Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

आडसाली उसाचा प्रयोग मुळशीमध्ये यशस्वी

$
0
0
मुळशीच्या भातशेतीच्या पट्ट्यात आडसाली उसाचा प्रयोग करून तानाजी रामचंद्र निम्हण यांनी अभिनव प्रकल्प साकारला आहे. या आडसाली ऊसाचे उत्पन्न एकरी ८५ टन मिळाले असल्याने मुळशी परिसरात आडसाली उसाचा पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध झाल्या असल्याचे संत तुकाराम साखर कारखान्याच्या ऊस विकास विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

कात्रज उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा?

$
0
0
कात्रज उड्डाणपुलाची समस्या, बीआरटी बसस्थानकांसह एसटी थांब्यांमुळे होणारा वाहतुकीचा गोंधळ, राजीव गांधी प्राणी संग्रहालय व कात्रज तलावाचा परिसर एकमेकांना जोडणे या प्रलंबित कामांची माहिती घेण्यासाठी महापालिका आयुक्त विकास देशमुख यांनी नुकतीच या भागाची प्रत्यक्ष पाहणी केली.

‘वीकेंड डेस्टिनेशन तेथे एसटी’ कधी?

$
0
0
पुण्याच्या जवळ असणाऱ्या विविध ठिकाणी पावसाळी पर्यटनासाठी जाण्याची क्रेझ वाढत असली तरीही ‘पीएमपी’कडे असणाऱ्या अपुऱ्या बस आणि एसटी महामंडळाची ठराविक चौकटीमध्येच काम करण्याची पद्धत यांमुळे पावसाळी पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांना इच्छित ठिकाणी जाण्यासाठी बस उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

अंतिम निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार

$
0
0
‘राज्याचे मुख्यमंत्री धनगर समाज आणि आदिवासींमध्ये वाद होण्यासाठी दुटप्पी भूमिका घेत आहेत. धनगर समाजाला आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे,’ असे आरक्षण समितीचे अध्यक्ष हनुमंतराव सूळ यांनी सोमवारी स्पष्ट केले.

काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये रंगले मानापमान नाट्य

$
0
0
वेल्हे तालुक्यात दोन कोटी १७ लाख रुपये खर्च करून उभारलेल्या पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या उद् घाटनावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मानापमानाचे नाट्य रंगले आहे. दोन्ही पक्षांमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले असून, एकमेकांविरुद्ध निषेधाची पत्रकबाजी सुरू आहे.

दीड लाख भाविकांनी घेतले शिवलिंगाचे दर्शन

$
0
0
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दीड लाख भ‌ाविकांनी श्रावणातील पहिल्या सोमवारी शिवलिंगाचे दर्शन घेतले. संततधार पाऊस, धुक्यात हरवलेला परिसर, हिरव्यागार डोंगररांगा असे वातावरण अनुभवण्यासाठी येणाऱ्या भाविकांची आणि पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे.

गावठाण निवासी क्षेत्रवाढीवर १७ ऑगस्टपर्यंत हरकती

$
0
0
गावठाणांच्या रहिवास क्षेत्रात वाढ करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्यात आल्या असून, येत्या १७ ऑगस्टपर्यंत हरकती नोंदविता येणार आहेत. या हरकतींवर सुनावणी झाल्यानंतर निवासी क्षेत्रवाढीचा अहवाल राज्य सरकारला अंतिम मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे.

हद्दीच्या वादामुळे स्कॉलरशिप नाही

$
0
0
पुणे महापालिकेकडून दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना देण्यात येणारी भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद स्कॉलरशिप आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना मिळत नसल्याचे दिसून आले आहे.

एसटी चालक, वाहकास मारहाण

$
0
0
तळेगाव-दाभाडे येथे जाणाऱ्या एसटीचा चालक वाकडेवाडी येथे उतरला असता, गाडीत बसलेल्या व्यक्तीने त्याच्याशी वाद घालून, शिवीगाळ करून, मारहाण केल्याची घटना वाकडेवाडी येथे रविवारी (२७ जुलै) रात्री आठ वाजता घडली.

