Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

प्राध्यापकांना शिस्त लावण्यात अपयशच

$
0
0
परीक्षांच्या पेपर सेटिंग आणि तपासणीसाठी गैरहजर राहणाऱ्या प्राध्यापकांवर कारवाई करण्यासाठीचे धोरण कडक नसल्याचाच गैरफायदा प्राध्यापक घेत आहेत. अशा प्राध्यापकांवर कारवाई करण्यासाठी विद्यापीठ कायद्यामधील तरतुदींमध्येच बदल करणे गरजेचे आहे.

आळंदी रोडवर बसला ‘स्वातंत्र्य’

$
0
0
तांत्रिक अडचणींमुळे आळंदी-नगररोडवर ‘बीआरटी’ सुरू करता येणे शक्य नसल्याचे मान्य करून, अखेर आळंदी रोडवर ‘डेडिकेटेड बस रूट’ सुरू करण्याचे पालिकेने जाहीर केले आहे. त्यामुळे, गेल्या अनेक दिवसांपासून अद्ययावत मार्ग तयार असूनही, तो वापरात नसल्याची ओरड दूर होणार आहे.

मेट्रो नियमावलीबाबतचे अनेक नकाशे अनुपलब्ध

$
0
0
मेट्रो नियमावलीबाबतचे अनेक नकाशेच उपलब्ध नसल्याने त्यावर हरकती-सूचना नोंदवण्यात अडचणी येत असल्याची तक्रार करून, त्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी स्वयंसेवी संस्थांनी केली आहे.

फार्मसी पदवीनंतरही चांगल्या नोकरीची शाश्वती नाही

$
0
0
इतर कोणत्याही व्यावसायिक अभ्यासक्रमाप्रमाणेच फार्मसीमधून पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही पदवी घेतल्यावर लगेचच चांगल्या पगाराची नोकरी मिळेल, याची कोणतीही शाश्वती नाही.

पालकांना ‘गुंड’ म्हणणे पडले महागात

$
0
0
अकरावी प्रवेशाबाबत विचारणा करायला आलेल्या पालकाला ‘गुंड’ संबोधणे पुणे विभागीय सहायक शिक्षण उपसंचालकांच्या चांगलेच अंगलट आले. पोलिसांनी केलेल्या मध्यस्तीनंतर सर्वांसमक्ष हात जोडून माफी मागितल्यानंतरच पालकांनी या प्रकरणातून माघार घेतली.

दहावी ऑक्टोबर परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू

$
0
0
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे येत्या सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना www.mahahsscboard.maharashtra.gov.in या वेबसाइटवर हे अर्ज भरता येणार आहेत.

भांडणे सोडवणारेच आपसांत भांडतात तेव्हा...

$
0
0
पुणे मुख्यालयासह विविध ठिकाणी सुरू केलेल्या ‘पोलिस कॅन्टीन’मध्ये पोलिसच दादागिरी करत असल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. पोलिसांच्या नातेवाइकांनाही तेथे खरेदी करण्यास परवानगी देण्यासाठी ही दादागिरी करण्यात येत असून, ‘इथून पुढे असे प्रकार घडले, तर याद राखा,’ अशा शब्दांतच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सुनावले आहे.

मनसे इच्छुकांच्या शनिवारी मुलाखती

$
0
0
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शहराच्या आठ मतदारसंघांतील इच्छुकांची चाचपणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे येत्या शनिवारी (९ ऑगस्ट) केली जाणार आहे.

उद्धव ठाकरेंचे ‘व्हर्च्युअल क्लास’

$
0
0
आगामी निवडणुकीत राज्यात महायुतीची सत्ता येण्यासाठी स्थानिक पातळीवर सेनेच्या लोकप्रतिनिधींनी, पदाधिकाऱ्यांनी नक्की कोणती भूमिका घ्यावी, याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी ‘व्हर्च्युअल कॉन्फरन्स’ द्वारे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

‘इमर्जन्सी’ उपचाराअभावी अवयव होतात ‘निकामी’

$
0
0
पुण्या-मुंबईसह महाराष्ट्रातील दृतगती महामार्गावर होणाऱ्या अपघातग्रस्तांना ‘गोल्डन अवर्स’मध्ये वेळीच वैद्यकीय उपचार मिळत नाहीत. त्यामुळेच हृदय, मेंदू, यकृत, फुफ्फुसासारखे अवयवांना इजा पोहोचल्याने उपचाराअभावी ते निकामी होत असल्याची माहिती पुढे आली आहे.

