Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

आंदोलन योग्य, पण हल्ला नाही

$
0
0
लोकशाहीमध्ये सर्वांना आंदोलन करण्याचे अधिकार आहेत; परंतु त्यासाठी हल्ला करणे योग्य नाही,’ अशी प्रतिक्रिया सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी पुण्यात दिली. ‘धनगर समाजाला आरक्षण देण्यास माझा विरोध नाही.

विद्यार्थ्यांनी साकारले 'EVM'

$
0
0
लोकसभा विधानसभा निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे हा चर्चेचा विषय असतो. कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग पुणेच्या (सीओईपी) विद्यार्थ्यांनी केवळ दहा हजारात मतदान यंत्राची निर्मिती केली असून, कॉलेजच्या विद्यार्थी प्रतिनिधी निवडणुकीसाठी मतदान यंत्र वापरण्याचा प्रयोग यशस्वी ठरला.

‘ब्रेनडेड’ पेशंटच्या संकलित नोंदींचा अभाव

$
0
0
अवयव प्रत्यारोपण (ट्रान्स्प्लांट) करणारी पुण्यातील मोजकीच हॉस्पिटल वगळता अन्य ठिकाणी ‘ब्रेनडेड’ पेशंट किती आहेत, याची संकलित नोंद ठेवणारी यंत्रणा अस्तित्वात नसल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे अशा पेशंटचा शोध घेणे, ही डोकेदुखी होऊ लागली आहे.

‘वारजे नाट्यगृहाचा निधी वर्ग करू नये’

$
0
0
महापालिकेतर्फे वारजे येथे उभारण्यात येणाऱ्या नाट्यगृहाच्या निधीचे वर्गीकरण केले जाऊ नये, असा ठराव अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेने केला आहे.

‘पुणे दर्शन’मधून उलगडणार स्वातंत्र्यसंग्रामाचा इतिहास

$
0
0
शहरातील प्रेक्षणीय स्थळांप्रमाणेच आता देशाच्या स्वातंत्र्याशी संबंधित असलेल्या निवडक वास्तूंची सफर आणि त्यांचा इतिहास जाणून घेण्याची संधी ‘पुणे दर्शन’च्या माध्यमातून पर्यटकांना उपलब्ध होणार आहे.

‘विनायक’ नको असे ‘विनायका’लाच साकडे

$
0
0
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीपूर्वीच चर्चेत आला आहे. या मतदारसंघात भाजपकडून बाहेरचा उमेदवार लादला जाऊ नये, म्हणून या परिसरातील काही नागरिकांनी चक्क लेण्याद्रीच्या गिरिजात्मजालाही साकडे घातले. या प्रकाराची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

‘मराठवाडा’च्या आर्किटेक्चर कॉलेजची मान्यता कायम

$
0
0
‘मराठवाडा मित्रमंडळ’च्या आर्किटेक्चर कॉलेजला अपात्र ठरवणाऱ्या ‘कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर’चे सर्व आक्षेप खोडून काढत मुंबई हायकोर्टाने कॉलेजची मान्यता कायम ठेवली आहे. तसेच कॉलेजचा केंद्रीय प्रवेश पद्धतीत समावेश करण्याचेही आदेश कोर्टाने दिले आहेत, अशी माहिती ‘मराठवाडा मित्रमंडळ’चे सचिव भाऊसाहेब जाधव यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

जर्दोसी आणि इमिटेशन राख्यांना पसंती

$
0
0
पारंपरिक रेशमी धाग्यापासून, इमिटेशन - जर्दोसी कलाकुसर केलेल्या, सोन्या-चांदीच्या, कार्टूनमधील प्रसिद्ध व्यक्तिरेखांपर्यंत विविध प्रकारातील राख्यांच्या खरेदीसाठी पुण्यासह उपनगरातील बाजारपेठ शनिवारी सायंकाळी गर्दीने फुलली होती.

सोलापूर विद्यापीठास अहल्याबाईंचे नाव द्या

$
0
0
पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले नाव देणे हा समाजाला नवी दिशा देणारा नामविस्तार ठरणार आहे. यापुढील काळात सोलापूर विद्यापीठाला अहल्याबाई होळकर यांचे नाव देण्यासाठी सोलापूरकरांनी एकमत घडवावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी केले.

