Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

साता-यात २०० भटक्या कुत्र्यांचा विषबळी

$
0
0
साता-यात एका पाच वर्षाच्या अनाथ मुलाला भटक्या कुत्र्यांनी अक्षरक्षः लचके तोडून ठार मारल्याच्या घटनेनंतर सातारकरांनी त्याचा बदला घेतला आहे. शहरातील सुमारे २०० भटक्या कुत्र्यांना विष घालून ठार मारण्यात आले आहे.

अण्णांनी घेतले स्वतःला कोंडून

$
0
0
नवा राजकीय पर्याय देण्यासाठी अण्णा हजारे यांनी 'टीम अण्णा' गुंडाळली आणि राजकीय पक्षाची तयारी सुरू केली आहे. पण याबद्दल अधिकृत घोषणा करण्याआधी अण्णा चिंतन करत असून, त्यासाठी त्यांनी गेले तीन दिवस स्वतःला यादवबाबा मंदिरातील खोलीत कोंडून घेतले आहे.

पुणे बॉम्बस्फोट-बीडमधून एकाला अटक

$
0
0
जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या साखळी बॉम्बस्फोटासंदर्भात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) बीडमधून एकाला अटक केली आहे. अब्दुल रफी असे त्याचे नाव असून स्फोटांचा कट रचण्यात त्याचा सहभाग होता असा एटीएसला संशय आहे.

इन्स्पेक्टरसह चार पोलिसांवर गुन्हे

$
0
0
दोन तरुणांना तीन दिवस पोलिस ठाण्यात डांबून ठेवल्याप्रकरणी श्रीरामपूरच्या इन्स्पेक्टरसह चार पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले. कोर्टाच्या आदेशानुसार जिल्हा पोलिस प्रमुखांनी तातडीने गुन्हे दाखल केले आहेत. पोलिस इन्स्पेक्टर जगदीश पाटील यांच्यासह सूरज अशोक गायकवाड, राजेंद्र खैरे, ए. आर. गांगुर्डे अशी त्यांची नावे आहेत.

कार ओढ्यात कोसळून दोघांचा मृत्यू

$
0
0
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर लोणावळ्याजवळ देवले पूलाजवळील ओढ्यात कार कोसळून झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास झाला. पंधरा दिवसांतील दुसरा अपघात आहे.

पुण्यातील स्फोटांमागे ‘IM’चा म्होरक्याच

$
0
0
देशातील अनेक साखळी स्फोटांचा मास्टर माइंड असलेल्या दहशतवाद्यानेच पुण्यातील स्फोट घडवून आणल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट होत आहे. हा दहशतवादी म्हणजे इंडियन मुजाहिदीन (आयएम) संघटनेचा भारतातील म्होरक्या यासिन भटकळ असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे पुणे स्फोटाचे गांभीर्य आणखी वाढले आहे. या प्रकरणी पोलिसांना चार जणांचा संशय असून, त्यांचा शोध सुरू केला आहे.

अंगावर झाड पडून दुचाकीस्वाराचा मृत्यू

$
0
0
औंध येथे ‘आनंद पार्क’ शेजारील डी मार्ट शोरुम समोरून जाणा-या दुचाकीस्वारावर रस्त्याच्या कडेचे झाड पडल्याने त्याचा मृत्यू झाला. हा दुचाकीस्वार पाषाण येथील लमाण तांडा येथे राहणारा असून, शुक्रवारी सकाळी तो विद्यापीठ चौकाकडे येत असताना हा अपघात झाला.

‘AICTE’कडे प्रस्ताव पाठविण्यात महाराष्ट्र आघाडीवर

$
0
0
तंत्रशिक्षण आणि मॅनेजमेंटचा इंटिग्रेटेड कोर्स आणि मॅनेजमेंटचा ड्युअल डिग्री प्रोग्रॅम हे नवे दोन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात राज्यातील तंत्रशिक्षण संस्था आघाडीवर आहेत. या दोन्ही अभ्यासक्रमांसाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेला (एआयसीटीई) देशभरातून गेलेल्या प्रस्तावांमधील सुमारे २० टक्के प्रस्ताव महाराष्ट्रातून गेले आहेत.

