Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

माळीणमधील शोधकार्य थांबवले़

$
0
0
आंबेगाव तालुक्यातील माळीण गावावर डोंगरकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर तेथे माती व चिखलाच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या ग्रामस्थांचा शोध घेण्यासाठी राबवण्यात आलेली शोधमोहीम दुर्घटनेच्या आठव्या दिवशी थांबवण्यात आली.

नागपूर मेट्रोची पुण्यावर मात

$
0
0
गेल्या सात-आठ वर्षांपासून निव्वळ चर्चेच्या फेऱ्यांमध्ये अडकलेल्या पुण्यातील मेट्रोच्या भूमिपूजनासाठी ‘मुहूर्ता’चा शोध अद्याप सुरू असताना, नागपूर मेट्रोचे भूमिपूजन याच महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याची चिन्हे आहेत.

‘फर्माइशी’तून रंगली मैफल

$
0
0
१९५२ साली प्रदर्शित झालेल्या ‘बाजी’ सिनेमातील ‘तकदीर से बिगडी हुई’ या गाण्यापासून २००८ सालच्या ‘रॉक ऑन’ सिनेमातील ‘सोचा है’पर्यंत विविध गाणी ‘फर्माइशे’ कार्यक्रमात नुकतीच सादर झाली.

जाणून घ्या क्रांतीगाथेचे शिलेदार

$
0
0
देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक ज्ञात-अज्ञात वीरांनी आहुती दिली. देशभरातील असे सशस्त्र क्रांतिकारक, त्यांचे कुटुंबीय यांची माहिती जाणून घेण्याची संधी शनिवारच्या (९ ऑगस्ट) हेरिटेज वॉकमध्ये मिळणार आहे. बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात सकाळी साडेदहा वाजता हा हेरिटेज वॉक होणार आहे.

‘माळीण’च्या कायमस्वरूपी पुनर्वसनाला प्राधान्य देणार

$
0
0
आंबेगाव तालुक्यातील माळीणमधील दुर्घटनाग्रस्तांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाला आपण प्राधान्य देणार असल्याचे विभागीय आयुक्त विकास देशमुख यांनी गुरूवारी पत्रकारांना सांगितले. पारदर्शी कारभार आणि गतिमान प्रशासन यावरही भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गावांच्या समावेशावर आचारसंहितेचे सावट

$
0
0
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यास काही दिवसांचा अवधी शिल्लक असल्याचे सांगण्यात येत आहे. या काळात महापालिकेच्या हद्दीत ३४ गावांचा समावेश करण्याची प्रक्रिया अद्याप मार्गी लागलेली नसल्याने गावांचा समावेश निवडणुकीपूर्वी होणार का, याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे.

चाकण बसस्थानकाला अतिक्रमणाचा विळखा

$
0
0
लाखो रुपये खर्चून बीओटी तत्वावर बांधलेले चाकणच्या बस स्थानकाची सुसज्ज अशी इमारत अजूनही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. असे असले तरी या बसस्थानकाच्या आवारात दररोज सायंकाळच्या वेळेत भाजी मंडई भरत असून या ठिकाणी भाजी घेण्यासाठी लोकांची मोठी गर्दी होत असते.

साहित्यिक-कलावंत करणार कर्नाटक सरकारचा निषेध

$
0
0
येळ्ळूरमधील मराठी भाषकांवर कर्नाटक पोलिसांनी केलेल्या अमानुष हल्ल्याचा पुण्यातील लेखक, कलावंत १३ ऑगस्टला बेळगाव येथे जाऊन निषेध करणार आहेत.

गावकऱ्यांना प्रशिक्षण देणार

$
0
0
आंबेगाव तालुक्यातील माळीण गावात डोंगर कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर आता डोंगरमाथ्याखालच्या गावांतील ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. दरड कशी कोसळते, दरड कोसळण्यापूर्वी नैसगिक घटना कशा घडतात याची माहिती गावकऱ्यांना दिली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले.

शाळांमध्ये इकोफ्रेंडली गणेशोत्सवाचा जागर

$
0
0
पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी इकोफ्रेंडली गणेशोत्सवाचा जागर केला जात असताना शाळांनीही बच्चेकंपनीला पर्यावरणपूरक मूर्ती बनवण्याचे धडे दिले जात आहेत.

