Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘तालुक्यातील जनतेच्या कौलाला प्राधान्य देणार’

$
0
0
‘आगामी विधानसभेसाठी मला कोणाचाही फोन आला आणि थांबा म्हणाले तरी मी थांबणार नाही आणि आजच्या सत्ताधाऱ्यांनी मला तिकिटासाठी आग्रह धरल्यास प्रथम तालुक्यातील जनतेच्या कौलाला प्राधान्य दिले जार्इल, तसेच कोणताही निर्णय कार्यकर्त्यांना आंधारात ठेवून घेतला जाणार नाही,’ असे अश्वासन दौंड तालुक्यातील पाटसमध्ये परिर्वतन मेळाव्यात उद्योगपती विकास ताकवणे यांनी दिले.

जिल्ह्यात १६ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला मान्यता

$
0
0
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील दौंड, शिरूर, वेल्हा आणि हवेली या तालुक्यातील आठ गावांमध्ये १६ कोटी रुपयांच्या नळ पाणीपुरवठा योजनांना मान्यता देण्यात आली आहे.

बारामतीत जिल्हा परिषद पुस्तक वाटपात नापास

$
0
0
महाराष्ट्र सरकारच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सर्व पाठ्य - पुस्तके मोफत देण्यात येतात. बारामतीमध्ये मात्र जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या समन्वयाअभावी अनेक सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना पुस्तकेच मिळाली नसल्याचे वास्तव पुढे आले आहे.

डेंगीच्या डासांची ७४ हजार ठिकाणी उत्पत्तीस्थाने

$
0
0
शहरात डेंगीच्या डासांचा उद्रेक वाढत असताना दुसरीकडे डासांची उत्पत्तीस्थाने देखील गेल्या वर्षीच्या तुलनेत चार हजारांनी वाढली आहेत. आजमितीला ७३ हजार ८९३ ठिकाणी डेंगीच्या डासांची उत्पत्तीस्थाने आढळल्याचे एका सर्व्हेतून स्पष्ट झाले आहे.

रक्तवाहिन्यांच्या विकाराचा डायबेटिस पेशंटना धोका

$
0
0
डायबेटिस, पॅरालिसीस, हार्टच्या आजाराने त्रस्त असलेल्या पुण्यातील ३० ते ४० टक्के पेशंटमध्येही रक्तवाहिन्यांचा विकार बळावत असल्याने याबाबत वैद्यकतज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. वाहिन्यांतील बिघाडामुळे रक्त पुरवठा कमी झाल्यास त्याबाबतचा निष्काळजीपणा जीवघेणा ठरण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

आरोपींना नयना पुजारीसह पाहिले होते

$
0
0
सॉफ्टवेअर इंजिनीअर नयना पुजारी हिला पेरणे फाटा वढू येथे रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारमध्ये आरोपी राजेश चौधरी आणि विश्वास कदम यांच्याबरोबर पाहिले होते, अशी साक्ष एका कारचालकाने मंगळवारी कोर्टात दिली.

पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी पतीला सक्तमजुरीची शिक्षा

$
0
0
पत्नीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला दोन वर्षे सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सत्र न्यायाधीश व्ही. पी. आव्हाड यांच्या कोर्टाने हा निकाल दिला. या प्रकरणी मल्लिकार्जुन अंबादास माने (रा. पानसरे चाळ, वाकड) याला शिक्षा सुनावण्यात आली आहे.

गणपती बाप्पा हवेत… चकाचक!

$
0
0
एकीकडे पर्यावरणपूरक उत्सवाचा जागर केला जात असताना पर्यावरणाला घातक ठरणारे परदेशी बनावटीचे रासायनिक रंग मूर्तिकारांकडून वापरले जात आहेत. शाडू मातीपेक्षा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती रंगवण्यासाठी या रासायनिक रंगाचा वापर करण्याचे प्रमाण जास्त असून, ग्राहकांकडून चकचकीत गणेशमूर्तींची मागणी होत असल्याने हे रंग वापरण्याशिवाय पर्याय नसल्याचे मूर्तिकारांकडून सांगण्यात येते.

दस्तनोंदणी झाल्यावर फेरफार नोंद तासाभरात

$
0
0
दस्तनोंदणी झाल्यानंतर अवघ्या काही तासांत महसूल अभिलेखात त्याची फेरफार नोंद घेण्याच्या योजनेस राज्यातील ३६ तालुक्यांत सुरुवात झाली आहे. ही ‘ई-फेरफार’ योजना येत्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे.

ट्रेकिंगच्या जाचक अटींविरुद्ध लढणार

$
0
0
गिर्यारोहण, ट्रेकिंग, साहसी शिबिरे आयोजित करणाऱ्या संस्थांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने नियमावली जाहीर करून नक्कीच स्वागतार्ह पाऊल उचलले आहे. मात्र, ही नियमावली अभ्यासपूर्ण नाही. यात अनेक जाचक आणि निरर्थक अटी लादण्यात आल्या आहेत.

