आणि प्रशासनामध्ये गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या वादात पुण्यातील हवेच्या प्रदूषणाने धोक्याच्या सर्व पातळ्या उलटल्या आहेत.

महायुतीत वाद होणार नाही

0
0
विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष अधिक जागांसाठी आग्रही आहे. मात्र, जागावाटपावरून महायुतीत कोणताही वाद होणार नाही, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी व्यक्त केला.

विनायक मेटे निवडणूक रिंगणात?

0
0
महायुतीत सामील झालेल्या शिवसंग्राम पक्षाने गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार तिसरे स्थानही मिळवू शकले नसलेल्या जागा मागण्याचा निर्णय घेतला आहे.

‘शिक्षणहक्क’ तरतुदी धाब्यावर

0
0
शाहू-फुले-आंबेडकरांच्या नावाने सरकार चालवित शिक्षणहक्काची अंमलबजावणी केल्याचे ढोल बडविताना प्रत्यक्षात मात्र राज्य सरकारकडूनच शिक्षणहक्काच्या तरतुदींची पायमल्ली होत आहे.

बर्माशेल चौकात कोंडी नित्याचीच

0
0
लोहगाव विमानतळाकडे जाणाऱ्या बर्माशेल चौकात (फाय नाईन) वाहतूक दिवे नसल्याने रोज वाहतूक कोंडी होत असूनही पोलिस कर्मचारी या ठिकाणी हजर नसतात, प्रत्येकाला जाण्याची घाई असल्याने अनेक वेळा चौकात वाहतूक कोंडी होताना दिसते.

विधानसभेनंतर ग्रामीण भागाचा कायापालट करणार : पवार

0
0
गेल्या १० वर्षांपासून मी देशाच्या शेतीचा कारभार पाहत आहे. शेतीचा प्रत्येक निर्णय माझ्या हातूनच झाले आहेत, त्यामुळे शेती कशी करावी, कमी खर्चात अधिक उत्त्पन कसे घ्यावे, अशा प्रकारचे शेतीचे संशोधन माझ्या निरीक्षणाखाली झाल्यामुळे हा अनुभव माझ्याकडे आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images