Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

वाहतुकीची दाणादाण

0
0
भिडे पूल, जयंतराव टिळक पूल आणि नदीकाठचा रस्ता पाण्याखाली गेल्याने येथील वाहतुकीचा ताण शहराच्या मध्यवस्तीतील रस्त्यांवर वाढला आहे. त्यात खड्डे, रस्त्यावरील पाण्याने वाहतूक मंदावली होती तर ‘पीएमपी’ आणि एसटी बसेस रस्त्यात बंद पडल्याने वाहतुकीची कोंडीत भर पडली होती.

प्रकल्पग्रस्तांची याचिका फेटाळली

0
0
पुनर्वसन झाले नसल्याचा कांगावा करून कोर्टात धाव घेणाऱ्या भामा आसखेड धरणाच्या ४२१ प्रकल्पग्रस्तांची याचिका हायकोर्टाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने फेटाळून लावली आहे. शेतकऱ्यांना जमीन मिळवून देण्याच्या नावाखाली इस्टेट एजंटांकडून दिशाभूल करण्याच्या अशा ‘उद्योगां’ना यामुळे आळा बसणार आहे.

युवा साहित्य संमेलनाला अद्याप मुहूर्त मिळेना

0
0
सासवड येथे झालेल्या साहित्य संमेलनात खुद्द मुख्यमंत्र्यांनी केलेली युवा साहित्य संमेलनाची घोषणा हवेत विरली आहे. सांस्कृतिक विभाग आणि शालेय शिक्षण व क्रीडा विभागामध्ये नसलेल्या समन्वयामुळे सातत्याने पाठपुरावा करूनही हे संमेलन घेण्यासाठी अद्याप मुहूर्त मिळालेला नाही.

‘...तर मी नट झालो नसतो’

0
0
‘मास्टर दत्ताराम बापूंचे व्यक्तिमत्त्व जाणून घेण्याच्या उत्सुकतेपोटी त्यांना भेटायला गेलो. त्यांना भेटल्यानंतरच नट झालो. बापू भेटले नसते, तर कदाचित मी नट झालो नसतो,’ अशी भावना ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांनी व्यक्त केली.

‘पुरुषोत्तम’मधील एकांकिकांचा संग्रह

0
0
पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेतील लेखनाचे पारितोषिक मिळालेल्या ३२ निवडक एकांकिकांचा संग्रह साकारला असून, ‘उत्तमोत्तम एकांकिका पुरुषोत्तमच्या’ असे त्याचे नाव आहे.

रिक्त जागांवर ‘ऑफलाइन’ प्रवेश...

0
0
शिक्षणहक्क कायद्यातील (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांपैकी रिक्त जागांवर ऑफलाइन प्रवेश देण्यासाठी शहरातील शाळांनी केलेली मोर्चेबांधणी नुकतीच उघड झाली होती.

गुणवंतांचा रविवारी कौतुक सोहळा

0
0
खडतर परिस्थितीचा मुकाबला करून दहावीच्या परीक्षेत उत्तुंग यश मिळविणाऱ्या ‘मटा हेल्पलाइन’च्या शिलेदारांचा येत्या रविवारी (३ ऑगस्ट) कौतुकसोहळा होणार आहे.

‘ऑनलाइन’चा अट्टहासच गोंधळाच्या मुळाशी

0
0
अकरावीची केंद्रीय प्रवेशप्रक्रिया गेली १५ वर्षे यशस्वीपणे हाताळणारी ज्युनिअर कॉलेज आणि प्राचार्यांना यंदाच्या ऑनलाइन प्रवेशापासून दूर ठेवल्यानेच हा अभूतपूर्व गोंधळ उडाल्याचे स्पष्ट होत आहे.

मतदार नोंदणी आजपासून सुरू

0
0
जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेल्या विशेष नोंदणी मोहिमेची मतदारयादी गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानंतर आजपासून (शुक्रवार) शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मतदार नोंदणीचे काम पुन्हा सुरू होणार आहे.

पुणे स्टेशनजवळ खून

0
0
पुणे स्टेशन परिसरात एका अनोळखी ३५ वर्षांच्या व्यक्तीवर धारधार हत्याराने वार करून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सर्पमित्र कसले हे तर सर्पवैरी!