चॉकलेट दहिहंडी

$
0
0
एखाद्या चांगल्या कामाबद्दल मुलाच्या हातात चॉकलेट दिल्यास ते ‘नको’ म्हणणारा मुलगा शोधून सापडणे मुष्कील. मग येथे तर संपूर्ण दोरीला कॅडबरी चॉकलेट्स टांगलेली दिसत असताना ती मिळवण्यासाठी मुलांमध्ये ‘कल्ला’ होणे स्वाभाविक होते. मैत्रयुवा फाउंडेशनतर्फे स. प. महाविद्यालयामागील रुईया मूकबधीर विद्यालयात चॉकलेट दहीहंडी साजरी झाली.

नाट्यसंस्थांसाठी नवे धोरण राबविणार?

$
0
0
नाट्यसंस्था त्यांना मिळालेल्या तारखा आपापसांत बदलू शकतील, चौमाहीत अधिक प्रयोग करणा-या नाट्यसंस्थांना पुढील वाटपात तारखांसाठी प्राधान्य मिळेल; एवढेच नाही तर पालिकेच्या कार्यक्रमासाठी नाट्यसंस्थांची तारीख बदलली गेल्यास त्यांना बदली तारीख दिली जाईल... नाट्यगृहांसाठीचे हे धोरण पालिकेने २५ वर्षांपूर्वीच निश्चित केले आहे. मात्र, तरीही पुन्हा नवीन नियमावलीचा घाट घातला जात असल्याचा आरोप नाट्यसंस्थांनी केला आहे.

बायबलचे अप्रकाशित पैलू प्रकाशात

$
0
0
ख्रिस्ती धर्माचा पवित्र ग्रंथ म्हणून ओळखल्या जाणा-या बायबलची संकल्पना ख्रिस्तितर मराठी वाचकांना स्पष्ट करण्यासाठी अनिल दहिवाडकर यांनी ‘बायबल : देवाचा पवित्र शब्द’ या हा एक अनोखा ग्रंथ संग्रह लिहिला आहे.

विकासकामांच्या ‘एस्टिमेट’ला लागणार मान्यता

$
0
0
महापालिकेकडून शहरात करण्यात येणा-या विकासकामांच्या पूर्वगणनपत्रांना (एस्टिमेट) शहर सुधारणा समितीकडून मान्यता घेण्याची बंद झालेली पद्धत पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. यापुढे एक कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची कामे असल्यास त्या कामांच्या पूर्वगणनपत्रांना शहर सुधारणा समितीची मान्यता घ्यावी लागणार आहे. त्यापेक्षा कमी रकमेची पूर्वगणनपत्र प्रशासनाकडून मंजूर केली जाणार आहेत.

सरीवर सरी....श्रावणसरीच!

$
0
0
शाळा-ऑफिसला जाण्याच्या वेळेत पाऊस येऊ नये... शक्यतोवर दिवसभर न पडता रात्रीच पडला तर बरे... थोडा-थोडा थांबून पडत राहिला, तर कामेही पूर्ण होऊ शकतात.... या सगळ्या अपेक्षा पूर्ण करत, शहर आणि परिसरात शुक्रवारी पावसाची हजेरी कायम राहिली. सकाळी साडेआठपर्यंत १८.६ मिमी, तर त्यानंतर सायंकाळपर्यंत तुरळक पावसाची नोंद वेधशाळेत झाली.

मराठी चित्रपट कलाकारांची आज भव्य शोभायात्रा

$
0
0
भारतीय सिनेमासृष्टीच्या शताब्दी वर्षानिमित्त अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने शंभर मराठी सिनेमांच्या महोत्सवाचे आणि मानाचा मुजरा या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या महोत्सवाला शनिवारी (दि. ११) प्रारंभ होत असून, त्याची सुरुवात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ते प्रभात चित्रपटगृह या मार्गावर मराठी चित्रपट कलाकारांसह शोभायात्रेने होणार आहे.