तलवारीचा धाक दाखवून वाहनचालकांना लुटले

$
0
0
हांडेवाडी रोड येथे इशा एम्पायर सोसायटीजवळ तलवारीचा धाक दाखवून तीन वाहनांवर दगडफेक करून त्यांना लुटल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

‘समन्वय नसल्याने कचऱ्याचा प्रश्न’

$
0
0
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे पुण्यातील कचरा प्रश्न अद्याप सुटलेला नाही, असा आरोप आमदार डॉ. निलम गोऱ्हे यांनी शनिवारी केला. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात लेखी आश्वासन देऊनही पुण्याच्या चारही दिशांना चार कचरा डेपो अद्याप उभारण्यात आलेले नाहीत.

मनसेचे सर्वाधिक इच्छुक खडकवासल्यात

$
0
0
ढोल-ताशांचा गजर आणि कार्यकर्त्यांच्या लवाजम्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इच्छुकांनी शनिवारी विधानसभा निवडणुकीसाठी वरिष्ठ नेत्यांसमोर जोरदार शक्तीप्रदर्शन केले. शहरातील आठ मतदारसंघांसाठी चाळीसहून अधिक इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या.

माळीणमध्ये आज सामूहिक दशक्रिया विधी

$
0
0
डोंगरकडा कोसळून उदध्वस्त झालेल्या आंबेगाव तालुक्यातील माळीण गावाच्या पुनर्वसनासंदर्भात ग्रामस्थांशी चर्चा करून निर्णय घेण्यासाठी माळीण येथे आज (रविवारी) बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

विद्यापीठ नामविस्तार समाजाला नवी दिशा देणारा

$
0
0
पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देणे, हा समाजाला नवी दिशा देणारा नामविस्तार ठरणार आहे. यापुढील काळात आता सोलापूर विद्यापीठाला अहल्याबाई होळकर यांचे नाव देण्यासाठी सोलापूरकरांनी एकमत घडवावे, असे आवाहन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी केले.

विद्यापीठात मिरवणूक, जल्लोश

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नामविस्तार सोहळा आणि विद्यापीठाच्या आवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण समारंभानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे विद्यापीठाच्या आवारात मिरवणूक काढण्यात आली होती.

दुर्गंधीकडे ‘बाबां’ची पाठच

$
0
0
शहराचा कचऱ्याचा प्रश्न मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या दरबारी सोडविण्याचा पालिका पदाधिकारी आणि आंदोलनकर्त्यांचा प्रयत्न शनिवारी पूर्ण धुळीस मिळाला. ‘बाबां’नी पुण्यातील कार्यक्रमाकडे पाठ फिरविल्याने कचऱ्याच्या प्रश्नावर कोणताही तोडगा निघू शकला नाही.

पाटील यांना डिस्चार्ज

$
0
0
डोळ्यांना इजा झाल्याने रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेले सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांना हॉस्पिटलने शनिवारी सायंकाळी डिस्चार्ज दिला. चार ते पाच दिवस त्यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.

पेट्रोलपंप उद्या राहणार बंद

$
0
0
पुणे, पिंपरी- चिंचवड आणि पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत पेट्रोल आणि डिझेलवर एलबीटी वसूल करण्याच्या निर्णयाविरोधात ‘पेट्रोल डिलर्स असोसिएशन, पुणे’ने सोमवारी (११ ऑगस्ट) एक दिवस शहरातील पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

नियमभंग केल्यास गुन्हा

$
0
0
गणेशोत्सवामध्ये गतवर्षी गणपती मंडळांकडून नियमभंगाचे प्रकार घडले. परंतु,त्याचे गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत. या वर्षी मात्र, नियमभंग झाल्यास थेट गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा सहपोलिस आयुक्त संजयकुमार यांनी शनिवारी दिला.

पुण्यात किरकोळ कारणावरून खून

$
0
0
किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात तरुणाचा डोक्यात दगड घालून खून केल्याचा प्रकार रविवारी दुपारी उघडकीस आला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images