Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

प्राध्यापकाला मारहाणीप्रकरणी रूपाली पाटील यांना जामीन

$
0
0
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार डॉ. विश्वजित कदम यांच्या प्रचारासाठी पैसे वाटत असल्याच्या संशयावरून भारती विद्यापीठातील एका प्राध्यापकाला शिवीगाळ आणि बेदम मारहाण केल्याच्या प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेविका रूपाली पाटील यांच्यासह नऊ जणांना अटक करून कोर्टात हजर करण्यात आले होते.

पिंपरी-चिंचवडमध्ये दमदार पाऊस

$
0
0
गेले अनेक दिवस हुलकावणी दिल्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये सोमवारी (२१ जुलै) दमदार पाऊस झाला. त्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. गेल्या आठवड्यात मान्सून सक्रिय झाला, तरी तो जोराने बरसला नव्हता.

तेलाचा टँकर उलटल्याने एक्स्प्रेस-वे १२ तास बंद

$
0
0
पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर खोपोली एक्झिटजवळ सोयाबीन तेलाची वाहतूक करणारा टँकर उलटल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक तब्बल बारा तास ठप्प झाली होती. वाहनांच्या १० ते १२ किलोमीटर लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या.

नितीन सोनटक्के यांना न्यायालयीन कोठडी

$
0
0
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) फसवणूकप्रकरणी अटक केलेले ब्लू-बर्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक नितीन सोनटक्के आणि त्यांच्या सहकाऱ्याची रवानगी येरवडा जेलमध्ये करण्यात आली आहे.

‘आउटलूक’च्या विरोधात दावा

$
0
0
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासासाठी ‘प्लँचेट’ केल्याचा आरोप खोडून काढतानाच याबाबतचा वृत्तलेख प्रसिद्ध करणाऱ्या ‘आउटलूक’ या इंग्रजी साप्ताहिकाचे संपादक आणि संबंधित बातमीदार यांच्या विरोधात शंभर कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे पुण्याचे माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

शहरात सोनसाखळी हिसकावण्याचे २ गुन्हे

$
0
0
वडगाव बुद्रूक आणि मुंढवा येथे सोनसाखळी हिसकावण्याच्या दोन घटना घडल्या असून त्यात सुमारे दीड लाख रुपयांचे दागिने हिसकावण्यात आले आहेत. वडगाव बुद्रूक येथील परिहार मे​डिकलसमोर दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी एका विवाहितेच्या गळ्यातील ६२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले.

गोळीबार : सात जणांना अटक

$
0
0
कॅम्प परिसरात हॉटेल गुडलक चौकात रविवारी रात्री झालेल्या गोळीबार प्रकरणी सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. हा गोळीबार पूर्ववैमन्यासातून झाला असल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.

शेतकऱ्यांच्या खात्याचा तपशील का दडवला?

$
0
0
राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी कारखान्याने शेतकऱ्यांच्या नावाने घेतलेल्या कर्जमाफी प्रकरणी शेतकऱ्यांच्या खात्याचा तपशील का दडविला जात आहे.

मुसळधार पावसाची राज्यात शक्यता

$
0
0
बंगालच्या उपसागरावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर अती तीव्र दाबाच्या कमी दाबाच्या क्षेत्रात (डिप्रेशन) झाल्याने पुण्यासह राज्याच्या इतर भागात पावसाचा जोर आहे. पुढील दोन दिवसांत पुण्यात पावसाच्या सतत सरी कोसळून काही वेळा मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

तूर्त तरी दिवसाआडच पाणीपुरवठा

$
0
0
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये किमान १० टीएमसी पाणीसाठा होईपर्यंत दिवसाआड पाणीपुरवठा मागे घेता येणार नाही, असे पालिका आयुक्त विकास देशमुख यांनी सोमवारी स्पष्ट केले. त्यानंतरही शहराला दिवसातून एकवेळ पाणीपुरवठा केला जाईल, असे संकेतही आयुक्तांनी दिले.