देशातील आदर्श शहर होण्याची संधी

$
0
0
‘आधुनिक विचार आत्मसात करून पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतुकीचे नियोजन केल्यास देशातील अन्य शहरांपुढे आदर्श निर्माण करण्याची संधी मिळू शकते,’ असे मत महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांनी व्यक्त केले.

सर्व शिक्षा अभियानाच्या कार्यपद्धतीत बदल करू

$
0
0
सर्व शिक्षा अभियानाची कार्यपद्धती बदलण्याची ग्वाही केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी लोकसभेत दिली आहे, अशी माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.

ब्राह्मण उमेदवार निवडून आणू

$
0
0
चिंचवड विधानसभा मतदारसंघातून कोणत्याही पक्षाने स्वच्छ चारित्र्याचा ब्राह्मण उमेदवार दिल्यास त्याला निवडून आणण्याचा निर्धार अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने व्यक्त केला आहे. महासंघाचा मेळावा चिंचवड येथील काशीधाम मंगल कार्यालयात नुकताच घेण्यात आला.

मुख्यमंत्री व्यापाऱ्यांच्या दबावाला बळी पडताहेत

$
0
0
‘जकात किंवा स्थानिक संस्था कर (एलबीटी) याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाचा असताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मात्र मूठभर व्यापाऱ्यांच्या दबावाला बळी पडून महापालिकांवर एलबीटी रद्द करण्याचा निर्णय लादत आहे,’ असा आरोप ज्येष्ठ कामगार नेते शरद राव यांनी सोमवारी (२८ जुलै) केला.

लोणावळ्यात जनजीवन विस्कळित

$
0
0
मावळ आणि लोणावळ्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळित झाले आहे. या परिसरातील नदीनाल्यांना पूर आला आहे. लोणावळ्यात सोमवारी सकाळी अवघ्या चार तासांमध्ये ९५ मिलीमीटर मि इतका विक्रमी पाऊस पाऊस झाला आहे.

पावसाने गाठली निम्मी सरासरी

$
0
0
गेल्या दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे आजपर्यंतची निम्मी सरासरी गाठली आहे. तसेच पवना धरण सुमारे ४५ टक्के भरले आहे. दमदार पावसामुळे शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे.

काश ‘कास’ पे फूल होते...!

$
0
0
उशिरा दाखल झालेल्या पावसाने आता वेग घेतला असला तरीही कास पठरावरील सौंदर्य अद्याप फुललेले नाही. मात्र, हौशी पर्यटकांच्या गर्दीने पठार गेल्या आठवड्यापासूनच फुलायला सुरुवात झाली आहे.

घुमानला भेट देणारे पर्यटक वाढले

$
0
0
पंजाबमधील घुमान येथे ८८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार असल्याची घोषणा झाल्यापासून घुमानला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे.

शिक्षणहक्क जागा संस्थांकडून ‘ताब्यात’?

$
0
0
शिक्षणहक्क कायद्याच्या (आरटीई) ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेला शह देण्यासाठी शाळांनी आता शिक्षण मंडळाची ढाल पुढे करून ‘मोहीम’ उघडली आहे. ऑनलाइन प्रक्रिया स्थगित करून पुन्हा शाळांकडेच हे प्रवेश द्यावेत, अशी मागणी रेटण्यात येत आहे.

विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाला अटक

$
0
0
घरापुढे भांडण करू नको म्हटल्याच्या रागातून विवाहितेला मारहाण करून विनयभंग केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी एका गुंडाला अटक केली आहे. लाल्या सुपारी ऊर्फ किशोर अरुण वाघमारे (२७, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे त्याचे नाव आहे.

तिकीट तपासनीसांच्या कमतरतेमुळे रेल्वेचा तोटा

$
0
0
रेल्वे स्टेशनवर ये-जा करणाऱ्या प्रवाशांनी तिकीट काढले आहे का, याची तपासणी करणे रेल्वे प्रशासनाला सक्तीचे आहे. मात्र, मध्य रेल्वेच्या पुणे विभागामध्ये अवघे २०७ तिकीट तपासनीस काम करत आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images