Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

अनवधानाने राहिला १८ लाखांचा खर्च!

0
0
केंद्र सरकारच्या ‘जेएनएनयूआरएम’ अंतर्गत थेरगाव डांगे चौकात उभारलेल्या उड्डाणपुलाच्या एक कोटी १२ लाख रुपयांच्या वाढीव खर्चास तसेच अनवधानाने राहिलेल्या १८ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्याचा प्रस्ताव पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

पर्यटकांचा ‘कुंभमेळा’

0
0
सरत्या आषाढ महिन्यातील शेवटचा आखाडाचा दिवस योगायोगाने शनिवार व रविवारला जोडून आल्याने लोणावळ्यात रविवारी पर्यटकांच्या गर्दीला कुंभमेळ्याचे रूप आले होते. भुशी डॅमवर आलेल्या लाखो पर्यटकांमुळे रविवारचा दिवस पर्यटकांच्या गर्दीचा अन् वाहतूक कोंडीचा ठरला.

पक्षविरोधकांकडून निष्ठावंतांना कानपिचक्या

0
0
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम करणाऱ्यांनी व्यासपीठावर येऊन निष्ठावंतांना कानपिचक्या दिल्यामुळे आणि अंतर्गत दुफळीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा चिंचवड येथील मेळावा फुसका बार ठरल्याचे रविवारी (२७ जुलै) स्पष्ट झाले. यावरून ‘नाव मोठे लक्षण खोटे’ म्हणीचा प्रत्यय आल्याचीही कुजबूज होती.

‘नव्या डॉक्टरांच्या नियुक्त्या करू नयेत’

0
0
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातील (आरबीएसके) बळी गेलेल्या डॉक्टरांच्या याचिकेवर झालेल्या सुनावणीत आरोग्य खात्याकडून घेण्यात येत असलेल्या पुरुष व महिला डॉक्टरांची यादी तसेच नियुक्त्या पुढील आदेशापर्यंत जाहीर करू नयेत, असे आदेश हाय कोर्टाने सरकारला दिले आहेत.

मालगाडीच्या धडकेने टेम्पो चक्काचूर

0
0
रेल्वे मालगाडीला धडक बसल्यामुळे एका टेम्पोचा चक्काचूर झाल्याची घटना रविवारी (२७ जुलै) सकाळी नऊच्या सुमारास दापोडी रेल्वेफाटकाजवळ घडली. त्यामुळे काही काळ रेल्वे वाहतुकीवर परिणाम होऊन काही गाड्या विलंबाने धावल्या.

पेट्रोलवरील LBT वसूल करणार

0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतून स्थानिक संस्था कर (एलबीटी) पेट्रोल कंपन्या, पुणे महापालिका आणि पेट्रोलपंपचालक यापैकी कोणी घेतला याची चौकशी केली जाणार असून, संबंधितांकडून जनतेचा ​हा निधी वसूल करणार असल्याचे यांनी स्पष्ट केले.

‘फॅटी लिव्हर’ ठरतोय सायलेंट किलर

0
0
बदलत्या लाइफस्टाइलमुळे पोळी- भाजीऐवजी फास्टफूड खाण्याचे वाढलेले प्रमाण तसेच व्यायामाच्या अभावामुळे लिव्हरमध्ये चरबीचे प्रमाण वाढू लागल्याने ‘फॅटी लिव्हर’चा आजार जडू लागला आहे. त्यामुळे होणारा ‘सियाटो हिपॅटायटिस’चा आजार वीस टक्के पुणेकरांसाठी ‘सायलेंट किलर’ ठरू लागला आहे.

‘महाराष्ट्र नवनिर्माण’ची ब्ल्यू प्रिंट तयार?

0
0
सुमारे नऊ हजार कागदपत्रांचा ‘अभ्यास करून तयार’ झालेली मनसेची ‘ब्ल्यू प्रिंट’ सध्या सोशल नेटवर्किंगवर फिरते आहे. रस्ते, वीज आणि पाणी व्यवस्थापन, शिक्षण, रोजगार आदी मुद्द्यांचा या ब्ल्यू प्रिंटमध्ये समावेश असल्याचे दिसत असून, आतापर्यंत सर्वच पक्षांनी चर्चिलेल्या मुद्द्यांचा या ब्ल्यू प्रिंटमध्ये समावेश असल्याने मनसे काय वेगळे नवनिर्माण करणार, अशी चर्चा रंगते आहे.

तंबाखूबंदीच्या सरकारी आदेशालाच ‘चुना’

0
0
मोठा गाजावाजा करून लागू करण्यात आलेल्या तंबाखूबंदीला राज्य सरकारच्या परिपत्रकानेच ‘चुना’ लावला आहे. ही तंबाखूबंदी केवळ सरकारी हॉस्पिटलच्या आवारांपुरतीच मर्यादित असल्याचे त्यामध्ये म्हटले आहे.

