Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

खड्डे झाल्यास पगारवाढ थांबविण्याचा इशारा

$
0
0
साठ ते सत्तर उंबऱ्यांचं माळीण गाव. तसं छोटसंच. पण कष्टाळू माणसाचं. शेतात भात किंवा नाचणी पिकवायची आणि त्यातून उदरनिर्वाह करायचा, असा त्यांचा नित्यक्रम. कामानिमित्त गावातील काही तरुण पुण्या-मुंबईकडे गेली.

माळीण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील नाल्यांचे सर्वेक्षण होणार

$
0
0
आंबेगाव तालुक्यातील माळीण गावात दरड कोसळून घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आल्या आहेत.

तंत्रज्ञान विद्यापीठ निर्मिती ठरला फार्सच

$
0
0
राज्यात तंत्रज्ञान विद्यापीठ निर्मितीचे प्रयत्न करण्यात आले, तरी ते योग्य दिशेने न झाल्याने या विद्यापीठाची निर्मिती हा एक फार्सच ठरला. ‘देशातील ‘आयआयटी’च्या निर्मिती प्रक्रियेचा अभ्यास केला असता, तरी या विद्यापीठाची भक्कम पायाभरणी झाली असती,’ असा घरचा आहेर तंत्रशास्त्र अभ्यासकांकडून सरकारला मिळाला आहे.

नगरसेविकेच्या नावाने खोट्या हरकती

$
0
0
शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यावर (डीपी) नगरसेविकेच्या नावासह अनेक नागरिकांच्या खोट्या सह्या करून हरकती नोंदविण्यात आल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला.

धरणातील विसर्गामुळे मुठा नदीला पूर

$
0
0
पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीत तब्बल १६,८०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले. या पाण्यामुळे मुठा नदी यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच दुथडी भरून वाहिली.

…अन् गाव गाडले गेले!

$
0
0
माळीण गावासाठी मंगळवारची रात्र नेहमीसारखी नव्हती. रात्रभर पाऊस कोसळत होता. त्यामुळे काही जाणत्या माणसांची झोप उडाली होती. शेतात पाणी घुसून बांध तर फुटले नसतील ना, याची चिंता त्यांना होती...

देवदूताने केली मायलेकांची सुटका

$
0
0
माळीण गावाला मदतीसाठी गेलो तेव्हा तिथे असलेले पोलिस सर्वांना हटकत होते म्हणून गावाच्या दुसऱ्या बाजूने मदतीसाठी गेलो. प्रत्यक्ष मदतीसाठी गेलो तिथे फक्त गाळच गाळ होता तर काही घरे तुटक्या अवस्थेत दिसत होती.

मैलापाण्यात अडकला आपटे रोड

$
0
0
घराबाहेरील रस्त्यांवर पावसाचे पाणी, तर सोसायटीच्या आवारात मैलापाणी..., पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयापासून ड्रेनेज, आरोग्य अशा सर्व खात्यांकडून केवळ टोलवाटोलवीची उत्तरे... अन् प्रभागातील नागरिकांसाठी कार्यतत्पर असणाऱ्या लोकप्रतिनिधींनी फिरविलेली पाठ...

गुटखाबंदीला पुन्हा मुदतवाढ

$
0
0
सुगंधित सुपारी, गुटखा, पानमनसाला, तंबाखूमिश्रित सुपारीच्या उत्पादनासह विक्रीवर बंदी घालण्यास राज्य सरकारने पुन्हा सलग तिसऱ्या वर्षी मुदतवाढ दिली आहे.

कोसळला काळ

$
0
0
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात, भीमाशंकर परिसरातील माळीण या चिमुकल्या गावावर बुधवारी ऐन सकाळी जणू काळकडा कोसळला. या जीवघेण्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा आकडा किमान ३००च्या घरात असेल, अशी धास्ती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. आतापर्यंत १९ मृतदेह हाती आलेत.

ब्राह्मणांना हवे फक्त संरक्षण!

$
0
0
‘ब्राह्मण समाजातील लोकांना आरक्षण नको, त्यांना फक्त संरक्षण हवे आहे. सरकारने तशी हमी द्यावी,’ अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने केली आहे.

‘इथे गाव होतं असं वाटतच नाही!’

