Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

एकदा होऊन जाऊ द्या...!

0
0
‘ते’ १४४ जागा मागत असतील, तर आम्ही म्हणतो, की आपण थेट २८८ जागाच लढवू..., एकदा होऊन जाऊ द्यात....! ताकद वाढल्याचा दावा करीत निम्म्या जागांवर दावा सांगणाऱ्या राष्ट्रवादीच्या दबावतंत्राला गुरुवारी पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसजनांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

‘मानवतेला काळिमा फासणारे कृत्य’

0
0
शिवसेनेच्या खासदारांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये कर्मचाऱ्याच्या तोंडात पोळी कोंबून रोजा मोडणे, ही मानवतेला काळिमा फासणारी घटना आहे, अशी टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

सिंहगड घाट ‘धोकादायक’

0
0
संततधार पडणाऱ्या पावसामुळे सिंहगडावर जाणाऱ्या मार्गावर सलग तिसऱ्यांदा गुरुवारी दरड कोसळली. कोंढणपूर मार्गे सिंहगडावर जाणारा मार्ग दरडीमुळे बंद झाला असून, येत्या तीन दिवसांत हा मोकळा केला जाणार असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे.

‘ऑनलाइन तरुणाई’ला नानांचे धडे

0
0
‘सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकून महात्म्यांचे महत्त्व कधीच कमी होणार नाही. उलट, अशा कृत्यांतून त्यांच्या विचारांचा गळा दाबला जातो. जाती-धर्मांत तेढ निर्माण करणाऱ्या विकृती अशाच गोष्टींचा फायदा घेत असतात.

स्कॉलरशिपमध्ये अनीश प्रथम

0
0
पूर्व माध्यमिक (चौथी) आणि माध्यमिक (सातवी) स्कॉलरशिप परीक्षेमध्ये यंदा पुण्याच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. सातवीच्या स्कॉलरशिप परीक्षेत पुण्याचा अनीश मिलिंद बापट राज्य गुणवत्ता यादीत (शहरी विभाग) पहिला आला असून, चौथीच्या स्कॉलरशिप परीक्षेत अद्वय सचिन अरगडे राज्यात (शहरी विभाग) दुसरा आला आहे.

पुण्यात आता रोज एकवेळ पाणी

0
0
आठवडाभरातील पावसामुळे धरणसाठ्यात वाढ झाल्याने पुण्यातील पाणीकपात अंशतः कमी करण्याचा निर्णय गुरुवारी घेण्यात आला. त्यामुळे सध्याच्या दिवसाआड पाणीपुरवठ्याऐवजी आज, शुक्रवारपासून दिवसातून एकदा पाणी पुरविण्यात येणार असल्याची घोषणा महापौर चंचला कोद्रे यांनी केली.

काँग्रेसचा आत्मसन्मान जागा

0
0
‘जागावाटपाची चर्चा सन्मानपूर्वक झाली, तरच विधानसभेच्या येत्या निवडणुकीत आघाडी होईल, अन्यथा आघाडी होणार नाही,’ असा इशारा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसला दिला.

आर. आर. आबांना मिळाले अंधश्रद्धा निर्मूलनाचे धडे

0
0
लाखोंची गाडी घेतल्यानंतर एका रुपयाच्या लिंबाने तिचे काय रक्षण होणार आहे, निर्जीव गोष्टी सजीवांचे संरक्षण कशा करतील, बुवाबाजी-अंधश्रद्धेवर विश्वास ठेवून कधी कोणत्या गोष्टी साध्य झाल्या आहेत काय...

सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल जप्त

0
0
गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने एका सराईत गुन्हेगाराला अटक केली असून, त्याच्याकडून एक पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. पिस्तूल बाळगल्याप्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विवाहितेला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांना सक्तमजुरी

0
0
व्यवसायात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणावेत, म्हणून विवाहितेला उपाशी ठेवून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पती, सासू आणि नणंदेला कोर्टाने सात वर्षे सक्तमजुरी आणि साडेतीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

१०३ सॉफ्टवेअर इंजिनीअरची ८४ लाखांची फसवणूक

0
0
सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करण्यासाठी डिपॉझिट म्हणून ५० हजार ते एक लाख रुपये घेऊन १०३ सॉफ्टवेअर इंजिनीअरची ८४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

लाचखोर महिला अधिकाऱ्याला सापळा रचून अटक

0
0
जिल्हा परिषदेच्या विशेष घटक योजनेतून शेळीपालन व्यवसायास मदतीचा धनादेश देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पशुधन विकास अधिकारी आणि अन्य एका व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. बारामती येथील पेन्सिल चौकाजवळ सापळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

काँग्रेसचे निष्ठावंत शिवसेनेच्या संपर्कात

0
0
राज्यातील आघाडी सरकारच्या नेत्यांवर आगपाखड करत पिंपरी-चिंचवडमधील काँग्रेसचे काही निष्ठावंत आता शिवसेनेच्या वाटेवर असून, लवकरच ते काँग्रेसचा ‘हात’ सोडून शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेणार आहेत.

पोलिसांविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्यास जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत कारवाई

0
0
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांचा छडा लावताना पुणे पोलिसांनी प्लँचेटचा आधार घेतल्याप्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे.

स्वबळाची भाषा करताना काँग्रेसमध्ये किती बळ?

0
0
विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेसचे मूळात राज्यात किती बळ राहिले आहे? उलटपक्षी, गेल्या खेपेस जनमताच्या जोरावर राष्ट्रवादीला जागा दाखविणाऱ्या काँग्रेसने आता स्वतःचीच जागा ओळखून वागावे, असा टोला गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर. आर. पाटील यांनी शुक्रवारी पुण्यात लगावला.

अनधिकृत नळजोड होणार नियमित?

0
0
शहरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत नळजोड घेण्यात आले असल्याने त्याद्वारे होणाऱ्या पाण्याच्या चोरीला आळा घालण्यासाठी हे सर्व नळजोड अधिकृत करण्याचे धोरण तयार करण्याचा प्रस्ताव शहर सुधारणा समितीसमोर मांडण्यात आला आहे.

हडपसरचा पाणीपुरवठा विस्कळित

0
0
पुलगेटजवळ असलेल्या जुन्या इमारतीची भिंत कोसळल्याने खडकवासला कालव्यातून सोडल्या जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण झाल्याने शुक्रवारी लष्कर पाणीपुरवठा केंद्रातून होणारा पाणीपुरवठा विस्कळित झाला.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत वित्तीय संस्थांचा ‘गोलमाल’

0
0
शेतकऱ्यांना मिळालेल्या कर्जमाफीच्या रकमांमध्ये वित्तीय संस्थांना हाताशी धरून ‘गोलमाल’ झाल्याचे स्पष्ट झाले असून, यातील १५३ कोटी रुपयांचे कर्ज अपात्र आढळल्याने त्यातील १०२ कोटी रुपये सहकार खात्याने वसूल केले आहेत.

पत्नी बोगस डॉक्टर; पतीची तक्रार

0
0
आपली डॉक्टर पत्नी बोगस डॉक्टर असल्याची तक्रार पुणे महापालिका आरोग्य विभाग आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षांकडे केली असून, तिच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अभिजित कात्रे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली आहे.

सामाजिक न्याय विभागाचा ढिसाळ कारभार

0
0
अस्वच्छ काम करणाऱ्या व्यक्तिंच्या मुलांकरिता केंद्र सरकार पुरस्कृत मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजनेमध्ये कचरा वेचकांच्या मुलांचा समावेश करण्याविषयी केंद्र सरकारने आदेश देऊनही राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने त्याचा अध्यादेश न काढल्याने राज्यातील सुमारे ६० हजार विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपसाठी मुकावे लागण्याची वेळ आली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images