0
0
मानवीवस्तीतील सापांना पकडून पुन्हा निसर्गात सोडणाऱ्या सर्पमित्रांच्या विश्वात सध्या ‘शौर्य’ दाखविण्याचे वारे वाहत आहे. कोणाकडे किती दुर्मिळ साप, किती मोठे अजगर यावरून अलिकडे सर्पमित्रांचे वजन ठरते.

दहशतवादी वकासला अटक होणार

0
0
इंडियन मुजाहिदीनचा (आयएम) प्रमुख दहशतवादी झिया-उर-रहमान उर्फ वकास याला जंगली महाराज रोडवरील साखळी स्फोटांच्या गुन्ह्यांत अटक करण्यासाठी दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) हालचाली सुरू केल्या आहेत.

भावी ‘सीएं’चा ओढा नोकरीकडेच

0
0
‘चार्टर्ड अकाउंटंट’ ही पदवी मिळाल्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याऐवजी एखाद्या मल्टि नॅशनल कंपनीत नोकरी विद्यार्थ्यांना हवीहवीशी वाटत आहे. सीए होण्यासाठी लागलेले अटेम्प्टस, शैक्षणिक गुणवत्ता आणि कौशल्यांवर या विद्यार्थ्यांना मिळणारे पॅकेज ठरत आहे.

पूरनियंत्रण व संरक्षक भिंत योजनेवरच ‘आपत्ती’

0
0
शहरातील नागरिकांपर्यंत पूरनियंत्रणाची माहिती वेळेत पोहोचविण्यासह संरक्षक भिंत उभी करण्यासाठी मंजूर केलेला निधी देण्यातही राज्य सरकारकडून टाळाटाळ होत असल्याने पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागावरच ‘आपत्ती’ ओढवली आहे.

एक्स्प्रेस वेवर अपघातात पाच ठार

0
0
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर लोणावळ्याजवळील देवळे गावाच्या हद्दीतील देवळे पुलाला वॅगनआर कार धडकून झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास झाला. अतिवेगामुळे गेल्या आठवड्यात झालेला हा दुसरा अपघात आहे.

दिवसातून दोनदा पाणी पुरवठा करा

0
0
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा तयार झाला आहे. खडकवासला धरण शंभर टक्के भरल्याने त्यामधून नदीत पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे पुणेकरांना दिवसातून दोनवेळा पाणी द्यावे, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने केली जात आहे.

भिडेपूल पुन्हा पाण्याखाली

0
0
धरण क्षेत्रात सतत कोसळत असलेल्या पावसामुळे खडकवासला धरणातून गुरुवारी ३० हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच विसर्ग करण्यात आल्याने शहरातील काही भागात पाणी शिरले.

ड्रेनेज लाइन तुंबल्या

0
0
धरणांतून नदीत पाणी सोडण्यात येत असतानाच, पावसाचा जोरही कायम असल्याने गुरुवारी सकाळी शहराच्या बऱ्याच भागांतील ड्रेनेज लाइन ‘चोक-अप’ झाल्या. ड्रेनेज तुंबून त्यातील अस्वच्छ पाणी बाहेर पडू लागल्याने बहुतेक रस्त्यांना नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले.

बुधवारची रात्रही पावसाचीच

0
0
मंगळवारच्या रात्री पुण्यात धुवाँधार पावसानंतर बुधवारची रात्रही पुणेकरांसाठी पावसाचीच ठरली. पुण्यात बुधवारी रात्री ६४.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गुरुवारी पहाटे २.३० ते सकाळी साडेआठ या वेळेत ६४ मिलिमीटर पाऊस नोंदला गेला.

पुणेकरांच्या संयमाची परीक्षा

0
0
मुसळधार पावसामुळे रस्तोरस्ती पडलेले खड्डे, जागोजागी साचलेली तळी, वीज नसल्याने बंद पडलेले सिग्नल आणि वाहतूक नियमनाचा अभाव... या साऱ्यांमुळे गुरुवारी संपूर्ण पुण्यात वाहतुकीची महाकोंडी झाली. त्यामुळे हजारो पुणेकरांना सकाळपासूनच वेगवेगळ्या रस्त्यांवर अडकून पडण्याची वेळ आली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images