जंगलांच्या संरक्षणात महाराष्ट्र ‘नापास’

$
0
0
राज्यात शंभर कोटी झाडे लावण्याच्या योजनेचे प्रलोभन दाखवून पर्यावरणप्रेमींची दिशाभूल करणारे राज्य सरकार महाराष्ट्रातील जंगलांचे संरक्षण करण्यात नापास झाले आहे. गेल्या दोन वर्षांत देशभरात तब्बल ५ हजार ८७१ किलोमीटर क्षेत्रातील ‘फॉरेस्ट कव्हर’ वाढले असताना महाराष्ट्रात मात्र आली आहे.

झाडे तोडणे आता पडणार महागात

$
0
0
जाहिरातींचे फलक (होर्डिंग) उभारताना झाडे तोडणे यापुढील काळात महागात पडणार आहे. सार्वजनिक तसेच खासगी जागेत होर्डिंग उभारताना झाडे तोडल्याचे आढळून आल्यास संबधित होर्डिंग धारकाचा परवाना रद्द करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

चौथी स्कॉलपरशिप सुधारित अभ्यासक्रमासाठी प्रस्ताव

$
0
0
चौथीच्या स्कॉलरशिपचा सुधारित अभ्यासक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. इयत्ता चौथीच्याच सुधारित अभ्यासक्रमावर आधारित हा अभ्यासक्रम अंतिम मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे.

अखेर फी परतावा जाहीर

$
0
0
शिक्षणहक्क कायद्यातील (आरटीई) २५ टक्के आरक्षणांच्या प्रवेशांसाठी शाळांना मिळणारी फी परताव्याची रक्कम राज्य सरकारने नुकतीच जाहीर केली. त्यासाठी सर्वशिक्षा अभियानाच्या निधीतून तरतूद करत राज्याने तोडगा काढला आहे.

इंजिनीअर्स : नॉट वेल प्लेस्ड

$
0
0
इंजिनीअरिंग प्रवेशामध्ये विद्यार्थ्यांच्या उड्या पडणाऱ्या कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये (सीओईपी) पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांची स्थिती यंदा ‘नॉट वेल प्लेस्ड’ अशी आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्लेसमेंट विक्रमी घसरली असून, केवळ ३० टक्के विद्यार्थ्यांच्या हातात ‘ऑफर लेटर’ आहेत.

२० दिवसांत डेंगीचे ३४८ पेशंट

$
0
0
शहराच्या विविध भागांत एडिसी इजिप्ती प्रकारच्या डासांचा प्रादुर्भाव वाढला असल्याने अनेक ठिकाणी डेंगीचे पेशंट आढळू लागले आहेत. परिणामी, जुलै महिन्याच्या अवघ्या वीस दिवसांत ३४८ जणांना डेंगीची लागण झाल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

संपकरी डॉक्टरांना ‘घरचा रस्ता’

$
0
0
‘कोणत्याही संपकरी डॉक्टरांवर कारवाई होणार नाही,’ असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही आरोग्य खात्याने अखेर राज्यातील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतील कंत्राटी ९०० डॉक्टरांना घरचा रस्ता दाखविला आहे.

पालिकेच्या शाळांत शिक्षक अपुरे

$
0
0
महापालिकेच्या शिक्षणमंडळाच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी पुरेसे शिक्षक मिळावेत, यासाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने महापालिकेत आंदोलन करण्यात आले.

टँकरच्या १०,००० खेपांचे पाणी कोठे मुरले?

$
0
0
शहरातील पाणीटंचाईच्या काळात टँकरच्या तब्बल दहा हजार फेऱ्या झाल्या असल्या, तरी प्रत्यक्ष नागरिकांपर्यंत पाणी पोहोचलेच नसल्याचा ठपका ठेवत बहुसंख्य नगरसेवकांनी सोमवारी पालिका अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. तरीही, पाणीमाफियांबाबत अधिकाऱ्यांचे मौनव्रत कायमच राहिले.

पुण्यातही जोरदार सरी

$
0
0
गेल्या काही दिवसांत अतिशय संथपणे बरसणाऱ्या पावसाने सोमवारी गती वाढविली. रात्री साडेआठपर्यंत शहरात २३.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील दोन दिवस शहरात दमदार पावसाची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images