‘जैवविविधतेचा खजिना’ उलगडणार सायन्स एक्स्प्रेस

$
0
0
हिमालयातील शिखरांपासून ते पश्चिम घाटातील विस्तीर्ण पसरलेल्या पर्वतरांगा, राजस्थानातील वाळवंटापासून ते कोकण किनारपट्ट्यावरील सागरी जीवनापर्यंत… देशातील वैशिष्ट्यपूर्ण जैवविविधतेचा खजिना उलगडणारी सायन्स एक्स्प्रेस भारत भ्रमणाला निघाली आहे.

दुर्घटनेमागील कारणे शोधण्यास सुरुवात

$
0
0
आंबेगाव तालुक्यातील माळीणमध्ये डोंगर कोसळून त्याखाली दबलेल्या गावकऱ्यांचा शोध व बचावकार्य थांबल्यानंतर आता या दुर्घटनेमागची कारणे शोधण्यात येत आहेत. या परिसरात झालेली वृक्षतोड, पडकाई योजना आणि खासगी कंपन्यांमुळे पर्यावरणदृष्ट्या झालेली हानी याचे अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी मागविले आहेत.

मीडीएशनमुळे मिटली अवघ्या पंधरा मिनिटात केस

$
0
0
एका गर्भवती तरुणीचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. मात्र उपचाराची रक्कम भरल्याशिवाय मृतदेह ताब्यात देणार नसल्याचे सांगण्यात आल्यामुळे तणाव निर्माण झाला. मुलीचे आई-वडिल गरीब असल्यामुळे पैसे देणे शक्य नसल्यामुळे एका रिक्षाचालकाने हॉस्पिटलला ४२ हजाराचा चेक दिला.

शीतपेयात काचेचे तुकडे; ग्राहकमंचाकडून विक्रेत्याला दंड

$
0
0
काचेचे तुकडे असलेले शीतपेयाची विक्री केल्याप्रकरणी तक्रारदाराला पाच हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश ग्राहकमंचाने विक्रेत्याला आदेश दिला आहे.

मेडिकल कॉलेज प्राध्यापकांचे निवृत्तीचे वय ६३ वर्ष

$
0
0
राज्यातील सर्व सरकारी विद्या शाखांच्या मेडिकल कॉलेजमधील निवृत्त होणाऱ्या प्राध्यापकांची संख्या अधिक असल्याने सध्या सेवेत असलेल्या प्राध्यापकांच्या निवृत्तीचे वय ६२ वरून आता ६३ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

रस्ते खोदण्याचा खर्च राज्य सरकारकडूनच

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाने सुरक्षिततेच्या कारणास्तव नमते घेत बोर्डाच्या परिसरात क्लोज सर्किट टीव्ही (सीसीटीव्ही) कॅमेरे बसविण्यासाठी रस्ते खोदण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठी भाषकांच्या भागात मुख्य संमेलनाचा आग्रह

$
0
0
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने घुमान येथे साहित्य संमेलन घेण्यास हरकत नाही; मात्र, मराठी भाषकांचे प्रमाण अधिक असलेल्या भागातच मुख्य साहित्य संमेलन घेण्यात यावे, अशी मागणी मराठी प्रकाशक परिषदेतर्फे गुरुवारी करण्यात आली.

राही सरनोबत होणार प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी

$
0
0
प्रसिद्ध नेमबाज राही सरनोबत हीला दोन वर्षासाठी परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी म्हणून गुरूवारी पुणे महसूल विभागात रुजू करून घेण्यात आले. राहीला प्रशिक्षणासाठी पुणे जिल्ह्यात नियुक्ती देण्यात आली आहे.

माजी न्यायाधीशाला कोर्टासमोर हजर राहण्याचे आदेश

$
0
0
एका ३५ वर्षीय माजी न्यायाधीशाने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचे वैद्यकीय अहवालात निष्पन्न झाले आहे. कोर्टाने त्याला दिलेल्या तात्पुरत्या अटकपूर्व जामिनाची मुदत संपल्यामुळे त्याला शुक्रवारी कोर्टात हजर राहण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे.

प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात ‘नो व्हेइकल झोन’ शक्य

$
0
0
शहरात वाढणारी वाहनांची संख्या आणि प्रदूषणाची वाढती पातळी लक्षात घेऊन आठवड्यातूंन एकदा प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात ‘नो व्हेइकल झोन’ करण्याची गरज असल्याचा सकारात्मक अभिप्राय महापालिका प्रशासनाने दिला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images