माहिती फलकांच्या दुरुस्तीची महापालिकेकडे मागणी

$
0
0
शहरातील गरीब आणि गरजू पेशंटना मोठ्या हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार देण्याबाबत आरोग्य विभागाने तयार केलेल्या माहिती फलकांवर अर्धवट माहिती देण्यात आली आहे. या माहितीमध्ये अनेक त्रुटी असल्याने सविस्तर आणि अचूक माहिती असलेले माहिती फलक महापालिकेने तयार करावेत, अशी मागणी सजग नागरिक मंचाने केली आहे.

गुंतवणुकीच्या निर्णयाला मुदतवाढ

$
0
0
सहकारी बँकांना स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशोच्या (एसएलआर) नियमानुसार फक्त सरकारी रोखे किंवा राष्ट्रीयीकृत बँकांतच गुंतविण्याच्या आदेशाला रिझर्व्ह बँकेने दोन वर्षांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे राज्य सहकारी बँक आणि सहकार क्षेत्राला सुमारे नऊ हजार कोटी रुपयांचा दिलासा मिळाला आहे.

जकात नाक्यांच्या जागा हव्यात पार्किंगला

$
0
0
महापालिकेच्या जकात नाक्यांच्या रिकाम्या जागा पार्किंगसाठी पीएमपीएमएलला उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पीएमपी प्रशासनाने महापालिका आयुक्तांकडे केली आहे. राज्य सरकारने ‘एस्कॉर्ट’ बंद केल्याने जकात नाक्याच्या जागा रिकाम्या झाल्या आहेत. यातील सात नाक्यांची जागा द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

ध्येयापर्यंत पोचण्यासाठी स्ट्रगलला पर्याय नाही

$
0
0
शैक्षणिक अभ्यासक्रम आणि इंडस्ट्रीला अपेक्षित असणारी कौशल्ये यात तफावत असल्याची बाब ललित कलेच्या विद्याशाखेकडूनही आता अधोरेखित केली जात आहे. त्यामुळेच ललित कलांचे रितसर प्रशिक्षण घेतल्यानंतरही विद्यार्थ्यांना स्ट्रगल करणे भाग पडते असून, स्वतःची ओळख निर्माण होईपर्यंत समाधानकारक मोबदलाही मिळत नसल्याचे दिसून येते.

‘यूजीसी’चीही पुनर्रचना

$
0
0
उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या आणि खासगी शैक्षणिक संस्थांच्या कामावर नियंत्रण ठेवण्यात विद्यापीठ अनुदान आयोगाला (यूजीसी) आलेले अपयश लक्षात घेत, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ‘यूजीसी’ची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे.

मद्यपी शिक्षकांमुळे शाळा बंद

$
0
0
जुन्नर तालुक्यातील हातवीज या आदिवासी दुर्गम गावातील जिल्हा परिषदेची शाळा मद्यपी शिक्षकामुळे बंद करण्याची वेळ आली आहे. गेल्या दोन वर्षांत मद्यपी शिक्षकामुळे काही पालकांनी त्यांच्या मुलांना शेजारच्या गावातील शाळांत प्रवेश घेतल्याने तेथील शाळेची पटसंख्या कमी झाली आणि त्यामुळे जून २०१४ पासून ती शाळा बंद करण्याचा निर्यण जिल्हा परिषदेने घेतला.

विद्यापीठाच्या परीक्षा पद्धतीत सुधारणा अधोरेखित

$
0
0
अपुरे मनुष्यबळ आणि कालबाह्य यंत्रणांवर बोट ठेवत डॉ. अशोक घाटोळ समितीने पुणे विद्यापीठाच्या परीक्षा पद्धतीमध्ये मोठ्या सुधारणा सुचविल्या आहेत. विद्यापीठाच्या मोठ्या विद्यार्थीसंख्येच्या गरजा पूर्ण करणारी सक्षम परीक्षा यंत्रणा उभारण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर अपरिहार्यच असल्याचेही समितीने आपल्या अहवालातून विद्यापीठाच्या निदर्शनास आणून दिले आहे.

‘आमदार व्हायचंय मला...’

$
0
0
लोकसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड यशामुळे भारतीय जनता पक्षाकडे इच्छुकांची झुंबड उडाली आहे. शहर आणि जिल्ह्यात भाजपच्या वाट्याला आलेल्या आठ मतदारसंघांमधील इच्छुकांची संख्या तब्बल ८४वर पोहोचली आहे.

‘खड्ड्यातील’ रस्त्यांची होणार पाहणी

$
0
0
शहरात पुनर्डांबरीकरण करूनही खड्डे पडलेल्या रस्त्यांची पाहणी केली जाणार असून, त्याचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी मंगळवारी दिले. तसेच, रस्त्यांच्या कामाचा दर्जा खराब असल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे सूतोवाचही त्यांनी केले.

श्रेयासाठी महापौरांनी ‘पळवले’ वसतिगृह?

$
0
0
शहराच्या मध्यवर्ती भागात मुलींच्या वसतिगृहासाठी जागा उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करत महापौर चंचला कोद्रे यांनी हे वसतिगृह मुंढवा, हडपसर भागात करण्याचा घाट घातला आहे. यासाठी मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत ८० लाख रुपयांचे वर्गीकरण करण्यास मंजुरी देण्यात आली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images