मोदींना वेळ द्या

0
0
‘देशातील मुस्लिम जनतेचे प्रश्न अन्य कोणापेक्षाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच माहित आहेत. केंद्रात त्यांचे सरकार अजून नवीन असून त्यांना थोडा वेळ देण्याची गरज आहे. ते निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणतील,’ असे मत गुजरातमधील उद्योगपती जफर सरेशवाला यांनी रविवारी व्यक्त केले.

ग्रेस मार्कांची मर्यादा १५ मार्कांवर आणा

0
0
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेतील ग्रेस मार्कांची मर्यादा २० मार्कांवरून १५ मार्कांवर आणण्याची मागणी शिक्ष क्षेत्रातून केली जात आहे. बेस्ट ऑफ फाइव्हनुसार विद्यार्थ्यांच्या मार्कांची सूज वाढत असतानाच दहावीचा गणिताचा पेपर १५० वरून १०० मार्कांचा करण्यात आल्याने ग्रेस मार्कांची सवलत १५ वर आणण्याची मागणी केली जात आहे.

पुन्हा बरसणार पाऊस सरी

0
0
राज्यात पुन्हा पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

देशातील माध्यम कायदे योग्यच

0
0
‘एखाद्या समूहाकडे किंवा मोजक्या संस्थांकडेच देशातील सगळ्या माध्यमांची मालकी असावी का याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. अशी मालकी असेल तर हे समूह त्या माहितीवर नियंत्रण ठेवतील अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.

महायुतीत नाराजी पर्व

0
0
लोकसभेला मिळालेल्या यशानंतर विधानसभेच्या जागावाटपात भाजप-शिवसेनेकडून घटक पक्षांच्या तोंडाला पाने पुसण्याचे प्रयत्न सुरू झाल्याने अन्य पक्षांतील नाराजी उफाळून आली आहे. हे दोन्ही पक्ष अन्य फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीका करीत काही ‘पांडवां’ची महायुतीअंतर्गत नवी युती झाली आहे.

११ वी ऑनलाइन… चुकांवरून बोध घेणार?

0
0
शहरातील अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा समुपदेशन फेरीचा अखेरचा टप्पा येत्या गुरुवारी (३१ जुलै) होणार आहे. प्रक्रियेमधून अद्यापपर्यंत प्रवेश निश्चिती न झालेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजांमध्ये सामावून घेण्यासाठीचे प्रयत्न या टप्प्यातून केला जाणार आहे.

मोजणी... रजनी स्टाइल

0
0
जिल्ह्यातील भूमी अभिलेख उपअधीक्षक आणि नगर भूमापन अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन पुरंदर तालुक्यातील मौजे मावडी कडेपठार या गावातील तब्बल ७७१ मिळकतींची मोजणी एकाच दिवसात पूर्ण केली. सिनेमात अशक्यप्राय कामे लीलया करणाऱ्या सुपरस्टार रजनीकांत यांच्या कुटुंबाचे हे मूळ गाव आहे.

‘क्लिक’साठी हवे प्रबोधन

0
0
अकरावी प्रवेशांसाठी ऑनलाइन प्रक्रियेचा फंडा ही काळाची गरज आहेच; मात्र ती राबवताना पालक आणि विद्यार्थ्यांचे प्रबोधनही तितकेच प्रभावी हवे, असे मत व्यक्त होत आहे. ऑनलाइन प्रक्रियेमुळे प्रवेशांमध्ये पारदर्शकता आली, असा सूर मात्र सार्वत्रिक आहे.

११ वी प्रवेश… व्हाया क्लासेस!

0
0
अकरावी प्रवेशासाठी रांगेत उभे राहण्यापेक्षा खासगी क्लासेसचे लाखभर रुपयांचे ‘पॅकेज’ घेऊन व्यवस्थापन कोट्यातून ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित केला जात आहे. इतकेच नव्हे, तर जाणीवपूर्वक दुय्यम कॉलेजमध्ये नावापुरता प्रवेश घेऊन खासगी क्लासवरच लक्ष केंद्रित करण्याकडे विद्यार्थी-पालकांचा कल वाढतो आहे.

तपासात ‘प्लँचेट’चा वापर गैर नाही!

0
0
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासासाठी ‘प्लँचेट’चा वापर करण्याच्या पोलिसांच्या भूमिकेचे ज्येष्ठ कम्प्युटरतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांनी रविवारी समर्थन केले. ‘परदेशात पोलिसांकडून तपास करताना आवश्यक वाटल्यास अतिंद्रिय शक्तींच्या वापराची शक्यता विचारात घेतली जाते.

CCTV बाबत पोलिस साशंक

0
0
पुण्यात मुदतीत म्हणजेच २८ ऑगस्टपर्यंत ‘सीसीटीव्ही’ बसणविण्याबाबत पोलिसांच्या मनातही शंका आहेत. ‘‘सीसीटीव्ही’ बसविण्यासाठी करार करण्यात आलेली कंपनी पुण्यातीलच असून, मुदतीत काम पूर्ण होण्याबाबत आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images