Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘आयबी’च्या अधिकाऱ्याचा लेडीज सर्व्हिस बारमध्ये धिंगाणा

$
0
0
पुणे येथील गुप्तचर विभागात (आयबी) नोकरीस असलेल्या एका ‘इंटेलिजन्स ऑफिसर’ने आपल्या मित्रांसमवेत पनवेल येथील लेडिज सर्व्हिस बारमध्ये धिंगाणा घातल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला.

शहीदांकडे लक्ष द्यायला सरकारकडे वेळ आहे का?

$
0
0
हेमराजचे शीर घेऊन गेलेल्या पाकिस्तानी जवानांचा त्यांच्या देशात सन्मान झाला... पण आपल्याकडे देशासाठी शहीद होऊनही सरकारने केवळ आश्वासने दिली. हेमराजला शहीद होऊन दीड वर्ष उलटले तरी सरकारने एकही घोषणा अद्याप पूर्ण केलेली नाही.

कचरा‘कोंडी’वर तोडग्यास बाबा-दादांना अपयशच

$
0
0
चार-सहा महिने उलटल्यानंतर डोके वर काढणारा शहरातील कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. उरुळी येथील कचरा डेपो दुसरीकडे हलवावा, यासाठी या भागातील राजकीय पक्षांची मंडळी, तसेच ग्रामस्थ आंदोलन करून कचरा टाकण्यास मज्जाव करतात.

‘विनायक’ नको म्हणून ‘विनायका’लाच साकडे

$
0
0
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीपूर्वीच चर्चेत आला आहे. या मतदारसंघात भाजपकडून बाहेरचा उमेदवार लादला जाऊ नये, म्हणून या परिसरातील काही नागरिकांनी चक्क लेण्याद्रीच्या गिरिजात्मजालाही साकडे घातले.

लूटमार करणाऱ्या तिघी महिलेच्या धाडसामुळे गजाआड

$
0
0
पीएमपी बसमध्ये एकट्या महिलेला गाठून, धक्काबुक्की करून लूटमार करणाऱ्या तिघा महिलांना एका धाडसी शिक्षिकेमुळे अटक झाली. मुंढवा ते हडपसर प्रवासादरम्यान गुरुवारी दुपारी हा प्रकार घडला.

पुण्याची हर्षा भट्टड राज्यात पहिली

$
0
0
सीए फायनल परीक्षेत पुण्याची हर्षा चंद्रकांत भट्टड ही ८००पैकी ५७४ गुण मिळवून देशात तिसरी आणि राज्यात पहिली आली आहे. पहिल्याच प्रयत्नात तिने हे यश मिळवले आहे.

‘पीएमपी’ची तूट महिन्याला भरून द्या

$
0
0
पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) तूट भरून काढण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड पालिकेने दर महिन्याला कंपनीला आर्थिक साह्य करावे, असे आदेश राज्य सरकारने पुन्हा एकदा दोन्ही पालिकांना दिले आहेत.

‘ऑनलाईन’च्या पारदर्शकतेला हरताळ

$
0
0
अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या अखेरीस केंद्रीय प्रवेश समितीकडून दिल्या जाणाऱ्या आकडेवारीमध्ये मोठी तफावत आढळू्न आली आहे.

माजी न्यायाधीशाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

$
0
0
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी माजी न्यायाधीशाचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांच्या कोर्टाने हा अर्ज फेटाळला.

मराठीच्या अभिजाततेचा निर्णय लवकरच

$
0
0
मराठी भाषेला अभिजात दर्जा बहाल करण्यासंदर्भातील निर्णय लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. त्यासाठी साहित्य अकादमीच्या भाषा तज्ज्ञांच्या समितीची बैठक सोमवारी (११ ऑगस्ट) होणार आहे, अशी माहिती केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली.

शेतकरी नुकसानभरपाईत भ्रष्टाचाराची ‘गारपीट’!

$
0
0
गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देताना पुरंदर तालुक्यात घोटाळा झाल्याचे उघडकीस आले असून, महसूल खात्यामधील तिघा जणांवर खातेनिहाय कारवाई केली जाणार आहे.

