Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

ताकद असलेल्या भागात मनसे लक्ष केंद्रित करणार

$
0
0
पुणे जिल्ह्यात सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे वर्चस्व असलेल्या मतदारसंघांत महाराष्ट्र नवनिर्माण सेना रिंगणात उतरण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना मनसेकडून ‘बाय’ मिळणार असल्याचे संकेत आहेत.

वर्ल्ड कप संपल्यावर पोस्टाच्या तिकिटांचा ‘गोल’

$
0
0
टपाल खात्याने फुटबॉल वर्ल्ड कपवर तिकीट काढले असून, ते पुण्यातील सर्व टपाल कार्यालयांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. या निमित्ताने टपाल खात्याने भारतीय फुटबॉलच्या इतिहासाची माहिती देणारी वेबसाइट तयार केली असून, त्यावरून ऑनलाइन पोस्टाची तिकिटे खरेदी करता येणार आहेत.

ढोलपथकांबाबत पोलिस भूमिका कधी घेणार?

$
0
0
ढोलपथकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या पुणे पोलिसांनी अद्याप ढोलपथकांबाबतची भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे सराव कुठे करायचा, किती वेळ करायचा, किती ढोल वापरायचे, टोल वापरायचा का नाही याबाबत पथकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून, पोलिसांकडून पथकांबाबतची भूमिका कधी घेतली जाणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

रघुराम राजन यांच्या नावाने फसवणूक कायम

$
0
0
रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) गव्हर्नर रघुराम राजन यांच्या नावाने ई-मेल करून फसवणुकीच्या घटना अजूनही सुरूच आहेत. रिझर्व्ह बँकेचा लोगो आणि रघुराम राजन यांचा फोटो वापरून ई-मेल येत असल्याने नागरिक चक्रावून गेले आहेत.

पानशेत पूरग्रस्तांना दिलासा

$
0
0
पानशेत पूरग्रस्त वसाहतीतील अतिक्रमणे दंडात्मक आकारणी करून नियमित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. या निर्णयामुळे शहरातील हजारो पूरग्रस्तांना दिलासा मिळणार आहे.

दिलासा, ‘लिमिटेड’ दरवाढ ‘अनलिमिटेड’!

$
0
0
वीज दरवाढीतून ग्राहकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने देऊ केलेल्या आर्थिक मदतीपैकी दरमहा शंभर कोटी रुपयांच्या निधीला राज्य वीज नियामक आयोगाने ब्रेक लावला आहे.

बारामती, पुरंदर ‘टँकर’वर

$
0
0
पावसाने दडी मारल्याने निर्माण झालेले पाणी टंचाईचे सकट गडद झाले असून, जिल्ह्यात बारामती, पुरंदर आणि आंबेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये पाण्याची उपलब्धता आता ‘टँकर’वर अवलंबून आहे.

कचरावेचकांसाठी१.५ कोटी रुपये

$
0
0
महापालिकेच्या हद्दीत कचरा गोळा करणाऱ्या व्यक्तींना, तसेच बायोगॅस प्रकल्पावर काम करणाऱ्या कामगारांना महापालिकेच्या विविध आरोग्य योजनांचा फायदा देण्याच्या प्रस्तावाला मंगळवारी मान्यता देण्यात आली.

पुढील तीन दिवस पावसाचे

$
0
0
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर मंगळवारी पुन्हा शहरात संततधार पावसाने हजेरी लावली. दुपारच्या वेळेत शहरात सर्वत्र हलक्या ते मध्यम सरी बरसल्या. सायंकाळी साडेपाचपर्यंत शहरात तीन मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

राजकीय वादातून आंबेगावात खून

$
0
0
आंबेगाव खुर्द येथे एका ३२ वर्षाच्या व्यक्तीचा धारधार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली. हा प्रकार ग्रामपंचायत निवडणुकांच्या वादातून झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

‘झेडपी’च्या शाळांत सेमी इंग्लिश

$
0
0
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षणाची ‘गुणवत्ता वाढविण्या’साठी राज्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये सेमी इंग्लिश माध्यमातून शिक्षण देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारसमोर आहे. त्याला मान्यता मिळाल्यास ग्रामीण भागातील साठ हजारांवर शाळांमध्ये सेमी इंग्लिशचे माध्यम उपलब्ध होईल.

कास पठाराला पावसाची प्रतीक्षा

$
0
0
पावसाने पाठ फिरवल्याचा फटका शेतीबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातील वनक्षेत्र आणि विविध नैसर्गिक अधिवसानांही बसला आहे. एरवी जून अखेरपासूनच हिरव्या आणि विविध रंगांच्या आकर्षक फुलांची झालर पांघरणारे कास पठार यंदा जुलैचा दुसरा आठवडा उलटला तरी अजून फुललेले नाही. त्यामुळे ‘महाराष्ट्राची व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ म्हणून ओळख असलेल्या या पठारावर जाणाऱ्या पर्यटकांच्या पदरात यंदा निराशाच पडली आहे.