अस्वच्छ पुणे, गलिच्छ पुणे

$
0
0
उरुळी येथील ग्रामस्थांनी कचऱ्याच्या विरोधात सुरू केलेल्या आंदोलनामुळे दोन दिवसांतच शहरातील कचराकुंड्या भरून वाहू लागल्या आहेत.

चौक्यांमध्ये होतेय वास्तुशास्त्राचे ‘पोलिसिंग’!

$
0
0
प्लँचेटप्रकरणी पुणे पोलिसांवर टीकेची झोड उठली असताना गुन्हे उघडकीस आणण्यापासून बरकत होण्यासाठी चौकी-कार्यालयातील रचना बदलण्यापर्यंत पोलिस अधिकारी वास्तुशास्त्राचा आधार घेत आहेत.

‘एनडीआरएफ’ची प्रयत्नांची पराकाष्टा

$
0
0
धो-धो कोसळणारा पाऊस, मातीचा प्रचंड ढिगारा, पावसामुळे झालेली दलदल, रस्त्यांची अडचण आणि संपर्क साधनांचा अभाव अशा प्रतिकूल परिस्थितीशी सामना करीत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) जवानांनी पराकाष्टा करून माळीणचे शोध व बचावकार्य आठ दिवसांत पूर्ण केले.

माळीण शोधकार्यासाठी ‘साथी हाथ बढाना’

$
0
0
महसूल यंत्रणा, पोलिस, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, मोबाइल कंपन्या आणि स्वयंसेवी संस्थांनी ‘साथी हाथ बढाना’ या भावनेने अहोरात्र केलेल्या कामामुळे ‘माळीण’ दुर्घटनेचे मदतकार्य सुकर होऊ शकले.

‘रासप’ला हव्यात ४० जागा

$
0
0
महायुतीतील घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ३८ जागांची मागणी केली असताना, राष्ट्रीय समाज पक्षाने ४० जागांचा आग्रह धरला आहे. महायुतीच्या जागावाटपात या पक्षाने पुणे जिल्ह्यात दौंड विधानसभा मतदारसंघ मिळण्यासाठी प्राधान्य दिले आहे.

‘व्हीआयपीं’साठी तरी खड्डे बुजवा

$
0
0
टेक्निकल एरिया विमानतळ ते राजभवन (बाणेर रोड) या ‘व्हीआयपी’ मार्गावरील खड्डे बुजवण्याची विनंती वाहतूक पोलिसांनी महापालिकेला केली आहे. शहरात दररोज किमान एक तरी ‘व्हीआयपी मूव्हमेंट’ असते. त्यामध्ये खड्ड्यांची अडचण येत असल्याचे पोलिसांनी पालिकेला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

शाळकरी वयातच हृदयविकार

$
0
0
हृदयाचे दुखणे आता पंचविशी-तिशीच्या तरुणांपर्यंत आल्याचे कठीण वास्तव अगदी अलीकडेच आपल्या पचनी पडू लागले आहे; आता मात्र ती परिस्थिती बरी असे म्हणण्याची वेळ आली आहे.

घटत्या प्रवाशांमुळे पीएमपी पंक्चर

$
0
0
पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) प्रवासीसंख्या सात महिन्यांमध्ये तब्बल चार लाखांनी घसरली आहे. दररोजची प्रवासीसंख्या साडेतेरा लाखांवरून साडेनऊ लाखांपर्यंत घसरली आहे.

पुण्याला मेट्रोची गरज नाही!

$
0
0
‘मेट्रो प्रकल्प आणि चार एफएसआयमुळे पुणे शहरावर प्रचंड ताण येणार आहे. सध्याच्या लोकसंख्येलाही पुरेशा पायाभूत सुविधांची वानवा असताना मेट्रो आणि चार एफएसआयची चैन पुण्याला परवडणारी नाही', असा सूर कोथरूडमध्ये आयोजित मेट्रो परिषदेत व्यक्त झाला.

हर्षवर्धन पाटील यांच्यावर शाईहल्ला

$
0
0
इंदापूरचे आमदार व राज्याचे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर शाई हल्ला झाला आहे. या हल्ल्यात त्यांच्या डोळ्याला दुखापत झाली असून त्यांना पुण्याच्या रुबी हॉल क्लिनीकमध्ये दाखल करण्यात आले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images