$
0
0
‘माळीण गावात जे घडलंय, ते खरोखरच भयंकर आहे. इथे कालपर्यंत एक गाव वसलं होतं, याची आज तिथे गेल्यावर पुसटशी कल्पनाही येत नाही...’, अशी भावनाविवश प्रतिक्रिया केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली.

पुण्यातले १५०० टेलिफोन बंद

$
0
0
पावसामुळ फर्ग्युसन कॉलेज रस्ता, प्रभात रस्ता, भांडार रस्ता आणि डेक्कन जिमखाना भागातील सुमारे १,५०० टेलिफोन बंद पडले आहेत. टेलिफोन सेवा पूर्ववत होण्यासाठी सुमारे आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे भारत संचार निगम लिमिटेडकडून (बीएसएनएल) कळविण्यात आले आहे.

‘अंतरंग’ आणि ‘नौटंकी’स उत्तम प्रतिसाद

$
0
0
आपल्या जीवनावर असलेला धर्माचा पगडा, धर्मावरून होणारं राजकारण...हे संवेदनशील विषय रंगांचा प्रतीकात्मक वापर करून प्रभावीपणे सादर करणारी ‘अंतरंग’ ही एकांकिका प्रेक्षकांनी उचलून धरली.

उलगडणार गोखले यांचा जीवनपट

$
0
0
गोपाळ कृष्ण गोखले यांच्या स्मृतिशताब्दी वर्षानिमित्तानं त्यांच्याविषयी माहिती देणारे प्रदर्शन आणि हेरिटेज वॉक आयोजित करण्यात आला आहे. एच. व्ही. देसाई कॉलेजमध्ये शनिवारी (दि. २) सकाळी ९ ते ११ दरम्यान हा उपक्रम होणार आहे.

रंगणार गिटार की ‘फर्माइशे’

$
0
0
१९५२ साली प्रदर्शित झालेल्या ‘बाजी’मधील ‘तकदीर से बिगडी हुई’पासून २००८ सालच्या ‘रॉक ऑन’ सिनेमातील ‘सोचा है’पर्यंत गिटार हे प्रमुख वाद्य असलेली विविध गाणी ‘फर्माइशे’ या कार्यक्रमात सादर होणार आहेत.

शाळेच्या अतिक्रमणामुळे बंगल्यात पाणी

$
0
0
बावधनमधील नैसर्गिक नाल्यावर एका शाळेने केलेल्या अतिक्रमणामुळे नाल्यातील पुराचे पाणी थेट एका बंगल्यात शिरण्याचा प्रकार घडला. बंगल्यात पाच ते सहा फूट पाणी घुसल्याने या कुटुंबातील सतरा जण बंगल्यातच अडकून पडले.

ड्रेनेज तुंबल्याने झोपडपट्टीत पाणी

$
0
0
रामटेकडी डोंगरावरून आलेले पावसाचे पाणी परिसरातील सुमारे पन्नास झोपड्यांमध्ये घुसले. ड्रेनेज तुंबल्याने घरातून पाणी काढणे देखील नागरिकांना शक्य झाले नाही. मात्र, गुरुवारी सकाळपासून महापालिकेकडून ड्रेनेज स्वच्छ करण्याच्या कामास सुरुवात झाली.

‘खड्डे दुरुस्ती न केल्यास खर्च वसूल करा’

$
0
0
इंडियन रोड काँग्रेसच्या (आयआरसी) निकषांनुसार खड्डे दुरुस्ती होणे आवश्यक असताना, त्याकडे दुर्लक्ष केल्यानेच शहरात पुनः पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण होत आहे. त्यामुळे, मानकांप्रमाणे खड्डे दुरुस्ती न करणाऱ्या ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांकडून त्यासाठी होणारा खर्च वसूल करण्याची मागणी स्वयंसेवी संस्थांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

राडारोड्यामुळे नाले झाले अदृश्य

$
0
0
धानोरी परिसरात बांधकामातून मोठ्या प्रमाणावर निघणारा राडारोडा नाल्याच्या शेजारी टाकत असल्याने पावसामुळे सोसायटीमध्ये पाणी शिरण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तर, काही ठिकाणी राडारोड्यामुळे नालाच अदृश झाल्याचे चित्र दिसत आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images