Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

शेतपंपांना २४ तास वीज शक्य

0
0
पाण्याचा उपसा करण्यावर कठोर निर्बंध घालून शेतपंपांना २४ तास वीजपुरवठा करणे शक्य आहे. तसेच, स्वस्त दराच्या कालावधीत अधिक वीज वापरता यावी, यासाठी घरगुती ग्राहकांच्या वीजजोडणीला ‘टीओडी’ मीटर लावण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती ‘महावितरण’चे व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता यांनी शुक्रवारी दिली.

शिक्षकेतर भरती परीक्षेत गोंधळ

0
0
पुणे विद्यापीठाच्या शिक्षकेतर कर्मचारी भरती परीक्षेमध्ये रविवारी तांत्रिक अडचणींमुळे परीक्षार्थींचा गोंधळ उडाला. महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या (एमकेसीएल) माध्यमातून घेण्यात आलेल्या या परीक्षेत पहिला प्रश्नानंतर येणाऱ्या ‘तुमची परीक्षा संपली,’ अशा आशयाच्या मेसेजने हैराण केल्याची तक्रार परीक्षार्थींकडून करण्यात आली.

…आणि होमगार्ड चोर बनले

0
0
होमगार्ड म्हणून काही वर्षे नोकरी केल्यानंतर दोघे तरुण पोलिसी खुब्या शिकले आणि भुरटेगिरी करता करता जबरी चोरी करणारे अट्टल गुन्हेगार झाले. या दोघांनी गेल्या सव्वा वर्षात तब्बल ४४ दुचाकीस्वारांना धमकावून लुटले आहे.

पेठांमधील पाणीपुरवठा विस्कळित

0
0
मध्यवर्ती भागातील पेठांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांमध्ये हवा भरल्याने पेठांमधील बहुतांश भागात रविवारी कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. सुट्टीच्या दिवशीच पाणीपुरवठा विस्कळित झाल्याने नागरिकांना पाण्यासाठी धावपळ करण्याची वेळ आली.

बनावट सह्या करून कोटींची फसवणूक

0
0
व्यवसायाच्या निमित्ताने पुण्यातील व्यापाऱ्याकडून घेतलेल्या चेकवर बनावट सह्या करून बँकेतून ‘आरटीजीएस’च्या माध्यमातून पैसे काढून तीन कोटी ३५ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली.

दाभोलकरांच्या तपासाची दिशा बदलली?

0
0
‘डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुन्याचा तपास करण्यासाठी पुणे पोलिसांनी प्लँचेट केले आहे किंवा नाही, याचा तपास सरकारने करावा. तसे केले असल्यास त्यातून काय धागेदोरे हाती लागले, आणि त्यामुळे तपासाची दिशा बदलली का, याची माहिती सरकारने जनतेला द्यावी,’ अशी मागणी डॉ. दाभोलकर यांच्या कन्या मुक्ता दाभोलकर यांनी रविवारी केली.

घरात साप आलाय? घाबरू नका!

0
0
घरात साप आलाय, आता काय करू? तो विषारी तर नसेल ना? सर्पमित्राचा नंबर आहे का? आम्ही एक पक्षी वाचवलाय, पण तो कोणाला द्यायचा? लहानसे घर असो किंवा एखादी मोठी सोसायटी, सातत्याने घडणाऱ्या या घटना आणि नागरिकांच्या मनातील अनेक प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी भारतीय सर्पविज्ञान संस्थेने ‘प्राणिमित्र’ हे नवीन अॅप विकसित केले आहे.

अभिजितची फोटो भरारी

0
0
१५ जुलै या दिवशीचा ‘नॅशनल जिओग्राफिक फोटोग्राफर’ ठरलाय अभिजित चव्हाण हा मराठी तरुण. १९६ देशांतील फोटोग्राफर्सना मागे टाकत त्याच्या फोटोची निवड झाली आहे.

वाहतुकीचा ‘सहवास’ नको

0
0
सहवास सोसायटीच्या रस्त्यावर वाढलेल्या वाहनांच्या वर्दळीमुळे हा रस्ता अपघातांसाठी निमंत्रण देणारा ठरत आहे. त्यामुळे हा रस्ता जड वाहनांसाठी बंद करावा आणि या ठिकाणी बॅरिकेड्स लावून या रस्त्यावरील वाहतूक कॅनॉल रोडवरून सोडण्याची मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.

राज्यात शेकरूंची गणना एकाच वेळी

0
0
राज्यातील शेकरूंची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी येत्या मे महिन्यात राज्यात एकाच वेळी शेकरूंची गणना करण्या निर्णय वन विभागाने घेतला आहे. यासाठी येत्या ऑक्टोबर महिन्यात भीमाशंकर अभयारण्यात कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती प्रधान मुख्यवनसंरक्षक (वन्यजीव) सर्जन भगत यांनी दिली.

आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाज आक्रमक

0
0
धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्यासाठी पंढरपूरपासून आयोजित केलेला मोर्चा सोमवारी बारामतीत धडकला. त्यामध्ये हजारो धनगर बांधव सहभागी झाले होते.

बेशिस्त पर्यटक; ढासळलेले नियोजन

0
0
पावसाळी पर्यटनाची क्रेझ दर वर्षी वाढत असताना, नियंत्रित पर्यटनाचे कागदी घोडे कितीही नाचवले तरी त्याची अंमलबजावणी अशक्य आहे, याची प्रचिती गेल्या वीकेंडला अनुभवायला मिळाली.

भारतीय लोकसेवा पार्टी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

0
0
भारतीय लोकसेवा पार्टी आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. २०११मध्ये स्थापन झालेल्या या पक्षातर्फे नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असून, त्यासाठी मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. पक्षाचे संस्थापक अध्यक्ष गोविंदराज यांनी ही माहिती दिली.

पीएचडी प्रवेश लांबले

0
0
पुणे विद्यापीठाच्या लांबत चाललेल्या पीएचडी प्रवेश प्रक्रियेवर आता विद्यापीठातील वरीष्ठ अधिकारी वर्ग आणि सिनेट सदस्यांकडूनही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ‘जवळपास गेले वर्षभर मारुतीच्या शेपटासारखी लांबत चालणारी प्रक्रिया संपणार तरी कधी,’ असा सवाल विद्यापीठीय यंत्रणेमधून उपस्थित केला जात आहे.

बोर्डाच्या हद्दीतील मालमत्तांच्या कागदपत्रांचे डिजिटायझेशन

0
0
ब्रिटिश काळापासून असलेल्या पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या परिसरातील मालमत्तांची कागदपत्रे आणि अन्य महत्त्वाचे दस्तऐवज यांचे कायमस्वरुपी जतन होण्यासाठी कागदपत्रांचे डिजिटायझेशन करण्याच्या प्रकल्पाला बोर्डाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

‘EPFO’ला मिळणार ‘सी-डॅक’चा सल्ला

0
0
एम्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गेनायझेशन (ईपीएफओ) या विभागामध्ये माहिती-तंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे करण्यासाठी पुण्यातील सी-डॅक या संस्थेची माहिती-तंत्रज्ञान सल्लागार म्हणून, तर पीएफ खात्यांमधील डबल इन्ट्री अकाउंटिंग सिस्टिमसाठी द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टंड अकाउंटंट ऑफ इंडिया (आयसीएआय) आणि अकाउंटिंग ​रिसर्च फाउंडेशन (एआरएफ) या संस्थांची सल्लागारपदी नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

फेरीवाल्यांच्या पुनर्वसनासाठी ‘टाउन व्हेंडिंग कमिटी’

0
0
केंद्र सरकारच्या ‘नॅशनल पॉलिसी ऑफ अर्बन स्ट्रीट व्हेंडर्स’अंतर्गत फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यासाठी पुणे कँटोन्मेंट बोर्डाने तयार केलेल्या हॉकर्स पॉलिसीनुसार ‘टाउन व्हेंडिंग कमिटी’ स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

खर्च कमी करण्याच्या रेल्वेच्या सूचना

0
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेची सूत्रे हातात घेतल्यानंतर केंद्रीय रेल्वे बोर्डाने रेल्वेच्या सर्व विभागांना खर्च कमी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रेल्वे बोर्डाकडून त्या संदर्भातील पत्र रेल्वेच्या जनरल मॅनेजरना पाठवण्यात आले असल्याचे समजते.

‘डॉक्टरांची मलीन प्रतिमा सुधारण्यासाठी कटिबद्ध’

0
0
काही मोजक्या डॉक्टरांकडून होत असलेल्या कट प्रॅक्टिस, जाहिरातबाजी यांसारख्या गैरप्रकारांमुळे डॉक्टर, वैद्यक व्यवसाय यांची समाजमनातील प्रतिमा बदलत चालली आहे. डॉक्टरांच्या चुकीच्या कामावर त्यांना ‘इंजेक्शन’ देण्याचे काम महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल करते.

महिला आरक्षण जाहीर

0
0
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आठ वॉर्डांपैकी महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणारे तीन वॉर्ड सोमवारी (२१ जुलै) ड्रॉ पद्धतीने निवडण्यात आले. यामध्ये वॉर्ड क्रमांक चार, पाच आणि सहा हे वॉर्ड महिलांसाठी राखीव ठरले आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images