पंजाबमधील घुमान येथे होणाऱ्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. या संमेलनाच्या लोगोचे अनावरण शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी (२१जुलै) ‘मातोश्री’वर होणार आहे.
साहित्य संमेलनाच्या लोगोचे ‘मातोश्री’वर अनावरण
↧
↧
ढोलताशा पथके करणार ‘सोशल प्रबोधन’
पुण्याच्या गणेशोत्सवाचे आकर्षण असलेली ढोलपथके संवेदनशीलता दाखवत सोशल नेटवर्किंग साइट्सच्या वापराबाबत गणेशोत्सवाच्या काळात समाज प्रबोधन करणार आहेत.
↧
कोट्यवधी रुपये खर्चूनही नाट्यगृहात त्रुटीच
छोटा रंगमंच... नेपथ्य आणण्यासाठी लिफ्टची अडचण... अपुरे मनुष्यबळ... प्रेक्षकांचा असमाधानकारक प्रतिसाद ही परिस्थिती आहे औंधमध्ये उभारलेल्या भीमसेन जोशी नाट्यगृहाची. महापालिकेतेने योग्य पद्धतीने नियोजन न करता नाट्यगृह बांधल्याने त्यात मुलभूत त्रुटी राहिल्या आहेत.
↧
पुणे-मुंबई एअरपोर्ट शिवनेरी सेवा
पुण्याहून विदेशात जाणाऱ्या नागरिकांना विमानतळावर जाण्यासाठी खाजगी गाड्यांचा सहारा घ्यावा लागतो. प्रवाशांचा हा त्रास कमी करण्यासाठी पुणे ते मुंबई एअरपोर्ट या दरम्यान शिवनेरी व्होल्वो सेवा सुरू करण्याच्या प्रस्तावावर एसटी महामंडळाने विचार सुरू केला आहे.
↧
‘जिप’ चे १० तालुक्यांत होणार ‘डे केअर सेंटर ’
नागरिकांना गावपातळीवर दर्जेदार उपचारात्मक आरोग्यसेवा देण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेतर्फे दहा तालुक्यातील ३२ गावांमध्ये ‘डे केअर सेंटर’ सुरू करण्यात येणार आहे. रक्तदाब व मधुमेह तपासणी आणि उपचार, नेत्रतपासणी, हृदयरोग तपासणी व उपचारासंदर्भात मार्गदर्शन आणि लहान बालकांसाठी नेब्यूलायझेशन सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
↧
↧
‘शास्ती’ची धास्ती कायम
अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासंदर्भात नियुक्त केलेल्या समितीकडेच शास्तीकराबाबतचा निर्णय घेण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे शास्तीची धास्ती कायम असून, पिंपरी-चिंचवडमधील दोन्ही प्रलंबित प्रश्नांचे घोंगडे अजूनही भिजत पडल्याचे स्पष्ट झाले आहे.
↧
औषधांची विक्री कायद्यानुसारच करा
‘व्यवसायात नफा मिळविण्याबरोबरच रुग्णांची योग्यप्रकारे सेवा करणे ही आपली मुख्य जबाबदारी आहे,’ असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त महेश झगडे यांनी येथे केले.
↧
दुचाकी चोरली : एकास पोलिस कोठडी
ससून हॉस्पिटलच्या पार्किंगमधून निवासी बंडगार्डन पोलिसांनी राजेश ऊर्फ तेगराज पिल्ले (वय ३१, रा. नढेनगर, काळेवाडी, पिंपरी) यास अटक केली. कोर्टाने त्यास मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दक्षा बिलगी (वय २५, रा. डॉक्टर्स वसतिगृह, ससून) यांनी फिर्याद दिली.
↧
भाजीपाल्याच्या दरात किरकोळ वाढ
पावसाने विश्रांती घेतल्यामुळे भाजीपाल्याच्या किमतीमध्ये किरकोळ वाढ झाली आहे. कोथिंबीर वगळता अन्य पालेभाज्यांचे दर आवाक्यात आले आहेत.
↧
↧
प्रज्ञाशोध परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेच्या राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील टप्प्यांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी येत्या २ नोव्हेंबरला (रविवार) ही परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेतून यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवरील टप्प्यामध्ये सहभाग घेता येणार आहे.
