Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

दरीत कोसळल्याने पुण्यातील युवकाचा मृत्यू

0
0
पर्यटनासाठी खंडाळ्यातील शूटिंग पॉइंटवर गेलेल्या युवकाचा पाय घसरून साडेसातशे फूट खोल दरीत पडून मृत्यू झाला. सोळा तासांच्या अखंड शोध मोहिमेनंतर शुक्रवारी सायंकाळी या युवकाचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला. पर्यटकाचा अशा पद्धतीने मृत्यू होण्याची ही आठवड्याभरातील चौथी घटना आहे.

आकाशवाणी पुणे .... ऐकू येणार स्पष्टपणे

0
0
शहराच्या मध्यवर्ती भागातच आकाशवाणीला रेंज न मिळणे...प्रक्षेपण मध्येच खंडित होणे....प्रक्षेपणात खरखर येणे... अशा आकाशवाणीच्या मध्यम लहरींवर चालणाऱ्या केंद्रांबाबतच्या तक्रारी लवकरच इतिहासजमा होणार आहेत.

मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार निवडणुकीपूर्वी नाही

0
0
आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्याचा मुख्यमंत्री कोण असणार, यावरून महायुतीच्या नेत्यांमध्ये स्पर्धा लागली असली, तरी राज्यात निवडणुकीआधी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्याची पद्धत नाही, असे सांगत केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शनिवारी महायुतीच्या नेत्यांना चिमटा काढला.

विद्यापीठातील प्रयोगशाळांची सुरक्षा व्यवस्था ‘रामभरोसे’

0
0
पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागासह इतर सर्वच विभागांमधील प्रयोगशाळांची सुरक्षा अक्षरशः वाऱ्यावर असल्याचे शनिवारी स्पष्ट झाले. दुबळ्या सुरक्षाव्यवस्थेचा गैरफायदा घेत, विद्यापीठाच्या रसायनशास्त्र प्रयोगशाळेतून नानाविध रसायने सहजगत्या विभागाबाहेर नेणे शक्य असल्याचेही ‘मटा’ने केलेल्या पाहणीतून समोर आले.

पैसे मागणारा तरुण अटकेत

0
0
आमदार विनायक निम्हण यांच्या ऑफिसमधून बोलतोय असे सांगून लोकांना देवदर्शनाला नेण्यासाठी एक लाख रुपये द्या नाही तर कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय बंद करा अशी धमकी देणाऱ्याला समर्थ पोलिसांनी अटक केली आहे.

तलाठी नियुक्तीत आता राज्यमंत्री घेत आहेत रस

0
0
गेल्या काही वर्षांत जमिनींना आलेले सोन्याचे भाव, वाढलेले खरेदी-विक्री व्यवहार आणि त्यातून होणारी ‘चलती’ यामुळे पुण्यातील कमाईचा ‘सजा’ मिळावा यासाठी तलाठी भाऊसाहेब आता थेट मंत्र्यांकडून दबाव आणत आहेत.

दोघा व्यावसायिकांची आत्महत्या

0
0
शेअर्सच्या व्यवसायात तोटा झाल्यामुळे पुण्यातील दोघा व्यावसायिकांनी चिपळूण येथील एका लॉजमध्ये आत्महत्या केली. शुक्रवारी रात्री हा प्रकार घडला. महेश विजय कुलकर्णी (वय ४२), मिलिंद पंडितराव पुजारी (४४) अशी या दोघांची नावे आहेत.

पुतळ्याला ‘जोडा मारो’ आंदोलन

0
0
शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात एकेरी शब्दात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेच्यावतीने निगडी चौकामध्ये उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या पुतळ्याला प्रतिकात्मक ‘जोडा मारो’ आंदोलन करण्यात आली.

१५ ऑगस्टपासून एस्कॉर्ट होणार बंद

0
0
राज्यात मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांमध्ये स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू झाला असल्याने एस्कॉर्ट (रहदारी कर) येत्या १५ ऑगस्टपासून बंद करण्याचे संकेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहेत. त्यामुळे, राज्यातील पालिकांना एस्कॉर्टपासून मिळणाऱ्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार आहे.

दागिनेचोरीचा बहाणा आला अंगलट

0
0
सराफाकडे काम करत असलेल्या नोकरानेच अपहरण झाल्याचे नाटक करून ३२ तोळे सोने लांबविल्याचा गुन्हा उघडकीस आला आहे. अपहरण केल्यानंतर तोंडाला क्लोरोफॉर्म लावण्यात आल्याचे नोकराने सांगितले.

