Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

सेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपचा गनिमी कावा

$
0
0
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर-जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखतींच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षातर्फे शिवसेनेच्या ताब्यातील कोथरूड, कॅन्टोन्मेंट, वडगाव शेरीसारख्या मतदारसंघांमधील इच्छुकांचीही चाचपणी करण्यात येणार आहे.

‘नोबेल’ हॉस्पिटल विरोधात ‘कट प्रॅक्टिस’ची तक्रार

$
0
0
हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पेशंट पाठविल्याच्या बदल्यात ‘धनादेश’ प्राप्त झाल्यानंतर सासवडच्या डॉक्टराने हडपसरच्या नोबेल हॉस्पिटल विरोधात ‘कट प्रॅक्टिस’ची तक्रार केली आहे. त्याची गंभीर दखल घेऊन महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने हॉस्पिटलला नोटीस पाठविण्याची कार्यवाही सुरू केली आहे.

राजकीय दबावामुळे चौकशीला विलंब

$
0
0
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या कोट्यवधी रुपयांच्या तोट्याला कारणीभूत असलेल्या संचालकांवरील वैयक्तिक जबाबदारी निश्चित करणारा चौकशी अहवाल सादर करण्याची सूचना सहकार खात्याने बँकेचे चौकशी अधिकारी शिवाजी पहिनकर यांना केली आहे.

११० वर्षांचे वृद्ध टँकर अपघातात मृत्युमुखी

$
0
0
सुसरोड येथील शिवशक्ती चौकात चहा पिण्यासाठी जात असलेल्या ११० वर्षांच्या वृद्धास टँकरने उडवल्याने त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास घडला. या प्रकरणी अनोळखी टँकर चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पासपोर्ट तक्रार निवारणाचा विक्रम

$
0
0
दत्तवाडी पोलिस ठाण्यात नुकत्याच झालेल्या पासपोर्ट तक्रार निवारण दिनाच्या कार्यक्रमात १५३ व्यक्तींच्या पासपोर्टची पडताळणी दिवसभरात पूर्ण करण्यात आले. संबंधित नागरिकाच्या घरी जाऊन त्याच्या घराची पाहणी, गुन्हे दाखल आहेत की नाहीत याची माहिती; तसेच कागदपत्रांची पडताळणी करून एकाच दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात पडताळणी करण्याचा विक्रम दत्तवाडी पोलिस आणि परकीय नोंदणी शाखेने केला.

पंपचालकांचा LBT विरोधात बंदचा इशारा

$
0
0
राज्यात पेट्रोल आणि डिझेलवर आकारण्यात येणारा स्थानिक संस्था कर (एलबीटी) कमी न केल्यास ११ ऑगस्टपासून राज्यातील पंपचालकांनी बंदचा इशारा दिला आहे. नागरिकांनीही एसएमएस पाठवून एलबीटी कमी करण्याच्या मोहिमेला पाठिंबा देण्याचे आवाहन ‘फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डीलर असोसिएशन’तर्फे करण्यात आले आहे.

‘नगर विकास’च्या ‘ग्रीन सिग्नल’ची प्रतीक्षा

$
0
0
दिरंगाईनंतर पुणे मेट्रो आता राजकारणाच्या ट्रॅकवर फसण्याची भीती आहे. हरकतींचा अभ्यास करून राज्याची जबाबदारी पूर्ण केल्यानंतर केंद्रीय नगररचना विभाग आता खो घालत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे.

प्रकल्प लांबविण्याचा डाव

$
0
0
‘दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनसारख्या (डीमआरसी) तज्ज्ञांनी तयार केलेल्या पुणे मेट्रोच्या अहवालाबाबत निरनिराळ्या शंकाकुशंका काढून हा प्रकल्प लांबविण्याचा डाव आहे,’ अशी टीका काँग्रेसने सोमवारी केली आहे.

‘रुपी’च्या विलीनीकरणास ‘पंजाब नॅशनल’ तयार

$
0
0
अडचणीत आलेल्या रुपी बँकेचे भवितव्य निश्चित करण्यासाठी आता केवळ तीन महिन्यांचाच अवधी शिल्लक आहे. दरम्यान, पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) रुपीच्या विलीनीकरणासाठी तयारी दर्शविली असून त्यासंदर्भात वेगाने प्रयत्न सुरू असल्याची माहिती सहकार सचिव राजगोपाल देवरा यांनी सोमवारी दिली.

