Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पुणे मेट्रोची सर्व तयारी पूर्ण

0
0
शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या पुणे मेट्रो प्रकल्पाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. या प्रकल्पाचे लवकर भूमिपूजन करावे, असे पत्र केंद्रीय नगरविकास खात्याचे मंत्री व्यंकय्या नायडू यांना आजच पाठविले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी रात्री पुण्यात दिली.

‘इबोला’मुळे पॅनिक होऊ नका !

0
0
आफ्रिका, नायजेरिया देशातील संसर्गित पेशंटच्या संपर्कात आलेला व्यक्ती देशात आढळला तरच इतरांना ‘इबोला’चा संसर्ग होण्याची शक्यता आहे. स्वाइन फ्लूसारखा हवेतून पसरणारा हा आजार नसल्याने नागरिकांनी याबाबत चिंता करू नये, असे आवाहन राष्ट्रीय विषाणू संस्थेने (एनआयव्ही) केले आहे.

पावसाच्या सरीनंतरही टँकरच्या खेपा सुरूच

0
0
जिल्ह्यात एक जूनपासून आतापर्यंत मावळ आणि भोर तालुक्यात वार्षिक सरासरीच्या सुमारे २५ टक्के अधिक पाऊस पडला आहे. तर, जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरावड्यापासून सुरू झालेल्या दमदार पावसानंतरही बारामती, इंदापूर आणि पुरंदर या तालुक्यातील २७ गावे आणि २८० वाड्यावस्त्या पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून आहेत.

केंद्रापुढे राज्याचे लोटांगण

0
0
वर्षानुवर्षे महाराष्ट्रात असणाऱ्या येल्लूरचा फलक काढून टाकण्यामुळे ते कर्नाटकात जाते कसे? मराठी अस्मितेवर वेळोवेळी केंद्राने घाला घातलाय. देशाला चार गृहमंत्री देणारे महाराष्ट्र राज्य केंद्रापुढे मात्र लोटांगण घालत असल्याची टीका सीमा प्रश्नाचे अभ्यासक किरण ठाकूर यांनी केली.

३४ गावांना आता शुद्ध पाणी

0
0
जिल्ह्यातील दौंड, हवेली, इंदापूर, शिरूर आणि खेड या तालुक्यांत मुळा-मुठा आणि भीमा या नद्यांच्या काठावर वसलेल्या आणखी ३४ गावांना शुद्ध पाण्याचा पुरवठा होणार आहे.

आंतरजातीय विवाह नोंदणीला वाढता प्रतिसाद

0
0
सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या निधीची रक्कम १५ हजार रुपयांवरून ५० हजार केल्यापासून जिल्हा परिषदेकडे आंतरजातीय विवाहांची नोंदणी करण्याचे प्रमाण वाढले आहे.

अवयवदानाची घेतली अधिकारी कर्मचाऱ्यांनी शपथ

0
0
अवयवदानाचे महत्त्व आणि औचित्य साधत पुणे विभागाच्या धर्मादाय आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह वकील, कर्मचाऱ्यांनी अवयवदान करण्याची सामूहिक शपथ घेतली. एवढेच नव्हे तर अर्ज भरून अवयवदानाच्या चळवळीत सहभागी होण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

आळंदी रोड बसमार्गाची डेडलाइन पुन्हा चुकणार

0
0
शहरातील आळंदी रस्त्यावर ‘डेडिकेटेड बस रूट’ सुरू करण्याची महापौरांची घोषणा अवघ्या आठवड्याभरात हवेतच विरणार असल्याचे स्पष्ट होत आहे. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि अधिकाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या प्रकल्पावर पुन्हा धुळीचे थर साचणार आहेत.

तंत्रशिक्षणाच्या रिक्त जागांसाठी मराठा, मुस्लिम आरक्षण लागू

0
0
तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या रिक्त जागांसाठी होणाऱ्या प्रवेशांमध्ये मराठा आणि मुस्लिम आरक्षण लागू असेल, असे तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) स्पष्ट केले आहे.