'तो' शाईहल्ला पूर्वनियोजित!-पवार

$
0
0
राज्याचे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर भिगवण येथे झालेल्या शाईहल्ल्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निषेध केला असून, हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचा दावा त्यांनी शुक्रवारी निगडी प्राधिकरण येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला.

सन्मानाची वागणूक नसेल, तर पक्षच नको

$
0
0
शहरातील कचऱ्याच्या प्रश्नावर तोडगा शोधण्यासाठी शुक्रवारी घेण्यात आलेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा उफाळून आला. सभागृह नेत्यांच्या अरेरावीमुळे अपमानास्पद वागणूक मिळाल्याचा आरोप करून पक्षही पाठीशी उभा राहिला नसल्याचा खेद काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य आबा बागूल यांनी व्यक्त केला.

गरज CCTV कॅमेरे अन् सुरक्षा दलांची

$
0
0
आगामी गणेशोत्सवात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी गणेश मंडळांसाठी पोलिसांनी विशेष नियमावली तयार केली आहे. त्या मोठ्या मंडळांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, मंडळांनी स्वतःची सुरक्षा दले तयार करणे आदी नियम करण्यात आले आहेत.

जिल्हा कोर्टाच्या शिष्टमंडळाकडून परिसराची पाहणी

$
0
0
सुप्रीम कोर्टाने पुणे जिल्हा न्यायालयाला माळीण दुर्घटनेचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असून त्यानुसार शुक्रवारी जिल्हा न्यायालयाच्या शिष्टमंडळाने घटनास्थळाची पाहणी केली. तसेच माळीण दुर्घटनेत बचावलेल्या लोकांशी संवाद साधून त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या.

संस्कृतच्या संवर्धनासाठी ३२ संस्था एकत्र

$
0
0
‘सहकारातून समृद्धी’ या उक्तीनुसार संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम पुण्यातील ३२ संस्था एकत्र येऊन करत आहेत. संस्कृत दिनाच्या औचित्याने आज (९ ऑगस्ट) पुणे विद्यापीठातील नामदेव सभागृह येथे सायंकाळी चार वाजता विशेष कार्यक्रम सादर केला जाणार असून, त्यात कवी भास यांच्या ‘स्वप्नवासवदत्त’ या नाटकाची रंगावृत्ती युवा कलाकार सादर करणार आहेत.

आईची हेळसांड करणाऱ्या मुलाला कोर्टाचा दणका

$
0
0
पतीच्या मृत्यूनंतर तिने आपल्या तीन मुलांचा सांभाळ केला..एका धर्मशाळेत भाडेकरू म्हणून राहत असलेली जागा स्वखुशीने सोडल्यामुळे मिळालेल्या रक्कमेतून फ्लॅट घेतला....विकत घेतलेल्या फ्लॅटमध्ये एका मुलाबरोबर तिने राहण्यास सुरुवात केली..

बांधकामांची ‘उड्डाणे’ जमिनीवरच

$
0
0
लोहगाव विमानतळाच्या परिसरात नऊशे मीटरपर्यंत बांधकाम करण्यास हवाई दलाने घातलेले निर्बंध, बांधकामासाठी घ्यावी लागणारी ‘ना हरकत’ आणि या निर्बंधांपूर्वी मंजूर केलेल्या इमारतींच्या बांधकामास केली जाणारी मनाई यामुळे लोहगावमधील अनेक गृह प्रकल्प अडचणीत सापडले आहेत.

तोडग्याची बैठक ‘कचऱ्या’त

$
0
0
उरुळी ग्रामस्थांनी सुरू केलेल्या कचरा आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेत शुक्रवारी बोलावलेली बैठक निष्फळ ठरली. कचरा डेपोबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून निर्णय घ्यावा, अशी चर्चा या बैठकीत करून कचऱ्याच्या समस्येचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात टाकण्यात आला.

मठकरींची मोर्चेबांधणी सुरू

$
0
0
शिवाजीनगर मतदारसंघात संभाव्य आयात उमेदवारावरून भारतीय जनता पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली असताना, पक्षाचे माजी शहराध्यक्ष प्रा. विकास मठकरी यांनी मेळाव्याद्वारे कार्यकर्त्यांशी संवाद सुरू केला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images