Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

सिंहगड घाट रस्ता ३ दिवस बंद

$
0
0
सिंहगड घाट रस्ता ‘चकाचक’ होऊन काही महिने पण झाले नसताना मंगळवारी पहाटे घाट रस्त्यावर दोन ठिकाणी दरड कोसळली. यातील दगड मोठे असल्याने रस्ता बंद झाला आहे. जेसीबीने हे दगड तोडण्यास किमान दोन ते तीन दिवस लागणार आहेत.

रस्त्यासाठी १७ वर्षे पाठपुरावा

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट होऊन १७ वर्षे झाली तरी चऱ्होलीच्या पठारे मळ्यातील रस्त्याचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. याबाबत ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त राजीव जाधव यांच्याकडे व्यथा मांडून या प्रश्नी लक्ष घालण्याची कळकळीची विनंती केली.

महिला आरक्षणामुळे नेत्यांची धावपळ

$
0
0
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डातील महिलांसाठीच्या वॉर्डांचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले. त्यामुळे आठपैकी सहा वॉर्डांतील नगरसेवकांचे गणित बिघडले आहे. मतदारसंघ बदलणे किंवा पती वा पत्नीला रिंगणात उतरवण्याचा पर्याय त्यांच्यासमोर आहे. त्यावर सर्वांची गणिते आणि आराखडे सुरू झाले आहेत.

वानवडीच्या इनामदार हॉस्पिटलवर मिळकतकर विभागही मेहेरबान

$
0
0
सात मजल्यांची परवानगी घेऊन तब्बल बारा मजले बांधणाऱ्या इनामदार हॉस्पिटलवर पालिकेच्या बांधकाम विभागापाठोपाठ मिळकत कर विभागानेही ‘मेहेरबानी’ केली असल्याची माहिती समोर आली आहे.

‘विसर्जन मिरवणूक रात्री दोनपर्यंत का नाही?’

$
0
0
‘मुंबईतील लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक रात्री दोन वाजेपर्यंत चालते; पण दगडूशेठ गणपतीच्या मिरवणुकीला वेळेचे बंधन घातले जाते. एकाच राज्यात दोन वेगवेगळे न्याय का,’ असा सवाल करून ‘पुण्यातही गणेश विसर्जन मिरवणुकांना रात्री दोनपर्यंत परवानगी द्यावी,’ अशी मागणी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी पिंपरीतील पत्रकार परिषदेत केली.

विद्यापीठे केवळ पदवी देणारी केंद्रे

$
0
0
‘विद्यापीठ स्तरावरील अभ्यासक्रम वर्षानुवर्षे तेच सुरू असून विद्यापीठे आता फक्त पदवी देणारी केंद्रे बनली आहेत,’ अशी टीका विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी मंगळवारी पुण्यात केली.

सत्ता आली तर एलबीटी रद्द

$
0
0
‘स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करण्याचा विषय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अहंकारामुळे अडकल्याची टीका करत ऑक्टोबर महिन्यात राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यास एलबीटी रद्द करण्याचा निर्णय प्रथम घेतला जाईल,’ अशी घोषणा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केली.

‘ITI’साठी विद्यार्थ्यांची झुंबड

$
0
0
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठीची (आयटीआय) मागणी वधारली असून, ‘आयटीआय’साठी उपलब्ध जागांच्या तिप्पट अर्ज दाखल झाले आहेत. मंगळवारी सायंकाळपर्यंत ‘आयटीआय’साठी दोन लाख ८३ हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले.

‘EPFO’मधील ‘आऊटसोर्सिंग’ गोत्यात

$
0
0
एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गेनायझेशन (ईपीएफओ) विभागामध्ये आऊटसोर्सिंगद्वारे नेमणूक करण्यात आलेल्या डाटा इन्ट्री ऑपरेटर आणि अन्य कर्मचाऱ्यांकडून वेळेवर काम करण्यात येत नसून, त्यांचा गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

‘LBT’चे उत्पन्न पुन्हा ट्रॅकवर

$
0
0
व्यापाऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द होण्याची शक्यता आता धूसर दिसत असून, पालिकेने पुन्हा सुमारे शंभर कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. गेल्या महिन्यापेक्षा ‘एलबीटी’च्या उत्पन्नात अंशतः वाढ झाली आहे.

पुणे स्वच्छतेची राजधानी व्हावी

$
0
0
‘पुणे हे विद्येचे माहेरघर असून, आयटी क्षेत्रातही शहराचा नावलौकिक सर्वदूर पसरला आहे. भविष्यात स्वच्छतेची राजधानी अशी ओळख पुण्याने प्राप्त करावी’, अशी अपेक्षा पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी मंगळवारी व्यक्त केली.

