Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पालिकेच्या उत्पन्नावर संक्रांत

0
0
महापालिकेची आर्थिक स्थिती ढासळत असतानाच पालिका हद्दीतील स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करण्यावरून व्यापारी आणि राज्य सरकार यांच्यामध्ये सुरू असलेल्या बैठक सत्रामुळे काही व्यापाऱ्यांनी ‘एलबीटी’चा भरणा बंद केला आहे.

झोपडीवासीयांसमोर दिव्य कागदपत्रे, पुराव्यांचे

0
0
राज्य सरकारने एक जानेवारी २०००पर्यंतच्या झोपडपट्ट्यांना पात्र ठरवण्याचा निर्णय जाहीर केला असला, तरी त्यासाठी अर्ज, आवश्यक पुरावे सादर करण्याच्या दिव्यातून झोपडपट्टीधारकांना जावे लागणार आहे.

तस्करी : महिलेला अटक

0
0
दुबई ते पुणे या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानामधून १२ सोन्याच्या बिस्किटांची तस्करी करणाऱ्या महिलेला कस्टम खात्याने अटक केली आहे. शकुंतला जैन असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. ती २७ जुलै रोजी दुपारी अडीचच्या विमानातून पुण्यात आली.

‘बीआरटी’ सुविधांचे तीन तेरा

0
0
आळंदी आणि नगररोडवरील बीआरटी मार्गासाठी आवश्यक ट्रान्सफर टर्मिनल आणि आयटीएमएस सुविधा तातडीने उपलब्ध होऊ शकणार नसल्याचे स्पष्ट होऊनही हा मार्ग खुला करण्याबाबत अजूनही पालिका आणि पीएमपी मौनव्रत धारण करून आहेत.

दांडीबहाद्दर विद्यार्थ्यांना ‘लिव्ह इंडिया’ची नोटीस

0
0
कॉलेजमध्ये दांड्या मारणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांना त्यांच्या घरचा रस्ता दाखवण्यास परकीय नागरिक नोंदणी शाखेने (एफआरओ) सुरुवात केली आहे. गेल्या आणि सध्याच्या शैक्षणिक वर्षांत दांड्या मारणाऱ्या पाच परदेशी विद्यार्थ्यांना ‘लिव्ह इंडिया’ची नोटीस बजावत मायदेशी पाठवण्यात आले आहे.

शिवसेनेकडे इच्छुकांची मांदियाळी

0
0
विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षांतराची लागण होऊ लागली असून काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर, अपक्ष नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक नाना काटे हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत.

मराठा-मुस्लिम पडताळणी करणार कोण?

0
0
आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक जात पडताळणी प्रमाणपत्रे देण्यासाठी नियुक्त केलेल्या समित्यांवर अध्यक्ष आणि सदस्यांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यातच मराठा आणि मुस्लिम समाजास आरक्षण लागू झाल्यानंतर नव्याने जात पडताळणीसाठी येणाऱ्या अर्जांच्या संख्येत वाढ होणार आहे.

स्बळावरच येतील ‘अच्छे दिन’

0
0
राज्यात १४४ जागांवरून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये जुंपली असताना, स्थानिक कार्यकर्त्यांनी मात्र स्बळावरच पक्षाला राज्यात ‘अच्छे दिन’ येतील, असा नारा दिला आहे.

गर्दीच्या ठिकाणी तरी ‘CCTV’ बसवा

0
0
गणशोत्सवापर्यंत परिमंडळ एकमध्ये ‘सीसीटीव्ही’ बसवण्याचे काम पूर्ण होण्याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहेत. गणेशोत्सवाच्या काळात गर्दीची ठिकाणे आणि विसर्जन मार्गावर तरी ‘सीसीटीव्ही’ बसले पाहिजेत, अशी तंबी पोलिसांकडून संबंधित कंपनीला देण्यात आली आहेत.

PMP च्या चाकाखाली तरुण ठार

0
0
पावसाने निसरड्या झालेल्या रस्त्यावर दुचाकी घसरल्याने मागून येणाऱ्या पीएमपीच्या चाकाखाली सापडून दुचाकीस्वार तरुण ठार झाला. बिबवेवाडी रोडवर महेश सोसायटीजवळ सोमवारी रात्री नऊच्या सुमारास हा अपघात झाला.

येळ्ळूरच्या घटनेचे पालिकेत पडसाद

0
0
येळ्ळूरमध्ये (जि.बेळगाव) सीमावासी मराठी भाषिकांवर कर्नाटक पोलिसांनी केलेल्या अमानुष अत्याचाराचे जोरदार पडसाद सोमवारी महापालिकेच्या मुख्य सभेत उमटले. येळळूरमधील मराठी भाषिक स्त्री-पुरुष, तरुणांना रविवारी पोलिसांनी अमानुष मारहाण केली.