मनमानी केल्यास टँकर ताब्यात

0
0
शहरात पाण्याची गंभीर परिस्थिती उद्भवली असताना, महापालिकेला सहकार्य करण्याऐवजी मनमानी भूमिका घेणाऱ्या पाणीमाफियांना चाप लावण्यासाठी कठोर पावले उचलण्यात येतील, असे संकेत शनिवारी पालिकेने दिले.

‘PMP’ ठेकेदाराने थकवले ८ कोटी

0
0
पुणे महानगर परिवहन लिमिटेड (पीएमपी) बस पुरवणाऱ्या जय सोमनाथ ट्रान्सपोर्ट कॅरिअर या ठेकेदाराने महापालिकेची जकात आणि त्यावरील दंड असे सुमारे आठ कोटी रुपये थकवले आहेत. महापालिकेने या संदर्भात सातत्याने पाठपुरावा करूनही संबंधित ठेकेदाराने वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.

ढोल पथकांवर काही बंधने हवीतच

0
0
‘ढोल-ताशा पथकांना सरावासाठी परवानगी देण्यासंबंधीची खूप चर्चा सुरू आहे. मात्र, नागरी वस्तीमध्ये चालणाऱ्या सरावामुळे नागरिकांना खरोखरच मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे. नागरिकांच्या पोलिस कंट्रोल रूमकडे येणाऱ्या तक्रारींचे प्रमाण लक्षात घेऊन या पथकांना काही बंधने घालणे अपरिहार्य आहे,’ असे मत शहराचे पोलिस आयुक्त सतीश माथुर यांनी शनिवारी व्यक्त केले.

पाण्यासाठी कृती आराखडा

0
0
अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिगंभीर बनू नये, यासाठी जिल्हा परिषदेने पुढील अडीच महिन्यांसाठीचा कृती आराखडा तयार केला आहे. दुष्काळाचे सावट असलेल्या सुमारे तीनशे गावांसाठी तब्बल एक हजार ३५९ योजना या आराखड्यात प्रस्तावित करण्यात आल्या असून, हा आराखडा जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.

मुक्ता दाभोलकर यांचा सवाल

0
0
‘डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुन्याचा तपास करण्यासाठी पुणे पोलिसांनी प्लँचेट केले आहे किंवा नाही, याचा तपास सरकारने करावा. तसे केले असल्यास त्यातून काय धागेदोरे हाती लागले, आणि त्यामुळे तपासाची दिशा बदलली का, याची माहिती सरकारने जनतेला द्यावी,’ अशी मागणी डॉ. दाभोलकर यांच्या कन्या मुक्ता दाभोलकर यांनी रविवारी केली.

पुरापासून संरक्षणासाठी पाटबंधारे खाते कायम सज्ज

0
0
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस, धरणांत वाहून येणारे पाणी, क्षणाक्षणाला वाढणारा जलसाठा, धरणाच्या पाणीपातळीची नियमितपणे घ्यावी लागणारी नोंद, सांडव्यातून सोडण्यात येणारे पाणी आणि नदीला येणारा पूर...

जीवदान देणारा क्रमांक - १०८

0
0
अज्ञात ठिकाणी अपघात होतो...१०८ या नंबरवर कॉल केला जातो... आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरवणारी अॅम्ब्युलन्स कॉल सेंटरकडून घटनास्थळी पाठवली जाते... अवघ्या २०-२५ मिनिटांत पेशंटला घेऊन नजीकच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचते...

हवामान विभागाचा खास ‘अंदाज’

0
0
हवामान विभाग म्हटले, की आपल्यापैकी अनेकांना आठवतो, तो पावसाचा अंदाज. परंतु, हवामान विभागातर्फे पावसाच्या अंदाजाबरोबरच हवामानविषयक अन्य घडामोडींचीही माहिती वेळोवेळी दिली जाते.

‘साहित्य संस्कृती’वर कोणाची वर्णी‍?

0
0
ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदाच्या जागेसाठी ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके, भारत सासणे आणि डॉ. नागनाथ कोत्तापले उत्सुक आहेत.

मंडेलांचे व्यक्तिमत्त्व पुस्तकरूपाने उलगडणार

0
0
दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंचा वेध ‘नेल्सन मंडेला : जिद्द आणि जागृती’ या पुस्तकात घेण्यात आला आहे. लेखिका मुक्ता गरसोळे-कुलकर्णी यांनी या पुस्तकाचे लेखन केले असून, हे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images