Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

अकरावी प्रवेशाचा शेवटही गोंधळातच

$
0
0
अकरावी प्रवेशाच्या समुपदेशन (कौन्सेलिंग) फेरीमध्ये गुरुवारी अभूतपूर्व गोंधळ झाला. शिक्षण उपसंचालक कार्यालयाचा नियोजनशून्य कारभार, कॉलेज निवडीच्या निर्णयप्रक्रियेतून पालकांना दूर करण्याचा प्रयत्न आणि पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे चिडलेल्या पालकांनी शिक्षण उपसंचालकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

माळीणमध्ये शोक अन् शोध

$
0
0
काळाच्या रूपाने कोसळलेल्या दरडीमुळे आंबेगाव तालुक्यातील माळीण गावावर गुरुवारी स्मशानकळा होती. दगड, माती, चिखल आणि गाळ यांच्या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत ४१ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. तीन महिन्यांच्या मुलीसह आठ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली.

बहुजनाच्या हातून विठ्ठलपूजा

$
0
0
कधीकाळी अस्पृश्यांना पाय ठेवण्यासही बंदी असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात शुक्रवारी इतिहास घडला. विठ्ठलाची आणि विठ्ठलभक्तांची अठ्ठावीस युगांची प्रतीक्षाच जणू संपली. आज प्रथमच बहुजन पुजाऱ्याच्या हातून श्री विठ्ठलाची पूजा करण्यात आली. तर महिला पुजाऱ्याकडून रुक्मिणी मातेची पूजा करण्यात आली.

कुऱ्हाडीने एकावर वार

$
0
0
हप्ता देत नाही म्हणून समाधान कानसकर यांच्यावर कुऱ्हाडीने वार करून, त्यांच्या घरातील पैसे चोरून दोन जण फरारी झाले आहेत. या प्रकरणी ज्ञानेश्वर लांडगे आणि त्यांच्या साथीदाराविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

शहरातील कचराप्रश्न पुन्हा पेटणार

$
0
0
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शहरातील कचराप्रश्न पुन्हा एकदा जोरदार पेटण्याची शक्यता आहे. उरळी देवाची येथील कचराडेपो कायमस्वरूपी हलविण्याबाबत अनेकदा महापालिका तसेच राज्य सरकारकडे पाठपुरावा करूनही त्यावर अद्यापही ठोस निर्णय झालेला नाही.

कमळ, धनुष्यबाणावर RPI ची नजर

$
0
0
आगामी विधानसभा निवडणुकीत यश मिळविण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ ​इंडियाच्या (आरपीआय) ​वाट्याला आलेल्या जागांवर भाजपचे ‘कमळ’ किंवा शिवसेनेचा ‘धनुष्यबाण’ या चिन्हांवर निवडणूक लढविण्याची मागणी आरपीआयच्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी खासदार रामदास आठवले यांच्याकडे केली आहे.

टेम्पोच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

$
0
0
भरधाव टेम्पोने मागून धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एक दुचाकीस्वार ठार झाला. चिखली येथे ही घटना घडली. दुलेश्वर शत्रुघ्न निसाद (रा. रिव्हर रेसिडेन्सी, चिखली) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे.

बेदरकार अधिकाऱ्यांमु‍ळे खेळाडू वाऱ्यावर

$
0
0
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळविलेल्या खेळाडूंना पिंपरी-चिंचवड महापालिकेने तीन वर्षांपूर्वी जाहीर केलेली आर्थिक मदत अजूनपर्यंत मिळालेली नाही. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या शिष्टमंडळाने सहाय्यक आयुक्त सुभाष माछरे यांना घेराव घातला.

मांजरीमध्ये चोरट्यांकडून मायलेकास मारहाण

$
0
0
मांजरी येथील भापकर मळा येथे तीन चोरट्यांनी मायलेकास मारहाण करत लुटल्याचा प्रकार बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडला. चोरट्यांच्या हल्ल्यात दोघेही जखमी झाले आहेत. त्यांच्यात झालेल्या झटापटी दरम्यान आरोपींकडील पिस्तूल जमिनीवर पडले.