सप्टेंबरमध्ये ‘महालोकअदालत’चे आयोजन

$
0
0
पुणे डिस्ट्रिक्ट कोर्टात १९ सप्टेंबर रोजी ‘महालोकअदालत’चे आयोजन करण्यात आले असून, त्यात एसटी महामंडळाच्या केसेस निकाली काढण्यात येणार आहे. एसटीविरूद्ध नुकसानभरपाईच्या केसेस दाखल केलेल्या पक्षकारांनी ‘महालोकअदालत’मध्ये केसेस मिटविण्यासाठी ठेवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘पीएमपी’ प्रवाशांसाठी आता ‘प्रवासी दिन’

$
0
0
अपु-या बससंख्येपासून ते अस्वच्छ बसेसपर्यंत आणि चालक-वाहकांच्या वागण्यापासून ते बसथांब्यांच्या दुर्दशेपर्यंत, सातत्याने टीकेचे लक्ष्य होणा-या ‘पुणे महानगर परिवहन सेवे’ने (पीएमपी) अखेर प्रवाशांच्या मागण्यांची दखल घेत दर महिन्याला ‘प्रवासी दिन’ साजरा करण्याचे निश्चित केले आहे. पुढील महिन्यापासून ‘पीएमपी’च्या प्रत्येक आगारात हा दिन साजरा केला जाणार आहे.

सामाजिक बांधिलकीसह सार्व. सुरक्षेची दहीहंडी

$
0
0
स्त्री-भ्रूणहत्या विरोधी संदेश...विशेष मुलांसोबत दहीहंडी...पुस्तकहंडी अशा सामाजिक बांधिलकी दर्शविणा-या उपक्रमांबरोबरच दहीहंडी रद्द करून त्या रकमेतून सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसविण्याचे भान दाखवित शुक्रवारी शहर आणि पसिरात उत्साहाने दहीहंडी साजरी करण्यात आली.

पायी चालणा-या दोघांना मारहाण; रक्कम लुटली

$
0
0
शंकरशेट रोडवर वेगा सेंटरसमोरील फूटपाथवरून पायी चाललेल्या दोघांना मारहाण करत त्यांच्या ‘एटीएम’कार्डवरून सुमारे २८ हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून नेल्याप्रकरणी खडक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

ढोल-ताशांच्या गजरावर थिरकली पुणेकर तरुणाई

$
0
0
पारंपरिक ढोल-ताशांचा गजर आणि नव्या-जुन्या हिंदी-मराठी गाण्यांवर थिरकत तरुणांनी शुक्रवारी गोपाळकाल्याचा सण साजरा केला. गोविंदा आला रे आला...पासून आ रे प्रीतम प्यारे.. आदी विविध धूनवर उत्साही गोपाळांनी दहीहंड्या फोडल्या. कोणत्याही भीतीचा लवलेश न बाळगता साज-या झालेल्या या सणात सुरक्षेच्या नियमांना मात्र हारताळ फासण्यात आला.

जांभूळवाडीत तरुणाचा कोयता, पाईपने खून

$
0
0
जांभूळवाडी येथे मंगळवारी रात्री एका १९ वर्षीय तरुणाचा कोयता, पाईपने मारहाण करत खून केल्याचा प्रकार घडला. रंगपंचमीला झालेल्या भांडणातून हा प्रकार घडला असून हवेली पोलिसांनी चौघांना गजाआड केले आहे. तेजस अशोक राक्षे (वय १९, रा. रामनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी विजय भंडारी, अजय तेलंग, लखनदास ठाकूर, भंडारी असे चौघांना ताब्यात घेतल्याची माहिती हवेली पालिसांनी दिली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>