Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

कामगारांच्या मागण्यांसाठी आजपासून बेमुदत उपोषण

$
0
0
‘पीएमपीएमएल’च्या प्रश्नाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करुन पीएमपी प्रशासनाने याची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे ‘पीएमपीएमएल’च्या कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित राहिले आहेत.

हलक्या पावसाची पुण्यात शक्यता

$
0
0
पुण्यासह राज्यातला पावसाचा जोर ओसरलेलाच असून, रविवारी राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. पुण्याच्या मध्यवर्ती भागात हलक्या सरी कोसळल्या, तर लोहगाव येथे तीन मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

एआयसीटीईची आता ‘प्रोजेक्ट फॅक्टरी’

$
0
0
कल्पना करा, की एखाद्या कंपनीला उत्पादनवाढीबाबत एक समस्या भेडसावते आहे. ती कंपनी ही समस्या सोडवण्याचे आवाहन एका वेब पोर्टलवर करते, ज्यावर तंत्रशिक्षणाचे विद्यार्थी आपल्या कल्पना अपलोड करतात आणि उपाय सुचवणाऱ्या सूचनांचा अक्षरशः पाऊस पडतो..!

विद्यापीठ वृक्षतोडीविषयी शिक्षणमंत्र्यांची चर्चा

$
0
0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वृक्षतोडीविषयी राज्याचे शिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांच्याशी शनिवारी चर्चा केली. या विषयी नाराजी व्यक्त करतानाच विद्यापीठाचा विकास होत असताना कायद्याचीही अंमलबजावणी होणेही तितकेच गरजेचे असल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले.

‘मटा ऑटो एक्स्पो’मध्ये खरेदीची धूम

$
0
0
आकर्षक कारची नवनवी मॉडेल्स... टेस्ट ड्राइव्हची संधी... स्पॉट बुकिंगवर अनेक आकर्षक सवलती आणि गणपतीबाप्पाच्या आगमनाच्या दिवशी गाडी मिळण्याची खात्री... अशा खास सुविधांचा लाभ घेण्यासाठी पुणेकरांनी परिवारासह रविवारी ‘मटा ऑटो एक्स्पो’मध्ये गर्दी केली आणि या कारचे बुकिंगही केले.

आपल्यासाठी दुसऱ्यांना दुर्गंधीत ठेवणे योग्य नव्हे

$
0
0
‘आपण चांगल्या वातावरणात राहायचे आणि दुसऱ्यांना दुर्गंधीमध्ये ठेवणे योग्य नाही’, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदारांसह पुणेकर नागरिकांचे कान टोचले.

ग्रामपंचायतींना देणार उच्च दर्जाचे ब्रॉडब्रँड

$
0
0
ग्रामपंचायतींना ऑप्टिकल फायबर नेटवर्कद्वारे उच्च क्षमता आणि दर्जाचे ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प केंद्र सरकारतर्फे हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायत हायटेक होणार असून त्यांच्या या प्रकल्पांची अंमलबजावणी अधिक गतीने करणे शक्य होणार आहे.

हडपसर येथे पहिले ‘इंटिग्रेटेड पोलिस सेंटर’

$
0
0
काळेपडळ, महंमदवाडी, हांडेवाडी, उंड्री पिसोळी भागातील नागरिकांना आपल्या तक्रारी, गुन्हा तत्काळ पोलिस स्टेशनला नोंदविता याव्यात तसेच, पोलिसांनाही तत्काळ गुन्ह्याच्या घटनास्थळी पोहचता यावे यासाठी कोंढवा, वानवडी, हडपसर पोलिस स्टेशनच्या हद्दीत नवीन ‘इंटिग्रेटेड पोलिस सेंटर’ सुरू करण्यात आले आहे.

पर्यावरणाच्या उत्सवात संस्कृतीचे ‘प्रदूषण’!

$
0
0
गणेशोत्सवात सुसूत्रता आणण्यासाठी नियमावलीबाबत सध्या चर्चा सुरु आहे. उत्सवातील पर्यावरणाचे निकष तर एक दशकापूर्वीच अस्तित्त्वात आले आहे आहेत. मात्र त्यांची अमंलबजावणी झालेली नाही. आजपर्यंत एकाही व्यक्तीवर उत्सावादरम्यान प्रदूषण केल्याबद्दल कारवाई झालेली नाही, यातूनच वास्तव स्पष्ट होते.

