Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

विद्यार्थी, बॅचलर्सना जागा नाही...

$
0
0
रात्री-अपरात्रीपर्यंत स्पीकर वाजवून मित्रमैत्रिणींसह धिंगाणा करणारे विद्यार्थी....सोसायटीच्या पार्किंगमध्ये गप्पा ठोकणारे किंवा अश्लील चाळे करणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी...आणि पाण्याचा नळ बंद न करणारे विद्यार्थी...अशा जाचाला कंटाळून अनेक सोसायट्यांनी आता विद्यार्थी आणि बॅचलर्सना जागा भाड्याने न देण्याचा निर्णय घेतला आहे.

‘एक्स्प्रेस-वे’वर दरोडा प्रतिबंधक पथक

$
0
0
‘एक्स्प्रेस-वे’वर होणारी लुटमार लक्षात घेता सुरक्षेच्या कारणास्तव पेट्रोलिंग वाढवण्यात आले आहे. ‘आयआरबी’च्या पेट्रोलिंगसाठी असलेल्या दोन वाहनांमध्ये प्रत्येकी दोन पोलिस कर्मचारी देण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक मनोज लोहिया यांनी दिली.

मनसे चित्रपट कामगार सेना राज्यभरात कार्यान्वित होणार

$
0
0
गेल्यावर्षी बरखास्त करण्यात आलेली मनसे चित्रपट कामगार सेनेची पुण्याची नवीन कार्यकारिणी येत्या दोन-तीन दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे. येत्या काही काळात नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोकण या भागातही चित्रपट सेना कार्यान्वित केली जाणार आहे, अशी घोषणा मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी केली.

लहान मुलांना होतोय दम्याचा त्रास

$
0
0
विषाणूंचा वाढता संसर्ग, बदलते ऋतूमान, परागकणांसह घरातील भिंतीवर आलेल्या बुरशीच्या अॅलर्जीमुळे लहान मुलांमध्ये पावसाळ्यात दम्याचा आजार डोके वर काढू लागला आहे. मुलांना होत असलेल्या त्रासामुळे हतबल झालेले पालक मुलांना घेऊन बालरोगतज्ज्ञांकडे धाव घेऊ लागले आहेत.

महसूल कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित़

$
0
0
महसूल विभागातील पदनामांत बदल, नायब तहसीलदारांना वाढीव ग्रेड पे, पदोन्नतीने नायब तहसीलदारांची भरती, कोतवालांना चतुर्थश्रेणी दर्जा अशा मागण्या मंजूर झाल्याने महसूल कर्मचारी संघटनेने राज्यभर सुरू केलेले काम बंद आंदोलन बुधवारी स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

खारफुटीसाठी हवा ‘बायोस्फिअर रिझर्व्ह’

$
0
0
वनक्षेत्राच्या संरक्षणासाठी ‘कोअर आणि बफर’ असे विभाग वन विभागाने केले आहेत, त्याच धर्तीवर खारफुटीसाठी ‘बायोस्फिअर रिझर्व्ह’ जाहीर केल्यास सध्या धोक्यात आलेल्या खारफुटी वनांचे संरक्षण होऊ शकते.

‘भारत ही ई-कॉमर्सची मोठी बाजारपेठ’

$
0
0
‘आशिया खंडात ई-कॉमर्सची बाजारपेठ वेगाने विस्तारत आहे. आशिया खंडात भारत आणि इंडोनेशिया या ई-कॉमर्स क्षेत्रातील अव्वल बाजारपेठा असून, त्यानी चीनला मागे टाकले आहे.

पारंपरिक मूर्तिकलेकडे नव्या मूर्तिकारांची पाठ

$
0
0
व्हॉट्स अॅप, ट्विटर, फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सचा सहजतेने वापर करणारी नवी पिढी गणेशमूर्ती घडवण्याचा पारंपरिक व्यवसाय करण्याच्या बाबतीत उदासीन असल्याचे समोर आले आहे.

आता ‘कौशल्या’सह पदव्युत्तरचे शिक्षण

$
0
0
शैक्षणिक अभ्यासक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना कौशल्याधारित अभ्यासक्रमासाठी पूरक ठरणाऱ्या कौशल्यांचेही प्रशिक्षण देता यावे, यासाठी पुणे विद्यापीठाने राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळासोबत (एनएसडीसी) एक सामंजस्य करार केला आहे.

थेट सेकंड इयरचे प्रवेश रखडले

$
0
0
डिप्लोमा इंजिनीअरिंग अभ्यासक्रमानंतर थेट पदवीच्या दुसऱ्या वर्षाला दिले जाणारे प्रवेश अद्याप रेंगाळले आहेत. काही विद्यापीठांचे फर्स्ट इयर इंजिनीअरिंगचे निकाल अद्याप लागलेले नसल्याने थेट सेकंड इयरच्या प्रवेशांवर परिणाम झाला आहे.