तक्रारींचा पाऊस पडूनही महावितरण कोरडे

$
0
0
वीजपुरवठा खंडीत असल्यामुळे गेल्या चार दिवसांपासून वाकड, थेरगाव भागातील बहुतांश नागरिक अंधारात आहेत. याबाबत तक्रारींचा पाऊस पडूनही ‘महावितरण’चे अधिकारी मात्र कोरडे असल्याने संतप्त भावना व्यक्त होत आहेत.

‘आदिवासींच्या अस्तित्वावर गदा’

$
0
0
धनगर समाजाचा आदिवासींच्या घटनात्मक यादीत समावेश करावा यासाठी बारामती येथे करण्यात आलेले आंदोलन जनतेची दिशाभूल करणारे व आदिवासींच्या अस्तित्वावर गदा आणणारे आहे.

विद्यापीठ चौकातील कोंडीची डोकेदुखी

$
0
0
पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीमुळे कामावर जाणाऱ्या नागरिकांना दररोजचीच डोकेदुखी होऊन बसली आहे. सकाळच्यावेळी सिग्नल ओलांडण्यासाठी दहा मिनिटे लागत असल्याने या भागात सुमारे एक किलोमिटर वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दररोज पाहायला मिळते.

सिंहगड घाट रस्त्याची अधिकाऱ्यांकडून पाहणी

$
0
0
सतत कोसळणाऱ्या पावसामुळे गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी सिंहगड घाट रस्त्यावरील दरड कोसळली होती. दरड कोसळलेल्या जागेची तसेच गडावरील इतर धोकादायक ठरणाऱ्या दरडीची गुरुवारी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. वनविभागाचे सहाय्यक उपवनसंरक्षक विजय माने यांनी ही पाहणी केली.

श्रद्धेच्या नावाखाली अतिक्रमणांचा डोंगर

$
0
0
सहावे ज्योतिर्लिंग असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर येथे मंदिर परिसरात उपलब्ध असलेल्या अतिशय कमी जागेत दाटीवाटीने दुकाने व घरे बांधण्यात आलेली आहेत. यामध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे.

घुसमट, घुसमट, फक्त घुसमट…

$
0
0
दोन दिवस उलटून गेले, तरीही निसर्गाच्या कुशीत आकांत सुरू आहे. दिवसरात्र घुसमट होताना दिसतेय रोखलेल्या आणि दबलेल्या श्वासांची. क्षणोक्षणी हेच चित्र माळीणमध्ये पहायला मिळत आहे.

माळीणसारख्या गावांचे सर्वेक्षण

$
0
0
माळीण गावाप्रमाणे किती गावे धोकायदायक ठिकाणी वसली आहेत, त्याचे सर्वेक्षण करण्यात येणार असून, अशा गावांचा पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे पुनर्वसन व मदतकार्य मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी शुक्रवारी दिली.

मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख

$
0
0
आंबेगाव तालुक्यातील माळीण गावावर डोंगर कोसळून ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची सरकारी मदत देण्यात येणार आहे.

मित्राचा खून : एकाला जन्मठेप

$
0
0
वाढदिवसाच्या पार्टीमध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणाच्या रागातून मित्राच्या डोक्यात दगड टाकून त्याचा खून केल्याप्रकरणी एकाला जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सत्र न्यायाधीश यु. एन. दिक्कतवार यांच्या कोर्टाने हा निकाल दिला.

डेंगीचे आठशे संशयित पेशंट

$
0
0
शहरात जूनमध्ये अडीचशे, तर जुलैमध्ये साडेपाचशे असे डेंगीचे तब्बल आठशे संशयित पेशंट गेल्या दोन महिन्यांत आढळले असून, डेंगीचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.

निष्काळजी डॉक्टरवर गुन्हा

$
0
0
हार्नियाचे ऑपरेशन करताना डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मेडिपॉइंट हॉस्पिटलचे प्रशासन आणि ऑपरेशन करणाऱ्या दोघा डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images