Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

तिसऱ्या सूचीत धनगर समाजाचा समावेश ही धूळफेक

$
0
0
तिसऱ्या सूचीत धनगर समाजाचा समावेश करण्याचा राज्य सरकारचा निर्णय ही केवळ धूळफेक आहे, अशा शब्दांत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी राज्य सरकारवर टीका केली. राज्य सरकारचा हा निर्णय अमान्य आहे.

सुभाषबाबूंच्या अस्थी परत आणा

$
0
0
जपानमधील रेन्कोजी मंदिरात गेली ६९ वर्षे जपलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थी भारतात आणण्याची मागणी नेताजी सुभाषचंद्र बोस मेमोरिअल इंडो जपान या संस्थेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

त्या मगरी गेल्या कुणीकडे?

$
0
0
खडकवासला परिसरात मुक्काम ठोकलेल्या दोन मगरींना वन विभागाने दोन वर्षांत पकडले असले, तरी अजून चार मगरी कोठे गेल्या की अजून त्या या परिसरातच वास्तव्यास आहेत, याचे गूढ उलगडलेले नाही.

ती व्यक्ती ‘इबोला’चा पेशंट नाही

$
0
0
आफ्रिकेहून दुबईमार्गे दुपारी पुण्यातील लोहगाव विमानतळावर परतलेली व्यक्ती ‘इबोला’ विषाणूने संसर्गित असावी असा बळावलेला संशय अखेर खोटा ठरला. ती व्यक्ती संशयित नसल्याचे विमानतळावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासणीतून दिसून आले.

मुत्याल, फुगे यांना राष्ट्रपतिपदक

$
0
0
पुणे आयुक्तालयातील अप्पर पोलिस आयुक्त प्रकाश मुत्याल, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रघुनाथ फुगे यांच्यासह राज्य राखीव पोलिस दल आणि केंद्रीय राखीव पोलिस दलातील अधिकारी जवानांसह ११ जणांना उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रपतिपदक जाहीर करण्यात आले आहे.

पुण्यात पाणीकपातीचा खेळखंडोबा

$
0
0
शहर व परिसरात येत्या सोमवारपासून पुन्हा एक वेळ पाणी पुरवठा करण्याता निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे. दीर्घकालीन नियोजनाचा अभाव आणि राजकीय हितसंबंधांवरच भर देणारे ‘कारभारी’ अशा परिस्थितीत पुणेकरांचे हितरक्षण मात्र दुर्लक्षिले जात आहे.

मधुमित्र!

$
0
0
‘आम्ही जे सांगायचो, त्यावर कोणाचा विश्वासच बसायचा नाही. औषध कंपन्यांच्या मार्केटिंगचे हे खेळ आहेत, अशी टीकाही केली जायची. आज ५० वर्षांनंतर मात्र लहान मुलाला इन्शुलिन टोचायची वेळ येत आहे, तेव्हा आमचे महत्त्व पटते आहे...’

पवारांचा पाचपुतेंना टोला

$
0
0
आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांची पाठराखण करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बबनराव पाचपुतेंचे आरोप फेटाळून लावलेत. प्रत्येकाला निर्णय घेण्याचा अधिकार असतो तो पाचपुतेंनी घेतला. पण पाचपुते नऊ वर्ष मंत्रीपदावर होते हा त्यांच्यावर अन्याय आहे का? असा सवाल पवारांनी केला.

पुणे पालिकेत कर्मचाऱ्याची आत्महत्या

$
0
0
पुणे महानगरपालिकेच्या आवारात एका कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज, शनिवारी घडली. भास्कर दत्तात्रय जगदाळे (वय ४३) असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

NCPला हवंय धनगर आरक्षण

$
0
0
‘धनगर समाजाचा घटनेच्या तिसऱ्या सूचीत समावेश करण्याच्या निर्णयास राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नाही. या समाजाला पहिल्या सूचीत स्वतंत्र तरतुदीने दुसरा विभाग करून आदिवासींप्रमाणेच नोकरी, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय आरक्षण मिळाले पाहिजे, अशी पक्षाची भूमिका आहे,’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी स्पष्ट केले

सिम्बायोसिसचे लिबरल आर्टस सुरूच

$
0
0
विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) आक्षेप घेतलेला चार वर्षे कालावधीचा ‘लिबरल आर्ट्‍‍स’चा पदवी अभ्यासक्रम सुरूच ठेवण्याचा निर्णय सिम्बायोसिस इंटरनॅशन युनिव्हर्सिटीने शनिवारी घेतला. अभ्यासक्रमाबाबतची संस्थेची भूमिका ‘यूजीसी’कडे मांडून, चार वर्षांच्या अभ्यासक्रमालाच मान्यता देण्याची विनंतीही संस्थेकडून ‘यूजीसी’ला करण्यात येणार आहे.