‘लर्निंग’साठी ऑनलाइन अपॉइंटमेंट

$
0
0
लर्निंग लायसेन्स काढण्यासाठी ‘आरटीओ’ कार्यालयात जाऊन फॉर्म भरणे, रांगेत थांबण्याचा वेळ आता कमी होणार आहे. आरटीओ कार्यालयाने लर्निंग लायसेन्स काढण्यासाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट देण्याची सुविधा सुरू केली आहे.

जातीअंताच्या लढ्याला अद्याप सुरुवातही नाही

$
0
0
‘महात्मा ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी १८५०मध्ये जातिव्यवस्था नष्ट करण्यासाठी पुढाकार घेतला. आजही आपल्या समाजात जातींना गोंजारले जात असून, आता १२५ वर्षे होऊनही भारतात जातीअंताच्या लढ्याला सुरुवातच झालेली नाही’, अशी खंत हमाल पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केली.

गळ्यात घंटा बांधणार कोण?

$
0
0
पावसाळी पर्यटन म्हणजेच निसर्गाच्या सहवासात जाऊन ड्रिंक्स-पार्ट्या करण्याची संस्कृती बळावत असल्याने सध्या पुणे परिसरातील सर्वच पर्यटनस्थळांवर तळीरामांच्या थिल्लरपणाचा उपद्रव होत आहे.

कनेक्टिव्हिटी ठप्प झाल्याने जुन्नरमध्ये बँकांचे व्यवहार बंद

$
0
0
दोन दिवसांपासून कनेक्टिव्हिटी नसल्याने जुन्नरमधील सर्व बँकांचे व्यवहार ठप्प झाले होते. कुरणजवळ केबल तुटल्याने ही समस्या ओढवली होती. खासगी व्यक्तीकडून केबल तुटल्याची गेल्या सहा महिन्यांमधील ही दुसरी घटना आहे.

ऋत्विकचा मृतदेह अखेर सापडला

$
0
0
राजगुरुनगर येथे भीमा नदीच्या पाण्यात पोहताना बुडालेल्या ऋतिक दत्ता कोळी (वय १३) या सातवीत शिकणाऱ्या शालेय मुलाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी रात्री साडेनऊच्या सुमारास पाण्यावर तरंगताना आढळून आला.

‘पर्यायी इंधनाचा विचार व्हायला हवा’

$
0
0
पेट्रोलचा वापर करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले असल्याने पर्यायी इंधनाचा विचार करण्याची आवश्यकता असल्याचे मत एसएई इंटरनॅशनलचे अध्यक्ष डॅन हॅन्कॉक यांनी व्यक्त केले. एसएई ऑफ हायवे बोर्डातर्फे ‘भविष्यातील तंत्रज्ञान आणि उद्योगसंधी’ या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

नदीपात्रात सराव करणाऱ्या पथकांवर कारवाई करणार

$
0
0
नदीपात्रात सराव करण्याबाबत कोणत्याही ढोलपथकाला पुणे पोलिसांकडून परवानगी देण्यात आलेली नसताना विनापरवाना सराव करणाऱ्या पथकांना पोलिसांनी मंगळवारी तंबी दिली. नदीपात्रात वादन करणाऱ्या पथकांनी तातडीने सराव न थांबवल्यास आजपासून (२३ जुलै) कारवाई केली जाणार आहे.

बंद पाइपलाइनच्या अंतिम टप्प्याला मान्यता

$
0
0
खडकवासला ते पर्वती जलकेंद्रादरम्यानच्या बंद पाइपलाइनच्या उर्वरित आणि अखेरच्या टप्प्यातील सुमारे ४१ कोटी रुपयांच्या कामास मंगळवारी स्थायी समितीने मंजुरी दिली. हे काम पूर्ण झाल्यावर शहरासाठी आवश्यक पाणी पालिकेला कॅनॉलमधून घेण्याची गरज राहणार नाही.

जोरदार पावसाची आज शक्यता

$
0
0
यंदाच्या पावसाच्या हंगामाचा दीड महिना उलटून गेल्यावर पुण्यातील पावसाने अखेर मंगळवारी शंभरी ओलांडली. मंगळवारी सायंकाळी साडेपाचपर्यंत सात मिलिमीटर पाऊस होऊन पुण्यात यंदाच्या हंगामातील एकूण १०५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images