Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

शॅार्टसर्किटमुळे फियाटला आग

$
0
0
सिएनजी गॅसवर चालणाऱ्या फियाट कंपनीच्या उनो कारला शॅार्टसर्किटमुळे आग लागून गाडीचे नुकसान झाले. शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना सोलापूर रस्त्यावर पंडित नेहरू भाजी मार्केटजवळ घडली.

संतप्त नागरिकांनी अपघातग्रस्त ट्रक पेटवला

$
0
0
रामटेकडी येथे ट्रकची धडक बसून पंधरा वर्षाचा मुलगा ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने एका शाळकरी मुलाचा शुक्रवारी मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी ट्रक पेटविला. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

आरक्षणासाठी कोर्टात जाऊ

$
0
0
विधानसभा निवडणुकीआधी धनगर समाजाला ‘एसटी’चे आरक्षण जाहीर केले नाही, तर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात न्यालयात याचिका दाखल करणार असे आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष हनुमंतराव सूळ यांनी पत्रकार परिषदेत सागितले.

‘आदिवासींमध्ये इतर जमाती समाविष्ट केल्यास संघर्ष’

$
0
0
शासकीय सेवेत आदिवासींच्या नावावर अनेक बोगसांना सामावून घेण्यात आले असून त्यामुळे खऱ्या आदिवासींवर अन्याय झालेला आहे. अशा परिस्थितीत आदिवासींमध्ये इतर जमातीचा समावेश केला, तर राज्यात मोठ्या प्रमाणात संघर्ष केला जाईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थीनी संघटनेच्या वतीने शुक्रवारी देण्यात आला.

‘दोषी पोलिसांवर कारवाई करा’

$
0
0
सुप्रीम कोर्टाचे वकील अॅड. विनीत धांडा यांच्याविरुद्ध पुणे पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात धांडा यांना क्लीन चीट देण्यात आल्यावरही संबंधित पोलिसांवर अद्याप कारवाई झालेली नाही. यातील दोषी पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी अॅड. धांडा यांनी केली.

महापालिकांना मिळणार २३७ कोटी रुपये

$
0
0
दस्त नोंदणीवर आकारलेल्या एक टक्का अधिभाराची २३७ कोटी रुपयांची थकबाकी राज्यातील २५ महापालिकांना देण्यात येणार आहे. पुणे महापालिकेच्या वाट्याला यातील ४६ कोटी ९४ लाख रुपये तर पिंपरी-चिंचवड महापालिकेला २३ कोटी २७ लाख रुपये मिळणार आहेत.

मेसेंजरमुळे घटले SMS चे प्रमाण

$
0
0
पूर्वीच्या काळी एसएमएसमधून साधल्या जाणाऱ्या संपर्काची जागा आता व्हॉट्सअॅपसारख्या मेसेंजरनी घेतल्याने एसएमएस पाठवण्याचे प्रमाण वेगाने कमी होत आहे. तसेच एसएमएस कमी झाल्यामुळे मोबाइल कंपन्यांचा महसुलामध्येही ५ टक्क्यांनी घट झाल्याचेही या दिसून आले आहे.

आद्य क्रांतिकारकांच्या जन्मस्थळी स्मारक

$
0
0
आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या जन्मस्थळी, शिरढोण येथे साकारत असलेल्या संरक्षित स्मारकाचे काम १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

प्रशिक्षणाच्या ‘गाइडलाइन्स’ची प्रतीक्षा

$
0
0
राज्य लोकसेवा आयोगाद्वारे (एमपीएससी) जिल्हा उपनिबंधक पदावर निवड झाल्यानंतर प्रशिक्षणाला येताना राज्यपालांच्या स्वाक्षरीने पत्र सादर केल्याने यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनीतील (यशदा) अधिकारीवर्गाचा संशय बळावला आणि ‘एमपीएसी’तील ही घुसखोरी प्रकाशात आली.