मेट्रोच्या नियमावलीवर हरकतींसाठी मुदतवाढ

$
0
0
शहरातील मेट्रोच्या प्रस्तावित नियमावलीवर हरकती-सूचना नोंदवण्यासाठी नागरिकांना आता आणखी कालावधी मिळणार आहे. हरकतींसाठी प्रशासनाने एक महिन्याची मुदतवाढ दिली असून, आता १६ सप्टेंबरपर्यंत नागरिकांना आक्षेप नोंदवता येणार आहेत.

बैलगाडा शर्यतीच्या बंदीबाबत हिवाळी अधिवेशनात प्रस्ताव

$
0
0
‘बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी कायद्यात आवश्यक ते बदल संसदेच्या हिवाळी अधिवेशनात करण्यासाठी प्रस्ताव मांडण्यात येईल,’ असे आश्वासन केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिले.

अभ्यास करून ‘पुणे मेट्रो’त लक्ष घालेन

$
0
0
पुणे मेट्रो प्रकल्पाची गरज, त्याचे अर्थकारण आणि सद्यस्थिती याबाबत अभ्यास केल्यानंतर आपण या विषयात जरूर लक्ष घालू, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी दिले.

पेट्रोल संपल्याने प्रचंड गैरसोय

$
0
0
शहरातील विविध भागातील बहुतांश पंप पेट्रोल संपल्यामुळे शनिवारी दिवसभर बंद राहिल्याने पुणेकरांची प्रचंड गैरसोय झाली. त्यामुळे सुरू असलेल्या पंपांची माहिती घेत तिथपर्यंत जाण्याची तसेच तेथील मोठ्या रांगेत उभे राहण्याची कसरत पुणेकरांना करावी लागली. पेट्रोलचे दर उतरल्यामुळे पंप चालकांनी पंप बंद ठेवल्याची चर्चा होती, परंतु, मागणी वाढल्याबरोबरच पुरवठा कमी झाल्याने पंप बंद ठेवावे लागल्याची माहिती पंप चालकांनी दिली.

स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

$
0
0
शहराच्या विविध भागांत देशाचा ६८ वा स्वातंत्र्यदिन शुक्रवारी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला. पुण्यातील मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम राज्यपाल के. शंकरनारायणन् यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

राज्यात महायुतीचीच सत्ता येणार

$
0
0
‘पंधरा वर्षे जनतेची लूट करायची आणि निवडणूक जवळ आली, की सवलतींचा वर्षाव करायचा, अशी कॉँग्रेस-राष्ट्रवादीची चाल आहे. केंद्रातील सत्तापरिवर्तनाप्रमाणेच येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यातही सत्तापरिवर्तन अटळ असून, राज्यात महायुतीचीच सत्ता येणार आहे,’ असा विश्वास केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शनिवारी व्यक्त केला.

३२ लाखांचे मोबाइल लंपास

$
0
0
वैभव थेटर शेजारील सॅमसंग मोबाइल गॅलरी फोडून सुमारे ३२ लाख रुपये किमतीचा माल चोरल्याची घटना शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.

एक्स्प्रेस वेवर कोंडीचे पारतंत्र्य

$
0
0
स्वातंत्र्यदिनाला जोडून आलेल्या सुट्ट्यांचे औचित्य साधून वर्षाविहार आणि पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी लाखो पर्यटकांनी लोणावळा-खंडाळ्याची निवड केल्याने शुक्रवारी पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वे वाहतूक कोंडीमुळे तब्बल १५ तास ठप्प झाला होता.

पुण्याचे महापौरपद खुल्या गटाकडे

$
0
0
पुढील अडीच वर्षांसाठी पुणे महापालिकेचे महापौरपद खुल्या गटासाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याचे शनिवारी जाहीर करण्यात आले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images