चक्रव्युहातील रस्त्यांची सुटसुटीत फेरआखणी शक्य?

0
0
एकसलग रस्त्यावर मध्येच सायकल ट्रॅक केला गेला आहे..., रस्त्याच्या रुंदीच्या तुलनेत फूटपाथची रुंदी अधिक आहे..., चौकात सिग्नल आहेत; पण झेब्रा क्रॉसिंगचे पट्टेच नाहीत..., रस्त्याच्या पातळीपेक्षा ड्रेनेजची झाकणे खाली-वर असल्याने रस्ता उंचसखल झाला आहे...

फुलपाखरू उद्यान नव्हे, तारांगण

0
0
सहा वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून अरणेश्वर भागात उभारण्यात आलेले फुलपाखरू उद्यान उद्‌ध्वस्त करण्याचा ‘प्रताप’ महापालिकेने सुरू केला आहे. या ठिकाणी आता पुन्हा लाखो रुपये खर्च करून ‘तारांगण’ उभारण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. विशेष म्हणजे माननीयांच्या आग्रहामुळे हा सर्व प्रकार सुरू आहे.

विकासकामांच्या निधीला राज्य सरकारकडून ‘खो’

0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजनेअंतर्गत (जेएनएनयूआरएम) करण्यात येणाऱ्या विकासकामांसाठी निधी देण्यास राज्य सरकारकडून ‘रेड सिग्नल’ दाखविण्यात आला आहे. त्यामुळे बोर्डाचा विकास लांबणीवर पडण्याची​ शक्यता निर्माण झाली आहे.

गगन नारंगच्या यशाला मेहनतीची किनार

0
0
भारताच्या गगन नारंगने ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत पुरुषांच्या ५० मीटर रायफल प्रोनमध्ये रौप्यपदक मिळवले. सुवर्णपदकाने थोडक्यात हुलकावणी दिली असली, तरी या रूपेरी यशातही गगनची अधिक मेहनत आहे. कारण, या प्रकारात गगन प्रथमच सहभागी होत होता.

बापट, मिसाळांना हटविण्यासाठी विरोधी गट गडकरींकडे

0
0
लोकसभेच्या निवडणुकीत अच्छे दिन आल्यानंतर भाजपमध्ये पक्षांतर्गत ‘अँटी इंकम्बन्सी’ लाट आली आहे. ‘येत्या निवडणुकीत नव्या चेहेऱ्यांना संधी द्या,’ अशी मागणी करीत शहर भाजपच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाने माजी पक्षाध्यक्ष नितीन गडकरी यांच्याकडे धाव घेतली आहे.

राज्यातील धरणांत ३५ टक्के पाणीसाठा

0
0
राज्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या सर्वदूर पावसामुळे धरणांचा पाणीसाठा वाढला असून प्रमुख धरणांचा पाणीसाठा ३५ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत हा साठा कमी असल्याने अजूनही धरणसाठ्यांची स्थिती चिंता करण्यासारखीच आहे.

‘५०० रुपयांत करा डायलिसिस’

0
0
डायबेटिस, बीपी, किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या आणि आर्थिकदृष्ट्या गरीब असणाऱ्या पेशंटला डायलिसिस करणे आता शक्य होणार आहे. पूना हॉस्पिटलमध्ये अवघ्या पाचशे रुपयांत डायलिसिसची सुविधा उपलब्ध होणार आहे.

शाळेत परिवहन समिती हवीच

0
0
राज्यातील सर्व शाळांमध्ये शालेय परिवहन समिती स्थापन करणे आवश्यकच असल्याचे शिक्षण खात्यातर्फे सोमवारी स्पष्ट करण्यात आले. ज्या शाळांकडे शालेय विद्यार्थी वाहतुकीची सुविधा नाही अशा शाळांसोबतच ज्या शाळांमध्ये पालकांमार्फत विद्यार्थ्यांसाठी परिवहन सुविधा उपलब्ध करून दिली जाते, अशा शाळांमध्येही त्या बाबतची जबाबदारी निश्चित करावी लागणार असल्याचे खात्यातर्फे सांगण्यात आले.

साहित्य संमेलन पुढे ढकलणार?

0
0
पंजाबमधील घुमान येथे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होऊ घातलेले ८८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीच्या काळात पंजाबमध्ये कडाक्याची थंडी असल्याने संमेलन मार्चपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images