Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

तहसीलदार कार्यालयातून हार्ड डिस्कची चोरी

$
0
0
पुरंदर तहसीलदार कार्यालयातील चार कम्प्युटर आणि त्यातील महत्त्वाचे दस्तावेज असलेल्या हार्ड डिस्क चोरट्यांनी पळवून नेल्या आहेत. ‘कम्प्युटरचे सीपीयू उकीरड्यावर फेकून दिले असल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केल्या आहेत,’ अशी माहिती तहसीलदार संजय पाटील यांनी दिली. सोमवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी दार तोडून चोरी केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, अशी माहिती नायब तहसीलदार दिनेश पारगे यांनी दिली.

बारामतीमध्ये संपाने विकासकामे ठप्प

$
0
0
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनतर्फे ३० जुलैपासून राज्यभर बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. बारामती तालुक्यातील ७५ ग्रामसेवक संपावर गेल्याने विकासकामे ठप्प झाली आहेत. ग्रामसेवक संघटनेच्या मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरू ठेवण्याचा निर्धार संघटनेने केल्यामुळे विद्यार्थी व शेतकऱ्यांची विविध दाखल्यांची कामे रखडली आहेत.

बारामतीमध्ये दोन दिवसांआड पाणी

$
0
0
बारामतीकरांसाठी करोडो रुपये खर्च करून २०११ मध्ये सुरू केलेल्या साठवण तलावाच्या गळतीमुळे पाणीपुरवठा योजनांचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. बारामतीमधील नागरिकांना दोन दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. नळाला पाणी उपलब्ध झाल्यावर पाण्यासाठी रांगा लावाव्या लागत आहेत. बारामती नगरपरिषदेचा नियोजनाचा अभाव, निकृष्ट दर्जा, ठेकेदारांनी घाईत केलेली कामे यामुळे हा तलाव सातत्याने गळत आहे.

ग्रामपंचायतींची धुरा कंत्राटी ग्रामसेवकांवर

$
0
0
ग्रामसेवकांच्या काम बंद आंदोलनामुळे ठप्प झालेला ग्रामपंचायतींचा कारभार पुन्हा सुरू करण्याची धुरा कंत्राटी ग्रामसेवक आणि विस्तार अधिकाऱ्यांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. या आंदोलनामध्ये सहभागी न झालेले १०८ कंत्राटी ग्रामसेवक आणि २९ विस्तार अधिकारी ग्रामपंचायतींच्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीने सध्या ग्रामपंचायतींची कामे पार पाडत आहेत.

सेवानिवृत्त अंगणवाडी मदतनीसांचे आंदोलन

$
0
0
राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाने घेतलेल्या निर्णयात ३० एप्रिल २०१४च्या पूर्वी निवृत्त झालेल्या अंगणवाडी सेविका मदतनिसांना एकरकमी निवृत्ती वेतनाच्या योजनेतून वगळण्यात आल्याने या महिलांना वृद्धापकाळी अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

विमानांच्या सुरक्षेकडे काणाडोळा

$
0
0
दिल्लीवरून पुण्याला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला तीन वेळा अपघात होण्याचे प्रकार झालेले असताना त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी विमानतळ प्राधिकरण आणि संबधित विमान कंपनीने कोणताही धडा घेतला नसल्याचे समोर आले आहे.

भारतीयांनी योग अंगीकारण्याची गरज

$
0
0
‘रोजच्या जीवनशैलीमध्ये असणारे योगाचे महत्त्व, योगाचा होणारा जागतिक प्रसार आणि योगामध्ये होणारे सखोल संशोधनाचा विचार करून भारतीयांनी योग अंगीकारण्याची गरज आहे,’ असे मत ज्येष्ठ योगाभ्यासक डॉ. संप्रसाद विनोद यांनी मांडले.

बांधकामे थांबवण्याच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद

$
0
0
शहरात निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे शहरातील बांधकामे बंद करण्याच्या महापालिका आयुक्तांच्या आदेशाला बांधकाम व्यावसायिक संघटनांनी सकारात्मक पाठिंबा दिला आहे. बांधकामासाठी पाण्याचा वापर तातडीने थांबवून पाणीबचतीसाठी संघटनेच्या वतीने जनजागृती करण्याचे आश्वासन संघटनांच्या प्रतिनिधींनी दिले.

बेकायदा नळ जोडांवर कारवाई सुरू

$
0
0
शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न ऐरणीवर आल्याने बेकायदा नळजोड, तसेच पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवरील कारवाईला वेग आला आहे. शहराच्या विविध भागांतील अनधिकृत नळजोड आणि पिण्याच्या पाण्याच्या गैरवापराबाबत शंभराहून अधिक जणांवर मंगळवारी कारवाई करण्यात आली.