VAT आणि टोलमधून ‘PMP’ला सूट हवी

‘प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प पेपर आवश्यक नाही’

$
0
0
शैक्षणिक प्रवेशासाठी लागणाऱ्या विविध दाखल्यांसाठी प्रतिज्ञापत्र सादर करताना स्टॅम्प पेपरची आवश्यकता नाही. दाखल्यांसाठी कोणी स्टॅम्प पेपरची मागणी करून अडवणूक केल्यास संबंधितांची चौकशी करण्यात येईल, असा इशारा नोंदणी व मुद्रांक महानिरीक्षक डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिला आहे.

सिंहगड घाट चकाचक

$
0
0
सिंहगडावरील पावसाळी पर्यटनास रस्त्यातील अडथळ्यांचा फटका बसू नये, या उद्देशाने सिंहगड घेरा समितीचे सदस्य, सरपंच आणि वनकर्मचाऱ्यांनी दिवसरात्र काम करून शुक्रवारी संध्याकाळी घाट रस्ता पुन्हा स्वच्छ केला. शनिवार संध्याकाळपर्यंत पुन्हा कोणतीही दरड न पडल्यास रविवारी पर्यटकांसाठी घाट खुला होणार आहे.

‘भुशी’चा वीकेंड तीननंतर एंड

$
0
0
भुशी डॅम भागात शनिवारी व रविवारी लाखाे पर्यटकांमुळे होणाऱ्याला गर्दी शिस्त लावण्यासाठी शहर पोलिसांनी डॅमसह त्या परिसरात जाण्यासाठी दुपारी तीन वाजल्यानंतर प्रवेश बंद केला आहे. तसेच भुशी डॅमकडे जाण्यासाठी सायंकाळी पाच नंतर प्रवेश बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

...तर अंनिसचं राज्यभर आंदोलन

$
0
0
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास कुठवर आला आहे, कुठल्या दिशेनं सुरू आहे, याबाबतचा संपूर्ण तपशील दहा दिवसांत द्या, अन्यथा अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्यकर्ते राज्यभर आंदोलन छेडतील, असा इशारा हमीद दाभोलकर यांनी दिला आहे.

पृथ्बीबाबांचा भुजबळांवर पलटवार

$
0
0
दिल्लीतील महाराष्ट्र सदनाचे आयुक्त बिपिन मलिक यांना पदावरून काढण्याच्या मुद्द्याला बगल देत या सदनाच्या बांधकामातच त्रुटी असल्याचा पलटवार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांचे नाव न घेता लगावला.

अकरावी प्रवेशाची गुरुवारी समुपदेशन फेरी

$
0
0
अकरावीच्या ऑनलाइन केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश न मिळालेल्या, तसेच प्रवेश मिळूनही ते न घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी येत्या गुरुवारी (३१ जुलै) समुपदेशन फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा गुणवत्तेनुसार प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेतले जाणार आहे.

‘ज्ञानज्योती’चा वसा स्मारकरूपात

$
0
0
स्त्री शिक्षणासाठी पुढाकार घेणाऱ्या ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे काम अखेर पूर्णत्वास जात असून, महात्मा फुले वाड्यानजीक असलेल्या या स्मारकाचे उद‍्घाटन दोन ऑगस्ट रोजी होणार आहे. पुणे विद्यापीठाच्या नामकरणावर अंतिम मोहोर उमटल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच सावित्रीबाई फुले यांच्या नावाने पालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या या भव्य स्मारकाचे लोकार्पण केले जाईल.

चारही धरणांत फक्त ११ टीएमसी

$
0
0
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांमध्ये शनिवारी पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या सातत्यपूर्ण पावसाने चारही धरणांमध्ये ११.०७ टीएमसी इतका उपयुक्त साठा झाला आहे.

बँकेची चौकशी ‘आजारी’च

$
0
0
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या तोट्यासाठी दोषी धरण्यात आलेल्या संचालकांवरील वैयक्तिक नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्यास गेल्या दोन महिन्यांत मुहूर्त सापडलेला नाही.

२४ लाखांचा अपहार केल्यावरून महिलेला कोठडी

$
0
0
बनावट कागदपत्रांद्वारे एका महिलेचे बचत खाते उघडून त्या खात्यावर बँकेतून गृहकर्ज मंजूर करून २४ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी अटक केलेल्या एका महिलेला २६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images