भूमिगत वीजवाहिनीत वडगाव शेरीत बिघाड

$
0
0
महापालिकेच्या सरधोपट कारभारामुळे वडगाव शेरी परिसरातील सुमारे ३५ हजार नागरिकांचा वीजपुरवठा कोणत्याही क्षणी खंडित होण्याची भीती निर्माण झाली आहे. या भागातील भूमिगत वीजवाहिनीत बिघाड झाला असून, त्याच्या दुरुस्तीचा मार्गही महापालिकेने बंद केल्याने ही परिस्थिती ओढवली आहे.

महायुतीतील घटक पक्षांचे दबावतंत्र

$
0
0
महायुतीतील भाजप-शिवसेनेकडून जागा वाटपाबाबत कोणताही निरोप येत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्राम हे नाराज झाले असून, त्यांनी दबावतंत्र वापरण्यास सुरुवात केली आहे.

बांधकाम नकाशे मंजुरीवरून कोंडी

$
0
0
हद्दीलगतच्या ३४ गावांचा महापालिकेत समावेश करण्याचा निर्णय झाल्यानंतर या गावांमधील जागांवर बांधकाम नकाशे मंजूर करण्यासाठी नगररचना विभागाकडे ओघ वाढला आहे.

पोलिसांकडे नवे ‘ब्रेथ अॅनालायझर’

$
0
0
वाहतूक पोलिसांनी तळीराम वाहनचालकांना वठणीवर आणण्यासाठी नवीन आणि चांगल्या दर्जाचे ब्रेथ अॅनालायझर खरेदी केले आहेत. यामध्ये ‘जीपीआरएस’ असून, कारवाई कोठे केली, संबंधित चालकाचा फोटो, नाव-पत्ता, दारूचे प्रमाण, तसेच कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचे नाव असलेली प्रिंट लगेचच काढता येणे शक्य आहे.

शहरात पाऊस दमला

$
0
0
शहर आणि परिसरातील पावसाचा जोर बुधवारी काहीसा ओसरला. शहरात दिवसभरात पावसाच्या अधूनमधून काही सरी कोसळल्या. रात्री साडेआठपर्यंत शहरात ३.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गुरुवारी शहरात हलक्या पावसाच्या काही सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे.

‘जेक्स्ट्रा’द्वारे इंटरनॅशनल कॉल मोफत

$
0
0
परदेशात गेल्यावर नातेवाइकांशी संवाद साधताना होणारा फोन कॉलचा खर्च आता ‘चकटफू’ होणार आहे. यासाठी जेक्स्ट्रा टेक्नॉलॉजीने ‘वाय फाय झोन’मध्ये सीमकार्डवरून फोन लावता येईल असे तंत्रज्ञान विकसित केले आहे.

अपॉइंटमेंट घेतल्यासच पुरोहित उपलब्ध

$
0
0
पाश्चात्य जीवनशैली पुरस्कार करणाऱ्या तरुण पिढीला मानसिक ताण कमी करण्यासाठी आजही ‘सत्यनारायणाची पूजा’च महत्त्वाची वाटते आहे. दिवसेंदिवस वाढत असलेली स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी मानसिक आधार मिळविण्यासाठी सत्यनारायणाची पूजा करणाचे प्रमाण वाढले आहे.

MSRDC वर ४ हजार कोटींचे कर्ज

$
0
0
रस्ते आणि पुलांच्या कामांमुळे चार हजार कोटी रुपयांहून अधिक कर्जाचा डोंगर झालेल्या महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावरील २६ व्यापारी भूखंड भाडेकराराने देण्याचा निर्णय घेतला आहे.

परकीय चलनाचा कॉसमॉसला परवाना

$
0
0
भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेला परकीय चलन व्यवहारासाठी कायमस्वरूपी परवाना देण्यात आला आहे. सन २००७पासून रिझर्व्ह बँकेने कॉसमॉस बँकेला परकीय चलन व्यवहार करण्याची मान्यता दिली होती.

हंजर प्रकल्पात पुन्हा आंदोलन

$
0
0
पुणे महानगरपालिकेच्या हंजर प्रकल्पामध्ये आलेल्या शहरातील कचरागाड्या ग्रामस्थांनी बुधवारी पुन्हा अडवल्या. कचरा डेपोमध्ये साचलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जात नाही, तोपर्यंत शहरातील गाड्या येऊ देणार नाही, असे उरुळी देवाची व फुरसुंगी ग्रामस्थांनी स्पष्ट केले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images