पावणेपाच कोटींच्या कामांची शिफारस

0
0
खासदार निधी म्हणून मिळालेल्या पाच कोटी रुपयांपैकी ४ कोटी ७८ लाख कोटी रुपयांचे कामांचे प्रस्ताव पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविले आहेत, असे राज्यसभेतील अपक्ष खासदार संजय काकडे यांनी सांगितले.

हायकोर्टाचा महापालिकेला दणका

0
0
आदेशाचा अवमान होत असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिका बरखास्त का करू नये, अशी विचारणा हायकोर्टाने केल्याने महापालिकेचे सत्ताधारी खडबडून जागे झाले आहेत.

एलबीटी चुकवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा

0
0
स्थानिक संस्था कर (एलबीटी) चुकवून १० कोटी रुपयांचा माल आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांवर पालिकेने गेल्या तीन दिवसांत तीव्र स्वरूपाची कारवाई केली आहे. शहराच्या विविध भागांतील १६ व्यापाऱ्यांच्या दुकानांची तपासणी करून त्यांच्याकडून ७५ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

गणेशोत्सव बैठकीत तक्रारींचा भडिमार

0
0
आगामी गणेशोत्सवाच्या तयारीसाठी महापालिकेने बोलावलेल्या बैठकीकडे मंडळांचे कार्यकर्ते आणि नगरसेवकांनी पाठ फिरवली. गणेशोत्सवाबाबत महापालिकेकडून योग्य पद्धतीने संवाद साधला जात नाही, आवश्यक सोयीसुविधा पुरवल्या जात नाही, कायद्याचा धाक दाखवला जातो, अशा तक्रारींचा भडिमार कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्या.

एलबीटीतून महसुलाची नाही खात्री

0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) माध्यमातून आगामी वर्षात दहा कोटी रुपये आणि २०१५ मध्ये २८ कोटी रुपयांपेक्षा जास्त एलबीटी मिळणार नसल्याचा अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे.

नाशिक, नगर उपकेंद्रांना मंत्रिमंडळाची मान्यता

0
0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक आणि नगर येथील उपकेंद्रांना राज्य मंत्रीमंडळाने बुधवारी मान्यता दिली. ही मान्यता देतानाच दोन्ही उपकेंद्रांसाठीच्या एकूण ५५१ पदांनाही मान्यता देण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला.

‘मूळ आरोपींविरूद्ध खटला सुरू राहील’

0
0
‘माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येच्या तपासात संदीप शेट्टी यांनी दाखल केलेल्या तक्रारीतील २६ संशयितांबाबत कोणतेही पुरावे न मिळाल्याने सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे.

फसवणुकीच्या उद्देशानेच नोकरभरती

0
0
‘नॉलेज ट्रान्झिशन कन्स्लटन्सी’ या सॉफ्टवेअर कंपनीला गेल्या काही महिन्यांत कुठलेही उत्पन्न मिळाले नसताना केवळ फसवणूक करण्याच्या उद्देशाने नोकर भरती केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

पुणे मेट्रोचा तपशील ‘अंडर एक्झामिनेशन’

0
0
पुणे मेट्रोसंदर्भात काही आवश्यक तपशील महाराष्ट्र सरकारकडून बुधवारी सकाळी प्राप्त झाला असून, केंद्रीय नगरविकास मंत्रालयाकडून तो तपासून पाहण्यात येत असल्याची माहिती नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी बुधवारी लोकसभेत दिली.

बिनपगाराच्या नोकरीद्वारे ८४६ इंजिनीअर्सची फसवणूक

0
0
नोकरीसाठी ‘सिक्युरिटी डिपॉझिट’च्या नावाखाली तब्बल ८४६ सॉफ्टवेअर इंजिनीअरकडून रक्कम घेऊन प्रत्यक्षात त्यांना पगारही न दिल्याच्या फसवणुकीप्रकरणी ‘नॉलेज ट्रान्झिशन कन्स्लटन्सी’ या कंपनीच्या संचालकाला पोलिसांनी बुधवारी अटक केली.

रेशनकार्डावर जास्त साखर

0
0
सणासुदीच्या तोंडावर राज्यातील रेशनकार्ड धारकांना जादा साखर देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे सणांच्या काळात कार्डधारकांना प्रतिव्यक्ती साडेसहाशे ग्रॅम साखर मिळणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images