Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

विद्युत खात्यातील लाचखोर अभियंत्याला अटक

0
0
केंद्रीय बांधकाम विभागाच्या विद्युत खात्यातील कार्यकारी अभियंत्याला पदाचा गैरवापर करून १२ हजारांची लाच घेतल्याप्रकरणी कोर्टाने सात वर्षे सक्तमजुरी आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

रात्रीच्या वेळी लूटमार करणारी टोळी निष्पन्न

0
0
नवी सांगवी येथे जाण्यासाठी क्लास संपवून बसस्टॉपच्या दिशेने चाललेल्या विद्यार्थ्याला गणेशखिंड रोडवरील म्हसोबा गेटजवळ लुटल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री घडला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तिघा आरोपींविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

हायवेवर लिफ्टच्या बहाण्याने लुटले

0
0
मुंबई-बेंगळुरू हायवेवर ​लिफ्टच्या बहाण्याने एका तरुणाला लुटल्याचा प्रकार बुधवारी रात्री घडला आहे. वारजे पोलिसांनी कारमधील तिघा आरोपींविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. दिनेश नांदगावकर (वय २४, रा. वारजे) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

ग्रामसेवकासह ग्रामपंचायत सेवकाला अटक

0
0
लघुउद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतीतील सेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.

पुण्यासह राज्यात पावसाचा जोर ओसरला

0
0
आठवडाभर दिवसरात्र बरसल्यानंतर शुक्रवारी पावसाने पुण्यासह राज्याच्या बहुतांश भागात सुट्टी घेतली. कोकण वगळता मध्य महाराष्ट्रात दिवसभर तुरळक ठिकाणी पाऊस पडला.

जलवाहिन्यांचे नकाशे तयार करा

0
0
पुण्यातील पाणी वितरणामधील गळती रोखून पाण्याच्या योग्य नियोजनासाठी जलवाहिन्यांचा नकाशा तयार करावा आणि नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी तांत्रिक समिती नेमण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी केली आहे.

मेट्रो नियमावलीतही आढळल्या ‘प्रिटिंग मिस्टेक’

0
0
शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यात (डीपी) एफएसआयबाबत ‘प्रिटिंग मिस्टेक’ करणाऱ्या प्रशासनाने मेट्रो नियमावलीच्या प्रकटनामध्येही पुन्हा तशीच चूक केल्याचे शुक्रवारी समोर आले.

ग्रामस्थांनी संयम ठेवण्याचे आयुक्तांचे आवाहन

0
0
कचराडेपोसाठी नवीन जागा शोधण्याचे काम सुरू असून दोन जागांचे भूसंपादन जवळपास पूर्ण होत आल्याचे महापालिका आयुक्त विकास देशमुख यांनी सांगितले. उरळी ग्रामस्थांना कचऱ्याचा त्रास होत आहे, याची पूर्ण जाणीव महापालिकेला असून नवीन ठिकाणी कचऱ्याचा प्रकल्प उभारण्यासाठी काही काळ लागतो.

प्रक्रिया ऑनलाइन; प्रवेश ऑफलाइन

0
0
अकरावीची प्रवेश प्रक्रिया यंदा ऑनलाइन असली, तरी प्रत्यक्षात सुमारे २० हजार म्हणजेच ३३ टक्के विद्यार्थ्यांनी ऑफलाइन प्रवेश घेतले आहेत. प्रक्रियेची व्यवस्थित माहिती करून न घेणारे पालक-विद्यार्थी आणि व्यापक जागरूकता निर्माण करण्यात कमी पडलेली प्रवेश समिती यांमुळे प्रक्रिया ‘क्लिक’ न झाल्याचे हे चित्र समोर आले आहे.

आता उरल्या स्मृती

0
0
माळीण गावात मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या ग्रामस्थांपैकी कुणी जिवंत राहिल्याची शक्यता आता मावळली आहे. दुर्घटनेनंतर शुक्रवारी तिसऱ्या दिवसापर्यंत एकूण ७० जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

भोरमध्ये काँग्रेसविरोधात ‘राष्ट्रवादी’चा बंडखोर ?