मुमताज शेख ‘कन्या महाराष्ट्राची’

$
0
0
नारी समता मंचातर्फे दिला जाणारा कन्या महाराष्ट्राची पुरस्कार मुमताज शेख यांना जाहीर झाला आहे.

डायबेटिस पेशंटचे ५,५०० रुपये वाचणार

$
0
0
आयुष्यभर औषधे घ्याव्या लागणाऱ्या डायबेटिस, हार्टच्या पेशंटच्या खिशावर महागड्या औषधांमुळे चांगलाच भुर्दंड पडत होता. मात्र ‘नॅशनल फार्मास्युटिकल प्राईसिंग अॅथॉरिटी’ने (एनपीपीए) या दोन्ही आजारांच्या १०८ औषधांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतल्याने डायबेटिसच्या पेशंटचे वर्षाकाठी साडेपाच हजार रुपये, तर हार्टच्या पेशंटचे अडीच हजार रुपये वाचणार आहेत. या पेशंटना अप्रत्यक्षरीत्या ‘एनपीपीए’ने ‘बोनस’च दिल्याचे मानले जात आहे.

‘आदर्श आरोग्य केंद्र’ संकल्पना राज्यभर

$
0
0
प्राथमिक आरोग्य केंद्रांचा पुणे जिल्ह्याचा पॅटर्न आता राज्यभर राबविण्यात येणार आहे. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचे जिल्हा आरोग्य अधिकारी आणि शल्य चिकित्सकांनी पुणे जिल्ह्यातील आदर्श मानल्या गेलेल्या पंधरा प्राथमिक आरोग्य केंद्रांची पाहणी केल्यानंतर आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक यांनी नुकतीच ही घोषणा केली.

लोकशाही नव्हे ही तर धनाढ्यशाही

$
0
0
‘संपत्तीच्या जोरावर भांडवलदार प्रबळ होऊ पाहत आहेत. लोकशाहीचे स्वरूप बदलून ते धनाढ्यशाही होत असल्याचे चित्र दुर्दैवी आहे. अशा वेळी कामगारांची हिंमत वाढविण्यासाठी कामगार चळवळीची गरज महत्त्वाची आहे,’ असे मत ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी मांडले.

एसटी कर्मचाऱ्यांचे आज डेपोंवर धरणे आंदोलन

$
0
0
एसटी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी राज्यातील १७ जुलै रोजी (आज) सर्व डेपोंवर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय महाराष्ट्र स्टेट ट्रान्स्पोर्ट कामगार संघटनेने घेतला आहे. राज्यातील सर्व एसटी डेपोंवर हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी कळवले आहे.

बदल्यांसाठी शिक्षक रंगवताहेत भिंती

$
0
0
शाळेतील वर्गांच्या भिंती पेन, पेन्सिल अथवा खडूने रंगवू नका असे विद्यार्थ्यांना नेहमीच सांगणाऱ्या शिक्षकांवरच नोकरीमध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बदलीसाठी जिल्हा परिषदेत भिंत रंगवण्याची वेळ आली आहे. पुण्यातून अन्य जिल्ह्यात जाण्यासाठी किंवा इतर ठिकाणाहून पुण्यात येऊ इच्छिणाऱ्या शिक्षकांनी परिषदेच्या शिक्षण विभागाबाहेरील भिंतीवर त्याची माहिती लिहिली आहे.

नगर रोडला हवे फायर ब्रिगेड केंद्र

$
0
0
चंदननगर, वडगाव शेरी, खराडी या नगर रोड परिसराचा गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर विकास झाला आहे. हॉटेल, मॉल, बीपीओ कंपन्या, बड्या सोसायट्या अशी रेलचेल असूनही या भागामध्ये एकही अग्निशामक केंद्र नाही. एखाद्या ठिकाणी आग लागल्यावर ती आटोक्यात आणण्यासाठी येरवडा अग्निशामक केंद्राचा आधार घ्यावा लागतो.

नोंदी घेण्याच्या नावाखाली फसवणूक

$
0
0
महापालिका हद्दीत समाविष्ट होणाऱ्या ३४ गावांचे दप्तर गटविकास अधिकाऱ्यांकडे जमा झाले असले तरी बेकायदा बांधकामांच्या नोंदी घेण्याचे आश्वासन देऊन नागरिकांकडून पैसे उकळण्याचे प्रकार केले जात आहेत. काही गावांचे सरपंच व ग्रामसेवकांनी हा ‘उद्योग’ चालविला असून, त्यात विनापरवाना बांधकाम केलेल्या नागरिकांची फसवणूक होत आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images