नियम कागदावर, अंमलबजावणीचे ‘विसर्जन’

$
0
0
पुण्यनगरीला जगाच्या काना-कोपऱ्यापर्यंत घेऊन जाणाऱ्या बाप्पांचा उत्सवातील विघ्ने टाळण्यासाठी उत्सवाला नियमांच्या चौकटीत बसविण्याचा प्रयत्न यापूर्वी अनेकदा झाला असला, तरी अंमलबजावणीतील त्रुटींमुळे काटेकोर शिस्तीचा वेळोवेळी फज्जाच उडाला आहे.

गणेश मंडळांसाठी पोलिसांची विशेष नियमावली

$
0
0
आगामी गणेशोत्सवात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी गणेश मंडळांसाठी पोलिसांनी विशेष नियमावली तयार केली आहे. त्या मोठ्या मंडळांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, मंडळांनी स्वतःची सुरक्षा दले तयार करणे आदी नियम करण्यात आले आहेत.

अंकुश असावा; पण नियमांचा अतिरेक नको!

$
0
0
गणेशोत्सवातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याबरोबरच सुरक्षितता, शांततेसाठी पोलिसांनी मंडळांना नियम लागू करण्यात गैर नाही. मंडळांचे कार्यकर्ते शिस्तबद्ध असतात. त्यांना वेगळी शिस्त लावण्याची गरज नाही. त्यामुळे पोलिसांकडून उत्सवावर अंकुश ठेवताना नियमांचा अतिरेक होऊ नये.

‘किडनी ट्रान्सप्लांट’साठी नातेवाइकांवरच भिस्त

$
0
0
‘ब्रेनडेड’ पेशंटची माहिती मिळाल्यानंतरही त्यांचे अवयव दान करण्यात अद्यापही डॉक्टरांना अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. त्यामुळेच गेल्या १९ वर्षांत राज्यात किडनी दान करण्यासाठी ‘ब्रेनडेड’ ऐवजी नातेवाइकांवर पेशंटसह डॉक्टरांना अवलंबून राहावे लागल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिल्पकार खेडकर यांना पद्म पुरस्कार मिळावा

$
0
0
अनेक शिल्प, मूर्ती घडवलेले, नव्या शिल्पकारांची पिढी तयार केलेले ज्येष्ठ शिल्पकार बी. आर. खेडकर यांच्या योगदानाची सरकारदरबारी यथोचित दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे खेडकर यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी पद्म पुरस्कार मिळण्यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा...

कचरा प्रक्रियाकेंद्रासाठी तीनशे एकर वनजमीन

$
0
0
कचरा प्रक्रिया केंद्राचा प्रश्न सोडविण्यासाठी वनखात्याची तीनशे एकर जमीन घेण्याचा पर्याय पुढे आला असून, सरकार त्यासंदर्भात विचार करीत आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

रक्षाबंधनासाठी जाणाऱ्या बहिणींवर काळाचा घाला

$
0
0
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मळवलीजवळील पाटण गावच्या हद्दीत तवेरा गाडी ट्रकवर आदळून रविवारी झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. सहा जण गंभीर जखमी झाले असून, यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.

गाफिलपणा टाळण्यासाठी इच्छुकांची चाचपणी सुरू

$
0
0
विधानसभेची निवडणूक दोन्ही काँग्रेसने एकत्र लढवावी, अशी चर्चा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात चर्चा झाली असून, जागावाटपाबाबतही मार्ग निघेल.

पुण्यातील पेट्रोलपंप आज राहणार बंद

$
0
0
पुणे, पिंपरी- चिंचवड आणि पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत पेट्रोल आणि डिझेलवर एलबीटी वसूल करण्याच्या निर्णयाविरोधात ‘पेट्रोल डिलर्स असोसिएशन’ने आज, सोमवारी सकाळी सहा ते सायंकाळी सहा या वेळेत शहरातील पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

सीए अभ्यासक्रमात लवकरच बदल

$
0
0
सीएसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठीच्या अभ्यासक्रमात येत्या काळात कालसुसंगत बदल करण्यात येणार आहेत. बदललेला अभ्यासक्रम लवकरच लागू केला जाणार असल्याचे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) सूचित केले आहे.

आफ्रिकेतून येणाऱ्यांवर ‘वॉच’

$
0
0
आफ्रिकेच्या काही भागांत ‘इबोला’ नावाच्या विषाणूची साथ पसरल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून पुण्यासह मुंबई विमानतळावर आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांवर आता ‘वॉच’ ठेवण्यात येणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images