क्रांतिदिनाच्या मुहूर्तावर विद्यापीठाचा नामविस्तार

$
0
0
आचारसंहितेपूर्वी पुणे विद्यापीठाच्या नामविस्ताराचा बार उडवण्याचा निर्णय राज्य सरकार व विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. येत्या शनिवारी (९ ऑगस्ट) क्रांतिदिनाचा मुहूर्त साधत राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती के. शंकरनारायणन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा नामविस्तार केला जाणार आहे.

पावसाने कॅम्पात भिंत कोसळली

$
0
0
मुसळधार पावसामुळे कॅम्पमधील न्यू मोदीखाना येथील घर क्रमांक २२४१ मधील भिंत कोसळली. या दुर्घटनेत नऊ घरांना फटका बसला. सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ चव्हाण यांच्या घराची भिंत कोसळली.

सिंहगडावरील पार्किंग वाढविणार

$
0
0
सिंहगड घाट रस्त्यावर पडलेल्या दरडीतील दगडांचा सदुपयोग करण्याचा निर्णय वन संरक्षण समितीने घेतला आहे. घाट रस्त्यावर गोळा केलेले दगड समितीने गडावरील पार्किंगच्या एका बाजूस जमा केले असून त्याचे सपाटीकरण करून पार्किंगची जागा वाढविण्यात येणार आहे.

सर्व शहराचा पाणीपुरवठा बंद

$
0
0
येत्या गुरुवारी (७ ऑगस्ट) संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. परिणामी शुक्रवारी (८ ऑगस्ट) सकाळी‌ उशीरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

माळीण : मृतांची संख्या १३३ वर

$
0
0
माळीण दुर्घटनेत सोमवार रात्रीपर्यंत १३३ मृतदेह हाती लागले आहेत. आता गावाच्या पुनर्वसनाचे आव्हान उभे ठाकले आहे. रविवार रात्रीपासून पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने मदतकार्याला मर्यादा येत आहेत.

आजपासून दोनदा पाणी

$
0
0
खडकवासला प्रकल्प पूर्ण भरलेला नसतानाही, मतांवर डोळा ठेवून राजकीय पक्षांनी पुणेकरांना आज, मंगळवारपासून दोन वेळच्या पाण्याची ‘भेट’ दिली आहे. गेल्या वर्षी पाणीकपात लादणारे हेच ‘माननीय’ आता मात्र वर्षभराचे नियोजन न करता लोकानुनय करीत आहेत.

१ लाख ३० हजारांचा गुटखा जप्त

$
0
0
धनकवडी येथील तीन विक्रेत्यांकडून पान मसाल्यासह गुटख्याची विक्री चोरीछुपे होत असल्याचे आढळले आहे. त्यांच्याकडून एक लाख २९ हजार ८२४ रुपयांच्या गुटख्याचा साठा जप्त करण्याची कारवाई अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) केली.

LBT चुकविणाऱ्यांविरोधात मोहीम

$
0
0
शहरातील स्थानिक संस्था कर (एलबीटी) चुकविणाऱ्या व्यावसायिकांविरुद्ध पुन्हा कठोर भूमिका घेण्यात येत असून, पालिकेकडे एक छदामही न भरणाऱ्यांविरोधात तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. अडीच कोटी रुपयांचा माल आयात करूनही कर न भरणाऱ्या व्यावसायिकांवर एलबीटी विभागाने कारवाई केली.

शालेय पोलिस दक्षता समितीची स्थापना

$
0
0
‘कायदा सुव्यवस्था आणि गुन्हे उघडकीस आणण्यासोबतच पोलिसांना आधुनिक परिस्थती नुसार सामाजिक विषयक सेवा करण्याचे काम करावे लागत आहे. त्यामुळे सर्व शाळांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शालेय पोलिस दक्षता समितीची स्थापना करावी,’ अशी सूचना सह पोलिस आयुक्त संजय कुमार यांनी केली आहे.

हडपसर व सासवड परिसराला खड्ड्यांचा विळखा

$
0
0
हडपसर आणि सासवड भागात गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने रस्त्यांची दैना उडाली आहे. तुकाईदर्शन ते भेकराई नगर, सोलापूर रोड - रविदर्शन ते लक्ष्मी कॉलनी या भागात रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत.

मुलींना मोफत शिक्षण केवळ फार्स

$
0
0
पूर्व प्राथमिक,प्राथमिक व ज्युनिअर कॉलेज यांच्या विनाअनुदानित फी धोरणावर सरकारचे विशेषत: शालेय शिक्षण विभागाचे कोणतेही नियंत्रण नसल्याने अनुदानित व विनाअनुदानित विभागात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images