↧
‘अँग्लो उर्दू बॉइज’ला दणका
कॅम्पमधील अँग्लो उर्दू बॉइज स्कूलच्या प्रशासनाला शिक्षण विभागाने दणका दिला. प्रशासनाने १७ क्रमांकाच्या फॉर्मसाठी बहिस्थ विद्यार्थ्यांकडून नियमबाह्य पद्धतीने घेतलेली आठ लाख ९७ हजारांची रक्कम परत देण्याचा आदेश जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी शाळेला दिला.
↧
शिक्षण मंडळावर ११९ तज्ज्ञ
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे (राज्य बोर्ड) अशासकीय सदस्य म्हणून, राज्य सरकारने ११९ तज्ज्ञांची नियुक्ती केली आहे. या विषयीचा शासन निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला असून, राज्य बोर्डाच्या सर्व नऊ विभागीय बोर्डांसाठीच्या तज्ज्ञांच्या प्रस्तावित यादीचा त्यात समावेश आहे.
↧
पर्यटकांनी केली सिंहगडाची ‘कोंडी’
यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच जोरदार पाऊस झाल्यानंतरच्या पहिल्याच रविवारी सर्वच पर्यटनस्थळांवर पर्यटकांचा ‘पाऊस’ पडला. सुमारे ७० हजार पर्यटकांनी सिंहगडावर स्वारी केल्याने संपूर्ण घाट रस्त्यात वाहतूक कोंडी झाली.
↧
↧
पावसाची पुण्यात ‘स्लो बॅटिंग’च
शहर आणि परिसरात रविवारी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली. सायंकाळी साडेआठपर्यंत शहरात १.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज (सोमवारी) शहरात पावसाच्या काही सरी कोसळतील, तर मंगळवारी काही मुसळधार सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
↧
शहरात आता ‘सीझनल’ फेरीवाले!
शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात आले असतानाच, आगामी काळात सणासुदीसाठी बाहेरील व्यावसायिकांसाठी पालिकेतर्फे ‘सीझनल स्कीम’ राबवण्यात येणार आहे. सात ते दहा दिवसांसाठी तात्पुरत्या स्वरूपाचा व्यवसाय परवाना उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव लवकरच मांडण्यात येणार आहे.
↧
बिल्डरचे ऑफिस फोडून तिजोरी पळवली
बिल्डरचे ऑफिस फोडून साडेबारा लाख रुपयांची रोकड ठेवलेली शंभर किलो वजनाची तिजोरी पळवल्याची घटना पुण्यातील फर्ग्युसन रोडवर ज्ञानेश्वर पादुका चौक येथे शनिवारी मध्यरात्री घडली. रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.
↧
जागांचे ‘इंजिनीअरिंग’ या वर्षीही नाही
राज्यातील अनेक इंजिनीअरिंग कॉलेजांमधील बाके यंदा विद्यार्थ्यांविना ओस पडणार आहेत. या वलयांकित अभ्यासक्रमाच्या विक्रमी म्हणजे सुमारे ६० हजार जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.
↧
↧
कृषिमंत्र्यांच्याच कर्जमाफी योजनेत ‘बोगस शेतकरी’
राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेच्या नावाखाली राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या पद्मश्री विठ्ठलराव विखे-पाटील सहकारी साखर कारखान्याने तब्बल नऊ कोटी रुपये लाटल्याचे स्पष्ट झाले आहे.
↧
मनोरमा शिंत्रे यांनी तयार केले सर्वांत मोठे शब्दकोडे
वयाच्या ६५व्या वर्षी कम्प्युटर शिकून त्याच्या साह्याने भारतातील सर्वांत मोठे शब्दकोडे तयार करण्याचा मान पुण्याच्या मनोरमा शिंत्रे यांनी पटकावला आहे. ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने या कोड्याला मराठी भाषेतील सर्वांत मोठे कोडे असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे.
↧
परदेशात हिट, भारतात सुपरहिट
पुणे वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या ‘पुणे ट्रॅफिक अॅप’ला परदेशातही चांगली पसंती मिळत आहे. अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, जपान, यूएई, सिंगापूर, सौदी अरेबिया, थायलंड या देशातील मोबाइल युझरनी हे अॅप डाउनलोड केले आहे.
↧
More Pages to Explore .....