0
0
भोर-वेल्हा-मुळशी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुन्हा बंडखोर उमेदवार उभा करण्याची तयारी सुरू केली आहे. एकच बंडखोर उमेदवार आणि निवडणुकीची व्युहरचना करण्यासाठी पक्षाची खेडशिवापूर येथे रविवारी (३ ऑगस्ट) बैठक बोलाविण्यात आली आहे.

लक्ष्मीनगरलाही दरडीचा धोका

0
0
जोरदार पावसामुळे आंबेगाव तालुक्यातील माळीण गावावर दरड कोसळण्याची घटना ताजी असतानाच येरवड्यातील लक्ष्मीनगर परिसरात मागील दोन दिवसांपासून दरडी कोसळत आहे. माळीण घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून येरवडा क्षेत्रीय कार्यालयाकडून डोंगराच्या कडेला असलेली धोकादायक घरे खाली करण्याच्या लेखी सूचना दिल्या आहेत.

नांदायचेच नाही, तिला अडवून कशी थांबे

0
0
‘जिला नांदायचेच नाही, तिला अडवून कशी थांबेल,’ अशा शब्दांत वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी आमदार विनायक निम्हण यांच्या भाजपमधील प्रवेशाच्या चर्चेवर टिपण्णी केली. राज्यात पुन्हा आघाडीचेच सरकार सत्तेवर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

युनिकोडमध्ये येणार मोडी

0
0
कालौघात मागे पडलेल्या मोडी लिपीवर आता तंत्रज्ञानाची मोहोर उमटली आहे. नवनवीन फाँट निर्माण करणाऱ्या ‘युनिकोड’ या अमेरिकेतील संस्थेने मोडीला मराठीची लिपी म्हणून मान्यता दिली आहे.

LBT चुकवणाऱ्यांवर कारवाई

0
0
शहरात लागू झालेला स्थानिक संस्था कर (एलबीटी) बंद होण्याच्या अपेक्षेने व्यापाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले असले, तरी पालिकेने एलबीटी चुकविणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध पुन्हा तपासणी मोहीम हाती घेतली आहे.

उपद्रवी सर्पमित्रांना लगाम

0
0
मानवी वस्तीतून वाचविलेल्या सापांना निसर्गात सोडण्याऐवजी त्यांचा खेळ करणाऱ्या उपद्रवी सर्पमित्रांना लगाम घालण्याचा निर्णय वन विभागाने घेतला आहे.

डेंगी : १,१०० जणांना नोटीस

0
0
शहरात विविध ठिकाणी डेंगीच्या डास उत्पत्ती करण्यास कारणीभूत ठरणाऱ्या सोसायटी, बांधकाम व्यावसायिकांसह ११०० जणांना आरोग्य खात्याने नोटीस बजावली आहे. तर, आतापर्यंत आठ जणांवर खटले दाखल करण्याची कारवाई देखील करण्यात आली आहे.

माळीण दुर्घटनेचे ७६ बळी

0
0
माळीण गावात मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या ग्रामस्थांपैकी कुणी जिवंत राहिल्याची शक्यता आता मावळली आहे. दुर्घटनेनंतर शनिवारी चौथ्या दिवशी सकाळपर्यंत एकूण ७६ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

अशीही पर्यावरणपूरक श्रद्धांजली

0
0
आंबेगाव तालुक्यातील माळीण येथे झालेल्या दुर्घटनेला पर्यावरणपूरक श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. दिग्दर्शक मंगेश हाडवळे आणि त्याचा मित्र अतुल बेनके यांनी माळीण दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली म्हणून जुन्नर येथे ‘माळीण संजीवन स्मारक’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

धरणसाठा ४८ टक्क्यांवर

0
0
गेल्या दिवसांत झालेल्या पावसामुळे राज्यातील प्रमुख धरणांचा जलसाठा ४८ टक्क्यांवर पोहोचला असून जलसाठ्यांची स्थिती सुधारली आहे. मराठवाडा आणि नाशिक विभागामधील धरणांमध्ये तुलनेने कमी पाणीसाठा झाला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images