शिवतारेंची ‘ज‌लदिंडी’ पुण्यात रोखली

$
0
0
पुरंदर तालुक्यातील पाणीप्रश्नी सिंचन भवनावर मोर्चा काढणारे शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे आणि त्यांच्या समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन बुधवारी सासवडला नेऊन सोडले. मंगळवारी त्यांनी सासवडपासून काढलेला मोर्चा गोळीबार मैदानाजवळ रोखण्यात आला होता.

आडतचा निर्णय सरकारच्या ‘कोर्टात’

$
0
0
व्यापाऱ्यांची आडत रद्द करण्याच्या प्रश्नामध्ये सरकारने हस्तक्षेप केला असून या संदर्भातला अंतिम निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

काँग्रेसच्या मागणीला ‘राष्ट्रवादी’चा ‘खो’

$
0
0
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपात पिंपरी विधानसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसला सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

पुणेकरांनी ढोलपथकांना सहकार्य करावे

$
0
0
‘ढोलपथकांच्या वादनामुळे नागरिकांना त्रास होणे मान्य आहे. या नेत्रसुखद तालाचा त्रास होतो, की संगीताचा आनंद मिळतो हा व्यक्तिसापेक्ष मुद्दा आहे. मात्र, पुणेकरांनी काही दिवस जुळवून घ्यावे,’ अशी भूमिका ज्येष्ठ तालवाद्यवादक तौफिक कुरेशी यांनी मांडली.

कँटोन्मेंट बोर्डाने ‘आरटीई’ धुडकावला

$
0
0
देशात मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचे वारे सुरू असताना पुणे कँटोन्मेंट बोर्डाने मात्र रवींद्रनाथ टागोर इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शुल्क आकारण्याचा घाट घातला आहे.

इंजिनीअरिंगच्या प्रवेश यादीला विलंब

$
0
0
इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशांसाठीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या (कॅप) पहिल्या फेरीसाठी लागणारी प्रवेशांची यादी बुधवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर झाली नव्हती. वेळापत्रकाप्रमाणे ती बुधवारी सायंकाळी पाच वाजता वेबसाइटवर जाहीर होणे अपेक्षित होते.

चाऱ्यासाठी मिळणार ३० हजार रुपये

$
0
0
जुलै महिन्याच्या पंधरवड्यापर्यंत पावसाने मारलेल्या दडीमुळे जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असून, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पशुधन विकास कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना पडीक जमिनीवर चारापिके घेता येणार आहेत. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून एक हेक्टरपर्यंत ३० हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे.

‘डीपी’मध्ये मेट्रोचा समावेश

$
0
0
केंद्र सरकारने मेट्रो प्रकल्पाला मंजुरी दिल्यास मेट्रोच्या अंमलबजावणीसाठी शहराच्या जुन्या आणि नव्या विकास नियंत्रण नियमावलीत (डीपी) मेट्रोच्या तरतुदीचा समावेश केला जाणार आहे. या तरतुदींवर नागरिकांकडून महापालिकेने हरकती आणि सूचना मागविल्या आहेत. १९ जुलै ते ३१ ऑगस्ट या काळात नागरिकांना मेट्रोबाबत आपल्या हरकती नोंदविता येणार आहेत.

डेंगीचे राज्यात चार बळी

$
0
0
मलेरिया आता हळूहळू काढता पाय घेत असला तरी डेंगीच्या ‘एडिस इजिप्ती’ डासांनी राज्यात घरोबा करण्यास सुरुवात केली आहे. अवघ्या सहा महिन्यांत डेंगीने पुण्यासह चार जणांचा बळी गेला असून आतापर्यंत ११३५ जणांना डेंगी झाल्याचे निदान झाले आहे.

योजनेविषयी गरीब अनभिज्ञ

$
0
0
महापालिकेकडून दीड ‘एफएसआय’ घेतलेल्या शहरातील मोठ्या हॉस्पिटलचालकांनी महापालिकेने शिफारस केलेल्या २७ पेशंटसाठी रोज मोफत बेड उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. या करारानुसार दर वर्षी शहरातील नऊ हजार ८०० गरीब पेशंटवर मोफत उपचार होऊ शकतात.

मुख्याध्यापकांचे ‘शिक्षणमंथन’

$
0
0
विद्यार्थ्यांचे नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी शाळेतच मंत्रिमंडळ, कौशल्यविकसनासाठीच्या मोहिमा, अनुभवाधारित शिक्षणासाठी निसर्गाचा घेतला जाणारा आधार आणि थेट अमेरिकेतील ‘नासा’मधून साधलेला ‘स्पेस संवाद’...
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images